बीइंग नारी... भाग १२
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
संपूर्ण कथा इथे आहे . बीइंग नारी... सर्व भाग
________________
रात्र प्रेमात न्हाऊन निघाली होती, उर्वी मस्त फ्रेश झाली होती. गुणगुणत तिने तिचे कामं आवरली, चहा केला, सासूला निघतांना चहा दिला, आणि म्हणाली,
“आमच्या खोलीची साफ सफाई केली नाही तरी चालेल. माझ्या वस्तू पडल्या राहतात, कशाला ना! माझं मी करेन... तुम्ही उगाच खोलीत जावू नका... तशीही मी आता सर्व कामासाठी बाई बघत आहे. तुम्ही काहीही करू नका. हवं तर आराम करा, फिरायला जात जा बाहेर, इकडे जवळ बगीचा आहे. तिकडे बायको असतात बोलायचं, वेळ जातो. मैत्रिणी जमवा तुच्या वयाच्या. घरी घेऊन या, चहा पार्टी करा... कशाला खोलीत जाता.”
सासू नजरा वरखाली बघत सारं ऐकत होती .काहीच बोलली नाही. उर्वी तिच्या ऑफिसला निघून गेली.
आकाशनेही निघतांना आज त्याच्या खोलीचं दार ओढून बाहेरून बंद केलं. तसा तो आईला काही बोलला नाही. उलट आज त्याने निघतांना काही कामासाठी उर्वीला फोन केला. आणि जेवण कर, आराम कर, फिरायला जा, ह्या सूचनाही त्याने आईला आज दिल्या नव्हत्या.
मग आज काहीतरी तर होणार होतं....
प्रत्येक नातं महत्वाच असतं हो, पण कोण कसं निभवतं हे महत्वाच, जवळचे कधी हळूहळू दूर निघून जातात आणि दूरचे कधी जवळ येतात हे त्यांच्या त्यांच्या त्या वेळच्या वागणुकीवर असतं, नाहीका? पालक अशे का वागतात हे न कळणार कोडं आहे. कदाचित आपले दिवस विसरत असतील... कदाचित आपण त्यांच्या जागी गेल्यावर असेच वागू की काय? काही बोलता येणार नाही.. पण नकोच ना.
तरीही उर्वी आणि आकाशला पालक वाह्यचं होतंच ना... मग ते कुठला आदर्श ठेवणार होते पालकत्वाचा...
ह्यासाठी व्हायचं असतं आपल्याला पालक, की जेव्हां त्यांना समजून घायचं असेल तेव्हां असं वागावं म्हणून... कि फक्त अपेक्षाच असतात... पालक असल्याच्या.... असो... तो ज्याचा त्याचा प्रवास... आपण बोलून काय... अर्थात जावे त्याच्या वंशी तेंव्हा कळे...
उर्वी घरी लवकर आली होती. आता आकाश जरा उशिरा घरी यायचा, म्हटलं तर आठ नव शिवाय तो निघतच नव्हता. उर्वी घरी आली तेव्हां सासूबाई जायला तयार झाल्या होत्या.
उर्वीच्या प्रकार लक्षात आला होता, तीही म्हणाली, “तुमच्या मुलाला येवू द्या, नंतर काय ते करा.”
खर तर उर्वीने सारं कळून सासूशी बोलयला हवं होतं पण तसं तिने केलं नाही...
तिने पटकन बॅग खाली टाकली. आणि वाट बघत बसली.
आकाश गुणगुणत घरात शिरला. आणि आईला न बघताच उर्वीला शोधत खोलीत शिरला. तिचं आवडतं चॉकलेट त्याने तिला दिलं, आणि गुणगुणत कपडे काढून बेडवर फेकले. उर्वीने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला, त्याने फ्लाईंग किस दिला, ती हसली, आणि कपडे नीट कपाटात ठेवले. तरी गप्प होती, काहीच बोलली नाही. तिला त्याचा मूड लगेच घालवायचा नव्हता. आकाश फ्रेश झाला आणि हॉलमध्ये आला, त्याचं मॅगझीन हातात घेत आईला म्हणाला,
“काय, तू बॅग परत भरली काय. जायचं आहे.?”
“हो, राहून काय करू. तू ना पोरं होवू देत ना काही.”
“असं, म्हणेज तू माझ्या मुलांच करशील का?”
“पण मी काय करू राहून इथ..”
“ऐकटाच मुलगा आहे ना मी, राहा ना मग, काय कमी आहे. तुला काय उर्वी त्रास देते. ती तर घरीही नसते दिवसभर.”
“हो रे हो, मी घरी असतो ना दिवसभर, खातो तुझ्या घरचं, मी आपली एक पोळी जेवण करतो रे बाबा... काही बीन करत नाही...”
“आई मला तुझ्याशी भांडायचं नाही, माझा मूड खूप चांगला आहे.”
“म्हणजे माझ्यासंग बोलल्याने तुझा तो मूड भिघडते...”
“तसं नाही...”
“काहून नसन रे, तुही जिंदगी माय काय?”
आकाश आता उठला, “उर्वी जेवायला घे बऱ...”
उर्वी खोलीतून आली, “काय हे आकाश, कशाला येते तुझी आई, मला ना चांगल वातावरण पाहिजे. कसं घरात चोरून राहावं लागते. असं दडपण वाटत राहतं सतत, कसं होणार रे काही... आपण आता प्रयन्त सुरु केलत ना. मोकळेपणा अजिबात नाही त्यांच्यात... मग कसं होणार!”
“उर्वी तू बिलकुल बोलू नको... तुला माझ्या आणि आईच्या मधात पडायची गरज नाही... “
“का नाही, कशी वागते तुझी आई.”
“तू मला सांगायचं नाही.”
“मला तुझी आई नको. नेवून टाक तिला कुठेही...”
“उर्वी... तोंड सांभाळ...”
“मग काय, मुलाच्या खोलीत शिरून काय करत असते ती... आज मी बोलून गेले होते ना म्हणून हे नाटकं तिचं.. आई म्हणे... हे हे अशी असते का आई...”
“उर्वी... ती माझी आई आहे. मी बघेन ना काय करायचं ते. तू बोलू नकोस.”
“होका, मला त्रास होतो तिचा. नेहमी नेहमी येते आणि घरात वाद करते.”
“आता तू करत आहेस...”
“कधी पर्यत गप्प बसू, मलाही माझ्या इच्छा आहेत... कसं होणार अश्याने... घरात आनंद कसा असणार रे... ही बाई नुसती कोपऱ्यात बसून असते... येते कशाला काय माहित.”
“ती माझ्या घरी येते, तुझ्या नाही.”
“हे माझंही घर आहे...”
“उर्वी... "
आकाशचा हात उठला होता. त्याने मोठ्या रागात तो कसा बसा मागे घेतला. उर्वी रागात त्याच्या आईकडे बघत होती.
शब्दला शब्द वाढले होते, उर्वी आज अचानक भडकली होती. आकाशने तिला तिच्या खोलीत नेवून ढकलून दिलं आणि आईसोबत बसला. त्यालाही कळत नव्हतं. पण उर्वी खर बोलत होती. आणि आई तर आता कशी तिचा काही दोष नाही ह्या भावनेत गुमान गप्प होती. नंतर म्हणाली,
“मला जायचं आहे, कशाले बाबा माह्यामुळे तुमच्यात भांडण.”
“असं तुला येवढ समजते.”
“अशीच माय झाली का रे..”
“असं, मग समजत नाही, घरात मोठ्या माणसाने कसं राहावं म्हणून... सासू आहेस ना, काय करते ग ती तुला, काय काम करायला सांगते. कि काय... कशाला हुंद्ळतेस आमची खोली... काय बघायचं असते तुला... कशाला आमचे टॉवेल धुतेस... लोकांना सांगायला... की आम्ही काय करतो रात्री ह्याचा सुगावा घेतेस, करू जे वाटते ते, करू पैदा नाही तर नाही करू, जसं वाटेल तसं आम्हाला...”
"अर अर... कसा बोलते रे बाबा..."
“काय बोललो, लाज नाहीका वाटणार तिला....”
“माझ्या पोरीचे असते तर मी धुतले नसते का रे देवा..”
“पोरीचे? आणि तसे... शोभते का तुला... तिचं काहीही पडलं राहू शकते.”
“तसे म्हणजे, अन मी काय तिचं काय ते चोरलं का. “
आकाशशी भडकला होता, परत म्हणाला, “म्हणजे तू खोलीत आमच्या मागून शिरतेस म्हणून मी आणि तिने कसं सगळं तुला हवं असं करायला हवं का?”
त्याची आई रोखून बघत होती तर म्हणाला,
“आता काहीच समजत नाही असा आव आणू नकोस... चांगल माहित आहे तुला... तू ना माहीत नाही यार... जा उद्या, मी तिकीट करून देतो... पाहिजे नाहीस इथ...”
“हो रे हो, जातो ना, काय राहाले आली काय मी तुह्या घरी... पोरगी नाही मले अन ह्या पोरीले माया करीन म्हणतो तर...”
“असं, अरे मुलीच्या खोलीतही लोकं असं हुंदळत नाहीत, आणि अशी मया, मला बोलायला लावू नको... तुमच्या दोघी मुळे मला आता त्रास होतोय.”
आकाश उठून खोलीत निघून गेला. उर्वी गुमान पडून होती. तोही गुपचूप जावून पडला. दोघेही एकमेकांकडे पाठ दाखवून झोपले होते.
उर्वीला सकाळी पाळी आली, तिने तिचं आवरलं, जरा शांतही झाली होती. नेहमीप्रमाणे तिचे आकाशच सर्व काही लावून ठेवलं, त्याचा शर्ट, पॅन्ट, सॉक्स, बॅग आणि ब्रेक फास्ट, त्याच्या जवळ येवून बसली,
“सॉरी आकाश काल मी जास्तच बोलले. तसं नव्हतं म्हणायचं मला.”
आकाश डोळे पुसत उठला, “मीपण, चल तुला सोडतो तुझ्या स्टॉपवर.”
तो वाशरूम मधून जावून आला, हॉल मध्ये गेलाच नाही, हळूच उर्वीला म्हणला,
“चहा दिला का आईला?”
उर्वी ड्रेस नीट करत म्हणाली,
“हो दिला ना, बिस्कीटपण दिलीत.”
“पण तिने खल्ली का?”
“ते नाही बघितलं मी, मला पाळी आली मग मी इकडेच होते. आता बघते ना.”
“पाळी आली! बऱ ठीक आहे...”
“का रे...”
“काही नाही... मला वाटलं होतं काही असलं तर आई निदान गप्प राहील, जावूदे.”
“काय!”
“जावूदे, विचार करू नकोस.”
“हुम्म...”
“उर्वी आज माझी महत्वाची मिटिंग आहे ग, कदाचित मला विदेशात पाठवणार आहेत. काही महिन्यासाठी.
“अरे मस्त...”
“हुम्म, चल लवकर, वेळ झाला, तो तुझा मुच्छड बसं ड्राईवर मला असा बघत असतो.”
“असं, जा तू गाडी काढ, मी आलेच.”
आकाश, हॉल मध्ये आला, गाडीची किल्ली हातात घेतली, आई हॉल मध्ये नव्हती. चहा आणि बिस्कीट तशीच होती. तो परत खोलीत आला, तर त्याची नजर बाथरूमवर पडली. आई बोथरूम मध्ये होती. त्याच्या परत मनात शंका आली, बाथरूममधून त्यांच्या खोलीतलं सारंकाही ऐकू येत होतं. आकाशच्या मनात खूप काही आलं पण त्याने मनातून काढून टाकलं, तो ओरडला,
“आई मी हिला तिच्या स्टॉपवर सोडून येतो. दहा मिनिटात.”
आणि तो उर्वीला घेवून निघून गेला.
परत आला, त्याने त्याची तयारी केली, जातांना आईजवळ आला,
“आई, आज मला वेळ नाही, तुला ट्रॅवल स्टेशनला सोडायला. आणि बुकिंगपण केली नाही आहे. आज करतो मग उद्या निघ.”
“हुमम...”
तिने नुसता हुंकार दिला. आकाश जायला निघाला, तर म्हणाली,
“काय ते खोलीत दोघजण ठरवतत अन गोड गोड बोलतत, अन मी वाईट..”
आकाश जुते घालत होता, म्हणाला, “काय काय बोलली तू... “
“मी काय बोलू, तुम्ही दोघ राजा राणी... मीचं काय ते वाईट... काल तुही बायको माह्याशी कशी बोलली तरी ती प्याराची अन म्या माय हाय तुही...”
“मग काय करू... तू माझी माफी मागितली... “
“म्हणजे, मी मागाले पाहिजे का?”
“अन तिची चिडचिड का झाली हे मला माहित झालं आज... पण तुझ्या चिडचिडच कारण काही कळत नाही.”
“हो रे... समजन ना तुले बी...”
मग हळू आवाजात पुटपुटली, “समजन का नाय ते बी माहित नाय, जन्माले घाललं तेवा समजन ना...”
आकाश तिच्या आता जवळ आला, “काय म्हटलं ग.”
“काय नाय, तू काय समजाच ते समज.”
“मला समजाचबीन नाही... जेवण करून घेशील. आज उशीर होईल मला. आणि उर्वी पण उशिरा येणार आहे. तिची कॉन्फेरंस आहे आज.
तो निघाला, परत म्हणाला,
"जेवण करशील... अन कहीही फालतू विचार करू नको, मला आणि उर्वीला चांगलं माहित आहे. आम्हाला काय करायचं आहे ते. तू आमची काळजी करू नकोस, फक्त स्वतःची काळजी घे."
आज इथेच थांबूया... कथा लवकरच मुख्य वळणावर येत आहे, तेव्हा तुमची साथ असुद्या, काय आहे ना, आयुष्यात घडणाऱ्या घटनांची मूळ खूप खोलवर असतात, आपल्याला दिसतात ती फळ.... मग जरा धीर धारा... आणि सोबत राहा ....
पुढचा भाग लवकरच ....
© उर्मिला देवेन
कथेचे सर्व भाग वेबसाईट आणि पेजवर आहेत, तुम्ही वेबसाईटवर, कथा मालिका -> बीइंग नारी... ला क्लिक करा. आणि सर्व भाग वाचा.
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments