बीइंग नारी... भाग १६ जेव्हा आई होणं अवघड होते.

 बीइंग नारी... भाग १६

 जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन

----------मनातली सल मनात गोठवून उर्वी पुढे निघाली होती, रात्री दिवसाच्या मागे धावत होत्या. तेही दिवस गेलेत, आकाशच्या नकळत उर्वीने माने मॅडमने दिलेला कानमंत्र बजावला होता. मैत्रिणीसोबत झालेल्या संवादनंतर तसं तिनेही बरच काही वाचलं होतं. पहिल्यांदा एवढं काही नवीन नवीन माहित झालं होतं.

त्यावेळी बालिकावधू लागायचं, ऑनलाइन ती बघायची, त्यात सुगनाला दिवस गेलेले दाखवत होते. तिलाही प्रश्न पडला होता, कसं काय मुलींना लागलीच दिवस जातात, पण तेही नाकारण्यासारखं नव्हतं ना. तिच्या मैत्रिणीला पहिल्या महिन्यात दिवस गेले होते, काय तर हनिमुला जातांना होते दोघं पण परतीचा प्रवास तिघांचा होता त्यांचा.

आता उर्वी दिवस मोजत असायची, महिना झाला होता. आणि तिला शरीर जड वाटायला लागलं होतं, आता असं का वाटते आहे म्हणून सुद्धा तिने इंटरनेट चाळून काढलं, तर काय प्रेग्नन्सी असल्यावरही असा जडपणा शरीरात जाणवत असतो हे तिच्या वाचण्यात आलं. मग काय, तिला आनंदच झाला होता. प्रेग्नन्सीच्या पाउलखुणा ओळखत सिरीअल बघत असायची.

पण, दोन दिवसांनी उर्वीची चिडचिड सुरु झाली, हल्ली तिला असं नेहमी होतं असायचं, महिना भरत आला कि तिची चीडचीड वाढायची, नको त्या कारणावरून भांडण होतं असायचं, आजही मुद्दा काहीच नव्हता, बसं अनुने बघितलेला वेबसाईट लॅपटॉप तश्याच राहिल्या होत्या. आकाश आला आणि लॅपटॉप घेवून त्याचं काय काय ते करत बसला, त्याने तिला आवाज दिला,

“उर्वी, हे काय बघत बसतेस दिवसभर? तुला काही कामधंदे नाहीत का? तुला जपानी भाषा शिकायला सांगितली ना, ते कर ना. कशाला हे असले सीरिअल बघत बसतेस.”

उर्वीची जणू चोरी पकडल्या गेली होती, म्हणाली,

“अरे, जरा मोकळं होतं माणूस, आता जरा निवांत हवाय मला... मनाला फ्रेश करायचं म्हणते, म्हणून बघते कधी कधी...”

आकाश परत म्हणाला, “मग हे काय, काय वाचत असतेस?”

आता उर्वी लॅपटॉपजवळ आली आणि तिने ते सर्व बंद करू लागली, आकाशने थांबवलं,

“काय करतेस, त्याची काही गरज नाही, मी करू शकतो.”

उर्वी चिडली, “मग करायचं ना गुमान, कशाला बडबड करतोस. आणि तो लॅपटॉप माझा आहे, माझ्या पैस्यातून घेतला होता, मी वापरेन ना कशाहीसाठी..”

“उर्वी, आता ही गोष्ट कशी आली इथे, तू हल्ली काहीही कुठेही बोलतेस. तुझं माझं काय हे?”

“मग, मी घेतला तो, हो बाजूला, आला मोठा.”

उर्वीने लॅपटॉप हिसकावून घेतला. आणि खोलीतून निघून गेली. आकाश चिडला, तिच्या मागेच आला,

“काय हे, कसला प्रकार आहे हा? तुला काही कळत नाही का?”

उर्वी अंगावर धावून आल्यासारखी आली, जोरात म्हणाली,

“काय? मला सगळं कळतं, तुला कळत नाही... रोब दाखवतोस काय मला! तुझ्यासाठी, समजलं तुझ्यासाठी सगळं सोडून आले मी... जरा वेळ स्वतःला द्यावा म्हटलं तर सुरु आहे ह्याच...”

“उर्वी मी काय म्हणालो, काहीच नाही ग, बसं कशाला तसल्या सीरिअल बघतेस असचं म्हटलं ना...”

“मग काय झालं सर्वच बघतात... जरा आनंद मिळतो, खुपतो तुला…”

“मला कशाला खुपेल ग! आणि ती वेबसाइट प्रेग्नन्सी सीमपटॉमसची कशाला वाचत होतीस... काही?”

“तुला काय फरक पडतो रे...”

“म्हणजे मला फरक पडत नाही, मग कुणाला पडतो, तुझ्या माहेरी...”

“ये जास्त बोलू नको, नालायक, हलकट...”  

आता जरा वेळ तो शांत झाला आणि म्हणाला, “तू माहेरी फोन केला होता वाटते, तुझी भाषा बदलली ना.”

आता उर्वीचा पार चढला, “काय रे नालायक माणसा, हलकट, तू... तुला काही कळत नाही.... आता काय माझे आईवडील तोडतोस... मी काय त्यांना एक फोन करू शकत नाही, नाही गेली लग्नाला म्हणून काय नातं तुटलं...”

“उर्वी तू काय बोलत आहेस? शोभते का तुला असं बोलणं?”

“तू बघ काय बोलतोस, म्हणे तिकडे फोन केला का, म्हणजे मला काय माझी आई भडकवते... ते बिचारे काही बोलत नाहीत…”

“असं, तुझ्याशी ना बोलणंच बेकार आहे... मी जातो बाहेर...”

“जा जा, जावून बोल तुझ्या आईशी... तिच्याशी बोल ना.”

“आत ती कशी आली?”

“माझी आई आली तर?

आकाशने तिने ठेवलेला लॅपटॉप घेतला आणि खोलीत जावून बसून राहिला...

तिने तिचं काम केलं होतं... ती येण्याची चाहूल लागली होती. पण कुणालाही ते कळत नव्हतं... धारा सुरु झाल्या आणि नकळत पोटरीपर्यंत आल्या, उर्वीला जाणवलं, ती धावत बाथरूममध्ये शिरली, त्याचं वेगाने आकाश खोलीतून उठला, त्यालाही भीती वाटली, ही काय करणार तर नाही म्हणून, तो आला त्याने दार पटकन ढकललं, उर्वीही दचकली, त्याने बघितलं, म्हणाला, “येवढ खाली आलं?”

“माहित नाही मला, जाणवलंच नाही.”

“भांडण कर मग जाणवेल ना.”

तो बोलून खोलीत निघून गेला, परत शांततेने तिच साम्राज्य घरात पसरवलं होतं. आकाश गप्प झाला होता. उर्वी परत मनाच्या कोषात शिरली होती.

हा महिनाही लाल होवून निघून गेला, परत नवीन सुरुवात झाली उर्वीची, दोन दिवस कसे बसे काढले, आणि शेवटी ती आकाशच्या कानाशी लागली,

“आकाश आपण जावूयाना इथे क्लिनिकमध्ये, प्रगत देश आहे हा.”

आकाशसाठीही साऱ्या गोष्टी नवीन होत्या, त्याने होकार दिला आणि मग इंग्रजी ज्याला येत असेल अश्या डॉक्टरचा शोध त्याने सुरु केला. फोनवर रीतसर अपॉइनमेंट घेतली. शनिवारीच तो जावू शकणार होता,

शनिवार उजाडेपर्यंत उर्वीला पाळी येवून बारा दिसव झाले होते. ते दोघे पोहचले क्लिनिकला, सगळं कसं पॉश होतं. बघून उर्वी आणि आकाशच जरा गडबडले. तिकडे फॉर्म भरतांना आकाशचा प्रश्न,

“तुला  मासिक पाळी कधी सुरु झाली ग?”

“हुम्म... आठवीत होते, म्हणजे १२ वर्ष लिही...”

“आता मागच्या महिन्याची दिनांक सांग?”

“हे काय, १० रे, लिही.”

“अरे हो, तू भडकली होतीस आदल्या दिवशी...”

“आकाश!”

“किती दिवसाची  मेंस्ट्रुअल साइकल आहे तुझी?”

“ मेंस्ट्रुअल  साइकल ?”

“MCग ! पीरियड्स...”

“असं सांग ना... बापरे भारी शब्द आहे, कधी ऐकण्यात आला नाही, आपण MC च म्हणत असतो.”

“सांग मग तुझी.”

“किती दिवसाची आहे असं लिहिलं आहे ना, म्हणजे पीरियड्सचे दिवस नाही विचारलेत.... ते ना...” उर्वी मोजायला लागली तोच आकाश म्हणाला,

"थांब त्या सुंदरश्या नर्सला विचरतो"

"ये थांब रे काहीही काय, कसाही प्रश्न करशील काय?"

"अबे ये, नर्स आहे ती, विचारयला काय जातं. आणि हे नागपूर नाही आहे कि पुरुषांनी विचारलं तर कसं म्हणून... इथे बघ डॉक्टर पुरुष आहे."

"अरे मला माहित आहे, थांब ना जरा.

उर्वी मोजत होती तोच आकाशने त्या नर्सला बोलावलं आणि विचारलं. तिने त्याला समजावून सांगितलं.

“मेंस्ट्रुअल साइकल म्हणजे एका पाळीपासून तर दुसऱ्यापाळीच्या आदल्यादिवसापर्यंतचे दिवस, म्हणजे किती दिवसात परत पाळी येते. फिरणारं चक्र ...” आकाशच वर वर बोलणं.

“बऱ बऱ, समजलं, गेलाच कशाला माहित नाही, सांगत होते ना, मला ३० दिवसात येते रे. कधी लवकर पण येते, २८ ते ३० लिही.”

“लिहिलं बऱ, इथे लिहिलं आहे ग, तुचं लिही...

“अरे मला ते जपानीमध्ये समजत नाही ना, तू लिही ना.”

“म्हणून म्हटलं होतं शिक, तर बाईसाहेबांचे नवीन उपक्रम सुरु असतात रोज नेटवर…”

“काय लिहिलं आहे ते सांग, तुला पाळी किती दिवस येते?”

“पाच दिवस.”

“म्हणजे?”

“तीन दिवस खूप नंतर कमी...”

“लिहिलं... बाकीचं राहूदे, काही समजत नाही आहे... अरे हो, आपल्याकडे काही रिपोर्ट नाहीत ना, तू ते मागे पुण्यात केले होते, ते आणले आहेस का सोबत?”

“नाही रे, ते जावूदे मागेच.. आता सगळं नवीन करूया.”

“जावू दिलं, करा मॅडम सही इथे...”

त्याने फॉर्म कॅउन्टरवर दिला, वात बघत बसले दोघे. नवीन अपॉइनमेंट होती वेळ लागणार होता, उर्वी हळूच म्हणाली,

“आकाश खूप पैसे लागतील काय रे, उगाच आलो का आपण?”

“ठीक आहे ना, आलोय आता, बघू किती लागतात ते...”

समोर बाळाचे सुंदर फोटो लागले होते, उर्वी बघत बसली होती, तोच् त्यांना डॉक्टरच बोलावणं आलं,

दोघेही आत शिरले, डॉक्टरांनी हसून स्वागत केलं, डॉक्टर लेडीज नव्हतीच, गायनेकोलॉजिस्‍ट आणि तोही पुरुष...

तसं विदेशात गायनेकोलॉजिस्‍ट स्त्री मिळणं जरा कठीण, त्यात जपानमध्ये इग्रजी बोलणारे मिळणार महाकठीण... उलट त्यांना बघून वाटणारही नाही के हे डॉक्टर आहेत, एवढा त्यांच्या वागण्या बोलण्यात साधेपणा, त्याने स्वतः उठून उर्वीची खुर्ची ओढली आणि बसायला सांगितलं.

नंतर विचरापूस केली, सोनोग्राफीला घेतलं, उर्वीला हात लावतांना त्याने आधी परवाणगी घेतली,  

“कॅन आय टच यू.”

नंतर त्याने सोनोग्राफी मशीनवर काहीतरी मोजलं, प्रिंट घेतली, म्हणाला,

“फॉलिकल साइज इज नाईस, टू फॉलिकलस आर गुड, लेफ्ट १६ mm, अँड राइट १४ mm, इट विल बी परफेक्ट इन टू-थ्री डे. हॅव इंटेरकोर्से ऑन दॅट डे.”

असा पटकन बोलून गेला तो सर्व, जसं काय मशीन तंत्र होतं सारं त्याच्यासाठी. नंतर त्याने काही मेडिसिन लिहून दिल्या, ज्या इंटेरकोर्से नंतरच्या दोन दिवसा नंतर सुरु करायच्या होत्या. सोबत डिजिटल थर्मामीटर घ्यायला सांगितलं.

रोज सकाळी उठताच तोंडात टाकून टेम्परेचर मोजायचं, पाळीच्या दिवसापासून तर चौदाव्या दिवसापर्यंत साधारण टेम्परेचर असेल आणि मग ज्या दिवशी ते जरा खाली जाईल त्या दिवशी इंटरकोर्स करायचा, दुसऱ्या दिवशी लगेच टेम्परेचर वाढले किंवा हळूहळू वाढले, म्हणजे ओव्हूलेशन (ovulation) झाले आहे. आणि तो ग्राफ मग वाढत गेला आणि पंधरा दिवसांच्या वर तसाच वाढत गेला की समजायच फरटीलजेशन झालंय, चान्स आहे. आणि जर का पडला तर पाळी लवकरच येणार...

सगळं ऐकून सारंच काही उर्वीला आणि आकाशला कळालं होतं असं नाही. एवढं सगळं तर त्यांना कधी माहितही नव्हतं.

ज्यांना हॉस्पिटलची  पायरी चढण्याआधीच प्रेग्नन्सी राहते, त्यांना कुठे असं सगळं माहित असतं. सारी हिस्टरी आणि दुनियादारी तर ह्या प्रवासात माहित होते. जेव्हां ह्या पायऱ्या चढतांना पाय खरच दुखतात. पण त्याचा त्रास कमी आणि मन थकून जातं.

क्रमशः -

© उर्मिला देवेन

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments