बीइंग नारी... भाग १९ जेव्हा आई होणं अवघड होते..

 बीइंग नारी... भाग १९ 

जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन




उर्वी आकाशची वाट बघत होती. दारावर बेल वाजली आणि उर्वी धावत दारावर आली, आकाश दारात उभा होता, सोबत गुलाबाचा फुल घेवून आला होता, मस्तीच मूड त्याने आज ठरवलं होतं. येताच तिला फुल दिलं, म्हणाला,


“माझ्या ह्या वाट बघणाऱ्या फुलासाठी एक फुल.”

“काय रे कशाला उगाच खर्च केलास.”

“अरे माझी राणी, वाट बघत आहेस तू... मग एवढं तर बनतं ना, तुझ्या ह्या आनंदासाठी एवढं तर करूच शकतो.”

तीला तो बिलगत आत शिरला, म्हणाला,

“आह, आज तर स्वारी अगदी वाट बघत आहे.”

उर्वी लाजली, “आकाश काहीही काय तुझं.”

आकाशने तिला सोडलं, “ओके, मी आवरून घेतो, मला काही काम आहेत. तू जेवण घे टेबलवर.”

तर उर्वी परत गडबडली, त्याचा हात परत तिने गळ्यात घालून घेतला,

“आकाश...”

आकाश थांबला, म्हणाला,

“मग, तयार ना?”

उर्वी गालात हसली, म्हणाली,

“हो एकदम तयार आहे.”

“चल मग. जेवण तयार आहे, जेवून घे, शक्ती नको.”

“अरे, ते करायला शक्ती लागत नाही, मन की शक्ती चाहिये, और अब दिल अटक गया हमारा... अब हमे उसीका खयाल है...”

“असं, मग इसिलीये आपका इंतजार है...”

आणि हसत उर्वीने त्याच्या हातात टॉवेल दिला आणि वाशरूममध्ये ढकललं, आकाश अजूनही उर्वीला इशारा करत होता आणि उर्वी लाजत उभी होती.

तो वाशरूम मधून येताच त्याने तिच्या अंगावर टॉवेल फेकला,

“बघ मी झालोय तयार...”

“मग, ये ना जेवायला, वाढलं आहे.”

“अरे, आधीच मला भूक लागली होती.”

“घे जेव पटकन.”

“तू ना वेडीच आहेस, वाट बघत होतीस ना, भूक ग, ती वाली.”

“वाट मी आताही बघत आहे.”

“मग जेवण कशाला आधी?”

उर्वीने आकाशला ओढून डायनिंग जवळ आणलं, बसवलं, म्हणाली,

“जेव आधी.”

आकाश बसला, “आधीच आठवडा झाला वाट बघून आता देवी प्रसन्न झाली, तरी अजून वाट बघूच.”

“हो ना आधी प्रसाद खावा लागतो. दर्शन झालं आता देवीच, प्रसादासाठीही रांगेत वाट बघावी लागते.”

आकाश उर्वीला चिडवत राहिला आणि जेवण संपल. आकाशने उर्वीला काहीच करू दिलं नाही, आज तिने काहीच आवरलं नाही, तिला उचलून घेवून आकाश बेडरूम मध्ये घेवून गेला... आणि प्रेमाची बरसात झाली.

मन तृप्त झाली होती, अंग अंग मोहरलं होतं. आकाशने उर्वीला तसचं पडून राहायला सांगितलं. आणि त्याने जरा स्वयंपाक घर आवरून घेतलं. रात्र प्रेमात निघून गेली, आणि नव्या उमेदीची सकाळ परत झाली होती.

आशेची निराशा झाली अन हाही महिना लाल झाला, उर्वीला ओक्साबोक्शी रडवून गेला. ती हताश झाली. आता काहीतरी करावं म्हणून तिचे प्रयत्न सुरु झाले होते. दिवस तिला खायला उठत होते. आकाश दिवसभर बाहेर असायचं आणि रात्री तिला समजवायचा उद्याच्या आशेवर त्याही निघायच्या. पण अर्थ नव्हता, तिच्या मनासारख काहीच घडतं नव्हतं. एकतर शिकलेली, नौकरी करणारी, लात मारेन तिथून पाणी काढण्याची धम्मक ठेवणारी आज फोल पडली होती. गप्प बसून राहणं म्हणजे मरण होतं तिच्यासाठी.

मित्र मैत्रिणींची प्रगती बघत किती काळ बसणार होती. तीच्या नंतर तिच्या बऱ्याच मैत्रिणीची लग्न झाली होती. त्यांना मुलही झाली होती. आणि ही अजूनही वाट बघत असायची. आकाशच्या एका मित्राचं, प्रतिकच लग्न झालं होतं, त्याच्या लग्नाचे फोटो फेसबूकवर होते. उर्वीने अभिनंदन केलं आणि मनात विचार शिरला,

“आता हा पुढच्या वर्षी बाळाचे फोटो टाकणार आणि मी अशीच अभिनंदन करत राहणार, हे भाग्य मला कधी?”

मनाला छिद्र पडत होते, आणि प्रत्येक छिद्र नव्याने पडतांना वेदना वाढत होत्या. पण काय करणार होती. नेमकं कारण कळत नव्हतं, उलट सगळीकडे उत्तर असायचं, होईल, काही असा खूप मोठा प्रोब्लेम नाहीच ना.

एका एझीबिशन मध्ये गेलेली, तिचा प्रोजेक्ट रोबोटिक्समध्येच होता, मग जरा माहिती मिळाली, कि जपान  गवरमेन्टकडून उच्च शिक्षणासाठी स्कॉलशिप मिळते म्हणून. बसं तिचे प्रयन्त सुरु झाले, पण त्यासाठी भारतातून परीक्षा द्यावी लागणार होती. इकडे येवून सहा महीने झाले होते, काही तिच्या हातात लागलं नव्हतं. बहिणीची लग्नही सुटलं होतं. तावातावात इकडे आल्याने सारीच नाती गडबडली होती. आकाशने तिची तिकीट बुक केली. उर्वी महिनाभरासाठी भारतात पोहचली होती.

आकाशने तिची सोय दिल्लीत एका मित्राच्या मदतीने करून दिली होती. दिल्लीत राहून तिने परीक्षा दिली, आणि मग प्रश्न पडला आता जायचं कुठे. सासरी गेली नाही तर सासू आणि आकाशला राग येणार होता. तिने निर्णय घेतला. ती सरळ मुंबई बहिणीकडे आली, तशीही ती तिच्या लग्नाला आली नव्हती. कसंतरी होत होतं तरीही ती पोहचली. तिच्याकडे दोन दिवस राहिली, लग्नाला गेली नव्हती आणि पुढेही त्यांच्या सुखाच्या, दुःखाच्या क्षणात ती कुठे धावणार होती, बहिणीचा नवरा बोलून गेला,

“तुम्ही पोर्णिमेसारखे येणार आणि जाणार...”

त्याचं मिश्किल हसणं मनाला लागून गेलं. खरच होतं ना, विदेशात राहणाऱ्या लोकांना समजून घेणं कठीण असतं, इकडे लोकांना वाटतं हे काय आपल्या कामी पडतील, पण कधी पैश्याची गरज पडली कि पहिले धाव त्यांच्याकडे असते. असो... बरोबर होतं बहिणीच्या नवऱ्याच. ते कुठे असणार होतो सोबत नेहमी, पण ही अशी नाती ना मनानेही सोबत रहायला तयार नसतात. ह्यांना दिखावा हवा असतो. बहिणीकडे मान तर असा खूप मिळाला नाही, अपेक्षाही नव्हती. राहिली एक दिवस, वेळ काढून न्यायची होती, तुला काय हवंय माझ्याकडून हा प्रश्न बहिणीला  उर्वीने मुद्दाम केला

सासरच्यांनी लग्नात तोरडी आणि जोडवी आणली नव्हती तिला, का तर माहेरच्यांनी द्यायला हवी म्हणून. पण माहेरी प्रथा नव्हती, आईला वाटलं होतं कि सासरचे आणतील, शेवटी लग्न तसंच लागलं... आईने फोनवर सांगितलं, घेवून दे तिला. आणि बहिणीनेही इच्छा दर्शवली, शेजारच्या सोनाराकडे जावून तिला उर्वीने घेवून दिले. हातात पाचशे रुपये ठेवले. निघाली परत नागपूरच्या वाटेने, प्रश्न होता राहायचं कुठे, इकडे राहिली तर का राहिली, आणि तिकडे राहिली तर कशी राहू... इकडे आड तिकडे विहीर आणि निघणारा मध्यम मार्ग तिलाच सोलून निघणार होता.

उर्वीने मन घट्ट करत सामान सासरी आणून ठेवलं, आणि दुसऱ्या दिवशी कामासाठी नागपूरला जायचं म्हणून आईकडे आली, आकाशला तेवढाच दिलासा होता कि उर्वी सासरी आधी गेलेली.

आईकडे पोहचल्यावर गप्पा गोष्टी झाल्या, जपानवरून आली होती, खूप काही सांगायला आणि ऐकायला होतं. पण गोष्ट अटकली आता त्या मुद्यावर, आईने काळजीत म्हणाली,

“आपण तिकडे एका वैदकडे जायचं का, म्हणजे जावू असचं, त्याच्याकडे म्हणे खूप लोकांना गुण आला आहे. त्याने तर एका बाईची पाळीपण सुरु करवून दिली... म्हणजे बघ बाबा, खूप लोकं जातात. तू दवाखानापण कर पण माझं आपलं जाऊन यावं म्हणून म्हटलं. खूप लोक जातात ग.”

एवढी शिकेलेली उर्वी हो म्हणाली, तीही लहानपणापासून असलं ऐकून होतीच. भेल भेल हॉस्पिटल करून असल्या छोटश्या ठिकाणी गुण लागतो, हे काही नवीन नव्हतं तिला.

आणि आईने जाणायची तयारी केली. उर्वीने आकाशला ह्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, कारण त्याला हे पटण्यासारखं नव्हतं. उलट आई नेत आहे म्हटल्यावर तर अजूनच नाही. मग उर्वीने त्याला सांगितलं नाही, तिने तयारी केली आणि पोहोचली तिकडे, अमरावतीच्या पुढे कुठेतरी खेड्यात आई घेवून गेली होती. एक साधरण सत्तर वर्षाचा माणूस होता. शेताच्या बांध्यावर एका झोपडीत राहत होता. तो नाडी आणि स्त्रीला बघून सांगायचा कि हिला मुलं होणार कि नाही. आणि औषधी द्यायचा. उर्वी तिकडे पोहचली तेव्हां, त्याच्या झोपडी नजीक मोठं मोठाल्या गाड्या उभ्या होत्या, बघून वाटलं खरच लोकांना गुण येत असावा, असं काय देतो हा म्हणून तिची चिकित्सा वाढली. उर्वीचा नंबर आला, तिची नाडी त्याने बघितली, एकतार कपाळावरच्या रेषांवर बघत होता, मग म्हणाला, “योग आहे... काळजी करू नका...”

आईने कधी आहे असं विचारलं तर म्हणाला, “सारच सांगायचं का?”

वाटलं असले लोकं तिरकट असतात. दोघीही औषधीसाठी थांबून होत्या. गर्दी ओसरली होती, आईने त्यांना प्रश्न केला,

“महाराज, सांगा ना काही, माझी पोरगी कधीपर्यंत वाट बघणार?”

तर ते महाराज म्हणाले,

“तुमच्या घरात काही असा प्रकार नाही, तिकडे मुलाची चाचणी करायला सांगा, आपल्या मुलीत दोष दिसत नाही. आता जोडीने आले असते तर सारच स्पष्ट झालं असतं. मी जावयालाही औषध दिली असती.”

“पण आता ते दूरू राहतात ना.” आईचं आपलं उत्तर.

“मग काय झालं, हेही महत्वाच असते. आता तुम्ही बघितलं ना, किती दूरू दूर चे लोकं येऊन जातात.”

“महराज, ते विदेशात राहतात सध्या.” आईने मानाने सांगितलं.

“सांगू नका हो, आता जे गाडी वाले होते ना, ते अमेरिकेहून आले होते, त्यांना मागच्या महिन्यात गुण आला, माझ्याकडून औषध घेतली होती दोघांनी. आता मुलगी इकडे थांबणार आहे आणि जावई जातील तिकडे. बाळ झालं कि मग तीही जाणार बाळासोबत. सात वर्षाने होणार आहे बाळ त्यांना.”

आई काहीच बोलली नाही, त्याची औषध त्यांच्या हातात आली होती. आईने उर्वीला त्या महान माणसाचं दर्शन घ्यायला सांगितलं. तिनेही घेतलं, आता एवढं ऐकून आणि बघून भारावली होती. निघणार तोच आकाशचा फोन आला, उर्वीला उचलायचा नव्हता. कारण त्याला काय सांगणार होती, आणि एवढ्या दुरून तो काही समजण्यासारखा नव्हता. दोघीही परत आल्या. आईने वाटेत उर्वीला खूप काही  सुनावलं, उलट म्हणाली, “जावयाला सांग टेस्ट करायला, आजकाल माणसांचीही ट्रीटमेंट होते. आमच्या मुलीत काही दोष नाही. मला तर भरा भरा दिवस गेले. माझ्या बहिणीला गेले... इकडे बाबाकडे कुणाला काही प्रोब्लेम नाही. तुझ्या मोठ्या वडिलांच्या मुलीला जुड्या मुली झाल्या मागच्या महिन्यात. त्या दोन नंबर वाल्या मोठ्या आईच्या मुलीला मुलगा झाला. पाच भाऊ आहेत बाबा, कुणाकडून असं ऐकलं नाही, आमच्या घराण्यात नाहीच हे, वांझुटपण. काय बाई माझ्या पोरीच्या मागे हे लागलं.”

उर्वीला लागलं होतं, दुसरी बाजूही माहित असणं हेही महत्वाच असतं म्हणून ती गप्प होती. तशी आईने आकाशसाठीही औषधी विनंती करून त्या वैद महाराजाकडून घेतली होती.

कथा क्रमशः 


© उर्मिला देवेन

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments