बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
भाग ३८
---
गुंतलेल्या मनालाही जरा उलगडण्यासाठी विसावा हवा,
भिरभिरणाऱ्या विचारांनाही जगण्यासाठी जरा ब्रेक हवा....
तिने आता सारं मनातून काढून टाकण्याचा विचार केला. अश्रू पुसले आणि, मेल बघत राहिली. तोच तिला ईमेल दिसला, आज तर तिला ओसाका युनिवर्सिटीला जायचं होतं.
“अरे, यार... हा मेल कसा विसरले होते मी... पण आताही जावू शकते. २ वाजायला वेळ आहे.”
तिने स्वतःला आवरलं. तयार झाली, जायचं कसं तेही बघितलं. आणि निघाली.
उर्विला जॉब मिळाला होता. फारसे खूप पैसे मिळणार नव्हते, पण ओसाका युनिव्हर्सिटीच्या लॅब काम करायला मिळणार होतं. बस ती खुश झाली होती. शिवाय प्रोफेसर तिला म्हणाले होते की काही महिन्यात ते तिला पीएचडीसाठीही मदत करतील.
आता जॉब करायचा, पैसा जमा करायचा आणि मग मोठी ट्रीटमेंट करायची स्व बळावर. तिचा निर्णय झाला होता. घरी आली. आकाशचा फोन तर तिने दिवसभर उचलला नव्हता.
तो आला, आणि शांत घरात बसून होता, मग हळूच म्हणाला,
“कधी जायचं आहे पुढ्यावेळी हॉस्पिटलला, मी सोबत येणार आहे.”
“त्याची गरज नाही. मला आता ती ट्रीटमेंट करायची नाही.”
“मग काय करायचं आहे.
उर्वीने आकाशच्या हातात ऑफर लेटर ठेवलं. आकाशने मिश्किल हसत ते वाचलं,
“व्हा, ग्रेट... किती मोठी संधी उर्वी.”
“हुमम... पण पैसा तेवढा नाही.”
“अग एवढे ठीक आहे. सुरुवातीला एवढेच मिळतात.”
“पण ते दिवसानुसार असणार.”
“काय हरकत आहे. मग आता ट्रीटमेंटच कसं?”
“ते तर सुरच आहे. आपण जो रुटीन सुरू केलाय तोच फॉलो करूया. जरा मेंदूला मोकळं करूया.. खूप धावणं झालं आता, जारा मार्ग बादलूया...”
“अरे व्हा उर्वी.. तू सकाळी भांडली होतीस माझ्यासोबत....
“तर काय करशील, तो माझा हक्क आहे... काही प्रोब्लेम आहे तुला?”
“नाही बाबा, मी काय आपला जोरूचा गुलाम, म्हणून माझी आई म्हणते ना बरोबर आहे.”
“आता नको आकाश परत तुझ्या आईचा विषय.”
“हे तू बोलतेस, तुझा आवडता विषय आहे ना..”
उर्वीने आकाशकडे नजर रोखून बघितलं, आकाशने जीभ दाखवत तिल चिडवलं अबी म्हणाला,
“मग, पार्टी... काढू का माझी?”
“ये आपण कमी करायचं ठरवलं होतं,...”
“अग पण जराशी चालते ना... कधी कधी, थोडशी घेतो ना... तूपण घे वाइन चांगली असते ग पाळीच्या दिवसात....”
उर्वी हसली आणि मग सगळं बदलत गेलं.
आता रोज दोघेही निघायचे, अगदी रुटीन पुण्यातल्या सारखा झाला होता. त्याच दिवसात आकाशचे भारतीय मित्र वाढले. मग सोबत फिरणं, पार्ट्या होत असायच्या. दोघेही कमवत होते.
तसं उर्वीच अर्ध लक्ष तिच्या दर महिन्याच्या हालचालीवर होतंच. दर महिन्यात डोळे ओले होतं होते. नंतर परत त्यांनी वेळ काढून आययूआयच्या दोन सायकल केल्या ज्या काही पॉसिटीव्ह ठरल्या नाही.
आता तिने परत जेव्हा वेळ मिळेल तसं सगळं माहित करणं सुरु केलं,
लाप्रोस्कोपी करण्यासाठी भारतात जायचं होतं. येणाऱ्या महिन्यात युनिवर्सिटीला महिन्याभराच्या सुट्या होत्या. उर्वी आकाशच्या मागे लागली होती, आकाशने सुट्या काढल्या. आणि दोघंहीही बँककोक मार्गे भारतात जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे चार दिवस फिरून मन फ्रेश करायचं आणि मग भारतात जायचं त्यांनी ठरवलं,
आकाश, “उर्वी, बायकोसोबत बँककोकला जायची मजा काही औरच.”
उर्वी हसली, “बायकोसोबत जातोस हे समजलं मला...”
“मग, तू काय आता सोडणार आहेस!”
“ह्या जन्मात तरी नाही...”
“मग चल येवू फिरून, तुला हनिमूनला घेवून गेलो नाही ना कुठे... समज हा आपला हनिमून आहे.”
उर्वी सगळं विसरून परत नव्या दमाने सगळं करत होती. मनात खूप काही होतं पण स्वतःचा आनंद महत्वाचा होता हे हेही खरं होतं.
जाण्याआधी तिने लाप्रोस्कोपी बद्दल माहिती काढावी आईला फोन केला,
“हो ग कर, आपल्या त्या मुंदे काकांच्या मुलीने केली होती, लागलीच राहिलं मग तिला. शेवटचा उपाय म्हणून करतात लोकं, काही असलं तर तिथेच ऑपेरट करतात म्हणे डॉक्टर.”
“हुम्म्म, बघत आहे मी येण्याच.”
“ये बाई, आता एकटी येवू नकोस, सारे जीवाचे हाल होतात तुझ्या.”
“हो हो, आकाशपण येतोय...”
“मग ठीक आहे. आणि राहणं कुठे?”
“आता आकाश येतोय म्हटल्यावर तिकडेच जाणार ना, पण मी ऑपरेशन झाल्यावर तिकडे येईल...”
“बर, कधी आहे ते सांगशील. मला राणीकडे जायचं आहे.”
“कधी जात आहेस?”
“अजून ठरलं नाही.”
“मग मी पुढच्या महिन्यात येते आहे, जावू नको कुठे...”
उर्वीने आईला सांगितलं होतं पण तिलाही सगळं माहित होतं तिकडे जावून काही कुणी कुणाच नसणार म्हणून. शिवाय आकाशला आता माहेरी अजिबात आवडत नसायचं. तोही त्याच्या ठिकाणी बरोबर होता. तो आला की बाबा आई घरात नेमके नसायचे. बाहेर असले तरी घरी येत नसायचे... कधी कुठल्या चर्चा होत नसायच्या कि काहीच नाही, गेलं तरी एका खोलीत तो बसून राहत असायचा... आता तोही आधीच बोलला,
“उर्वी मी काही तुझ्या घरी येणार नाही... तुला सोडून देईल.”
“तुझं घर... नाही का?”
“म्हणजे माहेरी.”
“असं, आणि मग मीही असचं करू का? कसं वाटेल मग?”
“हे बघ मला भांडायचं नाही.”
“आणि मला तिकडे गेल्यावर भांडायचं नाही... नुसती कटकट असते यार... कधी फ्लॅट रेडी होतो काय माहीत. हे बघ मीही मोजके दिवस तिकडे रहाणार. तू जिथे जाशील मी तुझ्यासोबत राहील. मला तिकडे राहायला होत नाही. कुठे हात जरी लावला तरी तुझी आई धावत येते. आणि तिथल्या बायका पार काहीही बोलतात...”
“हे बघ आपण वीस दिवसांसाठी जातोय ना, मग खूप कमी आहेत ते. त्यातही तुझे दिवस तर लेप्रोस्कोपीमध्ये जाणार. तू हवं तर राहा तुझ्या आईकडे. मला नको म्हणू यार... मी माझ्या गावात बरा...”
दिवस जवळ येत होते आणि उर्वी डॉक्टरच्या संपर्कात होतीच. ऑफिस मधून आली कि ती साथिया साथ निभाना बघायची आणि हसायची.... बस तेवढं मनोरंजन असायचं तिला.
जायला आठवडा राहिला होता, उर्वीची पॅकिंग सुरु होती. आज आकाश उशिरा येणार होता. तिचं सर्व आवरून झालं होतं, तिने तिची डायरी काढली,
“अरे, आता मी लॅपटॉपवर लिहायला लागले आणि विसरले होते.” तिने डायरी नजरेखालून काढली,
“किती आठवणीचा खजाना दडला आहे इथे... भावनांची उलथापालथ कसून कोरली आहे. किती काही लिहलं आहे...”
पानांवर असल्याल्या अश्रूंची डाग अजूनही त्यात ओलसर वाटत होती. तिने हळूच बाजूला केली आणि लॅपटॉप उघडला, आज मनाला पडलेल्या प्रश्नाची उत्तर शोधायची होती.
लॅप्रोस्कोपी ही पोटातील अवयवांची तपासणी करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ही अतिशय कमी जोखमीची तसेच कमीत कमी टाक्यांची प्रक्रिया मानल्या जाते.
दुर्बिणीच्या साहाय्याने, भूल देवून किमान फाडतोड करून केल्या जाणारी एक शस्त्रक्रिया म्हणजे लॅपरोस्कोपी. आता ही बऱ्याच करणासाठी वैदकीय प्रक्रियेत केल्या जाते, वंध्यत्वाच्या प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी ह्या दोन्ही प्रकारात लॅपरोस्कोपी केल्या जावू शकते...
“आता हे काय आहे नवीन काय, मी कुठे येते इथे?”
प्रायमरी इन्फर्टिलिटी अर्थात ज्या स्त्रीला अजून एकदाही गर्भधारणा झाली नाही अश्या वंध्यत्वाच्या प्रकाराला प्रायमरी इन्फर्टिलिटी संबोधल्या जातं.
“म्हणजे मी, अजूनही खंडीभर प्रयत्न करूनही दर वेळी पाळी येतेच मला. कधी त्या प्रेग्नसी कीटवर मी दोन लाईन्स बघेल काय माहित. आणले तसेच पडून आहेत.”
आणि ज्या स्त्रीला आधी मुलं झालंय पण दुसरं अनेक प्रयत्न करूनही राहत नसेल, तर मग अश्या वंध्यत्वाला सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात.
“कशाला हवंय दुसरं, झालं तर झालं नाही तरी एकचं उत्तम की, कशाला लोकं मर मर करतात दुसऱ्या तिसऱ्या मुलांसाठी काय माहित, इथे मला एक राहत नाही. लोकांना मुलगा हवा असतो उर्वी... ज्यांना होतात ना त्यांचे असे शौक असतात.”
लॅपरोस्कोप नावाचे लांब आणि बारीक ट्यूब पोटात छेद करून टाकली जाते आणि आतील अवयवांची तपासणी केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया लॅपरोस्कोपद्वारे होते म्हणून ह्याला वैदकीय भाषेत लॅपरोस्कोपी म्हणतात. लॅपरोस्कोप पुढे हाय रिझोल्यूशन असलेला कॅमेरा असतो. जो पोटातील सर्व काही मॉनिटर स्क्रीनवर दाखवतो. ज्यात सूक्ष्म अति सूक्ष्म जरी काही असलं तरीही डॉक्टर बघू शकतात. आणि गरज पडल्यास दोष तिथेच दूर केल्या जातो.
इन्फर्टिलिटीसाठी जेव्हा ही केल्या जाते, तेव्हा एका प्रकारे गर्भाशय आणि सगळा भाग धुतल्या जातो. ओव्हरीलाही पंचर केल्या जातं जेणेकरून जुने झालेले एग्स बाहेर पडतील आणि त्यामागे दडलेले उत्तम एग्स प्रक्रियात भाग घेण्यास सज्ज होतील. तसं पाहिलं तर ही ऑपरेटीव्ह पद्धतीतिल इन्फर्टिलिटीसाठी अगदीच शेवटी टेस्ट आहे. जिला शेवटचा इलाज म्हणून वापरल्या जाते.
लिहिता लिहिता उर्वी थांबली,
“बापरे, म्हणजे मी आता शेवटच्या उपचारावर आहे... आणि काही झालं नाही तर मी वांझ म्हणून वावरेल...”
तिच्या अंगावर काटे उभे झाले होते. भीती भरली होती, करावी कि नाही म्हणून मन परत विचार करत होतं... आतापर्यंतचा अनुभव वाईट होता, सारंच करून ती रिकामी होती...
बराच वेळ शांत राहिल्यावर तिच्या मनाने उत्तर दिलं,
“भीतीने प्रयत्नच केले नाही तर कसं? हाही प्रयत्न करूया. निदान कळेल तरी...”
कसं असतं ना, स्वतःला स्वतःहून ऑपेरेशनसाठी तयार करणं तेही निदान व्हावं म्हणून... एवढी हिंमत होते स्त्रीची, मातृत्वासाठी... काय किमया आहे ना ह्या ओढीची... मन माघार घेत नाही. जीवाची पर्वा करत नाही.... काय करायचं असतं नेमकं, काय सिध्द करण्याची ओढ असते, कशासाठी असतो हा उठाठेव... आईपण मिळावं म्हणून... की लोक लाज असते... की नातं टिकावं म्हणून... नेमकं काय हवं असते...
असे अनेक प्रश्न मनाला पडत असले तरीही आईपणाचा सोहळा हवाच असतो स्त्रीला. आणि तो सोहळा तिच्या एकटीचा नसतोच, पुरुषालाही बाप होण्याचा लडा लागला असतो. फक्त तो दाखवत नसतो. ह्या अग्नीत दोघेही सारखे जळत असतात पण इजा स्त्रीला होतात तेही खरं...
उर्वी तर आजच्या स्त्रीच प्रतिनिधित्व करत होती, तिला तिचं करिअर महत्वाच होतं नी आईपण सुद्धा.
आईपण आल्याशिवाय बाईपण येत नाही आणि बाईपण आल्याशिवाय बाईला महत्व तरी काय... पण खरंच असं आहे का? का आपण स्त्रिया मातृत्वाच्या ओढीत ओढत जातो... सारं काही विसरतो... वाहवत जातो... आणि ज्यांना हे लाभतं ना त्याही नाव बोटं ठेवतात बरका... खूप वाईट हा प्रवास.
असो, उर्वीची तयारी झाली होती मनाची. सुट्या लागल्या होत्या. दोघेही मजेत बँककोकला पोहचले, मजा मस्ती दोघंही खूप केली. दरम्यान उर्विला पाळीही आली होती, आता तिचं सगळं वेळेवर होणार होतं. कारण एक दोन दिवस जरी पाळीचे इकडे तिकडे झाले असते तर सगळं दिवसाचं गणित बिघडलं असतं.
उर्वीने पोहल्यावर आईला फोन केला, आई तिकडे नव्हतीच, ती राणीकडे गेलेली होती, आता उर्वी भडकली,
“तुला सांगितलं होतं ना मी येणार आहे ते...”
“अग पण माझं आधीच ठरलं होतं ना.”
“बघ तू अशीच करते, आणि मग म्हणतेस की आम्ही तुम्हाला मान देत नाही म्हणून. गरज पडली कि तुम्ही नसताच ना.”
“पण माझी काय गरज आहे ग, जावई आले आहेत ना...”
“पण आई, ही लॅप्रोस्कोपी आहे. ऑपरेशन असतं. तुला वाटत नाही मुलीसोबत राहायला पाहिजे म्हणून. आणि मी सांगितलं होतं ग, एकतर ती आकाशची आई यार धड जगू देत नाही इकडे आलं की आणि आता तू तिकडे जावून बसली. त्या राणीला समजत नाही का.”
उर्वीने रागात फोन ठेवून दिला. तीही चिडली होती, आकाशला काय सांगाव म्हणून अडकली होती. दुसऱ्या दिवशी कामासाठी नागपुरात दोघेही आले, आणि डॉक्टरला भेटायला गेले.
डॉ. मानसीने उर्वीची तपासणी केली,
“बघ पाळी झाली आहे, अल्ट्रा साऊंड मध्ये सगळं क्लीन आहे. कधी तुम्ही दोघं फ्री आहात?”
आकाश, “हीच मेन प्रायोरिटी आहे, म्हणजे त्यानुसार मी माझे काम अरेंज करतो.”
“मग आपण दोन दिवसाने करूया.”
“चालेल.”
“उर्वी तुझ्या काही बासिक टेस्ट कराव्या लागतील, ब्लड ग्रुप आणि आरएच फॅक्टर, शुगर माहित असणे गरजेच आहे. कारण हि एक ऑपरेटिव्ह प्रोसेस आहे. आदल्या दिवशी तुला भर्ती व्हावं लागले. दुसऱ्या दिवशी आपण दहाच्या जवळ करूया. एक दोन दिवस दिवसात तुला डिस्चार्ज दिला जाईल. आम्ही आकाशला ऑपरेशन रूमध्ये बोलवू. त्याला बघता येईल. काही असलं तर त्याला सांगू आणि तसा उपचार करू. डोन्ट वरी, सगळं होईल, काही घाबरायच नाही.”
आकाश, “ऍनेस्थेसिया दिला जाईल ना?”
“हो, ऑपरेटिव्ह असल्याने गरजेच आहे.”
आकाशला चिंता लागली होती. त्याला उगाच वाटत होतं का करतोय म्हणून. पण उर्वी सज्ज झाली होती. सर्व ठरवून दोघेही निघाले.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments