बीइंग नारी... 13
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
------------------------
काय आहे ना,
प्रेमातल्या काल्पनिक फुलपाखरांना उडावं वास्तविक जीवनात लागतं...
त्या दुनियात प्रेमात तुझ्या माझ्या ही दुनिया रे कैसी म्हणून काम चालतं
पण वास्तविक जीवनात, तू मी शिवाय, प्रेमात तुझ्या माझ्या सारंकाही असतं
दिवस जातं होते, आणि मग उर्वी आणि आकाश त्यांच्या प्रेमात आणि कामात मग्न होते. लग्नाला दीड वर्ष जास्त झालं होतं, आता उर्वीला मनातून कसं तरी होतं असायचं. आपल्याला दिवस जात नाहीत ह्याच तिला मनात खूप काही वाटायचं. त्यात जवळपास ओळखीतल्या सर्वाना लग्ननंतर वर्षभरात दिसव गेले होते. काही पहिल्याच महिन्यात प्रेग्नंट राहिल्या होत्या तर काही सहा महिन्यात. पण उर्विला असं काही लागलीच अनुभवायला मिळालं नव्हतं. मनातल्या मानत विचार सुरु असायचा पण मनातच मनाची समजूत काढायची ती,
“आता कुठे दीड वर्ष होणार... बराच वेळ आहे माझ्या हातात... माझं काही ह्या नादात करिअर वाया जायचं नाही, मी आता आहेच ना कामात व्यस्त, अनुभव आहे माझ्याकडे.”
पण दुसऱ्या क्षणाला मन उगाच विचारात शिरत होतं. त्यात कुणाच्या आपुलकीच्या शब्दांची अपेक्षा करणं म्हणजे पाप होतं. घरचे आणि सासरचे मनात ठरवून पक्के होते, की हिलाच सध्या बाळ नकोय...
मग उर्वीला मनात वाटायचं,
“हेही ठीक, निदान मला अजूनही दिसव जात नाही हे तर त्यांना कळत नाही...
भलेही लोकं आपल्याला वाईट म्हणोत पण आपल्यात वाईट तर शोधत नाही, ते त्यांच्या भ्रमात सुखी मी माझ्या कामात...”
_______________
त्या संध्याकाळी आकाशने उर्वीला बातमी दिली, तो कंपनीकडून जपानला जाणार होता. उर्वीचा आनंद गगनात मावत नव्हता, जरा आनंदी, जरा हळवी झाली होती ती. तसा आकाश तिला घेवून जाणार होताच, तो कुठे एकटा राहणार होता तिच्याशिवाय, पण नंतरच ना... आत लागलीच शक्यचं नव्हतं ते.
घरात आता ही वार्ता सर्वाना कळाली होती. नवल आणि आनंद सर्वाना होताच. पण उर्वी इकडे एकटी राहणार होती हे मात्र तेवढं खरं. तशी ती सगळं सोडून त्याच्यासोबत लगेच जावू शकत नव्हती. तिचा जॉब परमॅनेन्ट होता, तीन महिन्याआधी सांगावं लागणार होतं. आता उर्वीजवळ कोण राहणार प्रश्न होताच.
आकाशला एअरपोर्टवर सोडायला जातांना तिचे डोळे पाणावले होते, आणि अश्रू डोळ्यातून निघू नये म्हणून आकाश तिला सोडून सर्वाना बघत होता, मित्रांनी त्याला टोकलंही, एक तर त्याच्या जवळ येवून म्हणाला,
“अबे, उसके साथ बात कर, अभी अकेली रहेंगी यहा ओ... मुझे सब पता है तेरे बारेमे... कोई नाही साथ देनेवाला उसे, जा बात कर!”
तरीही आकाशच्या नजरा उर्वीवर पडून परत जात होत्या. कसंबसं मनाला सावरून आकाशने एअरपोर्टचा व्हरांडा सोडला. आणि तो कर्मभूमिकडे निघाला.
ते काही महिने उर्वीसाठी खूप कठीण गेले. भावाला पुण्यात नौकरी लागली होती, तो तिच्याकडे राहायला होताच. आणि सासूला वाईट वाटू नये म्हणून आकाशसाठी उर्वीने तिलाही मधून मधून बोलावलं होतं. तिच्यासाठी सारंकाही कसं ठप्प पडलं होतं,. तिचे बाळासाठी सुरु असलेले प्रयन्त जरा वेळेसाठी विसावले होते. रोज आकाशशी बोलणं होत होतं. त्यात कधी वाद, कधी मस्करी, कधी प्रेम होतंच. पण आता उर्वीला इकडे ऐकट राहायचं नव्हतं.
आकाशने उर्वीला तिकडे बोलवून घेण्यासाठी प्रयन्त सुरु केले होते. उर्वीचं मास्टर होतं तीही जपानमध्ये काही मिळते का म्हणून सतत बघत असायची. लग्नाचा दुसरा वाढदिवस येवून ठेपला होता. आकाश आणि उर्वीला तो एकटा एकटा घालवायचा नव्हता. उर्वीचा विझा तयार झाला आणि तिकट बुक झाल्या होत्या.
काही दिवसात राणीचं लग्न जुळलं, साखरपुडा होता, आता उर्वीने तिकडे विदेशात जावू नये असं तिच्या माहेरी वाटत होतं, पण उर्वी आणि आकाशच आधीच सर्व ठरलं होतं. उर्वीने राजीनामा दिला होता. आणि सगळं सामान पुण्यावरून सासरच्या घरी हलवलं होतं. भावाला आणि घरच्यांना राग येत होता तिचा पण तिला आता थांबायचं नव्हतं.
तिच्या आणि आकाशच्या अनेक विनवण्या नंतरही उर्वीच्या माहेरच्यांनी राणीचं लग्न जरा महिना लांबवलं नव्हतं.
आणि इथेच आकाशच्या मनात अळ पडली, सर्व सर्वांच्या जागी बरोबर होते. कुणीच चुकीच नव्हतं, पण सर्वच समोरच्याला चुकीच दाखवण्यासाठी तत्पर होते. सारखंपुडा मोठ्या दणक्यात आटोपला होता. तसा उर्वीला कधी तिच्या माहेरी मान मिळाला नव्हता, आणि कदाचित तो मिळणार नव्हताच, शेवटी लग्नासाठी उर्वीने परत येतो म्हणून आईला सांगितलं आणि तयारीला लागली.
नाती पण ना...
जिथे आपल्या असल्याने फरक पडत नाही तिथे नसल्याने काय फरक पडणार होता... हे उर्वीच्या लक्षात आलं होतं.
तसा आकाश वर्ष दोन वर्षासाठी जपानला राहणार होता. मग उर्वीला तो वेळ गमवायचा नव्हता. बाळ झालं तर तो वेळ उत्तम असले असाच दोघांचा विचार झाला होता. उर्वीलाही आता जरा ब्रेक हवा होता, ती तर कॉलेज झाल्या झाल्या नौकरी करत घराबाहेर होती. आकाशला सेंटल होण्यासाठी वेळ मिळवा म्हणून आणि घरात लग्नाचा विषय टाळता यावा म्हणून तिची स्वतःशीच चाललेली स्पर्धा होती ती मागच्या पाच सहा वर्षापासूनची.
कसं असतं ना, ज्याचं जळतं ते त्यालाच कळत असतं...”
आपण लोकांना का खुपतो तर आपण त्यांना आवडतं नाही म्हणून नाहीच कदाचित...
पण जरा त्यांच्या मनासारखं वागलं नाही कि मग रक्ताच्याही त्यातलं रक्त पातळ होतं कदाचित. आणि मग आपल्यासाठी आपुलकी हरवून जाते...”
येवढ्यात बाळ झालं की मग करिअरचा ग्राफ अजून जोरात आखता येईल आणि नातीही जरा स्थिरावतील ह्या विचाराने उर्वी मनातून तयार झाली होती. तिला आता आकाशजवळ जायचं होतं. जरा स्वतःला वेळ द्यायचा होता.
ऑफिसमध्ये होती, सोबत काम करण्याऱ्या सर्वांनी तिला अनेक सल्ले दिले होते. त्यात माने मॅडम होत्याच ना, दुपारच्या जेवणाच्या सुट्टी मैफिल जमली होती, म्हणाल्या,
“उर्वी, एकांत असेल तुला तिकडे, घे आता तू चान्स, जॉब काय तुला मिळेल नंतर, Mtech आहेस, रोबोटिक्स मध्ये काम आहे तुझं, हा अनुभव आहेच हाताशी, पण हेही खूप महत्वाच असतं ग. स्त्री म्हणून आपल्याकडून अपेक्षा असतात सर्वांच्या. नाती मजबूत करण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो आपल्यासारख्या करियर करणाऱ्यांचा... वेळ घेता येत नाही आणि वेळ देवू शकत नाही.”
मंजिरी मॅडम त्याचं शब्दांना उचलत म्हणाली,
“बीइंग नारी सर्व काही करावं लागतं ग, आधी सारखं राहिलं नाही आता, लग्न करा आणि मुलं मग त्याचं करा... आता घरात बायको हवी असते ती कमवणारी आणि बाई म्हणून राबणारी... काय आहे ना मूळ गोष्ट तशी बदलली नाही पण विचारांसोबत अपेक्षा जाम बदलल्या आहेत आजच्या काळात... आणि ह्या काळासोबत पळत गेलो नाही तर हेच लोकं बोलतात आपल्याला, बीइंग नारी, आयुष्याची कसरत सारी.”
संगीता लॅबमध्ये काम करणारी होती, तिच्याही लग्नलाही बारा वर्ष झाली होती, नवरा मोठ्या कंपनीत डिरेक्टर होता, पण तिला नौकरी करायची होती, म्हणाली,
“आपलं हक्काचं पाकीट हवं असतं उर्वी, नवरा लाखो कमवत असला तरी आणि कितीही प्रेम करत असला तरी. म्हणून सांगते, हा आईपणाचा सोहळा न सुटणारा आहे, पण उशीर झाला तर सारं सुटत जातं ग, तू ना जाण्याआधी स्वतःच चेकअप करवून घे. म्हणजे अगदी तयार होवून जा तिकडे, पाच सहा महिन्यात राहशील ग तू प्रेग्नंट. प्रत्येक महिन्याला बरोबर दिवस पाळायचे.”
“म्हणजे हो..” उर्वी कुतूहलाने म्हणाली, तर माने मॅडम हसत म्हणाल्या,
“घ्या आमच्या रोबोटिक्सच्या मॅडमला हेही सांगा आता, अग आयुष्य रोबोट आहे माहित नाही का तुला, सायन्स आहे सगळं... बघ पाळीचे काही दिवस सोडून वरचे आठ दिवस दे सोडून आणि मग करा तुमचा कार्यक्रम फिक्स...”
“काय हो मंजिरी मॅडम, सुटलं होतं ना तुमचं गणित ह्याच नियमात दुसऱ्यांदा....”
सगळ्या परत जोरात हसायला लागल्या, मंजिरी मॅडम, हसतच म्हणल्या,
“मग काय, पहिली मुलगी तीनची झाली होती, आणि मग दुसरं बाळ हवं म्हणून घरात घरच्यांनी तगादा लावला होता. केलं फिट हे समीकरण, सुटला माझा गुंता, मुलगा झाला, सासू सासरे खुश... असतात दिवसभर नातावांसोबत... मजेत सुरु आहे सगळं आता, सासूबाई करते किरकिर माझी, पण चालायचं... तिलाही कळतं आता, तिला जे जमलं नाही निदान मी ते करावं म्हणून... मग मीही कानाडोळा करते काही बोलत जरी असल्या तरी... थोडंफार सासरे सांभाळून घेतात. आणि आलच अंगावर तर नवरोबा असतो ना, देत करून समोर... मग सांगतात हे, घराच लोन आहे, कार घेतली आहे. दोन मुलांचा उत्तम शाळेचा खर्च... आणि काय काय ते... सगळे गुमान गप्प बसतात काही महिने... आणि मी माझ्या नवऱ्याच्या मिठीत....”
माने मॅडमने तिला थांबवलं, “अग, बसं पुरे, आता काय सगळं सांगशील, काही तिलाही अनुभव घेवू दे, ज्याचं त्याचं गणित वेगळं असतं मंजिरी... आपण काय, बसं जरा विसावा देवू शकतो, तिचं तिलाच सोडवायचं आहे सारं.”
सर्व जरा गंभीर झाल्या, तेवढ्यात सानिका माने मॅडमच्या कानात बोलली, आणि माने मॅडम जोरात,
“हो बातमी बक्की आहे. आपल्या कुंद सरांच्या बायकोला बारा वर्षाने दिवस गेलेत, तेही सोडणार आहेत जॉब. जाणार आहेत परत त्यांच्या गावी... इकडे ते फक्त बायकोच्या ट्रीटमेंट साठीच आले होते. काय हाल झाले होते ग तिचे. बिचारी, राहले शेवटी दिवस तिला, आपले सर पण कमी नाही, साथ दिली ना तिला.
मला तर आठवतं, अंगावर जास्त आलं ना कि काही आडपरदा राहत नाही ग, हे समीकरण त्यानांही बोलले होते मी सुरवातीच्या दिवसात.., भावासारखे लहान सहान गोष्टी सांगायला यायचे नवीन होते तेव्हां, मग तर त्यांनी खूप मोठ्या डॉक्टरला दाखवलं बायकोला...”
उर्वीला कॉलेमध्ये काम करून जेमतेम काय ते दीड वर्ष झालं होतं, तिला तसं कुणाचं काही माहित नसायचं. मग प्रश्न केला तिने,
“मॅडम असं काय झालं होतं हो कुंद सरांच्या बायकोला.”
“काही नाही ग, मुलं होतं नव्हतं ना, त्यातल्या त्यात सासूचा त्रास भारी, त्याच्या घरात म्हणे हिलाच मुलं होतं नव्हतं. भरपूर संपत्ती आहे कुंद सरांची त्याच्या गावात, पण बघ ना वारस नव्हता ग त्यांना. मला म्हणाले होते, मुलगी हो की मुलगा, माझा वारस हवाय, तोही बायकोसाठी, तिला असं खुडत बघू शकत नाही, संपत्तीचं काय घेवून बसायचं. चित्राला अख्खी सोन्याने माळवू शकतो पण तिला कडेवर बाळ हवय, नाहीतर वेड लागेल तिला...”
उर्वीने परत म्हणाली, “त्यांची ट्रीटमेंट सुरू होती का?”
“हो ग, होती सुरु, मागच्या पाच वर्षापासून इथे ते तेच करत होते. महिन्यातून कितीतरी वेळा त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं, पण थकले नाही ते.”
तेवढ्यात दार वाजलं, सर्व जरा थबकल्या, कुंद सर आतमध्ये आले,
माने मॅडम लगेच म्हणाल्या, “अहो सर आम्ही आता तुमच्याबद्दल बोलत होतो, खूप खूप अभिनंदन सर, चित्रालाही अभिनंदन सांगा माझ्याकडून.”
सरांनी स्मित हास्य देत अभिनंदन स्वीकारलं, आणि ते माने मॅडमशी त्याचा तास अॅडजस्ट करू लागले. बोलण्यात त्यांना माहित झालं की उर्वीही जॉब सोडणार आहे आता, तर उर्वीला बघत म्हणाले,
“अरे आता दुसरी विकेटपण पडणार वाटते आपल्या डिपार्टमेंटची.”
“काय उर्वी मॅडम, मग कधी आहे प्लॅन तिकडे अहोकडे जाण्याचा... छान, छान निर्णय घेतला..”
उर्वी उठली, म्हणाली, “अहो सर, पुढच्या आठवड्यात निघणार आहे मी.”
“व्हा व्हा, मस्त...”
सर निघून गेले. पण सरांचा तो शांत चेहरा उर्वीच्या मनाला खूप काही सांगून गेला होता. समाधान बघितलं होतं तिने त्यांच्या चेहऱ्यावर.
पुढचा भाग लवकरच..
© उर्मिला देवेन
कथेचे सर्व भाग वेबसाईट आणि पेजवर आहेत, तुम्ही वेबसाईटवर, कथा मालिका -> बीइंग नारी... ला क्लिक करा. आणि सर्व भाग वाचा.
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार
उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट
कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा!
आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments