बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
भाग ३२
---
आपला निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो,
दुसरे घेणार नसतात कधी...
आणि निर्णय हा स्वतःला आनंद देणार असावा...
हो ना!
उर्वीने परत नव्या उमेदीने निर्णय घेतला, “आता आनंदी राहायच, आकाशला माझ्यामुळे किती त्रास होतो. मी ही अशी, त्याला कुठला आनंद देवू शकत नाही. पण आता निदान त्याच्याशी भांडायचं नाही. अभ्यास करायचा, रोबोटिक्सवर नवीन काही शोधायचं, रिसर्च पेपर लिहायचे. नाही झाली पीएचडी मग काही नॉलेज वाढवूया. जॉब शोधायचा, ह्यातून बाहेर आली कि माझी मी तयार असायला हवी ना, मी काय घरी बसून राहणारी नाही, माझं करिअर मला प्रिया आहे. आता प्रेम, लग्न, संसार... ह्यापुढे काही अजून प्रमोशन होत नाही आहे. मग जॉब शोधायचा.”
तीच्या विचारांचं फुलपाखरू परत उडत थांबल,म्हणालं,
“प्रयत्नही थांबायला नको, जो थांबला तो वेळ परत आणू शकत नाही. आपल ह्या विषयावरच संशोधन सुरु ठेवायचं. आता खूप काही माहित झालाय, पण अजूनही काही असेल ना, तेही माहित करणार मी, जगभरात सगळीकडे हा प्रोब्लेम आहेच ना... माझ्या जगावेतेरिक्त जग काय काय करतं हेही माहित करूया.... मी काही सोडायची नाही आता...”
विचारात परत ती म्हणाली,
“काय हे उर्वी तू घुमून फिरून तिथेच आलीस ग... पण तू तर जिद्दी आहेस ग, हातात घेतलेलं काम असं सोडून जाणार नाहीस, आणि रिझल्ट मिळाल्याशिवाय थांबायची नाहीस. ही तुझीच जिद्द होती आकाशशी लग्न करण्याची. किती मोठी लढाई होती ती अजूनही सुरूच आहे. इथे आपलेच आपल्या पुढे उभे असतात, आपलीच काट्यांची वाट तयार करतात. कसं बोलतात यार मन रक्ताळून जातं, विश्वास बसत नाही आपले रक्ताचे लोक आहेत म्हणून, माझ्या बाबतीत तर आता नवीन सुरु झालाय, आकाशच्या आईला मी नकोय आणि माझ्या घरच्यांना वाटतं आकाशचा दोष आहे.”
विचारात अश्रू जमले होते, मग खूप रडली, कुणाशीतरी बोलण्याची इच्छा झाली होती, तिने आईला कॉल लावला, तिने उचलला नाही. मग तिने फेसबुक उघडलं, हल्ली ती उघडत नसायची, सगळीकडे लोकांच्या नुसत्या वार्ता असायच्या, एखाद्याने पिंग केलं नी बोलता बोलता प्रश्न केला कि तू घरी राहून करतेस काय? तर काय सांगायचं हा प्रश्नच होता, उलट काही कारण सांगू शकत नव्हती, मुलतर नव्हतेच. आणि हा प्रश्न केला कि मग कधी घेतेस चान्स, काही गुड न्यूज, तर काय काय... फेसबुक बघतांना ती आता घाबरायची.
बराच वेळ चाळून झालं होतं तर आकाशच्या क्लासमेटने मला पिंग केलं,
“हे व्हॉटस गोइंग डियर.”
उर्वीने खूप वेळाने उत्तर दिलं, “डूइंग ग्रेट डियर.”
तिचाही प्रेम विवाह होता, फेब्रुवारी महिन्यात वेलेंटाइन डे लग्न झालं होतं आणि एकाच वर्षी. मुलगीही होती तीन वर्षाची. उर्वीने काही लिहिणं टाळलं तर तिने लिहिलं,
“यार स्टील ऑन हनिमून, बेबी प्लॅन नाही किया?”
आता मात्र उर्वीने होकार दिला, “हा स्टील ऑन हनिमून...”
तिने इमोजी पाठवले आणि म्हणाली, “कर ले एन्जोय, फिर चान्स नाही आता.”
उर्वीनेही परत इमोजी पाठवले. आणि ऑफलाईन झाली. जरा बर वाटलं, ती होती जरा मोठ्या घरची, म्हणून असं बोलली असावी असं उर्विला वाटलं, “मध्यम वर्गात लग्न झाल्यावर मुलं वर्षभरात झाले नाही कि बसं शिकलेल्या मुलीही नाव बोटं ठेवायला लागतात. आणि उच्च वर्गात तर मुली लग्नच करत नाहीत तरीही चालतं, त्यांना पर्वा नसते कुणाची, चायला आपण सर्व जगाची पर्वा करतो आणि जगणं विसरून जातो. मला जगायचं आहे. नको आता विचार, बाळ बाळ खूप झालं, ते काय मला म्हणत आहे जन्माला घाल म्हणून.”
बरोबर तर होतं, आपल्याला हवी असतात मुलं, म्हणून आपण जन्माला घालतो, आपल्याला हवा असतो तो आनंद, ती भूक आपली असते, आणि मुलं जन्माला आली कि मग त्यांनाच म्हणतो, तुला जन्म दिला, किती कष्ट केले, काय काय नाही केलं, किती मंदिर चढली, किती औषधी केल्या, नवस बोलली.... बापरे... किती अपेक्षा करतो त्यांच्याकडून, त्यांना स्वतःच्या मनमर्जीने जगुनही देत नाही. सवय जात नाही माणसांची, लहानपणी मुल ऐकतात तसं त्यांनी मोठं झाल्यावरही आपल्या तालावर नाचावं असा अट्टाहास असतो आपलं. चुकत नाही का?
संध्याकाळ झाली होती, आज आकाश उशिरा येणार होता. उर्वीने सकाळच होतं मग काही बनवलं नाही तिच्यासाठी. घर साफ करत राहिली. उद्याच काय काय करायचं म्हणून ठरवत राहिली. आई काही परतून मिसकॉल देणार नाही हे तिला माहित होतं. कुणाशी बोलावं म्हणून मनात गोंधळ सुरु होता. जरा तयार झाली, आणि सहज शॉपिंग निघाली. बाहेर समोर एक प्रेग्नेंट स्त्री तिच्या दोन मुलांना घेवून चालली होती. तिला बघून उर्वी अजूनच भावूक झाली, वाटलं हिला कशाला आता तिसरं हवंय, मग तिच्या मागे मागे ती चालू लागली, विचारात की तिच्या मागे मागे चालल्याने तीही ह्या महिन्यात प्रेग्नेंट राहील. नुसती तिला बघत होती. ती मॉलमध्ये शिरली आणि उर्वीही, मग शॉपिंग मध्ये जरा विसरली, घायचं तरी काय, उगाच मॉलच्या सर्व फ्लोवर वर फिरत होती, वरच्या फ्लोवरवर किड्स सेक्शन होतं. तिने फेरफटका मारला, किती सुंदर सुंदर कपडे होते. झोपण्याचे बेड, लहान लहान हातमोजे, सॉक्स, जुते, सगळं इवल इवलसं.... नंतर बाळासाठी स्टोलर, गाडी... वॉटर बॉटल, दुधाचे डबे... त्याच्या बॉटल, डायपर, खेळणी.. कितीतरी.. बघूनच उर्वीला हायसं झालं, वाटलं,
“माझ्या नशिबी हे सगळं शॉपिंग करणं कधी येणार.”
वेळ सगळं बघण्यात निघून गेला. मग ती खालच्या फ्लोवरला आली, तिकडे मेडिसिन आणि स्त्रियांच्या सगळ्या वस्तू होत्या. प्रोटीन विटामिन सगळ्या मेडीसीन तिकडे होत्या. ती एक एक बॉटल बघत होती आणि ट्रान्सलेट करून वाचत होती. मनात चक्र फिरत होतं,
“हुम्म, हे मी घ्याला हवं, माझंही असंच होते, विटामिन सी तर फायदेशीर असतं, घ्यायला काही हरकत नाही. घेऊ का, नको, महाग आहे. पण...”
तिने ठवून दिलं. नंतर तिला सेक्स पावरच्या मेडिसीनही दिसल्या, उचलून वाचायला लागली, मनात विचार शिरला, “कशाला लागत असेल ह्या मेडिसिन.”
मग लगेच आठवलं, आपल्याकडे तर लोक शिलाजित खातात. तिला त्यावरही शिलाजितच इंग्रजीतलं नाव दिसलं, (mineral pitch) मिनरल पिच. ज्याला आपण शिलाजित म्हणतो, लिहील होतं फॉर बूस्ट टेस्टोस्टेरॉन (testosterone).
“टेस्टोस्टेरोन तर पुरुष लैंगिक हार्मोन आहे. ह्याच हार्मोन्समुळे पुरुष पुरुष असतो.”
उर्वीने दीर्घ श्वास घेतला, वाटलं, “लोकं घेत असतील म्हणून इथे विकायला आहेत ना, मला तर वाटलं होतं आपणच असल्या वस्तू वापरतो, लोक तर मजा मारण्यासाठीही वापरता. बघ इथे लिहिलं आहे टू इम्प्रूव सेक्स ड्राइव, एनर्जी लेवल, फॉर डिप्रेशन, इरेक्टाइल डिसफंक्शन, हे काय आहे माहीत नाही बाबा... नवीन नवीन वाचायला मिळतं.”
वेळ खूप झाला होता ती निघाली, ती घरी त्याच औषधीच्या विचारात निघली, घरी आली, आवरून घेतलं. बसली परत काही वाचत, नवीन महिन्यात परत एक्यूपंक्चर करायचं होतं तिला. ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली. आणि जुनी गाणी ऐकत बसली, आकाशने फोन केला, तो पोहचत होता.
काही वेळाने बेल वाजली, आकाश पोहचला होता, तो तिच्यासाठी, रेड वाईन आणि मैकडॉनल्ड्स चिकन नगेट घेवून आला होता, आल्या आल्या हातात देत म्हणाला,
“मला माहित आहे तू काही बनवलं नसणार, मग हे तुझ्यासाठी.”
उर्वी हसली, वाईनची बॉटल घेत म्हणाली, “आणि हे रे?”
“हे उद्याच्या आपल्या पार्टीसाठी...”
“आणि तुझं?”
“माझं आहे ना घरी... तेच होते.”
आकाश तिला आल्या आल्या बिलगला, “आकाश वास येतोय, जास्त घेतली काय रे.”
“नाही ग, नेहमीएवढी...”
“असं, अंघोळ कर.”
“एवढ्या थंडीत! तू येणार नाही थंडी कमी करायला.”
तिने त्याला ओढत हात पाय धुवायला ढकललं. आकाशने आवरून घेतलं आणि मग दोघांनी बसून मूव्ही बघितला, नवीन वर्ष सुरु झालं होतं.
उर्वीने मनातच म्हटल, “पुढल्या वर्षी आम्ही तिघं असू देत...”
आकाश तिला पटकन म्हणाला, “झाला नवस बोलून?”
उर्वी चिडली, “काय रे काहीही तुझं. मी आपलं बस..”
“कुठल्या देवाला बोललीस?”
उर्वीही चिडल्या सारखी बोलली, “जेवढे माहित आहेत ना तेवढ्या सगळ्यांना.”
“बापरे, आयुष्य जायचं मग माझं ते फेडण्यात... माझं बर बाबा, एकाच देवीचा नवस असतो... काय मग आज पावणार काय...”
“आकाश, आज फक्त चौथा दिवस आहे...
“चला मग झोपा... देवी काही पावणार नाही... मी तर झोपतो आता.”
नवीन वर्षात नवीन उमेदीने परत उर्वी उभी झाली होती. ह्याही महिन्यात तिने एक्यूपंक्चर केलं होतं. आता तिची छान ओळख झाली होती डॉक्टरांशी. भारतीय होती त्यांना बोलायला उत्सुकता वाटत असायची. मग तिला त्यांनी एक्यूप्रेशरच्या काही पॉइंटला प्रेस करणंही शिकवलं. आठवड्यातून दोनदा तिला हॉट स्टोन मसाजसाठीही बोलवायचे. हर्ब टी सोबत प्यायचे. उर्वी तिकडे गेली की फ्रेश होत असायची. पण २०११चा जानेवारी आला तसाच निघून गेला, फेब्रुवारीत लग्नाला चार वर्ष पूर्ण होणार होती. लग्नाचा वाढदिवस साजरा केला दोघांनी. पुढल्या वर्षी तरी आपली फॅमिली पूर्ण होईल ही आशा आता उर्वीला होती. ह्या महिन्यात तिने जरा एक्यूप्रेशरसाठी ब्रेक घेतला होता. मग एक दिवस लंच ब्रेकमध्ये ती एक्यूप्रेशर क्लिनिकमध्ये सर्वांसाठी बिर्याणी आणि गुलाबजाम बनवून घेवून गेली होती. सगळ्यांनी मजेत खाल्ली. तिला नाराज नको होवू म्हणून समजावलं. डबडबलेल्या उर्विला त्यांनी सावरलं, ब्रेक नंतर आपण परत नवीन पद्धतीने अजून ट्रीटमेंट करू म्हणून तिला समजावलं.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments