बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
भाग २७
---
मनात धाकधूक सुरु होती. तयारीत होती तर आईचा फोन आला, उर्वीने काहीही झालं नाही असचं दाखवलं, आणि आईला सरळ तिकडे हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं.
हॉस्पिटलमध्ये पोहचली, तर तिच्यासारख्या अजूनही होत्या आज त्याचं टेस्टसाठी, नवीन मुलीही होत्या आणि लग्नाला पाच दहा वर्ष झालेल्याही.
हिस्टेरोस्कोपी ह्या शब्दाला फोडलं तर, हिसट्रो म्हणजे गर्भाशय(यूट्ररस) स्कोपीचा अर्थ होतो स्टुडी, अभ्यास. अर्थात गर्भाशयाचा अभ्यास. हा शब्द लॅटिन भाषेतून प्रचारात आला आहे. आणि हल्ली किती प्रमाणात होते हे उर्वीला आज कळला होतं.
हिस्टेरोस्कोपी ही एक प्रकारची दुर्बिणीद्वारे (हिस्टेरोस्कोपद्वारे)केली जाणारी गर्भशयाची सूक्ष्म तपासणी. या प्रक्रियेत नळ कांडीसारखी बारीक दुर्बिण योनीमार्गाद्वारे गर्भाशयात हळूवार, नाजुकपणे, पूर्ण सावधाणीने सरकवली जाते. जी सरकवताना फारसा त्रास जाणवत नाही, पण आतामध्ये गेल्यावर जरा जाणवतं. हा हिस्टेरोस्कोप योनीमार्ग व गर्भाशयाच्या आतील भागाची अगदी सूक्ष्म तपासणीसाठी वापरल्या जातो. आणि त्या भागाच्या इमेजेस मोठ्या स्वरूपात मॉनिटरच्या स्क्रीनवर येतात, ज्याचा अभ्यास करून डॉक्टर रिपोर्ट तयार करतात. जो पुढची ट्रीटमेंट ठरवतो.
“हुश्ह, च्याला, आपल्या आपल्या दुनियेत आपण ऐकटच खुडत बसलो असतो, पण आजूबाजूला बघितलं तर जाणवतं. हा खडतर प्रवास माझा एकटीचा नाही, कितीतरी रागेत आहेत ह्या वाटेच्या. नारी म्हणून सिध्द करायला किती आपण धडपड करत असतो. मार्तुत्व एक अनमोल प्रवास आहे पण ज्यांना सहज करायला मिळत नाही, त्यांची वाट कशी काट्यांनी भरून असते. शरीराचा कुठला कुठला भाग उघडा करावा लागतो. कुणा समोरही उघडा करावा लागतो. ज्या इद्रीयाला झाकून ठेवल्या जातं तिथे कितीतरी हात लागतात. मन मारावं लागतं. लाज ज्याला स्त्रीचा दागिना म्हणतात त्याला मुठीत बंद करून ठेवावं लागतं. मनातल्या लाजिला मनातच कोंबाव लागतं. पाच दहा पुरुषाच्या टीममध्ये आपण अर्ध नग्न पाय वर करून पडून असतो, ह्या अपेक्षेत कि पुढ्यावेळी बाळाला बघायला असं होवू दे. ज्या भागाला स्पर्श करण्यासाठी नवरा किती प्रेमाने सर्व हाताळत असतो तोच भाग असा उघडा ठेवून आपण काय विचार करत असू हे फक्त त्या स्त्रीलाच माहित असते. नजरा डॉक्टरांच्या मेल्या असतात हो, पण आपलं मन मरतं अशी वेळ प्रत्येक वेळी आल्यावर.”
असो, हॉस्पिटलच्या नर्सने प्रत्येकीचा कंबरेखालचा भाग नीट तपासून बघितला. जागा स्वच्छ हवी होती जांगेमधील. ती तर म्हणालीही,
“काय करता मॅडम, डॉक्टर ओरडतात तिकडे मग!”
आता मात्र उर्वीला वाटलं, “हाच फरक आहे ना आपल्या देशात आणि विदेशात, तिकडे कधीच असं म्हटल्या जात नाही. निर्सगाच्या नियमात स्वतःहून कुणी नाक खुपसत नाही. वाटलं डॉक्टरांना बघायचं काय आहे. साधा हिस्टेरोस्को टाकायचा आहे गर्भाशयात आणि स्क्रीनवर त्याला मोठ्या स्वरूपात बघायचं आहे. दोन तीन मिनटामध्ये होतं काम, फारच अवघड करून ठेवतात सगळं.”
तिचा नंबर येईपर्यंत हॉस्पिटलचा हिरवा झगा घालून बसून होती. पहिल्यांदा हा असा हॉस्पिटलचा झगा घालून तिलाही गंभीर वाटत होतं. मनाच्या आशेने थकली असली तरी मेंदूने आजही ती खंबीर होती. भूक लागली होती तिला, पोट आवाज करत होतं, उगाच आईला ऐकायला जावू नये म्हणून आता ती उठून फिरत होती. सासूकडून निघतांना काहीही खाल्लं नव्हतं, आईला काही बोलू शकत नव्हती नाहीतर परत तिचं बोलणं सुरु झालं असतं.
मनात अनेक प्रश्न शिरले होते. कशाला पडत असावी ह्या हिस्टेरोस्कोपी गरज, तोच तिला त्या दिवशीच डॉक्टरच बोलणं आठवलं,
“काय आहे ना, हिस्टेरोस्कोपी आम्ही तेव्हांच संगत आसतो, जेव्हा कपलला वर्षभरात राहत नाही आणि मग ते डॉक्टर कडे येतात, सुरवातीला त्यांना औषधी देवून आणि इंटरकोर्स योग्य वेळेवर करायला सांगून परत वर्षभरात काही फायदा झाला नाही तर मग स्त्रीच्या गर्भशायची तपासणी गरजेची होते. तुझ्या बाबतीत तसंच आहे तुझे सगळे प्राथमिक इलाज झाले आहेत. तुझी तर एचएसजीपण झाली आहे. तुला बरच काही कळतं, मला पुढचं ठरवण्यासाठी हिस्टेरोस्कोपी गरजेची आहे.”
विचारत तिचा नंबर आला, आता इथून पुढे ती एकटीच जाणार होती. आई तिथेच बसून राहिली, आत गेली तर खोलीत सारे पुरुष डॉक्टर होते. आणि मानसी मॅडम म्हणजे डॉक्टर. उर्वी पाठमोरी पडली, तिचे पाय तिने नीट स्टँडवर ठेवले, झगा वर ओढला. मानसी मॅडम तिच्या मांडीला हात लावत तिला रेल्याक्स करण्याच्या प्रयत्नात होत्या. आणि कधी हिस्टेरोस्कोपी झाली उर्वीला कळला नाही. क्षणात जरा दुखलं पण तेवढं सहन झालं, शेजारच्या खोलीत जावून कपडे केले आणि परत डॉक्टरच्या बोलावण्याची वाट बघत बसली, आई म्हणाली,
“जेवतेस काय?”
तिला तर भूक लागली होतीच, डबा आई घेवून नेहमी बाहेर निघत असायची, आज मात्र उर्वीने गुमान संपवला. काही वेळाने डॉक्टरने आत बोलवलं,
“आल इज फाइन उर्वी. मी पेनकिलर लिहून देते, तू कधी निघणार आहेस तिकडे.”
“अजून पंधरा दिवस आहेत.”
“मस्त, म्हणजे पुढची पाळी आहे अजून, तू आता पाच सहा दिवसाने ये, म्हणजे ओव्हूलेशन फेज संपून गेलेली असेल, आणि ल्युटिल फेज सुरु असेल मला एंडोमेट्रियमची स्टडी करता येईल. युरीन टेस्ट करून ल्यूटिनिझींग हार्मोन (एलएच) बघता येईल.”
उर्वीच्या कानावर परत नवीन शब्द पडत होते. पाळीच्या फेजतर तिच्या लक्षात आल्या होत्या, पहिली आणि दुसरी मेन्स्ट्रूअल फेज, आणि फॉलिक्युलर फेज ज्यात रक्तस्त्राव आणि स्त्रीबिजांचा विकास होतं असतो. तिसरी अर्थातच फॉलिकलची वाढ झाल्यानंतर ते स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर निघण्याचा टप्पा म्हणजे ओव्ह्यूलेटरी फेज. आणि अंतिम फेज म्हणजे ल्युटिल फेज पण एंडोमेट्रियम बद्दल आज परत नवीन ऐकलं होतं.
डॉक्टरला होकार देत ती निघाली, आईला काहीच बोलली नाही मग सोबत तिकडेच गेली. आईचा डोळा लागला आणि ही बसमध्ये बसल्या बसल्या ती आठवत होती
मेन्स्ट्रूअल फेज हा सुरुवातीचा टप्पा आहे, हा पाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरु होतो, ज्यात रक्त, म्यूकस, आणि ब्रेक झालेल्या यूटेरिन लाइनिंग अर्थात गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) ह्यापासून तयार झालेलं मेंस्ट्रुअल फ्लुइड व्हजायना द्वारे अर्थात योनीमार्गातून बाहेर पडत असते. अर्थात फलन न झाल्यामुळे ही प्रकिया घडते आणि सर्व बाहेर टाकून गर्भाशय नव्याने तयार होत असते.
आता दुसरी फेज, म्हणजे ज्याची सुरुवात ही मेन्स्ट्रूअल फेजपासूनच होते, ही अगदीच महत्वाची असते. ज्यात स्त्रीच संपूर्ण जननांग (फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम) कामी लागलं असतं. स्त्री अंडाशयात (ओव्हरीज) स्त्रीबिजाची (फॉलिकलची) वाढ होत असते. पोष ग्रंथिमधून (पिट्यूटरी ग्लॅंड) स्त्रीबिजाला प्रेरित करणाऱ्या संप्रेरकांचा (हार्मोन) निर्मिती होते. ज्यात पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन) आणि पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन)हे महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक सायकलमध्ये तीन ते दहा फॉलिकल्स तयार होतात. फेज संपत येता येता, एक डॉमिनंट फॉलिकलची वाढ पुढे होते. फॉलिक्युलर फेज साधारण तेरा ते चौदा दिवसांचा असतो.
ओव्ह्यूलेशन(बीजांडोत्सर्ग) फेज म्हणजे तिसरी आणि सर्वांत लहान फेज. परिपक्व झालेलं बीजांड (डॉमिनंट फॉलिकल) ल्युटिनायझिंग हार्मोनचे प्रमाण वाढल्यामुळे डॉमिनंट फॉलिकल उत्तेजित होऊन अंडाशयातून बाहेर येतो. ही फेज साधारण सोळा ते बत्तीस तास चालते.
आता शेवटीची फेज म्हणजे ल्युटिल फेज, जवळपास चौदा दिवस. ह्याच फेजमध्ये स्त्रीबीज बाहेर आलेलं असतं. बाहेर आल्यावर प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. शरीराच बेसल तापमान वढ्याला लागतं. फलन झाले तर गर्भाशयाची तयारी सूर होते. ह्या दरम्यान एंडोमेट्रियमची जाडी आणि कॉर्पस ल्युटेअमची वाढ होते. फलन झाले नाही तर मग प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण कमी होते. आणि पाळी सुरू होते.
उर्वी मनात हसली, आणि हसू चेहऱ्यावर आलं, एकदम म्हणाली,
“सर्व खेळ ना ह्या हार्मोन्सचा आहे, मानवी शरीर म्हणजे मेंदूतून नियंत्रित होतं. डॉक्टर मानसी बरोबर बोलली होती. रोबोट्स आहोत आपण... हाच खेळ समजत नाही आपल्याला आणि मग त्या साक्षात नसणाऱ्या परमेश्वराला आपण आपलं नियंत्रण करणारा समजतो. तसही मानव प्राणी कुणालातरी सगळं सांगून मोकळं व्हावं ह्या मताचा, मग तो उलट उत्तर न देणार परमेश्वर आपलं सर्वस्व होतो. तेवढीच मनशांती लाभते. मेंदू परत नवीन उमेदेने कामाला लागतो.... म्हणूनच लोक म्हणतात ना मन आनंदी ठेवा मग सगळं मिळतं, असो, पण मग असचं आहे तर हॉस्पिटल कशाला? मन आनंदी करण्याचा मार्ग शोधावा... अनेक आहेत. पण मंदिराच्या पायऱ्या चढूनच जर सगळं झालं असतं तर.... ह्या हॉस्पिटलच्या पायऱ्या चढणं टळलं असतं.”
विचारत उर्वी आईकडे पोहचली. तिने आता स्वतःला शांत करण्याचा निर्णय घेतला.
मागच्या वेळी तिने आईच्या घराजवळून नजीक दोन प्लॉट बुक केले होते. इन्वेस्टमेंट म्हणून... पण आता तिला जाणवत होतं, कि ती इकडे आली कि तिला खूप मानसिक त्रास होतो. ह्याच काळात जे घडून जातं तेच मग पुढे आकाशजवळ गेल्यावरही वारंवार मध्ये येतं. मनाचा तोल जातो आणि मेंदू काम करत नाही. मनशांती भंग होते. आणि मग ते होर्मोन त्याचं कार्य करत नाहीत निट.
पेपर चाळत होती, नवीन फ्लॅट स्कीम दिसली, बजेटमध्ये होती. डाउन पेमेंट पुरते पैसे तिच्याकडे होते. आधीच्या नौकरितून जमा केलेले. बसं तिचा निर्णय झाला होता, हक्काचं घर हवं होतं. आता तिला कटकट नको होती. सासरी सासुच घर होतं. आईचं घर माहेर होतं, जिथे ती पाहुनी होती. आली तरी त्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागत होतं. तिने आकाशला सर्व माहिती पाठवली, त्याचा फोन आला,
“तुला योग्य वाटत असेल तर बघून घे साईट.”
“हो, मी जाणार आहे पुढच्या आठवड्यात चेकअप साठी, बघून घेते. आणि बुक करते.”
“ठीक आहे. मला काही हरकत नाही. तिकडे आल्यावर असावं एक आपलं घर. वाटलं तर विकून टाकू.”
उर्वीला आकाशचा होकार मिळाला होतो, त्याने विनंती करून एकदा त्याच्या आईला बघायला घेवून जा म्हणून सांगितलं होतं. तसा उर्वीला रागच आला होता, पण काय करणार, त्याला होकार देऊन मोकळी झाली.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments