बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” भाग २८

 बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन

भाग २८ 


---

पाच दिवसाने ती परत डॉक्टरकडे गेली. युरीन टेस्ट साठी सैंपल दिलं, डॉक्टरने सोनोग्राफी केली म्हणाली,

“इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉन आर वर्किंग वेल, एंडोमेट्रियम इज गुड एनफ थिक. नो वरी.

चल मी तुला औषधी देते, तू पूर्ण तीन महिन्याच्या घेवून जा, अँड रीलॅक्स हो जरा.

बस तो शब्द आईने ऐकला आणि म्हणाली,

“तेच तर नाही आहे. किती धावपड आहे हिच्या मागे. जॉबपण पाहिजे आणि सर्व हीच करते.”

डॉक्टर जरा गालात हसली, “मग त्यालाच आयुष्य म्हणतात, आणि ती आजची नारी आहे, मागे कशी असणार. आणि सर्वच करते म्हणजे नेमकं काय करते हो.”

आई गोंधळली, “म्हणजे तिने आता मागे प्लॉट घेतले, आज फ्लॅटसाठी साईटवर जात आहे इथून गेल्यावर. सगळं तिचं ठरलं असतं. कधीच कुणासाठी वेळ नसतो.”

“मग बिघडलं कुठे, आयुष्य तिचं, तिला हवंय सगळं, निर्णय दोघांचा आहे. तिला वेळ आहे ती करते आहे.”

मग ती उर्वीला म्हणाली, “गुड उर्वी, नाईस टू नो, नाहीतर बायका, मी बाई आहे कसं करू म्हणून मागे राहतात...”

“अहो काकू इथे स्त्रिया स्पेसमध्येही काम करतात आणि आपण इथे बायकांना त्यांची स्पेसही देत नाही.

“तसं नाही हो, पण मग तिला त्रास होतो ना, आत बघा चार वर्ष होतील ह्या फेब्रुवारी महिन्यात. तरी...”

होईल हो, मग काय घरात बसून रहायचं का? ती सर्व करत राहिली ना कि सगळं ठीक होणार.”

“उर्वी तू मला मेल कर वाटलं तर. फोनपण करू शकतेस. बाकी कधी येणार पुढ्यावेळी कळवं, आणि गोड बातमी असली कि तिकडेच कर सगळं. म्हणजे इकडे येवू शकतेस. जसं तुम्हा दोघांना जमेल तसं. काही ओव्ह्युलेशन प्रेडिक्शन किट्स पण घेवून जा. हल्ली बऱ्या पैकी मिळतात आपल्याकडे. डू नॉट मिस फर्टाइल विंडो ”

“हो आता सगळं घेवून जाते, खूप आहे ह्यावेळी. मी बेसल बॉडी टेम्परेचरनेपण ओळखू शकते, शिवाय मला जरा त्या वेळी पोटात दुखते.”

“गुड देन, ऑल द बेस्ट, बऱ मला एक सर्जरी आहे. कळवं मग, मी युरीन रिपोर्ट मेल करते. तसं निगेटिव असेल, पण काही वाटलं तर मेडिसीन मेसेज करते, घेवून जा.”

“बऱ मला एक सर्जरी आहे. कळवं मग, मी युरीन रिपोर्ट मेल करते. तसं निगेटिव असेल, पण काही वाटलं तर मेडिसीन मेसेज करते, घेवून जा.”

डॉक्टरची पण काही वेगळी स्टोरी होती, भर तारुण्यात दोन मुलं असतांना तिच्या नवऱ्याने तिला सोडलं होतं. पण आजची नारी म्हणून तिने स्वतःच करिअर उभं केलं. मुलांना शिकवलं, किती कष्ट पडले असतील ना तिला. पण आज उभी होती स्वतःच्या जोरावर. म्हणून ती आईला उत्तर देवू शकली होती.

आई आणि उर्वी निघाल्या होत्या फ्लॅटच्या साईटवर. पोहचल्यावर उर्वीने मॉडेल घराचे फोटो काढले, फ्लॅट दूर होता, पण बजेटमध्ये होता मग उर्वीने पुढच्या प्रोसेस साठी होकार दिला आणि सगळं पंधरा दिवसात व्हावं हेही सांगितलं.

दरम्यान गावात आईला कुणीतरी बोललं, कि त्या गर्भधारण करण्यासाठी दर्ग्यावर जावून या. आईचा जीव, भीतभीत ती उर्वीला म्हणाली,

उर्वी हसली, तिलाही वाटलं आपण चढूया काही पायऱ्या, आता देव तर मंदिरातही आहे आणि मज्जीतीतही.  

“चल, तशीही घरी बसून बोर होते मी, माझं फिरणं होईल, बाकी तू कर.”

आईला काय तिला उर्वीला तिथपर्यंत न्यायचं होतं. तयारी केली तिने, दोघीही जावून आल्या.

तोही एक वेगळा अनुभव असतो ना, ते दिवस तसेच असतात, फक्त ध्यास लागाला असतो. कुणी काहीही बोललं तरी वाटतं, जावून यायला काय हरकत आहे. कधी कुणाच्या काही करण्याने काही झालं तर आपलंच भलं ना... मेंदूला पटत नसलं तरी मन वळत जातं.

जायला दहा दिवस राहिले होते, तर आईच्या आत्याने यायचं ठरवलं, आईला फोन केला, बोलण्यात आईने उर्वीबद्दल सांगितलं आणि तिला तिची ती आयुवेदिक औषधी घेवून यायला सांगितली.

आत्या आजी आली, आणि रडायला लागली, म्हणाली,

“म्या गावभर लोकायचा इलाज करतो अन नातीचे अश्रू पाहू शकली नाही.”

जून खोड, बोलणं आणि डोळ्यात पाणी, माया आभाळाएवढी पण दडलेली. तिने दुसऱ्या दिवसापासून उर्वीची मालीश सुरु केली, म्हणाली,

“लहान होती तेव्हां तुला तेल लावता आलं नाही म्हणून एवढी मोठी झाल्यावर लावण्याचा योग आला मले.”

गावठी होती, पोटाची मालिश करतांना म्हणाली,

“हे इथ ना, चरबी जमली असते. त्याने राहत नाही गर्भ, आता म्या ना ह्या पोटाला कसं लूसलुशीत करतो.”

तिने जणू तिचं सर्वकाही पणाला लावलं होतं. काढा आयुवेदिक होता काही साईड एफेक्ट नव्हता, मालिश सोबत उर्वीला रोज सकाळी घ्यायचा होता. सातही दिवस जेवणात साजूक तुपाचा भरगोस वापर करायचा होता. तूपही ती घेवून आली होती. सात दिवस तिने जणू उर्वीला कुठेच जावू दिलं नव्हतं. उर्वीला मजा यायची. मालिश नंतर शांत वाटत असायचं तिला. त्या सर्व करण्यात आशीर्वाद होते हेही जाणून होती. आत्या राहून निघून गेली, जातांना म्हणाली,

“गेल्या गेल्या करा आता... म्हणजे सगळं कसं तयार झालं असलं...”

उर्वी हसली, वाटलं, “सायन्स ह्यानांही माहित असतं फक्त पद्धत वेगळी असते, बोलण्याची.”

मालिश करून तिने सगळ्या नसा नसा मुक्त केल्या होत्या, ज्याने उर्वीला मोकळं वाटत होतं. खाण्यात तुपाचा खूप वापर झाला होता, मग जणू शरीराचं शुद्धीकरण झालं होतं, जुन्या काळी बायकांना असचं तयार केल्या जात असावं कदाचित. तेव्हां तर खूप काही होतं, राण्या महाराण्या, संभोगाआधी विशेष तयार होत असत, त्यांच्या तर अंतरभागाला वाफारा दिला जायचा, जेणेकरून कुठलं इन्फेक्शन व्ह्यायला नको. वाटतं कधी कधी ते प्रगत होते कि आपण...  त्याचं प्रथा नव्याने आज वैज्ञानिक पद्धतीने समोर येत आहेत.

वैदकीय शास्त्र इतिहासिक काळातही प्रगत होतं आपलं आणि आताही ते प्रगत आहे.

सीजर हा प्रकार आपल्या आता आता काही वर्षापासून जास्त ऐकण्यात येतो. हल्ली तर सर्वांच सीजर होतं. पण इतिहासिक काळातही भारतात सीजर झालंय, हे कादाचीतच भारताबाहेर माहित नसेलही. महान आचार्य चाणक्यने, महाराणी दुर्धराच्या पोटाला योग्य रीतीने काटून बिंदूसाराला बाहेर काढलं होतं. महाराणी दुर्धराने चुकीने महाराज चंद्रगुप्ताच अन्न ग्रहण केलं होतं ज्यात त्यांना नाममात्र विष दिल्या जायचं.

असो, उर्वी इकडे राहून मस्त तयार झाली होती, निघाली होती आकाशकडे, खूप साऱ्या उमीद घेवून. त्यालाही तिची ओढ होतीच. जणू दोन्ही मन ओढल्या जात होती भेटीसाठी....

उर्वी तिकडे पोहचली आणि मग प्रेमाची बरसात होती. दोन्ही मन जणू तीन महिन्याने भेटली होती, मन बोलत होती आणि तन आलिंगन देत होते.. जणू बेचैनि अशी होती...

कितनी बेचैन होके तुमसे मिली
तुमको क्या थी ख़बर
थी मैं कितनी अकेली

कितना बेचैन होके तुमसे मिला
तुमको क्या थी ख़बर
था मैं कितना अकेला

दरम्यान आकाशची ट्रान्स्फर परत ओसाका मध्ये झाली होती. आल्या आल्या उर्वीसाठी  सगळं कसं खूपच धक्कादायक होतं. आताच तिला टोक्यो युनिवर्सिटीकडून पीएचडी साठी रेकमेंडेशन मिळालं होतं.... पण?

आकाश तिला म्हणाला, “तू इथे राहा मी ओसाकाला राहतो, विकएंडला भेटत जावू. हरकत काय!”

तो सहज बोलला, पण एवढं सोपं होतं हे? विदेशात रहावून जर वेगळं राहत असू तर काय फयदा असंच उर्वीला वाटायचं. शिवाय तिने किती तयारी केली होती ह्या वेळी, ती सगळी पाण्यात बुडाली असती हे वेगळं.

कसं बसं विचारात घर लावलं, त्यातच डॉक्टरने दिलेली सर्व औषधी सुरु केली होतीच. तिला आकाशपासून दूर राहायचं नव्हतं. त्या दिवशी आकाशने तिला कुशीत घेतलं,

ती तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवून पडून होती. आकाश तिला म्हणाला,

“मग करायची का ऍडमिशन, मी रक्कमपण लावून ठेवली आहे. तू टोक्योला होस्टेलमध्ये राहायचं.”

“पण वेगळं वेगळं राहणं मला पसंत पडत नाही आहे.”

“अग किती मोठी संधी आहे ही, तुझा प्रोजेक्ट होता मास्टरचा म्हणून तुला संधी मिळाली आहे.

“पण ती पीएचडी दोन वर्षापेक्षा जास्त वेळ पण घेवू शकते. मी नाही थांबू शकत आता...”

“म्हणजे...”

“मला दूर रहायचं नाही आहे. आणि आपण चान्स घेण्याचं करतोय त्याचं काय?”

“त्याचं काही होत नाही आहे ना, काळ वेळ काही ठरली नाही आहे. अजून किती वर्ष लागतील तेही माहित नाही...”

“असं कसं म्हणतोस, मी आता किती तयारीने आली आहे.”

“मग तुझा काय निर्णय आहे?”

“माझी पीएचडी सुरु आहे रे आयुष्यावर... ह्या विषयावर जिथे मी अडकली आहे. त्या पीएचडीने मला कदाचित अजून मोठी संधी मिळेल पण ह्या पीएचडीने मनशांती. आणि अजून बरच काही...”

“अर्थात तुझा निर्णय झालाय तर.”

“हो, मी काही तिकडे एकटी राहणार नाही. सध्या माझी प्रयोरीटी ती नाही.”

“पण मी म्हणेल अजून विचार कर, मिळत नाही अशी संधी, दोन तीन वर्ष असेच निघून जातील.”

“आणि अजून काही झालं तर.... तुझे नि माझे संबंध सुटले तर... त्या पीएचडीला डोक्यावर घेवून फिरू.”

“असं काही होणार नाही.”

“व्हायला काय आहे. इथे सर्व तेच व्हायला हवं असं समजतात, आणि मग मी तिकडे एकटी राहिली तर मग अजून तोंड फुटेल सर्वाना.”

“हे, असलं काही होत नसते... पण शेवटी निर्णय तुझा.”

मनातून आनंद झाला होता आकाशला कारण तो कुठे राहू शकत होता एकटा तिच्याशिवाय. हळूहळू रात्र सरकत गेली. महिना गेला, तीन महिने गेले, पण काहीच हाती लागलं नाही.

पुढचे तीन महिने आता औषधीचा काही परिणाम होईल ह्या प्रतीक्षेत गेले. पण हाती काहीच लागत नव्हतं. प्रत्येक महिन्याला नवीन पाळी सोबत नवीन उमीद उठत होती आणि पाळीसोबतच शमत होती.

मधल्या काळ जणू उर्वी स्वतःला प्रेगनंट समजत असायची, तेच कंबरेच दुखणं, स्तनात वेदना, जडजड वाटणं, पाळी दोन तीन दिवस लांबण, आणि मग तिचं अलगत येणं.... काहीच बदलत नव्हतं. एलोपैथीच्या औषधी आता संपल्या आणि आशाही मावळल्या होत्या.

तिची होणारी चिडचिड आकाशला सहन होत नव्हती आणि उर्वीत आता ग्लानी भरायला लागली होती. आपल्यामुळे आकाशला हे सुख नाही हे तिला आता झोंबत होतं.

तिने सोबत आणलेल्या सर्व आयुर्विदिक औषधीबद्दल वाचून काढलं, काही औषधी तिने आकाशला देणे सुरु केलं होतं, तोही गुमान घ्यायचा. कुठली औषधी कशासाठी वापरली जाते जणू तिला सगळं माहित होतं. आई तिला म्हणायची

“तू बिन डिग्रीची वैद झालीस आता.”  

उर्वी हसायची, म्हणायची, “हो लीहून ठेवते, मला फरक पडला तर निदान कुणाला सांगतांना कामात येईल. नाहीतर ही  वैद्यकी  काय कामाची.”

तिने लिहायला आणि घ्यायला सुरुवात केली होती.

शतावरी, हिला आयुर्वेदिक जडी बुटीची राणी म्हणतात. अनेक शारीरक रोगांसाठी वापरल्या जाते. ही प्रजनन क्षमता वाढवणारी औषधी वनस्पती म्हणूनही लोकप्रिय आहे. इस्ट्रोजेन होर्मोंस वाढवण्याचे काम करते. ह्याच्या सेवणाने मासिक पाळी नियमित होते. आणि ओव्हुलेशनही वाढते. एवढचं नाही तर शतावरीच्या सेवनाने आईचे दूध वाढण्यासही मदत होते. ही पुरुषांसाठीही गुणकारक मानल्या जाते.  

आयुर्वेदात रसायन म्हणून ओळखल्या जाणार शिलाजित, पण शिलाजीय चा वास्तविक अर्थ होतो पर्वतांवर विजय मिळवणारा. हा एक चिकटसा चमकदार दगडासारखा दिसणारा पदार्थ हिमालय पर्वत रांगांमध्ये आढळतो. आरोग्या संबंधित अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी  आजही आयुर्वेदात ह्याला पहिलं स्थान आहे. वंध्यत्वावर इलाज करतांना आयुर्वेदात हे रसायन पुरुषांसाठी वापरले जाते. ज्यांच्या सेवनाने शुक्राणू संबंधित समस्या दूर होतात. त्याची संख्या वाढते आणि ते गतिशील होतात.

उर्वीला वाटलं, “म्हणून बाबा वारंवार सांगत होते, आकाशला सांग महिनाभर घ्यायला, बघ कसा पुढच्याच  महिन्यात रिझल्ट मिळत नाही ते...”

ती हसली, म्हणाली, “म्हणजे ह्यांनी ठरवलं सुद्धा की दोष आकाशचा आहे. बापरे... दोष तर अजूनही कुणाचा आहे ते माहित नाही... जावूदे मी कशाला विचार करू. असचं असतं, आपलं तर मापलं लोकांचं दीड पायली... चला ह्या बहाण्याने तरी मला आपलं समजलं त्यांनी नाहीतर मी तर विसरले होते, माझे आई बाबा मला आपलं समजतात म्हणून. पण आकाश घेतोय दुधासोबत, आणि तो तर विचारतही नाही मला, गुमान समोर घेवून गेली कि गुपचूप न काही बोलता घेतो. पण अजून काहीच रिझल्ट आला नाही...”

 मग कधी येणार.... बघूया पुढच्या भागात...

कथा क्रमशः

कथेचे सर्व भाग वेबसाईट आणि पेजवर आहेत, तुम्ही वेबसाईटवर, कथा मालिका -बीइंग नारी... ला क्लिक करा. आणि सर्व भाग वाचा.

नोट- माझी विषकन्या कश्यपी ही ऐतिहासिक कादंबरी सध्या मराठी साहित्यात खूप कौतुकाचा विषय ठरत आहेत.... सर्वाना धन्यवाद! आपणास हवी असल्यास आपण अमेझोन/ फ्लिप कार्ट वरून मागवु शकता. लिंक हवी असल्यास मला मेसेज करा...

https://www.amazon.in/Kashyapi-Vishkanyech-Prem-Urmila-Deven/dp/9356115923/ref=sr_1_1?crid=3LSHAYFYUDIK6&keywords=urmila+deven&qid=1665138045&qu=eyJxc2MiOiIxLjAwIiwicXNhIjoiMC4wMCIsInFzcCI6IjAuMDAifQ%3D%3D&sprefix=urmila+deven%2Caps%2C326&sr=8-1


© उर्मिला देवेन

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...



Post a Comment

0 Comments