बीइंग नारी... भाग २०
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
दिवस जातं होते, उर्वीची जाण्याची तयारी सुरु होती. उर्वी शॉपिंग करून परतली होती तर तिच्या कानावर शब्द पडले, आई बाबांशी फोनवर बोलत होती, बाबाची दुसऱ्या शहरात बदली झाली होती आणि ते तिकडे राहत असत, शनिवार रविवारी ते इकडे यायचे. आई म्हणत होती,
“आपण किती आटापिटा केला तिचं मन वळवण्याचा, बघा ना असा नवीन प्रोब्लेम उभा राहिला आता, आता आपल्या मुलीला पोरंबारं झाले नाही तर हे असले लोकं काही साथ देत नसतात. ते तिची अडाणी सासू तर हिलाच बोलत असणार. आता आपली पोरगी सांगत नाही. पण तिच्या नजरेत वाचता येत आपल्याला. एवढी शिकलेली मुलगी आपली, काय भोग वाढून ठेवले आहेत तिच्यापुढे काय माहित.”
बाबा, “आपण काय करू शकतो ते बघ.”
“काय करता, बघू काय होतं ते. घेवून गेली होती मी तिकडे. हो घेतली मी औषध पोरासाठीपण.”
बाबा, “जावूदे ग, झालेच किती वर्ष.”
“हो आता अजून काय झालं... जेमतेम अडीच वर्ष... पण चिंता लागते ना, लोकांच्या मुलींना मुलं झाले, आपली मुलगी शिकलेली म्हणून गप्प आहोत. पण हे असं नवीन ऐकलं तर मनाला त्रास होते. तसं ती काही बोलत नाही. पण बाई माझं आईच मन... काय करू मला तो मुलगा आणि त्याची आई कधीच पसंत नव्हती. पण आपल्या मुलीच्या इच्छेसमोर काय बोलावं...”
बाबा, “झालं आता, तिचं ती करेल.”
“हो जावूच द्याच आता... आहे ती समजदार. आपण बोलून काय वाईट व्हयाच का. तसंही काही अपेक्षा नाहीत आपल्या. आहे माझी राणी, माझं ऐकण्यासाठी... हिच्याशी तर बोलून काही होतं नाही. आपणच उत्तर देण्याच्या लायकीचे राहत नाही.”
बाबा, “म्हणूनच बोलू नकोस.”
“हो हो, काही बोलत नाही तिला...”
बाबा, “किती दिवसासाठी आली आहे ती.”
“महिन्या भरासाठी... आता झालेच ना पंधरा दिवस जास्तच, बाईची जाण्याची तयारी सुरु झाली आहे.”
“सासरी जावून आली का?”
“हो आली जावून पण जाणार आहे म्हणे अजून, काय बाई, ती बया हिच्यासंग धड बोलत नाही, कशाला जाते तिकडे कोण जाणे... पोरगा म्हणत असले ना.”
बाबा, “तिकडे पण जायला हवंच ना.”
“हो, हो, जावूदे... मी काहीच म्हणत नाही. तुम्ही या लवकर ह्या वेळी.”
उर्वीला कळला होतं बाबा आईला काय सांगत होते. आणि आई का अशी बोलत होती, तशी ती तिच्याजागी योग्यच असावी... ज्याच्या नशिबी असे भोग येतात त्यालाच माहित असते. उलट नवरा आता दोषी होत होता हे वेगळं.
स्त्रीला स्त्री म्हणून किती बाजू सांभाळाव्या लागतात, आता नवरा तिच्या नवसाचा होता, तिला आकाश हवा होता जोडीदार म्हणून. आणि तिची निवड उत्तम आहे हे तिला पटवून देण्यासाठी काय काय नाही करावं लागत होतं, ते तिचं तिला माहित होतं. सासरी अपमानाने आवंढे गिळून मानाचा तोरा माहेरी मिरवणं म्हणजे तारेवरची कसरत असते.
एक नारीच जेव्हा नारीला समजू शकत नाही तेव्हां सारचं भारी होत जाते. आणि त्याची जाणीव नारीलाच नसते.
उर्वी सारं ऐकूनही काहीच बोलली नाही, गुमान काही दिवस माहेरी राहिली. नंतर ती सासरी गेली, तिकडे तर काही जमण्यासारखं नव्हतं.
दिवसभर करायचा काय हा प्रश्न असायचा, घरची पुस्तकं नीट ठेवणं. आलेली कागदपत्र बघणं. कपाट नीट करणं, धाकधूक मनात ठेवून स्वयंपाक करणं, हेच उर्वी करायची. मनासारखं तर ती काही करूच शकत नव्हती. नुसता स्वयंपाक खोलीतला डबा जरी उघडला तरी सासू धावत येवून बघायची, उलट किरकिर करायची कि, “माझे डबे उघडून बघते, समान हुंदळते.”
उर्वीलाही प्रश्न पडायचा काय लपवून ठेवलंय स्वयपाकखोलीत.
त्या दिवशी तिने कपाट पुसण्याच काम हाती घेतलं, तसं ते कपाट तिला लग्नात आलं होतं. पुसत असतांना सहज शब्द निघाला,
“किती धूळ बसली ना, काही दिवसात, मी आता पुसायलाही नाही…”
सासू आतमधल्या खोलीतून लगेच म्हणाली,
“हो मला काय काम नाहीत, तुझे कपाट पुसत राहू...”
उर्वी पटकन म्हणाली, “माझे कपाट? तुमचंही सामान भरलं आहे तुम्ही.”
ती हे ऐकताच अशी रागात तिकडे आली आणि त्या कपाटातून तिचं सामान ओढून काढलं, जोरजोराने रडायला लागली,
“मी काय कधी कपाट पाहिलं नाही बाई म्हणून ठेवलं, घे तुझं कपाट केलं मोकळं...”
उर्वीला काही सुचलं नाही तिनेही आगीत पाणी ओतलं,
“कशाला रडता, नाटक करू नका उगाच, मी काही इथे नसते... तुम्हीच वापरता... मी तर सहज म्हणाले, कपाटावर धूळ होती म्हणून.”
“हो मीचं वापरतो ना, तुह्या बापाने घेवून दिलं आहे.”
“कशाला बोलता, खर तर आहे. ह्या घरातल्या सर्व वस्तू माझ्या वडिलांनी घेवून दिल्या आहेत. काय म्हणता मग.”
“हो आमची तर लायकी नाहीच ना.”
“मला काय माहित, आता हा टीव्ही माझा आहे. हा मोठं दिवाण बेड ज्यावर तुम्ही हक्कचा समजून झोपता ना पाय पसरून तोही माझ्या वडिलांनी मला दिलाय. तुम्हाला नाही... अजिबात झोपायचं नाही निदान मी असे पर्यंत.”
“घेवून जा इथून तुझं सामान, माझ्या घरात नको...”
“असं, मग मी यायला पाहिजे, लोकांना सांगायला... सामान चालत नाही.”
“अरे देवा, मी काय तुले ये म्हटलं होतं... येतस इथ एकटी... ह्याले त्याले भेटतसं, दिल्ली मधी एकटी होतीस, शहरात फिरतसं लोकांसंग.”
आता मात्र उर्वीला शब्दाचा अर्थ कळायला वेळ लागला... पण जेव्हा कळला तिला राहवलं नाही. तिने तिची बॅग भरणं सुरु केलं. उर्वी सामान भरत आहे हे दिसताच सासू मागच्या अंगणात जावून रडत बसली होती.
तेवढ्यात काकू घरात शिरल्या, सासूच्या मैत्रीण होत्या, सासूला आवाज देत त्या उर्विकडे आल्या, तिचे डोळे लाल होते, त्यांनी डोळ्याकडे बघितलंच नाही, त्यांनी प्रश्न केला,
“कवा आलीस बाई?”
उर्वी उत्तर दिलं, “पंधरा दिवस होतील आता...”
“चालली पण काव बाई आता...”
उर्वीने उत्तर दिलच नाही तर परत म्हणाली,
“काय व, एकटी येतस नुसती, अजून पोट सपाट तुये, काय पोरं बिरं पायजे का नाय? तुयी वाली सासू मोठी आस पकडून हाय. तिचा त इचार करा. आता म्हतार माणूस कवा पर्यंत रायल. तू बाई शिकली पोरगी एकटी दुकती फिरतंस, फिरू नको बाई, लय जमाना खराब हाय...”
उर्वीचे डोळे अजून भरून आले होते. ती तिची बॅग भरण्यात तिच्या शब्दांवर उत्तर देणं टाळलं होतं. आता काय करावं मनात आलं तिच्या, आईच्या घरातून मोठ्या तावाने निघाली होती कि सासरी काही दिवस राहिल म्हणून पण काही इकडे जमलं नाही. दोन दिवसात घराच्या बाहेर निघण्यासाठी उर्वी तयार झाली होती.
काकू सासूला आवाज देत आतल्या अंगणात पोहचल्या होत्या, आणि त्या जोरजोराने त्यांच्या जवळ रडत होत्या. उर्वी घरातून निघून गेली. ती रस्त्याने जात होती तेव्हाही सासूच्या वयाच्या बायकों तिला उभ्या राहू राहू बघत होत्या. काही बायको तर पुटपुटत होत्या. कसतरी बॅग घेवून ती मुख्य रस्त्यावर आली, आणि आकाशचा फोन आला, तो असा रागवला आणि उर्वीला काहीच सुचलं नाही.
“तुला समजत नाही, माझ्या घरातून निघून गेली तू. आई रडत आहे, काय बोलली तिला? अरे तुला तर समजायला पाहिजे होतं ना. ती तर तशीच आहे.”
“हे बघ, मी काहीच बोलली नाही.”
“तू काय आणि कशी बोलते ना, हे मला चांगलं माहित आहे. तू पण काही कमी नाही.”
“हो रे मी तर कमीच नाही... पण तुझी आई किती जास्त आहे माहित आहे का?”
“मला चांगल माहित आहे. परत जा घरी.”
“मी जाणार नाही, तुला माहित आहे काय बोलतात बायका माझ्याबद्दल?”
“ते ऐकायचं नाही मला... मला तर कुणीच काही बोलत नाही.”
“आकाश, मी जाणार नाही...”
“तू सर्व सामना घेवून निघालीस का?”
“जमलं नाही मला तेही घेतलं असतं, तुझा आग्रह होता म्हणून सुरुवातीला सर्व मोठ्या बॅग घेवून इथे आली होती. आता घरापर्यंत ऑटो न्यायला मला वेळ नव्हता, आता जाण्यासाठी ऑटो घेवून येईल आणि सामान घेवून जाईल... पण आता मी जात नाही.”
“तू ना, फालतू आहेस. जा आता तुझ्या घरी.”
“आकाश इथे माझं घर कुठे आहे रे?”
“तुझी आई म्हणते ते तिचं घर आहे, माझं घर माहेर झालंय, ते कुठे माझं राहिलं?”
“फालतू बोलू नकोस, नवऱ्याच्या घराला स्वतःच समजत नाहीस... आली मोठी... मला आईशी बोलायचं आहे. जा तू जिथे जायचं तिथे.”
उर्वीने ऑटोला हात दाखवला, आणि ती बसं स्टँडला आली, जायचं कुठे होतं काही माहित नव्हतं.
अचानक आपण रस्त्यावर आलोय असचं तिला वाटू लागलं. नजेरेसमोर आतापर्यंतचा चित्रपट धावत होता.
कथा क्रमशः
कथेचे
सर्व भाग वेबसाईट आणि पेजवर आहेत, तुम्ही वेबसाईटवर, कथा मालिका -बीइंग नारी... ला क्लिक
करा. आणि सर्व भाग वाचा.
© उर्मिला देवेन
कथा
वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
1 Comments
Sign in to see explanation why why} you could or may not like this primarily based in your video games, associates, and curators you follow. Whether you're taking 다파벳 part in} a machine or eight guys with cigars, you may be glad to know some Poker Basics. Note that we don't draw to two-card royals consisting of an ace and a 10. In that case, you'd simply keep the ace and discard the remainder. Below the screen is a console contains a|that features a} bill validator. Players slide in forex, and credit then seem on the screen.
ReplyDelete