बीइंग नारी...भाग १८
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
बीइंग नारी...भाग १८
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
---
सांग, मी तुझ्यावीणा कसं स्वतःला सांभाळलं असतं....
सांग, मी तुझ्यावीणा कसं तुला सावरलं असतं ....
अशेच काहीसे दोघं मनात म्हणत होते, उर्वी चिडली होती आकाशला जाणवलं होतं. त्यालाही आता नुसता त्रागा आणि त्रास नको होता. मग आकाशने ह्यावेळी स्वतःला सावरलं, त्याला उर्वीला त्रास द्यायचा नव्हता. पण उर्वी चिडली होतीच. तिचं तीला माहित झालं होतं, पण आशा असल्याने तीही चीडचीड करत होती. खर तर ती स्वतःवर चिडली होती.
अटकला होता जीव आता, ना पाळी येत होती ना काही कळत होतं. उलट टेस्ट घरीच करून तिला नाराज व्हायचं नव्हतं. वाट बघत ती रात्र तिने कशीतरी काढली, आणि ती सकाळी अलगत आली... तिचं मन रक्ताळलं होतं, वेदना वाढल्या होत्या. कुठेच लक्ष नव्हतं. स्वतःचा राग येत होता.
आकाशला जेव्हा कळलं, तेव्हा तोही नाराज झाला, पण करणार काय होता, म्हणाला,
“उर्वी आपण ह्या वेळीही जावू ना डॉक्टरकडे. काही काळजी करू नकोस, आता हाती घेतलं आहे ना हे, तर फत्ते करून सोडूच... अजून नवी सुरवात, काय...”
तेवढ्याच शब्दाने सुखावलेली उर्वी परत उठली आणि नव्याने प्रयत्नाला तयार झाली.
आता तिने सर्व पाळीचा अभ्यास सुरू केला. कारण सारंकाही ह्याच प्रक्रियेत होतं. स्त्रीला स्त्री रूप प्रदान करणारी हेची ती प्रक्रिया असते.
मासिक पाळी, स्त्रीला दर महिन्याला येते. म्हणजे तिच्याकडे प्रत्येक महिन्याला एक चान्स असतो. पण त्या प्रत्येक चान्समध्येही फक्त २०%च प्रेगनेंसीचा चान्स असतो. त्यातही प्रेगनेंसी टिकून राहण्याचा चान्स कमीच. म्हणजे सारच काही कठीण. आणि वर्षभर प्रयत्न करून प्रेगनेंसी न राहणाऱ्या जोडप्यांसाठी तर सारच महाकठीण.
स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्वाची गोष्ट, जिची सुरुवात वयाच्या साधारण दहा ते चौदा वर्षापासून होतेच. स्त्रीच्या मातृत्वाचा प्रवास ह्याशिवाय अशक्य आहे. शिवाय ती जर वयात येवूनही आली नाही तर मात्र सारच अवघड.... तिची सुरुवात झाली कि मुलीची वाढ व्हायला सुरुवात होते. शरीरात आणि स्वभावात बदल होत जातो. मुलीची पोंगडावस्था सूर होते आणि तिचा प्रवास तारुण्याच्या दिशेन वळतो. मग लाजणं, बोलण्यात लवचिकता असे गुण तिच्यात अलगत शिरतात. कधी ती रागावते तर कधी उद्धटही बोलते. त्याचं काळात घरातले नकोशे वाटतात आणि परके हवेशे. मित्र मैत्रिणीकडे ओढ वाढते. आई वडिलांचं बोलणं लागतं तर कधी मनाला भेदून जातं.
पाळी सूर असणे म्हणेज नेमकं काय तर स्त्रीच्या गर्भाशयातून रक्तस्राव सूर असणे. आता हे का होतं,
बाळाला जन्म देणे हा स्त्री आयुष्याचा महत्वाचा टप्पा आहे. आणि हेच निगडीत आहे पाळीशी, अर्थात स्त्रीच शरीर तिला प्रत्येक महिन्यात गरोदर राहावं म्हणून तयार करत असतं. ह्यातला प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो गरोदर रहाण्यासाठी. संपूर्ण शरीर कामाला लागलं असतं. अंडाशयात स्त्रीबीजाची वाढ सुरु होते. तर गर्भाशय नव्याने परत तयार होतं असतं. आणि ज्यांना हा गरोदर रहायचं असतं त्यांना मनालाही तयार करायचं असतं.
उर्वी मनाला तयार करत होती. तिला ह्या महिन्यात बरच काही माहित झालं होतं. पाळीचे काही पाच दिवस संपले होते, म्हणजे ती तयारीला लागली होती, हिरव्या पालेभाज्या खाणं, फिरायला जाणं सर्व सुरु केलं होतं तिने, ह्या दिवसात स्त्रीबीज तयार होतं असते म्हणून उत्तम आहार आणि मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयन्त करत होती. पाळीचा बारावा दिसव आला होता आणि डॉक्टरकडे जायचं होतं. आकाशने सुट्टी घेतली. आणि दोघेही निघाले. डॉक्टरने टेम्परेचरचा मागच्या आणि आताच्या महिन्याचा आजपर्यंतचा ग्राफ बघितला. त्याच्याकडे आधीच्या भेटीत घेतलेल्या ब्लडटेस्टचे रिपोर्ट्स पण होते. सर्व बघून तो म्हणाला,
“प्रोजेस्टेरोन लेवल इज नाईस... ऑल गुड, डोन्ट वरी..”
उर्वी मनात म्हणाली, “सगळं नाईस म्हण, पण रिजल्ट कधी मिळेल... सगळं चांगलं आहे मग कुठे काय वाकडं आहे ते तरी माहित होवू देत.”
डॉक्टरने तिला सोनोग्राफी साठी आवाज दिला. तिचं लक्ष समोर ठेवल्या फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टमच्या मॉडेलवर होतं. आकाशने हात लावला आणि तिने डॉक्टरकडे लक्ष देत होकार दिला.
सोनोग्राफी झाली परत डॉक्टर म्हणाला,
“एग साईज इज गुड.”
उर्वी परत खुश झाली, पण मनात म्हणाली, “ते तर चांगलेच असतात, पण काय?”
आकाशला उर्वीची तळमळ समजली होती. त्याने तिला हात लावला. तोच डॉक्टरच लक्ष गेलं, म्हणाला,
“टेक HCG ट्रिगर शॉट धिस टाईम.”
आकाशने प्रश्न केला, “HCG ट्रिगर शॉट? व्हॉट इज धिस, अँड व्हाय?”
प्रश्न साहजिक होता, कदाचित जोपर्यंत आपण ह्या समस्यांना तोंड देत नाही तोवर असे शब्द कानावरही येत नाही.... कायम गूढ असतात. कधी तोंडातून जरी कुणाच्या निघाले तरी काही कळत नाही..
कारण देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही असचं काहीसं...
तर त्याने सांगितलं कि, ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन (एचसीजी), हा हार्मोन संपूर्ण गर्भावस्थेत महत्वाच कार्य करत असतं. पण कधी कधी सुरुवातीला त्याची कमतरता असते, HCG इंजेक्शनचा शॉट ओव्हुलेशनची प्रकिया उत्तेजित करण्यासाठी आणि एगची पूर्ण वाढ होण्यासाठी वापर करणार आहोत. ह्या इंजेक्शनच्या शॉट नंतर साधारण ३६ ते ४८ तासात ओव्हुलेशनची प्रकिया घडून येते.
झालं... ह्यावेळीही कार्यक्रमाची वेळ निर्धारित झाली होती. आकाशने उर्वीकडे बघून हलकीशी स्माईल दिली. आज उर्वीला अजून काही गोष्टी माहित झाल्या होत्या. तसे इकडे डॉक्टर खूप बोलत नव्हते. मग मनात येणारे शब्द आणि शंका कुठे उघडायच्या हे अवघड होतं. शिवाय अजूनतरी माहेरी कुणी असं अनुभवलं नव्हतं मग कुणाशी बोलावं हाही प्रश्न होता.
दोघेही घरी आले, उर्वी स्वतःची काळजी घेत असायची. आईला फोन केला आणि जरा सांगितलं तर म्हणाली,
“आमच्यावेळी नव्हतं बाई असं. मला तर काहीच ह्यातलं माहित नाही. आता जसं डॉक्टर म्हणतात तसा करा. आणि के ते सांगा.”
उलट म्हणाली, “मला तर तू तीन महिन्यात राहिली होती, जास्तीत जास्त सहा महिने लागतात प्रयत्न सुरु केल्या नंतर, तुम्ही तर आता सुरु केले मग बघा वाट अजून... मला काय माझ्या घरच्या कुणाला असा प्रोब्लेम झाला नाही, तुझ्या सासूला जावई खूप उशिरा झाले होते ना? एकदा म्हणल्या होत्या त्या. रीत असेल घराण्याची.”
ती तिच्या जागी बरोबर होती. तिला उर्वी तीन महिन्यात राहिली होती, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तीघ होते आणि दुसऱ्या वाढदिवसाला चौघ होणार होते. आता आईच्या बोलण्याने तिलाही जरा हायसं वाटलं, खरच होतं, आकाश त्याच्या आईला तीन वर्षाने झाला होता. तेवढाच तिला दिलासा मिळाला. शिवाय आईला आपण आता चान्स घेण्यासाठी प्रयन्त करतोय हे कळला होतं, मग कुणी काही बोलणार नाही ह्याची खात्री पटली होती. तशी ती केव्हाची प्रयन्त करत होती हे तिला स्वतःला माहित होतं.
इंजेक्शनने त्याचं काम केलं होतं, आता आकाश आणि उर्वीला त्याचं करायचं होतं.
उर्वीला त्या दिवशी दुपारी पोटात दुखायला लागलं, आता दुपारी आकाश थोडा घरी रहाणार होता. उर्वीची धडपड सुरु झाली, तिने आकाशला फोन लावला, आणि आकाश रियेक्ट झाला,
“काय?”
“सांगत आहे ना...”
“अग पण सकाळी तू टेम्परेचर मोजलं होतं, तेवढं खाली नव्हतं. मी आवर्जून बघितलं होतं.”
“मला माहित नाही... पण खूप दुखत आहे. तुला सांगितलं होतं ना, मला ही प्रक्रिया जाणवते म्हणून... ते त्याचच दुखण आहे.”
“अग मी आता नाही येवू शकत. आणि माझी मिटिंग आहे संध्याकाळी सातची. धावत धावत जरी आलो ना तरी आठ तरी वाजतील.”
“मी काय करू आता.”
“बघ, आपण ना टेम्परेचरच्या नियमाने जावूया.”
“अरे पण ते उद्या अचानक वाढलेलं दिसेल ना, अर्थात ओव्हुलेशन आता होणार आणि मग काय फायदा...”
“हुम्म, राहतो तो बारा तास वगैरे... काळजी करू नकोस.”
“पण तू येणा लवकर, कर ना काहीतरी.”
“असं... मजा आहे तुझी, कशासाठी बोलावत आहेस माहित आहे का?”
आकाश मिश्किल हसला, उर्वीही हसली,
“अरे पण काय करू मी आता.”
“बघ वाट.”
“किती बघायची, आधीही मीच वाट बघत होती तुझी, तू भेटायला उशिरा यायचा, कसं वाटायचं मला... आणि आता काय माझ्या स्त्रीबीजानेपण वाट बघायची का?”
“अरे तुला ट्रेंन कशासाठी केलं मी.”
“वाट बघण्यासाठी?”
“मग!”
“बघतो आता... पर्याय के, पण लवकर ये.”
“अरे मिटिंग संपली कि धावत येतो मी... बायको बोलवत आहे, तेही त्याच्यासाठी... चायला मिटिंगपण ना आज वेळेवर ठरली.”
“बघ बाबा, आज मी तयार आहे. आणि तू बहाणे सांगत आहेस.”
“असं, बघतो ना आल्यावर, कशी हातही लावू देत नाहीस मग.”
“बघ तू आज.”
“अरे, मजा मग आज...”
“आल्यावर...”
“ओके उर्वी, तू काळजी करू नकोस, येतो मी, आपल्याकडे वेळ आहे अजूनही...”
आकाशने फोन ठेवला पण उर्वीच मन काही कुठे लागत नव्हतं, कधी ती हसत होती तर कधी आकाशची वाट बघत कसंतरी होत होतं तिला.
उर्वीच्या पोटाच्या खालच्या डाव्या बाजूला दुखणं वाढत होतं... घरात ती त्याची वाट बघत घडीकडे बघत होती. आणि ती घटका तिला घडीचा आवाज करत चिडवत होतं. उर्वीही मनातल्या मनात लाजत होती पण आकाशची वाटही ती त्याचं तीव्रतेने बघत होती...
कथा क्रमश-
© उर्मिला देवेन
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments