बीइंग नारी... प्रस्तावना....

 


बीइंग नारी...

जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन

नमस्कार मंडळी!

ह्या विषयावर लिहावे हा विचार मनात खूप वर्षापासून घोळत होता. कामाचा व्याप आणि नात्याची छत्री अशी वाढत गेली आणि मनात असूनही हा विषय लेखणीतून उतरला नाही.

मानवी स्वभाव, आपली वेळ निघून गेली की आपण त्या गोष्टीकडे ढुंकूनही बघत नाही. मीही धावत्या काळाच्या मागे धावत तो काळ विसरले होतेच.

आज ही समस्या आपल्या समजात वाढत आहे. आपल्या समाजातील १५% जोडपी ह्या समस्येशी झुंज देत आहेत. हिची ती उत्तम वेळ आहे जेव्हा ही कथा समजासमोर यावी असं मला वाटतं. सहाजिकच ही कथा फक्त माझी नसणारच, अश्या अनेक नायक नायिका आपल्या अवतीभवती असतील. त्या साऱ्यांच प्रतिनिधित्व करण्याची जवाबदारी पेलत मी ही माझी कथा, आत्मकथनात्मक कादंबरी प्रकारातून आपल्या समोर प्रस्तुत करत आहे.

सादर कादंबरीतील घटना, संदर्भ आणि पात्र ह्या साधरणपणे  ह्या २००३ ते २०१६ काळात मांडल्या गेल्या आहेत. म्हणजे, तंत्रज्ञानाचा उगवता काळ,  IT क्षेत्राची भरभराट, मुलींचं उच्च शिक्षण, स्त्री स्वतंत्रता, आधुनिक विचारांचे वारे, प्रेमविवाहाचे नारे... सगळीकडे विद्रोह आणि वाढती चढाओढ... आणि, मग त्यातला जीवनातला संघर्ष, अस्तित्व जपण्याची लढाई...

जेव्हा एका स्त्रीला आई होणं अवघड होतं तेव्हां तो संघर्ष तिच्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाचा असतो... पण तरीही वाट तिला ऐकटीला चालावी लागते. तिचा जोडीदार महत्वाची भूमिका पार पडत असतो. आणि मग नाती उमगायला लागतात, जवळचे, दूरचे कळायला लागतात. पोकळ नात्याचं अस्तिव क्षीण होतं जातं आणि मनाच्या नात्यांच्या गाठी घट्ट पडत जातात.

न्यूनगंड निर्माण होता, वाद हा आयुष्याचा भाग होतो, गैरसमज, एकमेकांवर आरोप वाढत जातात. समाजाची भीती वाटते. स्त्रीत्वाचा अपमान वाटतो, सारं काही असून नकोसं वाटतं. जीवनात नकारात्मकत्ता वास करते, ती निघणे कठीण होते आणि मग सारच कसं सुटत जातं, त्या जीवघेण्या चढाओढीत जगणं कठीण होतं, आयुष्याचे निर्णयावर मन परत परत फिरतं आणि मग मन दगड होतं... कशाच काहीच वाटत नाही, अश्रू संपले असतात, वेदना जाणवत नाही, तरीही मनात असलेली जिद्द मनाला ओढत असते, तिथूनच सुरु होते मग आयुष्याच नवीन वळण...

कथेची नायिका उर्वी ही माझं, तुमचं आणि कदाचित आपल्यातल्या काहीचं प्रतीरूप असल्यामुळे ही कथा लिहितांना मनात खूप प्रश्न आहेत. कथा ही वास्तविकता आणि सत्य अनुभवाशी निगडीत आहेच पण कथेत वावरणारी पात्रांचे नाव, काही घटना कथेच्या मागणीनुसार बदलल्या आहेत.

मनात स्त्री म्हणून कोलाहाल आहे... पण बीइंग नारी मला ते सारं लेखणीतून उतरवायचं आहे... तो जीवघेणा प्रवास, त्यातले अनुभव, कधी सुखाची लहर तर कधी दुःखाची झळ, कधी गंमत तर कधी जीवघेणा घोर आणि मग अनंत काळासाठी बाहाल झालेलं मातृत्व मांडायची आहे.

अर्थात माझ्यासारख्या अनेकांची असणारी ही कथा येणाऱ्या पिढीसाठी माझ्या लेखीनितून मांडायची आहे...

तेव्हां माझे वाचक मला नक्कीच सांभाळून घेतील ह्यात शंका नाही... आपल्या प्रोत्साहनाची गरज आहे पण नुसती कौतुकाची थाप नको तर मार्गदर्शनाचीही अपेक्षा आहे.

सोपं नाही Being a  नारी....

स्वतःच्या अस्तित्वाला जपत,

ती जीवघेणी लढाई लढण्याची सारी खुमारी...

तारेवरची कसरत असते सारी,

आजच्या काळात अस्तित्व जपत

कठीण आहे हो Being a  नारी,

तरीही घेते ती भरारी...

नमन तुला शत-शत नारी!!

कथा लवकरच..

कथेच्या प्रकाशनचे सर्व अधिकार लेखीकडे राखीव, ह्याही नोंद घ्यावी!

------------------------------------------

कथा आठवड्यातून दोनदा... 


Post a Comment

0 Comments