बीइंग नारी... भाग ४


 


बीइंग नारी... भाग ४ 

जेव्हा आई होणं अवघड होते...

भाग ३ इथे वाचा भाग ३


कथा मालिकेची लिंक - कथेचे प्रकाशित झालेले सर्व भाग इथे आहेत.

भाग ४ -

हसता हसता आकाशने डोळे पुसले आणि, तिला बघत म्हणाला,

“निघ तू, सोपं नाही सारं... आज मी हरलोय, तू नको. स्त्रीच्या मनात काय सुरु असतं हे कधी कुणाला कळतं का? काल परवापर्यंत माझ्या बहिणीशी भांडत होतो, ती अभ्यास करत नाही म्हणून तिच्याशी अबोला धरून होता. किती बोलायचो तिला, पण ती काहीच बोलली नाही... कि मी समजून घेतलं नाही, पण काय समजायचं होतं हे तरी कळायला हवं होतं ना... का गेली ती? सारे प्रश्न निरुत्तर ठेवून.”

शांत झाला, म्हणाला,

“तू काहीच बोलणार नाहीस का? की तुलाही मला समजण्यासाठी अजून काही करावं लागेल... बोल ना एकदाची! दे भडाभड शिव्या... काही लायकी नाही माझी, मोठे मोठे शब्द तानायचो ना, दिसली आता तुला माझी लायकी, हे असे दीवस काढले आहेत ग मी, खूप बघितलं आहे.”

उर्वीने त्याला समोर बसवलं, त्याचा हात हातात घेतला, अजूनही त्या हाताला रॉकेलचा वास तसाच होता. त्याच्या पाणावलेल्या डोळ्यात डोळे नजर रोखून ती म्हणाली,

“आकाश मी आहे तुझ्या सोबत अजून...”

पाणावलेले आकाशचे डोळे, जरा चकाकले, उर्वीने हात अजून घट्ट केला, तिच्या नजरेत त्याच्यासाठी काळजी होती.

“तुझा हात हातात घेतलाय म्हणजे तो काय नुसता हातात नाही माझ्या. तुझ्या माझ्या प्रेमाच्या धाग्यात काळजीचा धागाही गुंतला आहे, मग आपल्या ह्या नात्याची वीण अजूनच घट्ट होते.”

आता आकाशने त्याचा हात तिच्या हातावर परत घट्ट केला, तिला बघत राहिला,

ती त्याला म्हणाली,

“तू हरला नाहीस. एवढं लक्षात ठेव. मी तुला हरू द्यायची नाही. आणि मी आज इथेच आहे, माझ्या घरी कळवलं मी की मी आज इकडे थांबते आहे म्हणून.”

आकाश चकाकला,

“तू तुझ्या घरी सांगितलं?”

“घाबरू नकोस, तसलं काही बोलले नाही, मृत्यूचं एकच कारण असतं का? मी बोलले. तू काळजी करू नकोस.”

आकाशने डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला, उर्वी परत म्हणाली,

“जे झालंय त्यात तुझा दोष नव्हता... पण आता तुला ह्यातून उठावं लागेल, माझ्यासाठी... आहे तयारी? मला काहीच माहित नाही तुझ्या बहिणीबद्दल पण तरीही मी जे समजायचं ते समजले... हे परत हवंय तुला”?

ती स्मित हसली, तो आवक बघत राहिला, ती म्हणाली,

“माझ्या लढाईचा शंखनाद झालंय आकाश, आता तर सज्ज व्हावं लागेल. मलाही आणि तुलाही....”

आकाश उभा झाला, आणि त्याने गच्च मिठी मारली, मिठीत रडून आसवं सारी उर्वीच्या खाद्यावर पडून तिची ओढणी ओली झाली होती. आकाश शांत झाला होता.  बाहेर अजूनच रडण्याचा आवाज वाढला, कुणीतरी नातेवाईक आले होते. आकाशने उर्विवर आत्मविश्वासाने बघितलं, नजरने सारंकाही बोलून झालं, हलकीशी हास्य मुद्रा त्याच्या चेहऱ्यावर आली, तो खोलीतून निघाला, माधुरी त्याला दिसली,

“माधुरी, खूप खूप धन्यवाद तुझे... जरा वेळ थांब तिच्यासोबत. मी तिला घरात घेवून जाईल जरावेळासाठी. नंतर घेवून जा तिला.”

माधुरीने नुसता मान हलवत होकार दिला. तीही सारंकाही बघून चकित होती. दोघांच्या मनाच नातं आज साऱ्यांनी अनुभवलं होतं. काही वेळाने रंजित उर्वीला आणि माधुरीला घेवून आकाशच्या घरात गेला. आकाशच्या आईचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं. उर्वीला काय बोलावं कळत नव्हतं. तिची नजर फक्त दूरू कोपऱ्यात बसलेल्या आकाशवर होती. मनाला येईल तसं त्याच्या आईला सांत्वना देत काही वेळ उर्वी आणि माधुरी घरात बसल्या. उर्वीवर सर्वांच्या नजरा पडत होत्या. अबोल इशारे नकळत साऱ्यांच्या नजरा वाचत होत्या. नंतर रंजित त्यांना घेवून तिथून निघून गेला.

पंधरा दिवस लोटले होते. आणि कॉलेजला मार्कलिस्ट पोहचल्या होत्या. सारेच मार्कलीस्ट घेण्यासाठी जमणार होते. आकाशने आज यावं ह्याच प्रतीक्षेत उर्वी होती. ती कॉलेजला पोहचली आणि आकाश तिला नेहमीच्या जागी उभा तिची वाट बघत दिसला.

बोलायचं खूप होतं पण वेळ नव्हता, तिला बघातच आकाशच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण आवर घातला त्याने मनाला. दोघांनी मोजका वेळ सोबत घालवला, मार्कशीट बघितल्या. झेरॉक्स केल्या.

“उर्वी, मी MBA एडमिशन घेतोय, आता मला मार्कशीट आणि बाकीचे कागदपत्र घेवून लगेच निघायचं आहे. बाकी मी सर्व काही करतो, तू काळजी करू नकोस. मला जरा वेळ दे...”

“हुम्म्म, मी आहे तुझ्यासोबत...”

“बसं, अजून मी हरायला नको... ह्याची काळजी घे... मी फोन करतो तुला.”

जरा थांबला, म्हणाला,

“उर्वी, नाही जमलं, पटलं तर मला सोड बिनधास्त पण आयुष्याचा साथ सोडू नकोस... स्त्री म्हणून जन्म घेणं, आणि त्याला जगणं, दुसऱ्यांना जगवणं हे सारं एक पर्व आहे. तू ते भरभरून जगावं बसं एवढंच ग...”

तो घाईत निघून गेला, उर्वीही घरी आली, घरात गोंधळ होता, सर्वाना कौतुक होतं उर्वीच, मार्कशीट बघत सर्व आनंदी होते. तोच तिची नजर ओरीजनल मार्कशीटवर पडली, आकाशशी बोलतांना त्याची मार्कशीट आणि उर्वीची बदलली होती. आकाश उर्वीची मार्कशीट घेवून MBA एडमिशनसाठी निघून गेला होता.

उर्वीचा गोंधळ उडाला, काय करावं कळत नव्हतं, तिने सर्वांच्या हातून मार्कशीट घेतल्या आणि गप्पच राहिली. संध्याकाळी घरात कुणी नसतांना तिने आकाशला फोन लावला, योगायोग तो फोनवर आला, त्याला सर्व सांगितलं तर म्हणाला,

“अग मी तर मार्कशीट कॉलेजला दिलीपण, त्या क्लार्कने पण बघितली नाही... तू काळजी करु नकोस. मी उद्या येतो... तशीही माझी उद्या शिफ्ट नाही आहे. जमेल मला.”

आकाशने उर्वीची मार्कशीट कॉलेजमधून मिळवली आणि तिला भेटायला पोहचला,

बऱ्याच दिवसांनी दोघे भेटले होते. कॉलेजच्या आवारात त्यांनी अनेक गप्पा केल्या. पुढे काय काय आणि कसं करायचं हे सारं ठरवत दोघेही रमले होते.

तोच आकाश म्हणाला,

“उर्वी मला मुलगी पाहिजे हा, पहिली...”

“हुम्मम... पण मुलगा झाला तर...”

“तर दुसरी...”

“मुलगा झाला तर...”

“तर तिसरी... पण मला मुलगी पाहिजे...”

त्याचे डोळे भरून आले होते... उर्वीला इशारा कळला होता, ती गप्प झाली, तिला तो हळवा कोपरा परत हिरवा करायचा नव्हता.

मनातले काही कोपरे माणसाला कधीही हळहळून टाकतात... त्यावर न बोलता इलाज हवा असतो...

जरा वेळाने त्याने तिचा हात हातात घेतला,

“पण, तू, तू म्हणून जगावं ग, स्वतःच अस्तिव जग, उभं कर... मी भावनेच्या भरात वाहवून तुला काय बोललो हे विसर आता, आपला संघर्ष खूप कठीण आहे. तू आणि मी आपल्याच लोकांच्यासमोर उभे असणार आहोत. प्रेमविवाहाला नाही ग मन स्वीकारत अजूनही... आणि मी तर शून्य आहे. अजून मला स्वतःला उभं करायचं आहे तुझ्यासाठी...”

उर्वी मनात खोल शिरली, हरवली होती त्याच्या त्या भावनेत.

उर्वी आणि आकाशचा संघर्ष सुरु झाला होता, आकाशचा स्वतःला सेटल करण्याचा आणि उर्वीला कामयस्वरूपी बायको म्हणून आयुष्यात आणण्याचा आणि उर्वीचा त्याला साथ देण्यासाठी वाटेल ते करण्याचा.

कॉलेजचे दिवस संपले होते. संघर्षाला वाट माहित होती, दोघेही निघाले होते त्या वाटेवर...

करिअर आणि फक्त करिअर हाच ध्यास होता दोघांचा. कामानिमित्य भेटी होत होत्याच. एकमेकांचे रुसवे फुगवे काढत, कधी सावरत ते दोघेही प्रेमात होते. तो काळ काही वेगळाच होता, प्रेमवीर भेटले की प्रेमाच्या गप्पा होतात पण ह्याचं वेगळं होतं, ह्या दोघांची भेट म्हणजे रविवार, कुठली ना कुठली नौकरी संदर्भात परीक्षा किंवा. इंटरव्यू. सोबत नौकरीसाठी फॉर्म भरणं, काय कुठे करायचं हे ठरवणं आणि सारं काही होत होतं.

वर्ष गेलं, आकाश गावातल्या फाक्ट्रीत कामाला जायचा आणि कॉलेज करायचा. उर्वी मात्र लग्नाचा विषय टाळावा म्हणून नौकरी करत बाहेरगावी राहायला होती. दोघेही जाम बिझी होते. उर्वी घरच्यांना सांभाळत करीयरमध्ये तर आकाश नौकरी करत त्याच्या MBA मध्ये. उर्वीच करीयर भरारी घेत होतं, आता तिला लठ्ठ पगारची चांगल्या कॉलेज मध्ये लेक्चररची नौकरी लागली होती. आकाशचं MBA स्कॉलरशिपच्या मदतीने पूर्ण झालं होतं. तोही उत्तम संधीच्या शोधात होता. गाव सोडून आता तो पुण्यात नौकरीसाठी आला. काहीही करून नौकरी महत्वाची होती. येवढ शिक्षण घेतल्यावर कळला की अजूनही सध्याचे सॉफ्टवेअर कॉर्स करावे लागतील तेव्हा कुठे उत्तम कंपनीत एंट्री मिळेल. इथे खाण्याचे वांदे, कुठला कॉर्स करणार होता तो. मित्रांनी BE झाल्याझाल्या, बापच्या भरोशे कॉर्स केलेले आणि आता त्यांच्याकडे संध्या होत्या. आकाशने वाटेल ती संधी हाताळली, आणि पैसा हातात येवा म्हणून लेक्चररची नौकरी पत्करली. MBA करतांना त्याने सहज NET पास केलं होतं.  मग ही संधी मिळाली की, सुरुवातीला तेही गरजेची होती ना.

आता दोघांना नौकरी लागली, मग अजून मोठी नौकरी मिळावी म्हणून धडपड सूर झाली. प्रेमात आणि सारं काही ठरवण्यात बघता बघता पाच वर्ष झाली होती.

“प्रेमात तुझ्या माझ्या ही दुनिया रे कैसी

तू माझा मी तुझी ह्यालाच जग म्हणती

तरीही प्रेमात तुझ्या माझ्या ही दुनिया रे कैसी...”

असं प्रत्येक पेमीयुगल म्हणत असतं राव... पण दुनियेची सच्चाई हीच आहे, की, प्रेमाच्या काल्पनिक फुलपाखरांना उडावं वास्तविक जीवनात लागतं...

आणि आता उर्वीला घरच्यांना थांबवणं कठीण होतं. कधी जॉबसाठी बाहेर तर कधी काही करत तिने घरच्यांना रोखलं होतं.

म्हणतात जोड्या स्वर्गात ठरतात, बघाना इथे भूवर कसे पापड बेलावे लागतात...

“मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी...” हे म्हण्यापुरतंच आहे हो.... अश्या बीटविन द लाईन्स असतात ना, की वाट लागते... पण आपण तेच घेववूया... काय!

हेच हो, “मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी...”

दोन्हीकडच्यांना ओढून दोघांनी मांडवात यायला मजबूर केलं होतं... प्रचंड आत्मविश्वास भरला होता दोघांत. लाथ मारू तिथे पाणी काढू ही धम्मक नसा नसात होती. त्याच जोरावर त्यांनी घरच्यांना विश्वासात घेतलं. आणि शेवटी आकाश आणि उर्वीच्या प्रेमापुढे साऱ्यांना नमावं लागलं, मनात नव्हतं पण ओठांवर होकार द्यावा लागला... तसही पळून जावून लग्न करणं दोघांना मान्य नव्हतं. आकाशला बऱ्यापैकी नौकरी, शिवाय त्याने phdलाही सुरुवात केलेली आणि सगळच उत्तम... मग कमी कुठे असणार होती.

मग आलीच की लग्नाची वरात उर्वीच्या दारात...

पुढचा भाग इथे वाचा भाग ५

-उर्मिला देवेन 

Post a Comment

0 Comments