बीइंग नारी... भाग ८

 बीइंग नारी... भाग ८


आधीचा भाग इथे वाचाhttps://www.manatalyatalyat.com/2022/07/blog-post_19.html

आकाश हॉलमध्ये आला, उर्वी अजूनही तशीच बसली होती. आकाश तिच्या सोमर येवून बसला. तिला बघत होता, एका क्षणाला दोघांच्या नजरा एकमेकांवर पडल्या आणि राग उडून गेला. दोघेही मिठीत शिरण्यासाठी एकदम समोर आले. आणि फुसकं भांडण फूस झालं...
काय आहे ना, भांडण कधी दोघांमुळे होतं नसते, दोघांच्या भांडणाला कारणीभूत तिसरा असतो...
आकाशने उर्वीला कुशीत घेत बेडरूम मध्ये आणलं,
“उर्वी काय बोलायचं होतं तुला?”
“काही नाही रे, तोच नेहमीचा विषय, घायचं ना रे आता मनावर... वर्ष होईल लग्नाला. तुलाही हवं होतं ना बाळ लवकर...”
आकाशने दीर्घ श्वास घेतला,
“उर्वी, मला हवं होतं हे जेव्हा मी म्हणालो होतो ना तेव्हां परिस्थिती वेगळी होती. भावना हावी झाल्या होत्या. पण आता आपण आपला विचार करायचा ना. आणि आपण कुठे काही करत आहोत. राहिलं तर आनंद आहे. पण तू आणि मी मिळून खूप काही करायचं आहे.”
“हो रे, पण, हेही म्हत्वाच आहे ना? स्त्री म्हणून माझ्यासाठी... "
“आहे, पण..."
"स्व अस्तित्वाच्या नादात हे स्त्रीत्व नको ना मागे राहायला. मला कसं सारंच हवं आहे. ”
"तुझ्या माझ्या म्हण्याने ते आताच होणार आहे का?"
"तसं नाही रे, पण मी मागे राहायला नको ना, आणि वेळ निघून गेल्यावर काय मग परत खूप अडचण आली तर?"
:ये असलं काही होणार नाही, आता कुठे आपला हनिमून सुरु आहे...”
आणि आकाशने उर्वीला अंगावर ओढलं, उर्वीच्या त्याच्या गालावरच्या वाढलेल्या दाढीच्या बारीक केसांना ओढत त्याला म्हणाली,
“तू काय बोलणार होतास... मी उगाच ओढलं ना सारं...”
आकाशने मिठी गच्च केली आणि दोघांची अंग एकमेकांना जणू चीपकली होती, दोघांच्या श्वासांची गर्मी वाढायला लागली होती. तर आकाश म्हणाला,
“आता तू जॉब करतेस, आपलं निभतं ग दोघांच. पैसेही बऱ्या पैकी जमा झालेत आता. माझी तयारी सुरु झाली आहे. मी हा जॉब सोडून नवीन ट्राय करतो... म्हणजे तुला योग्य वाटत असेल तर.”
उर्वीसमोर प्रश्न होता, पण तिने त्याला होकार दिला, म्हणाली,
“बिनधास्त सोड, आणि नवीन प्रयत्न कर. मी आहे ना. काळजी करू नकोस.”
उर्वीच्या आत्मविश्वासाने आकाशची जिद्द वाढली होती. त्याला आता ह्या क्षणाला असंच जावू द्यायचं नव्हतं. तिच्या कानात तो म्हणाला,
“आपण आपल्या बाईकने महाबळेश्वरला जावूया, आपल्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला...”
आणि उर्वी त्याच्या कुशीत शिरली.. तो तिच्यात परत कैद झाला.
___________
दुसऱ्या दिवशी, उर्वी तिच्या ऑफिसमध्ये होती, तोच तिला आकाशचा फोन आला,
“उर्वी, आई येत आहे, उद्या सकाळी. तुला जमेल काय सुट्टी घ्यायला?”
उर्वीसाठी अनपेक्षित होतं हे, ती लगेच म्हणाली,
“अरे पण असं अचानक! काय झालंय एवढ्या घाईत यायला?”
“अग ती येत आहे, स्वतःहून... हे महत्वाच नाही का?”
“हो, आहेच ना, पण...? का? कळेल का?”
“ आता तू प्रश्नांची सूची तयार करू नकोस."
"अरे पण..."
"पण बीन काही नाही, ती म्हणाली, आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे मग तिला यायचं आहे.”
उर्वीच्या तोंडातून हसू एकदम फुटलं, हसू आवरलं नाही तिला, मनात म्हणाली,
“चायला, मुलाचा वाढदिवस लक्षात राहत नाही आणि लग्नाचा वाढदिवस लक्षात आहे सासूच्या. "
तिचं हसणं आकाशने ऐकलं, त्यालाही सारं कळालं होतं,
“ये उरू, मला माहित आहे तू काय विचार करत आहेस ते. पण ती येत आहे. आता नाही म्हणू का? मग भोग तू पुढे काय होणार ह्या विचारात... चल सांगतो तिला ट्रॅवल स्टेशनवरून परत जायला.”
उर्वी हसतच म्हणाली,
“अरे एकदम प्रेम उतू गेलेलं दिसते... ट्रॅवल स्टेशनवर पोहचली सुद्धा..”
“उर्वी गप्प ना, तुला जमणार आहे का तिला घ्यायला जायला तेवढं सांग?”
उर्वी विचार करत म्हणाली,
“नाही रे, पण कुठली ट्रॅवल आहे, आपल्या घराजवळ येईल ना ती, समोर काळेवाडी फाट्यापर्यंत आली तरी जाईल मी घ्यायला. जरा उशिरा येईल ऑफिसला.”
“अरे हो, माझ्या लक्षात आलं नाही.”
“तुझ्या लक्षात कसं राहील, आता लक्ष माताजी ना...”
“उरू...”
“ठीक आहे बालक...”
“मग ठीक आहे. माझं जमणार नाही ग उद्या...”
“हुम्म्म तुझं जमत नसतं ना वेळेवर... नेहमीचं तुझं असले काम माझ्या कडे असतात.”
“ये बाई, राहूदे पुराण तुझ्याजवळ...”
“राहिलं...”
उर्वीने फोन ठेवला. पण प्रश्न उठला होता,
“का येते ही आता? कशाला हवी मधात, आता महाबाळेश्वरला जाण्याच्या प्लॅनची तर वाट लागली. आकाश काही आईला घरी सोडून माझ्यासोबत जायचा नाही...”
तेवढ्यात समोरून माने मॅडम आल्या,
“काय ग, काय बडबडतेस ओठातल्या ओठांत, आली का तुझी सासू?”
माने मॅडम म्हणजे ना, समोरच्याला बघताच त्याच्या मनात काय सुरु आहे हे स्पष्ट ओळखत असत.
उर्वी हसली, “काय हो मॅडम, कसं कळतं तुम्हाला?”
“अरे, उगीच नाही घालवले २० वर्ष संसारात, कुठे राम आहे आणि मरण हे कसं बिंबल्या गेलंय ग. जावूदे, काय झालं.”
“अहो सासूबाई येत आहेत अजून इकडे.”
“मग, तुझी मजा की, आता रोज सकाळी स्वयंपाक करून यावं लागेल तुला, माझ्यासाठी एक चापती जास्त आणत जा, म्हणजे आता तुला कराव्या लागणार ना, मोजून तर करणार नाहीस..”
“ते आणेल हो, पण...”
“पण काय ग! हे असचं असतं ग, आपल्याला काय हवंय हे कुठे कुणाला कळत असतं... येते तर येवू दे, येईल आणि जाईल, तिच्यामुळे तुम्ही दोघं भांडू नका... ती तर येतंच त्याच्यासाठी असेल पण धुडकावून लावायचा बेत... आणि हा, जेवढा लवकर जमेल ना तेवढा लवकर चान्स घे, तुला कारण सापडतील सासूच न ऐकण्याचे. आणि नवरापण काहीच बोलू शकणार नाही... अरे ट्रिक असते ती... "
“हो ना मॅडम, चालू आहेत प्रयत्न...”
“हुम्म्म, आणि अजिबात टेन्शन घायचं नाही... टेंशन द्यायच, काय!”
उर्वी स्मित हसली, तर त्या परत म्हणाल्या,
“अग, बाळ झालं की द्यायचं सासूकडे, आपल्यापेक्षा ना त्यांना नातवाची खूप चिंता असते. करेल त्याचं. आणि सुट्टीच्या दिवशी तू कर बाळाच म्हणजे कुणाच्या मध्ये पडायचं नाही, पण तू नौकरी सोडायची नाही... महिन्याचा पगार हातात पडला ना, की कुणीच काही बोलत नाही. आणि मुलं मोठी झाली की करतात ग सगळं, आपल्याला बसं त्यांच्यावर नजर ठेवावी लागते. आता माझा मुलगा दहावीत गेलाय ह्यावर्षी. वाटते का मी पंधरा वर्षाच्या मुलाची आई, माझ्या सासूने जाम छडलं मला पण केलं ग तिने माझ्या मुलाच... बघ नाव निघालं ना, तेवढच ग मला समाधान, आता सासू काहीच करू शकत नाही. असते घरी, मीचं बाई ठेवली त्यांच्यासाठी दिवसभर असते ती सोबत तिच्या. जातात ग दिवसं भरा भर उडतात, पण आपण उडणं सोडायचं नाही...”
माने मॅडम हसत त्यांच्या पिरेडसाठी निघून गेल्या. उर्वी स्टाफ रूममध्ये विचार करत होती. तिलाही प्रश्न पडला,
“खरच माझी सासू करेल का माझं? मला बाळ झालं तर... निदान माझ्या बळाच?”
सासूबाई आलेल्या मग महाबळेश्वर काही होणार नव्हतं, उर्वी त्या रात्री जेवण झाल्यावर आकाशसोबत बोलत बसली होती,
“मग रे, काय करायचं पहिल्या वाढदिवसाला... मी हॉफ डे घेणार आहे.”
“मी पण घेतोय, जावूया कुठेतरी जवळपास दोघंच...”
“कसं जाणार रे, आई आहेत ना. मागे त्यांनी काय धूम मचवली होती”
"ये काहीही बोलू नकोस, काय शब्द आहेत तुझे..."
"मग, काय म्हणू."
“जावू ग खूप बहाणे आहेत.”
“काय रे...”
“अग, लॅपटॉपचा की पॅड काम करत नाही आहे, सर्विस सेंटरला अपॉइनमेंट घेतली आहे मी... मस्त जावून येवू लोंग एक दीड तास, मग आईला घेवून बाहेर जेवायला जावू.”
“मस्त, ठरलं मग...”
मग अरे प्यार किया तो डरना क्या... अब तो बस तुम हो.. तुम्हारे सिवा जाना कहा...,
चायला जमलं की..”
उर्वीने आकाशला हलकंस मारलं,
“ये काय ते, इकडून तिकडून घेवून टाक टूक केलं आणि जमलं म्हणतोय, अरे पण महाबळेश्वरला कधी जावू”
“जावू ग, आई परत गेल्यावर, ती काय इथे राहायची नाही, तिला काही इथे करमत नाही तसंही, आता आठ दिवस झाले कि म्हणेल, जायचं म्हणून...”
आणि परत म्हणाला, “ये हसू नकोस, माझी आई आहे ती....”
उर्वी गुमान आकाशच्या कुशीत शिरली, तशी ती शहारली, अंगावर रोमांच उभे झाले होते. आकाशने तिला डोळा मारला, गुलाबी थंडीचे दिवस नुकतेच संपले होते. फेब्रुवारी महिन्यात ना थंडी ना खूप ऊन, तरीही त्या समयी गार वारा सुटला होता...
उर्वीने मनातून हाक मारावी असं झालं, आणि आकाश हळूहळू तिच्यात सामावत गेला. वऱ्याचा हळुवार आवाज कानात शिरत होता तसे तशे ते दोघांत शिरत होते. हळुवार वाऱ्याने मनाला साद दिली आणि दोन्ही मन अगदीच तृप्त होवून निपचित पडून राहिली. हळूच आकाशने उर्वीच्या कानात म्हटलं,
“काय मग, झालंय ना तुझ्या मनासारखं...”
तिने कुरकुरत कूस पलटली, आकाशने पलटून तिच्या माथ्यावर ओठ टिपली, स्वतःला सावरत तो उठला. उर्वीने त्याचा हात पकडला,
“उर्वी जरा अभ्यास करायचा आहे ग, तू झोप ना... मी जरा एक प्रोग्राम करून बघतो, फ्रेश झालोय आता...”
तिने हात सोडला, त्याने तिच्या अंगावर पांघरून घातलं, तिच्या चेहऱ्यावर असंख्य समाधान त्याला दिसलं तसा तो मनातून सुखावला. तिला नजरेने खुणावत तो दार उघडून बाहेर आला, त्यांच्या खोलीच्या जवळ त्याला आई उभी दिसली, आकाश दचकला,
“आई, तू अजून जागी आहेस. इथे दाराजवळ काय करतेस?”
“अरे, मी बाथरूमला जात होती म्हणून.”
आकाशला काय बोलावं सुचलं नाही, उर्वीनेही काहीसं ऐकलं. ती तशीच पडून राहिली. आकाश परत खोलीत आला, आणि काम करत बसला. आई दारा जवळ का उभी होती ही त्याला सुचत नव्हतं, शेवटी मनाला समजावलं, कारण बाथरूमसाठी खोलीच्या दाराजवळूनचं जावं लागत होतं. तो खूप वेळ अभ्यास करत राहिला.
कथा क्रमशः ....
आधीचे भाग पेजवर आहेत . किंवा वेबसाइटवर, कथा मालिका ह्या पेजवर बीइंग नारी... मध्ये बघा.. सर्व कथेचे भाग आहेत.
© उर्मिला देवेन
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... कथा नावासोबत शेयर करायला हरकत नाही.
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगलPost a Comment

0 Comments