बीइंग नारी... भाग १७ जेव्हा आई होणं अवघड होते..

 बीइंग नारी... भाग १७ 

जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन---

डॉक्टरकडे जावून आल्यापासून दोघांची आशा वाढली होती, आता माहितच झालं होतं कि कधी अंडाशयातून स्त्रीबीज (egg) बाहेर येते, आणि ही दोघे तर बेडवरचा कार्यक्रम करणार होतेच, चान्स सुटणार नव्हता.  शिवाय स्त्री बीजाची साईजपण उत्तम होती असचं डॉक्टर म्हणाला होता. उर्वी आणि आकाश आनंदात घरी आले.

आता तो डॉक्टर काय काय म्हणाला हे सर्व उर्वी इंटरनेटवर बघत होती. स्त्री अंडाशयात असणाऱ्या स्त्री बीजाची साईज रोज किती वाढते, आणि मग किती साइज हवी असते. हे सर्व तिने वाचून काढलं होतं.

आताच तिच्या फॉलिकलची साइज उत्तम होती आणि प्रेगन्सी राहण्यासाठी १८- २० mm डायमीटर असायला हवी हे तिच्या लक्षात आलं होतं. खूप खुश होती.

तिने सकाळी उठल्या उठल्या टेम्परेचर मोजलं, आणि ग्राफ चार्टवर लिहून ठेवलं. दिवसभर आनंदी होती. परत दुसऱ्या दिवशीही तिने टेम्परेचर मोजलं. साधारण होतं. अजून काही फॉलिकल  ओव्हरीतून बाहेर आला नसेल ह्या विचारात होती... आणि मग आज आकाशने तिला रात्री जवळ घेतलं, उर्वी म्हणाली,

“आकाश, आज नको ना, उद्या?”

“अरे यार आता काय हे पण कॅलेंडर बघून करावं लागेल, अजब आहे यार...”

“आकाश प्लीज...

“बऱ बाबा, झोपलो मी... तुझ्याशी कोण वाद घालणार...”

“नकोच घालूस आता...”

तो परत पलटला, म्हणाला, “उर्वी...”

उर्वीने बंद केलेले डोळे उघडले आणि एक कटाक्ष त्याच्यावर टकला, आकाश हसला, उर्वीही हसली, त्याने हात तिच्याकडे वळवला तिने पकडून परत त्याच्या जागी ठेवला, परत डोळे मोठे करून तिने आकाशला खुणावलं.

आकाशने तिच्या माथ्यावर ओठ टिपली आणि कूस पलटली, उर्वी त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत गोड हसली आणि मग झोपेच्या कुशीत शिरली.

तिने उठल्या उठल्या सकाळी टेम्परेचर मोजलं, आज टेम्परेचर जरा कमी होतं, ती आकाशकडे वळली, आकाश अजूनही झोपून होता.

“आकाश आज टेम्परेचर कमी आहे, म्हणजे आज...”

“आज पार्टी मग!” आकाश डोळे चोळत म्हणाला.

“बघ ना, आज फॉलिकल सुटणार आहे ओव्ह्वरीतून, कधीही सुटू शकतो..”

चयला, काल पासून सुरू हात लावत आहो तुला, आता ह्या फॉलिकला लक्षात आला, लेट लातिप दिसते.”

“आकाश मस्करी करू नकोस, मलाच लाज वाटत आहे.”

“पण, ऑफिस आहे..

“आता…”

“आता... ?”

“चल मी तयार अहो बाबा... सकाळी सकाळी ही देवी प्रसन्न होतं असेल तर काय, आपण तर कधीही तयार...”

उर्वी लाजत होती आणि आकाश तिला छेडत होता, आणि मग बंध टूतट उर्वी आणि आकाश स्वतः कैद झाले, नंतर उर्वी बराच वेळ पलंगावर पडून राहिली, आकाशने तयारी केली आणि तो ऑफिसला निघून गेला. उर्वी सावकाश उठली, स्वतःच आवरलं. दुपारी तिला पोटात दुखायला लागलं.

आता पोटात का दुखते म्हणून ती परत शोधायला लागली, तर लक्षात आलं, हे तर फॉलिकल ओव्हरी मधून बाहेर येण्याची वेळ आहे. म्हणून दुखत आहे. ही दुखणं सर्वांना नसतं हेही तिने वाचलं होतं. अर्थात तिचं शरीर तिला ह्या वेळेची जाणीव करवून देत होतं. ती सुखावली होती. सकाळीच कार्यक्रम घडून गेला होता. आणि पुरुषांचे स्पर्म तर पाच दिवसही गर्भाशयात जिवंत राहून वाट बघू शकतात हे तिने वाचलं होतं. दिवस मस्त गेला तिचा. शरीराचे संकेत तिला मिळत होते, संध्याकाळ पर्यंत ते दुखणं थांबलं होतं. तसं तिने परत रात्रीचा प्लॅन आखला होताच. आकाशला मेसेज करून सांगितलं होतं लवकर यायला.

चायला शरीरातही ही दुनिया असते ना रावं, जसे मजनू मुलींच्या मागे लागले असतात ना, ती केव्हां बाहेर येत आणि ते केव्हां तिला लाईन मारत आपलंसं करतो, बसं तिचं हालात इथे गर्भाशयात असते.

स्पर्म योनीमार्गातून येत, ओवरीच्या तोंडापुढे येवून उभे असतात, प्रतीक्षेत कि केव्हां स्त्रीबीज बाहेर येईल. आणि जसं ते बीज बाहेर पडते, हमाला बोल होत असावं... असो. निसर्गाचा नियम तो, पुरुष स्त्रीच्या मागेच असतात.

रात्री आकाश आला, आणि उर्वीत्याच्याशी बोलत राहिली, बाळ दोघांना हवं होतंच मग काय, प्रयत्न सोडायचे नव्हते. दोघांनीही त्या क्षणाचा सदउपयोग केला आणि तो क्षण ते तसा जगले. उर्वी आकाश खुश होते. आकाश तर उर्वीला जपायचाही. बाहेर फिरायला जातांना तो तिला म्हणाला,

“आता तूला फिरायला जायची सवय लावावी लागेल.”

"का रे?"

"अग तेवढाच व्यायम होतो शरीराचा."

आकाशचा इशारा उर्वीला कळालं होतं. तिचही मन आता वाट बघत होतं. अपेक्षा वाढत होत्या. डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे तिने मेडिसिन सुरु केलं होतं. आणि टेम्परेचर मोजणं सुरूच होतं. ती रोज सकाळी ते मोजून नोंद करायची. ग्राफ वाढत होता, उर्वी मनातून खुश झाली होती. टेम्परेचर ओव्हूलेशन झाल्यानंतर तीन दिवसाने लगातार वाढत होतं. आणि आता पंधरा दिवस झाले होते. म्हणजे पाळीची तारीख चुकली होती. उर्वीला मनातून आनंद झाला होता. ती मनातून सुखावली होती. आकाशने डॉक्टरला फोन केला, तर तो म्हणाला कि, अजून आठ दिवस जर टेम्परेचर असचं वाढत राहिलं तर हॉस्पिटलला या. टेस्ट करू.

आता आकाश उर्वीची काळजी घ्यायला लागला, दरम्यान उर्वीची कंबर खूप दुखत असायची. तिचे स्तनही दुखत असयाचे. कदाचित प्रेग्नन्सी मुळे हे सर्व घडत असावं असचं तिला वाटत होतं.

रोजच्या प्रमाणे तिने आजही टेम्परेचर मोजलं, नेहमीपेक्षा, म्हणजे नेहमी ३६ .९०-३७ डिग्री सेल्सियस असायचं पण आज एकदम ३६. ६० होतं. उर्वी तेव्हांच नाराज झाली होती. आकाशला काहीच बोलली नाही.

तो ऑफिसला जातांना नेहमीप्रमाणे म्हणाला,

“उर्वी, जास्त कुठला विचार करू नकोस. आणि जास्त उगाच काम करू नकोस.”

हसत म्हणाला, “तुझे ते सीरिअल बघ, आराम कर, नाहीतर अभ्यास कर.”

उर्वी काहीच बोलली नाही, पण मनातून हादरली होती, त्याला कसं सांगायचं तिला कळत नव्हत, पण पाळी अजून आली नव्हती मग काय सांगणार होती. तो ऑफिसला निघून गेला. आणि ही रडत राहिली. तिच्या लक्षात आलं होतं, पाळी येणार म्हणून, पण तरीही आशा होती, कदाचित आपली काही चूक झाली असेल आज सकळी टेम्परेचर मोजतांना म्हणून स्वतःची समजूत काढत होती. त्यात तिच्या कंबरेच दुखण वाढलं होतं, आणि स्तनही त्रास देत होते. कशात मन लागत नव्हतं. फेसबुक उघडून बसली होती, तर तिची मैत्रीण शशीने हाय टाकला, हिनेही हाय लिहिलं,

पुढे ती म्हणाली,

“काय ग काही न्यूज आहे का तुझी?"

“नाही ग अजून प्रयन्त सुरु आहे.”

“कर मग... सुरु ठेव.”

नंतर खूप वेळाने तिने लिहिलं, 

“मला राहिला हा महिना, तुला बोलली होती ना मागे, आता मुलगी झाली कि बसं झालं मग... तू ही कर तशीच. प्रयत्न कर ग. सगळं स्वतःहून करावं लागतं. नुसती वाट बघत बसल्याने काही होणार नाही.”

उर्वीनेही खूप वेळाने तिला अभिनंदन दिलं. पण तिला कळत नव्हतं तिचं कुठे काय चुकत होतं. मनात स्वतःबद्दल काहिशी घृणा निर्माण झाली होती, म्हणाली,

“एवढं सोपं असतं का हे? पण मला का एवढं सहन करावं लागत आहे. मीचं का ह्या सगळ्यांना सामोरी जात आहे. लोकांना काहीच करावं लागत नाही, मी कुठे चुकत आहे...”

रडली जरा, आईला फोन केला, तिचं सर्व ऐकून घेतलं, काय करणार होती, बहिणीच्या लग्नाला गेली नव्हती, आणि आयुष्यभरासाठी बोल घेतले होते. नमतं घेत ती बहिणीच कौतुक ऐकत राहिली. 

फोन संपला आणि स्वतः शिरली, म्हणाली,

"माझं कुठे कुणी ऐकून घेणार आता, नवल तर आधीही नव्हतं आणि आता तर नवल करण्यासाठी राणी आहेच. काय करावं, शेवटी आईवडिलांचे आशीर्वाद नाहीत आपल्याकडे, हे असं तर सहन करावं लागणार... सर्वांची मन खुश ठेवली कि आपल्या वाट्याला असलं येत नसावं. पण मी काय असं वाईट केलं. प्रेमविवाह काय मी एकटीनेच केलाय ह्या जगात...”

मन ओरडून ओरडून रडत होतं तिचं. बसल्या बसल्या अश्रू गळू लागले. जोरात किंचाळून ओरडली. नंतर शांत झाली. 

आकाशशी ती फारसं बोलत नव्हती. तोही कामात बिझी होता.

दोन दिवस तसेच गेले, टेम्परेचर कमीच होतं चाललं होतं पण तिची हिम्मत होत नव्हती आकाशला सांगण्याची. आकाशने जरा विचारलं,

“काय, टेम्परेचर मोजत आहेस ना बरोबर? इथे तो डॉक्टर तेच मागेल आधी.”

“मग, मोजत नाही तर काय. तुझं लक्ष राहते का?”

“दोन दिवसात नव्हतं, म्हणून विचारलं ना…”

“असं, आला मोठा काळजी घेणारा...”

“काय झालं उर्वी, चिडत जावू नकोस बऱ, हल्ली तुला चिडायला कारण लागत नाही.”

“मी कुठे चिडते, चिडण आणि मग रागावणं, मग राग धरून  बसणं हे तर तुझ्या आईला जमते, आणि मग आईचं बाळ तिच्याशी लाडा लाडाने बोलत तिचा रुसवा काढत बसतो... असं कुठे बाबा माझं नशीब...”

“नशीब! आता हे कसं आलं...”

“अरे जे आपण करू शकत नाही, आणि आपल्याला ते मिळू शकत नाही ते सारं नशिबात गुंडाळल्या जातं...”

“असं, मग तर नशीब बिशिब काही नाही... "

“का?”

“कारण राग तर तुझ्या नाकावर आहे, आणि चिडणं तुझा हल्ली स्वभाव झाला आहे.”

“ये ये... जास्त बोलू नकोस, काहीही काय तुझं... माझ्या नशिबात तर काहीच नाही कदाचित... फुटकं नशीब घेवून आली आहे मी जन्माला... ना आईवडील साथ देत ना काही मिळत...”

“आता अजून काय हवंय तुला, तुझी इच्छा तर पूर्ण होणार ह्या महिन्यात, खूप दिवस झाले ग ह्या वेळी... काय मग पार्टी आहे का?”

उर्वीच मन भरून आलं होतं, पण तरीही तिची आज हिम्मत होत नव्हती, आणि अचानक चिडली,

“तुला काय काम धंदे नाही का, नुसती पार्टी पाहिजे... कर तुझ्या आई सोबत, मी कशाला हवी, आता काही वेळे आधी तिच्याशी बोलत होता.... म्हणजे पार्टी करत जा, बापा बापा, पैसा काय झाडाला लगतो... तिला म्हणे पार्टी कर... “

“उर्वी काय सुरु आहे. गप्प हो... आवर आणि झोप बघू... उगाच त्रास करून घेवू नकोस.”

“मला काय त्रासच आहे आता... लोकांना माहित नाही कसं राहतं, माझंच काय चुकतं.”

चूक कशी आणि कुठे होते हे जर ह्या निसर्ग नियमात माहीत झालं तर मग काय...

आणि कधी कधी तर चूक नसतेच वेळ योग्य नसते...

आणि वेळ योग्य असूनही चूक असेलच असं म्हणता येत नाही....

बघा पटलं तर...

क्रमशः 

© उर्मिला देवेन

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments