बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” भाग २४

 बीइंग नारी...

“जेव्हा आई होणं अवघड होते!”

© उर्मिला देवेन



--

उर्वी सारंकाही ऐकून सुन्न झाली होती, अशीही एक बाजू असू शकते हे तिला पटणं कठीण झालं होतं. आकाश गुमान तिच्या जवळून उठला, त्याला काहीच बोलायचं नव्हतं. कदाचित त्याला विषय वाढवायचा नव्हता. पण उर्वीला विषय वाढवायचा होता, तिलाही त्याच्या मनातला मळ बघायचा होता, ती उठली, म्हणाली,

“मुलगी बघून ठेवली काय रे तुझ्या आईने? तिच्या मनासारखी, म्हणजे, तिचा मानपान करणारी आणि हुंडादेणारी. तू असा गप्पा झालास कि बस्स...”

“ये फालतू बोलू नकोस, उर्वी तसं नाही आहे.”

“मग कसं आहे, तुझ्या आईची हिंमत कशी झाली हे बोलण्याची.”

“आता झाली, मी काय करू, मी तसं करणार नाही मग तर झालं.”

“करायला काय! तू तर तुझ्या आईचं पिल्लू आहेस ना ती जसं म्हणेल तसं तू करणार, आता मागे इकडे येण्याआधी तिने तुला मंगळसूत्र करून मागितलं, करून दिलं कुकुल्या बाळाने... बायकोला नाही आणि आईला घालून मिरवायला पाहिजे.”

“उर्वी जावूदे ना, दिलं करून, ती काय घेवून जाणार आहे. आपलंच आहे ते.”

“असं, मग मला लग्नात तिने तिची नथ दिली होती, ती कशी मागून घेतली, तिला घालून मिरवायच होतं ह्या वयात. माझ्याकडे राहिली असती तर काय झालं असतं? अजून काय, तोरडी, जोडवी, सगळचं तिने मागून घेतलं... हे असं? म्हणे आपल्याला होणार आहे. राहूदे दे रे, नाटकं आहेत सारे.”

“उर्वी काय फरक पडतो, आपण तुला त्यापेक्षा सुंदर घेवू...”

“घेणार आला मोठा, हुम्म्म. तुला मी कुठे हवी आहे. पाहिजे असेल ना तुझी आई.”

“मी असं कुठे म्हणालो, आणि पाहिजे माझी आई तर काय फरक पडतो, तिचा एकुलता एक मुलगा आहे मी, तिने रहावं माझ्यासोबत.”

“इथेही?”

“का नाही. आई आहे माझी.”

“हेच, हेच भरवते ती तुझ्या डोक्यात. मी आई आहे मी आई आहे.... ती तिथे राहून रिमोट चालवते तुझं... आणि तू रोबोट आहेस तिच्या हातातला. काय म्हणत होती ती, तिला फिरायला कशाला नेतोस. असं, म्हणजे काय तिला घेवून जाणार?”

“तू जास्त बोलत आहेसं.”

“असं, असं तू तुझ्या आईला नाही बोललास...”

“ती आई आहे.”

“आणि मी?”

“तू बायको.”

“म्हणजे बायको सतरा साठ मिळू शकते आणि आई नाही ना?”

“मग, बरोबर आहे. एवढं समजते तर चूप राहा ना... मला तू सांगू नकोस, मी कसा आहे ते.”

“हो दिसत आहे तू कसा आहेस ते, आता मला मुलं होतं नाहीत ना, मग तुझ्या आईला म्हटलं असेल तुचं.”

“असं मी काहीच बोललो नाही.”

“मला काय माहित, मी येण्याआधी तुझं आणि तिचं काय बोलणं झालं तर..”.

“हो झालं माझं बोलणं, जा काय करतेस.”

“काय करू शकते मी, आता कामाची नाही म्हटल्यावर तुला वाटत असणार ना.”

“मग कामाची हो ना, स्वीकार कर...”

“असं, माझ्या... माझ्यात काही प्रोब्लेम आहे असं म्हणणं आहे का तुझं... तू स्वतःला कधी दाखवलं आहे का डॉक्टरकडे... माझ्या घरात कुणाला मुल उशिरा झाली नाहीत. ही परंपरा तुझ्या घरात आहे. समजलं, आला मोठा... तुझं चेकअप कर ना? मीचं का भोगू...”...... विषकन्या कश्यपी कादंबरी इथे उपलब्ध आहे

आकाशने भिंतीवर मूठ रागात मारली, खर तर ती उर्वीच्या तोंडावर बसणार होती. पण तिचं बोलणं योग्य होतं. त्याने कुठे स्वतःला अजून चेक करवून घेतलं होतं. संतापून तो खोलीत शिरला. आणि परत घरात सन्नाटा पसरला.

रात्री कुणीही कुणाशी बोललं नाही. उर्वीने मनात विचार केला, तिलाही चुकल्यासारखं वाटत असायचं. आणि आकाशलाही पण जावून आधी बोलणार कोण... ह्या विचारात रात्र निघून गेली. दोघेही दोन खोलीत झोपले होते. अधून मधून दोघंही हळूच एकमेकांच्या खोलीत डोकावत असत पण पुढे येवून बोलण्याची पहल मात्र झाली नाही. सकाळी आकाश उठला, त्याचं लक्ष समोरच्या कॅलेंडरवर पडलं, त्याने वर्तुळ करून ठेवलेले दिवस होते, डोक्याला हात लावत तो उर्वीला शोधायला दार खोलून निघाला, ती घरात नव्हती. आता मात्र आकाश घाबरला, दहा वाजले होते, तो झोपूनच राहिला होता, रात्री उशिरापर्यंत भांडत असल्यानेमुळे. त्याने उर्वीला फोन लावला, तो घरातच वाजत होता. आता मात्र अजूनच घाबरला, कसं करावं म्हणून त्याला सुचत नव्हतं, त्याने कपडे बदलले, चप्पल घातली आणि दाराजवळ आला, तसं दार बाहेरून उघडल्या गेलं, उर्वी भाजीच घेवून दारात होती. आत मात्र साहेबांनी काहीच म्हटलं नाही, चप्पल काढली आणि गुमान खोलीत. परत गप्प.

त्याला कळालं होतं, उर्वीच्या उगाच चिडण्यामागचं कारण, कसातरी तो उर्वीच्या पुढे आला, ती भाजीच फ्रीजमध्ये ठेवत होती. त्याने वांगी उचलली आणि म्हणाला,

“आज ह्याची भाजी कर... नाहीतर मी चिकन आणू का? आज शनिवार आहे ना, सुट्टी आहे.”

उर्वीने गुमान उत्तर दिलं, “मी घेवून आली आहे.”

आता मात्र त्याने तिला फ्रीज समोरून बाजूला केलं, मिठीत घेतलं,

“सॉरी मी विसरलो होतो, हे तर दिवस मला तुझं ऐकून घेण्याचे आहेत. माझा तोल गेला. तू हव्या तेवढ्या शिवा घाल ना... मी ऐकतो इकडे बसून.”

तो बसलाही आणि हसला, “च्यामरी, बायकोच्या शिव्या खाल्याशिवाय पचत नाही मला... महिन्यातून एकदातरी हव्या... ”

उर्वी गंभीर झाली, म्हणाली, “चूक माझी आहे, मीचं उगाच राईचा पहाड तयार करते.”

तिला मनात सलत होतं. आता अजून एक भीती तिला जाणवायला लागली होती. स्वयंपाक करतांना तिला तिच्या आईच्या घराजवळ राहणाऱ्या काकुच्या मुलीची गोष्ट आठवली, उर्वीच लग्न ठरलं होतं तेव्हां ती पार्लर साठी कुणाला तरी शोधत होती. तेवढात वरच्या गच्ची वरून तिला बाजूचे दोन घर सोडून एक पाटी लागलेली दिसली होती. आईला विचारलं तर माहित झालं, काकूची मोठी मुलगी नव वर्षानंतर माहेरी परतली होती. कारण विचारलं तर माहित झालं, मुलं होतं नाहीत म्हणून नवऱ्याने खूप छळलं, खूप मार खात असायची. सासरी खूप त्रास होता तिला मग भावाने तावातावात सोडचिठी करवून दिली आणि आता बहिण घरी आल्यावर त्यानेही हात वर केली. त्याची बदली झाली, तो त्याचं कुटुंब घेवून बदलीच्या ठिकाणी निघून गेला. आणि ही आता आई सोबत राहते. मग तिने पार्लर सुरु केलं. तसं आईने तिला तिच्याकडे जायला नकारलं होतं पण उर्वी गेलीच.


आज तिला ते आठवून वाईट वाटत होतं. “आपण तिकडे गेलेलो म्हणून तर ही परिस्थिती आपल्यावर आली नसावी, तिचं जसं झालं तसं माझं तर नाही...”

विचारात होती. तर आकाशने मागून येवून तिला विचारलं,

“झाली का ग भाजी, आहा... काय सुगंध सुटला आहे. चिकनची भाजी आणि तेही तुझ्या हाताची, सुट्टीचा दिवस, काय, घेवू का ग जराशी?”

उर्वी विचारांच्या पायऱ्या भरा भरा उतरून खाली आली, शब्द फुटत नव्हते, म्हणाली,

“घे ना. ते घ्यायला तुला मला असं विचारण्याची गरज नाही.”

“नाही म्हटलं, दिवस वैऱ्याच आहेत. मी काही म्हणायचं आणि तू...”

उर्वी ने गरम चमचा भाजीतून काढला आणि घेवून त्याच्याकडे वळली...

आकाशने गुमान ग्लास घेतला आणि बसला डायनिंगच्या खुर्चीवर, जेवणाची वाट बघत,...

महिना तसाच गेला, मन अशांत झालं होतं तिचं, काही केल्या काहीच हातात येत नव्हतं. आता परत ती आकाशच्य मागे लागली,

“आकाश आपण परत जावूया का डॉक्टरकडे, आता इकडे टोक्योला इंग्रजी बोलणारे डॉक्टर मिळतील ना.”

आकाशने होकार दिला आणि शोधायला लागला, तर घरापासून जवळच एक डॉक्टर होता. त्याने अपॉइनमेंट घेतली. तिकडे दोघेही पोहचले, हा डॉक्टर उर्वीला जरा वयस्कर वाटला, अनुभवपण चांगला होता त्याच्याकडे. क्लिनिक मध्ये खूप सर्टिफिकेट तिला दिसत होत्या. आकाश त्याला सर्व सांगितलं, आधीचे रिपोर्ट्स दाखवले. पाळीचे दिवस संपले होते, त्याने आकाशला पुढच्या तारखेला येतांना टेस्टसाठी त्याचं सीमेन (वीर्य)सकाळी आणायला सांगितलं. त्याने त्याचं क्षणाला उर्वीकडे बघून डोळा मारला.

नंतर डॉक्टरने उर्वीला आणि आकाशला एचएसजी (HSG) टेस्टबद्दल सांगितलं.

आता हेही त्यांच्यासाठी नवीन होतं. कारण उर्वीची आतापर्यन्तची हिस्टरी बघून त्याने संगितलं की ओव्हूलेशन होतं आहे. जे त्याला ब्लड टेस्ट वरून आणि आधीच्या काही रोपोर्ट वरून त्याला कळालं होतं. म्हणजे फर्टिलाइजेशन होतं नसावं हा त्याचा अंदाज होता. त्यासाठी त्याला फैलोपियन ट्यूब(गर्भनलिका) मध्ये काही ब्लॉकेज, किंवा सूज तर नाही ह्याच निदान करायचं होतं.

एचएसजी, (HSG)  हिस्टेरोसेलपिंगोग्राफी(Hysterosalpingography) टेस्ट द्वारे, जर फैलोपियन ट्यूबमध्ये जर काही कमतरता असेल तर ती बघता येते आणि मग तशी ट्रीटमेंट करता येते. ज्यांना प्रयत्न करूनही बाळ होतं नसेल अश्या जोडप्यांना ही टेस्ट सांगितली जाते. कारण गर्भधारण प्रक्रियात फैलोपियन ट्यूब महत्वाच कार्य करत असते. स्त्री अंडाशयातून स्त्रीबीज निघून ह्याच फैलोपियन ट्यूबमधुन प्रवास करत गर्भाशयाकडे येत असते. हायच फैलोपियन ट्यूबच्या प्रवासात स्त्रीबीजाच मिलन पुरुष बीजाशी होते आणि मग जीवाची निर्मिती सुरु होते. पण जर फैलोपियन ट्यूबमध्ये काही अडथडा असेल तर फर्टिलाइजेशन होत नाही किंवा झालं तरी ते तिथेच अडकून राहते. मर्यादित वेळेत फर्टिलाइज झालेलं बीज गर्भाशयापर्यंत पोहचत नाही.

कधी कधी ह्या प्रकारात फैलोपियन ट्यूबमध्ये गर्भ वाढतो आणि मग त्याची वाढ होतं नाही, अश्या प्रेगनेंसीला एक्टोपिक किंवा ट्यूबल गर्भ असंही म्हटल्या जातं. असा गर्भ जास्त काळ टिकत नाही किंवा राहिला तर जीवावर बेतू शकतो. अश्या वेळी कधी कधी फैलोपियन ट्यूब काढून टाकली जाते. आणि जर आधीच्या काळात गर्भ कळला तर त्याला काढून फैलोपियन ट्यूबला स्वच्छ केलं जातं.

कधी कधी तर हा फैलोपियन ट्यूब सरळ नसून चीपकलेला असतो, अशी अनेक कारण शोधण्यासाठी ही टेस्ट केली जाते.

असो, उर्वीचे पाळीचे दिवस संपले होते. उर्वी डॉक्टरकडे उत्तम वेळेवर आली होती आणि डॉक्टरांनी हा प्रस्ताव ठेवला होता. हेही उर्वी आणि आकाशसाठी नवीन होतं, पण आता उर्वीला तेही करायचं होतं. आकाशने उर्वीकडे बघून डॉक्टरला होकार दिला.

पुढे त्याने सांगतील की, ह्या प्रोसिजर नंतर पहिल्या तीन महिन्यात ३०% चान्सेस वाढतात प्रेग्नेंट राहण्याचे. आतापर्यतच्या रिपोर्टमध्ये काहीही असं नसल्याने कदाचित उर्वी अनएक्सप्लेंड फर्टिलिटीचा शिकार असावी, असा त्याचा अंदाज होता. ह्या प्रक्रियेत गर्भाशयाची साईज मोजल्या जाणार होती आणि एक ट्यूब गर्भाशयातून गर्भ नलिकेपर्यंत सोडल्या जाते, आणि तिचं निरक्षण केल्या जातं.

प्रक्रिया झाली, सगळं नीट आहे, दोन्ही फैलोपियन ट्यूब ओपेन आहेत पण गर्भाशयाचा साईज जरा लहान आहे असा तो म्हणाला, पण काळजी करू नका, ते खूप काही गंभीर नाही, असंही तो बोलला. डॉक्टरने काही पेनकिलर लिहून दिल्या, जरा काही दुखापत जाणवली तर म्हणून...

बाकी त्याने परत पाच दिवसाने फॉलीकल स्टुडी साठी बोलावलं होतं. सोबत आकाशलाही सीमेन आणायला सांगितलं.

आता आकाशची पाळी आली होती, टेस्ट करण्याची... बघूया मग पुढच्या भागात काय होतं.

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments