बीइंग नारी... भाग ११
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
.-----------------------
डॉक्टरांशी बोलून झालं होतं उर्वीच, आणि बाहेर येवून तिने फोन उचलला, आई आनंदात होती, म्हणाली,
“कुठे आहेस?"
"मी ना ...." अचानक कॉलमुळे आणि डॉक्टरच ऐकून शब्द निघाले नाही उर्वीचे.
"अग, राणीला बघायला मुलगा येणार आहे." आई उत्साहात म्हणाली.
उर्वीला वाटलच, कामाशिवाय आई काही फोन करणार नाही, ती आधीच नाराज होती, उतरत्या स्वरात म्हणाली,
“आई मी क्लिनिक मध्ये आहे, तुला नंतर कॉल करू का? आपण बोलू सविस्तर.”
“क्लिनिक मध्ये? काय ग काही गोड बातमी?”
“हो... नाही, नाही आहे.” उर्वीच्या मनात सुरु असलेला घोळ तिच्या ओठांवर आला होता.
“काय?”
“नंतर बोलते. काहीही नाही आहे.”
तरीही आईने तिच्या काळजीपोटी बोलणं सुरूच ठेवलं. कितीही झालं तरी आई होती.
“काय बाई तुम्ही आजकालच्या पोरी! कशाला आहेस हॉस्पिटल मध्ये? काय पाळलं की काय बाळ?
“आई, काहीही बोलू नकोस.”
“आता तुझं काय... काही सांगता येत नाही. करियर डोक्यावर घेवून फिरणाऱ्या मूली तुम्ही. तुम्हाला असल्या गोष्टी सुरवातीला अडचण वाटतात.”
“आई मी नंतर बोलते.”
उर्वीने फोन ठेवला.
कसं असतं ना, ओघ असतो हो, आपल्याला सांगायचं असते, कि मी तशी नाही, पण समोरचा परत तसचं बोलतो, मग वाटतं खरंच आपल्याला आपले ओळखतात काय? कदाचित समोरचा आपल्या काळजीपोटी विचारात असेलही पण शब्दांची तीव्रता भयंकर असते जेव्हां काहीच महित नसतांना आपल्याला जज केलं जातं. अंदाज बांधून गुन्हेगार ठरूवून मोकळे होतात सारे. तसं आपल्या समजात नेहमीच होतं ना, कुठलीही पळताळनी न करता आपण दुसऱ्यांवर आरोप असतो.
आकाश आणि उर्वी क्लिनिक मधून निघाले. उर्वीने टेस्टसाठी ब्लड सैंपल दिलं. तशी त्यांच्या मनात धुकधुक वाढली होती.
दोघेही घरी आले. पण उर्वीच्या मनात विचार घोळत राहिला.
“आपण प्रेग्नंट होतं हे तिला आनंद देत होतं पण मग दुसऱ्या क्षणाला वाटलं, काहीपण सांगत असेल ही डॉक्टर, ह्यांचे काय पैसे कामानायचे धंदे असतात. उगाच बोलायचं आणि मग पेशंट नेहमी जाणार... जावूदे.. नव्हतच काही असचं समजायचं... पण राहील मला आता लवकर. काय ते टेस्ट करवून घेते.”
आकाशने नेहमीप्रमाणे आईला फोन केला, तिची चौकशी केली. बोलण्याच्या नादात आकाश बोलून गेला की उर्वीला क्लिनिकला घेवून गेलेलो. मग काय, तिने जे समजायचं होतं ते तिने समजलं. बाकीच तर कुणाच्या हातात नव्हतं...
दुसऱ्या दिवशीउर्वी ऑफिसला गेली तेव्हां तिचा पडका चेहरा बघून आर्त माने मॅडम जवळ आल्या,
“काय ग काय झालं, चेहरा पडला तुझा?”
उर्वीला असं कुणी प्रेमाने बोललं नव्हतं, तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. मॅडम अगदीच तिच्या जवळ आल्या, तर उर्वी रडायला लागली, आकाश समोर असतांना ती रडली नव्हती पण आता ती अश्रू थांबवू शकली नाही. तिला असं रडत बघतांना बाकीच्या मॅडमही उर्वीच्या जवळ आल्या. माने मॅडमने तिला शांत केलं. घडलेला प्रकार तिने त्यांना सांगितला.
माने मॅडम हसत म्हणाल्या, “होतं ना कधी कधी, काही विचार करू नकोस. माझंही पाहिलं बाळ नव्हतं ग राहिलं, मग लगेच काही महिन्यात, म्हणजे ना, दोन तीन महिन्यात दिवस गेलेत मला. आणि तुझं नव्हत्यात जमा होतं, उगाच नव्हत्याच होतं समजून मनाला चुटचुट कशाला लावून घेतेस. आणि बघ डॉक्टरांचं काम असतं ते सर्व सांगणं, तरी बऱ तिने सांगितलं... काही तर काहीच बोलत नाही... पण अश्या गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात कदाचित.”
त्यात मंजिरी मॅडम म्हणाल्या, “अग काही होतं नाही, माझ्या जावूच पण असचं झालं होतं.... नसतंच ते, तुला काही त्रास होतोय का? आणि ते काही नाही, बस जुळून सुटलं असतं, तुला सांगू माझ्या बहिणीच तर चांगल मोठं झालं होतं पण त्याला हृदय नव्हतं, आता सांग! तिला तर खूप त्रास झाला होता. हे तर तुला माहित नसतांना सुटलं, मग काही विचार करू नकोस. आणि ना ते डॉक्टर कधी कधी भीती भरून देतात. डोंट वरी...”
माने मॅडम परत मंजीरीला म्हणल्या, “अग कशाला घाबरवतेस तिला, तसंही इथे कुणी नाही तिचं, आई आणि सासू सारख्याच आहेत, नवऱ्यासमोर भावना गुंडाळून गप्प असेल ही, म्हणून आता फुटली...”
“काही नाही ग, काही होतं नाही, उत्तम डॉक्टर बघ, काळजी घे, आणि लवकर संपव हा विषय... खूप काही करायचं असतं... काही मनात घेवून बसू नकोस... हीच वेळ असते स्वतःला सांभाळण्याची, मग सगळं स्वतः सांभाळलं जातं.”
तेवढ्यात लेडीज स्टाफ रूम मध्ये चहा घेवून काका शिरले, बायकांचा घोळका बघून म्हणाले,
“काय झालं रे बाबा, काही नवीन बातमी तर नाही आपल्या मॅडमची. आज चहा मॅडमकडून काय मग”
आता सर्व हसल्या, आणि आपल्या आपल्या जागी बसायला गेल्या. तोच माने मॅडम म्हणाल्या,
“काय हो काका चहा साठी बातमी कशाला हवी, आणि असली तर काय नुसत्या चाह्ने होणार काय, आणि सगळ्यात आधी तर तुम्हाला सांगू, पार्टीची तयारी करायला. आज चहा माझ्याकडून. तुम्हीपण घ्या.”
उर्वी शांत झाली, पोटात दुखत असल्याने आता तिला घरी जायचं होतं, ती डिपार्टमेंट हेडकडे गेली,
“सर सुट्टी हवी आहे, घरी जायच आहे. जरा त्रास होतोय.”
डिपार्टमेंट हेड वयस्कर होते, हळूच म्हणाले,
“हो जा, तुझे पिरेड अॅडजस्ट झाले का दुपारचे.”
“हो सर मी माने मॅडम आणि रावत सरांसोबत केले अॅडजस्ट.
“ओके, बस जरा, काय झालं?”
“सर, काही नाही...”
“अग बस, तुझा इंटरव्ह्यू मीचं घेतला होता ना, माझ्या मुलीसारखी आहेस तू.”
उर्वी जरा मनातून गडबडली, कसं बोलावं कळत नव्हतं तिला, हळूच म्हणाली,
“सर ते काल क्लिनिकला गेले होते... काही दिवस जास्त झाले होते म्हणून.... पण... “
ती गप्प झाली..
“हुम्म...बऱ बऱ... तुला काही त्रास आहे का?”
“नाही सर.”
“मग काही काळजी करू नकोस, आमचं पाहिलं बाळही आम्ही असचं गमावलं होतं, पण काय, प्रयन्त सोडले नव्हते... आपल्या हाती काय असतं, प्रयन्त... ते आपण करायचे... बघ लवकर बातमी दे बऱ आता... तुचं इकडे नवीन लग्न झालेली आहेस.”
उर्वी हसली, “सर...”
“हो हो, जा तू, हवं तर उद्याही सुट्टी घे, काही हरकत नाही, पण नंतर मला तू कामावर हजर पाहिजे... अरे तुझ्यासारखी हुशार एम्प्लॉई आमच्या कडे असणं म्हणजे काय... डू नॉट वरी.. टेक लीव ईफ यू वांट.. “
“ओके सर...”
उर्वी सरांच्या कॅबीन मधून निघाली... आणि घरी गेली.
कसं असतं ना त्या भवरात शिरल्याशिवाय त्या गोष्टीची जाणीव होतं नाही, आपल्यासारखे अनेक असतात अवतीभवती पण जाणवत नाही... आपण आपल्याच नादात असतो.
आपण पुढे आलो, कि अनेकांना आवाज फुटतो आणि भावना वयक्त होतात... अनुभव सांगितले जातात, काही शिकवून जातात तर काही मनाला छेडून जातात...
___________________________________
दोन दिवसाने आकाशचा इंटरव्ह्यू होता. त्याचं पूर्ण लक्ष तिकडे होतं. उर्वीही सारं विसरून तिच्या कामात होती.
आणि आकाशच मोठ्या कंपनीत सिलेक्शन झालं. आता त्याला विदेशात जाण्याचा योगही होता. त्यात उर्वीचा मास्टरच्या थर्ड सेमचा निकाल लागला आणि तिची नौकरी पक्की झाली. आता रोबोटिक्समध्ये प्रोजेक्ट असणार होता आणि सर्च तिचं नवीन टेक्नोलॉजीच्या विषयाचं होतं. कॉलजेला तिला गमवायच नव्हतं, मग नौकरी पक्की झाली होती. ह्या आठ दिवसात एवढं सगळं घडून गेलं होतं.
मग त्या दिवशी उर्वीने स्वतःचे रिपोर्ट्स घेतले आणि डॉक्टरकडे जावून आली, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. तिला डॉक्टरने काही औषधी दिलेल्या. आणि सगळं कसं समजावून सांगितलं. कुठलं इन्फेक्शन होवू नये म्हणून योनीमार्ग स्वच्छ करण्याच्या औषधी असतात हेही तिला आता कळालं होतं. महावारीच्या काही दिवसानंतर त्या गोळ्या तिने वापराव्या अशी सक्त ताकीद दिली होती डॉक्टरने. सारं कसं सुंदर झालं होतं.
औषधी सगळं वापरून दोन महिन्यात काही राहिलं नाही मग उर्वीने औषधांचा नाद सोडून दिला. तिलाही तिचं करिअर महत्वाच होतं. आता नाही तर पुढच्या काही महिन्यात दिवस जातील ह्या नादात ती तिच्या कामात बिझी होती. आकाशही खूप व्यस्त होत चालला होता. नवीन ऑफिस, नवीन प्रोजेक्ट, शिवाय जपानचे क्लायंट सर्व त्याच्यासाठी नवीन आणि मस्त होतं.
सहा महिने असेच निघून गेले. त्यात सासुच मध्येमध्ये येणं, लहान मोठ्या तक्रारी सारंकाही सुरु होतं.
आता उर्वीने नौकरी सोडावी आणि चान्स घ्यावा असं सर्वाना वाटत होतं. पण उर्वीसाठी तिचं करिअरही तेवढंच महत्वाच होतं. बसून बाळाची वाट बघणं तिला कुठे जमणार होतं. पण तशी ती वाट बघत होतीच ना... ते त्या वाट बघणाऱ्यांना कुठे माहित होतं. आपल्या आपल्यात ग्रहात सारेच उर्वीला दोषी ठरवत होते.
तुझी बायको मुलं होवू देत नाही, अशी कुरकुरही उर्वीच्या कानावर आली होती.
त्या दिवशी ती घरी आली तेव्हां तिची सासू तिच्या आणि आकाशच्या खोलीत काय शोधत होती काय माहित. उर्वी खोलीत शिरताच ती बाहेर आली, उर्वीने काहीच म्हटलं नाही...
खरं तर ती खोली शोधत असायची, रात्री वापरण्यात आलेले टॉवेल तर कधी अंतरवस्त्र खोलीत कुठेही पडून असायची मग उर्वीला लाज वाटायची.
तिने त्या रात्री आकाशला बोलून दाखवलं,
“आकाश मला तुझ्या आईचं आपल्या खोलीत येणं पसंत नाही.”
“का ग, काय फरक पडतो?”
“फरक पडत नाही रे, पण मी सकाळी कसं बसं आवरून निघून जाते, तुही निघतांना काही उचलत नसणार... मी घरी आली की मला आपले रात्री वापरलेले टॉवेल आणि कधी कधी तर माझे अंतर वस्त्रही धुतलेले दिसतात...”
“जावूदे, धुते ना ती.. तू विचार करू नको...”
“असं कसं म्हणतोस! अरे अन कसं वाटते ते.”
“काय वाटयचं त्यात आई आहे माझी.”
“माझी नाही... आणि आई असूनही काही मर्यादा असतात आता.”
“तू उगाच काही विचार करू नकोस”
“बघ आता मी मनात काहीच घेत नाही म्हटलं तरी वाटतं रे, उगाच मग रात्री झालेलं कसंतरी होतं, मन खात राहत असतं...”
“मग उचलून ठेवत जा तुझ्या वस्तू, कशाला ठेवतेस पडून...” आकाश हसत म्हणाला...
“असं! नाही राहत आठवण, पण गरज काय आपल्या खोलीत येवून तिला आवरण्याची, राहो ना पडून माझ्या वस्तू... आणि मग हेच जावून तिकडे सांगणार की मी त्यांना काम करायला सांगते म्हणून...”
“हुम्म्म... बोलेल मी,आणि मी उद्यापासून दार लावून जात जाणार... पण तू आता इकडे ये... खूप झालं तुझं ज्ञान देवून...”
“आकाश कसं वाटतं रे, काय शोधते तुझी आई आपल्या खोलीत...”
“जावूदे ना…
“नाही जावू देवू शकत मी...”
“मग म्हण तिला...”
त्याने उर्वीला ओढलं, आणि मग उर्वी त्याच्यात आकाशमय झाली, मंद रात्र चढत होती...
आणि प्रेमही शिखरावर चढण्यासाठी आतुर होतं. दोन जीवांनी एकमेकांना त्यांच्या स्वाधीन केलं होतं.
“अजून रात्र तरुण आहे..
तू अशी दूर दूर का ग
मी तुझ्या जवळी असतांना
होवू दे बेभाण मला ग...
अजून रात्र तरुण आहे...”
दोघंही एकमेकात कैद झाले होते...
.................आजचा भाग इथेच.... भेटूया पुढ्या भागात, लवकरच...
© उर्मिला देवेन
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments