बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
भाग ३९
----
आपले आपल्या सोबत असणं आणि ते असल्याचा भास सोबत ठेवणं म्हणजे नेमकं काय?
नाती धरून ठेवणं... जी समोरच्याने ताणली असते, आपण ताणली तर मग काय?
दोघेही घरी आले आणि उर्विला आईचा फोन आला,
“मी उद्या पोह्चत आहे, तुझं ते ऑपरेशन कधी आहे.”
“आहे परवा, ये तू, मी करते तुला कॉल.”
आईच बोलणं उपकरांच्या भाषेत होतं हे उर्वीला जाणवलं होतं, पण गरज उर्वीची होती. उलट आकाशला कसं वाटलं असतं हेही महत्वाच होतं. एवढी मोठी प्रोसेस आणि माहेरचं कुणीच नाही. कदाचित त्याला कळला होतं, म्हणून तो त्याच्या आईला सोबत येण्यासाठी आग्रह करत होता,
म्हणाला होता, “तिला गरज आहे, तिच्या गरजेच्या वेळी तू सोबत राहलीस तर तुझे आणि तिचे संबंध सुधरतील ग, उद्या तुझी गरज असेल तेव्हा ती मनातून उभी असेल... नाहीतर कर्तव्य नुसतं असेल नजरेत.”
त्याच्या आईला यायचं होतं, तिकडे नागपूरात भरपूर नातलग होते तिचे. भेटणं झालं असतं आणि वरून उर्वीला बोलणंही कि तिची आई आली नाही म्हणून... तशी ती रागात होतीच, का कुणास ठावून...
आदल्या दिवशी आकाशवर भडकली,
“काय खर्च सुरु आहे तुहा, समजत नाही का मले.”
“काय सुरु आहे...”
“इथ मी एकटी रायतो, मले कधी विचारलास दवाखान्यात चल मनून...”
“असं होय.”
“आता माग मी पडली होती तवा आला पण नवता तू, कसा येशीन आता याचं असल ना.”
“काय लागलं होतं तुला?
“असं, सारा गाव मनत होता, पोरगा आला नाही मनून. आता बर तुले वेळ भेटला.”
“आई मला काम असतात, आता न्यायचं आहे तुला दवाखान्यात?”
“आता कसा नेशील.”
आता उर्वी भडकली,
“घेवून जा ना रे, सगळं वरून खालीपर्यंत चेक अप करून आण, माहित तर होईल झालंय काय म्हणून.”
“तुले काही म्हटलो काय व, आली मोठी. तोरा दाखवते, सारं गाव थूकते तुह्यावर.”
“आकाश बघ आता, माझ्यावर सर्व गाव थूकते... मी का राहू मग इथे. मी आताच निघते, मला नाही राहायचं आहे.”
आकाशने काहीच उत्तर दिलं नाही, उर्वी तयार झाली आणि त्याने तिला बस स्टॉपवर सोडलं, तसा तो चिडला होता, पण परत उर्वीसोबत त्याला भांडायचं नव्हतं. उर्वीला उद्या परस्पर तिकडे हॉस्पिटलमध्ये ये म्हणून त्याने सांगितलं. आणि घरी आला. घरीही तो आईशी बोलला नव्हता.
उर्वी आईकडे आली, गरज होती तिची, निदान आई आहे हे तिला दाखवाचही असायचं. सासरी माहेर आहे ह्याची जाणीव करून द्यायची होती. मनात तर माहित होतं पण जनात ते येवू द्यायचं नव्हतं, तीही एक वेगळी लढाई होती. नाती जुळवून आणण्याची.
दोघींही उद्याची तयारी केली. आई सारखं म्हणत होती,
“जावई तिकडे आहे तर मी थांबणार नाही, परत येईल.”
उर्वीला पटलं नव्हतं. तिने निदान थांबावं असचं तिला वाटत होतं. जरा वेळाने तिच्या लक्षात आलं, राणीच्या घरचे येणार होते, आई कशी थांबणार होती, तिनेही जास्त बोलणं टाळलं. उद्या जे होईल ते ह्या विचारात ती राहिली.
दुपारी आई आणि उर्वी नागपूरसाठी निघाल्या, आकाश त्याच्या आईला घेवून तिकडे पोहचला होता.
उर्वीच्या आईने आकाशच्या आईला नावापुरता नमस्कार केला आणि तिचा एक कोपरा पकडून राहिली. बोलायला बरी होती मग तिथे असणार्या नर्ससोबत तिची मस्त जमली होती. इकडे आकाशची आई गुमसुम बसून होती, तिच्या मते हा खर्च माहेरच्यांनी करायचा होता. आणि हेच भांडण त्या दिवशी झालं होतं.
उर्वी आईकडे निघून गेल्यावर आकाश आणि त्याच्या आईच भांडण झालं होतं. उर्वीवर जो तो खर्च करत होता तो खर्च तिच्या माहेरच्यांनी करावा असं तिचं म्हणणं होता. तिचंही बरोबर होतं, शेजारी पाजारी सगळं तेच होतं, मुलगी माहेरी गेली की सगळं तिचे आईवडील करायचे. अगदी लहान सहान खर्चही.
आणि हे उर्वीनेही अनुभवलं होतं, आता ती विचाराने मोकळी होती, कमवत होती पण मनात तिलाही वाटत होतं, तिच्यात आणि तिच्या बहिणीत फरक तिला जाणवत होताच. राणी आणि घरी असली की आई आणि बाबांची तारेवरची कसरत असायची. तिच्या सासरचे जरी कुणी येत असले तरी घरी लाजमा असायचा. आणि उर्वी आली की... घरात काहीच नसायचं...
उर्विला डॉक्टरने भर्ती करून घेतलं, संध्याकाळीच तिला जेवता येणार होत. नंतर ती काही खाऊ शकणार नव्हती. सकाळी तिला एनिमा देणार होते. तिच्यासोबत एक जन राहू शकत होतं. लेडीज वार्ड होता. आईने राहावं असा सल्ला डॉक्टरने दिला. आईला मात्र घरी जायचं होतं, ती म्हणाली,
“तुझ्या सासूला ठेव ग, मला घरी खूप तयारी करायची आहे.”
“आई तू थांब ना... तिच्याशी काही बोलू शकत नाही ग.”
“काय बोलायचं आहे, नर्सला आवाज द्यायचा. आणि तुला तर सगळं माहित आहे. काही गरज नाही. मी काय करू इथे थांबून. मला खूप काम आहेत, तसाही घरात पसारा पडला आहे. मी आताचा आले राणीकडून. बाबापण आज येणार आहेत. आता जावाई इथे आहे, यीनबाई आहेत मी कशाला हवी.”
उर्वीच्या डोळ्यात पाणी आलं होतं, तर आकाश जोरात म्हणाला,
“तुम्ही थांबा, काय ते तयारी नंतर करा. हे महत्वाच नाही का.?”
शेवटी आई बाहेर गेली आणि फोन करून परत आली, कशीतरी ती राहायला तयार झाली. आकाश त्याच्या आईला घेवून त्याच्या मावसबहिणीकडे निघून गेला. तो रात्र डब्बा घेवून आला तेव्हा उर्वीची आई खोलीच्या फोन वर बोलत होती, आकाशच्या कानावर शब्द आले,
“ह्या लोकांमध्ये राहण्याची इच्छा होत नाही, पण आता काय करता लोक लाजी राहावं लागत आहे. ती तिची तोंड हेकडं करून बसलेली सासू बघितली की असं वाटते ना... पण जाऊदे, बर वाटणार नाही ते, हो आता झोपते इकडे, उद्या बघते मी निघते.”
आकाशने ऐकून लक्ष दिलं नाही, त्याने डब्बा आणला होता, उर्विला जेवायला सांगितलं. आणि तिच्या आईचा डब्बाही दिला. उद्या सकाळी येतो म्हणून सांगितलं.
आईने डब्बा खाल्ला, आता तिला खाली झोपायचं होतं. हॉस्पिटल बऱ्यापैकी असलं तरी पेशंटपुरते बेड होते, आईची कुरकुर सुरु झाली होती,
“खूप मच्छर आहेत इथे. घरीच जायला पाहिजे होत, उद्या सकाळी पहिल्या गाडीने आली असती. फालतूच थांबवून ठेवलं.”
उर्वी गुमान गप्प होती. मध्ये मध्ये आई झोपेतून उठून बसत, बडबडत होती. आता उर्वी तिला म्हणाली,
“तू झोप इकडे, मी झोपते खाली, मला काही वाटणार नाही... कितीही आकाशात उडले ना तरी जमिनीवर अजून आहे मी. वेळ काढून नेता येते मला...”
आता मात्र आई झोपली, पहाटे उर्वीला एनिमा द्यायला नर्स आली, उर्वीसाठी पहिला अनुभव होता.
नंतर तिला अंघोळ करायची होती. ती तयार झाली होती. नंतर नर्सने पोटावरचे केस काढून तिला पूर्ण रेडी करून दिलं होतं. आता तिला काही खाता येणार नव्हतं.
आठ वाजले आहे नर्सला सलाईन लावायची होती. हा तर खूपच नवीन अनुभव होता तिच्यासाठी,
आई होती म्हणाली, “पोरीला कधी अशी परिस्थिती आली नाही, आमच्या मुली, धडधाकड, बघायला रेखीव, ना बारीक ना लठ्ठ, कधी चक्कर येवून पडल्या नाही की कधी काही नाही, आता हे काय आलंय सोमर...”
बरोबर होतं तिचं, आजपर्यंत उर्वीला कधीच सलाईन लावल्या गेली नव्हती. ती दिसायला घडधाकड होती. आणि तिलाच हे सगळं सहन करावं लागत होतं. आता तिला वाटायला लागलं होतं,
“आपण नाजूक असतो तर किती बर झालं असतं ना, ज्या मुली नाजूक असतात त्यांना बर लवकर दिवस जातात... काही नाही, आपण वरून चांगलो दिसतो, बाकी काही नाही.”
नर्सला तब्बल अर्धा तास लागला नस शोधायला. सगळं होवून आता दहा वाजायला आले होते. आकाश अजून आला नव्हता. उर्वीची धडधड वाढत होती, त्यात आई किरकिर करत होती,
“काय बाई, समजायला पाहिजे ना, अजून पत्ता नाही ह्या लोकांचा. दिलं पोरीला एकटं सोडून.”
नर्सने आईच्या हातात सलाईन बोटाल आणि बाकी गोष्टींची लिस्ट दिली होती, उर्वीने ती हातात घेतली, म्हणाली,
“आकाश आला की दे त्याला. हे एमर्जन्सि लागलं तर आणून ठेवायचं आहे. त्याने कला आणलं आहे सगळं. काळजी करू नको. येईल तो.”
उर्वीला जरा अंदाज आला होता, तिकडे मावस बहिणीकडे काय झालं असेल ह्याचा. आकाश त्याच्या आईला समजावण्यात लागाल असेल. पण आता तिलाही त्याचा राग येत होता.
तिची पूर्ण तयारी झाली होती. हॉस्पिटलचा हिरवा झगा घातला आणि तिचा चेहरा पार पडला होता. तोच तिला डॉक्टरने बोलावलं, उर्वीने कुणाची फिकर केली नाही. ती सरळ ऑपीरेशन रूमकडे निघून गेली.
तिकडे पूर्ण टीम होती. दहा लोकं खोलीत होते. तिला ऑपरेशन बेडवर पडायला सांगितलं. सगळे सेटअप लावत होते, उर्वीने डॉ मानसीला म्हटलं,
“मॅडम अजून आकाश आला नाही आहे.”
“हो हो, येईल ना, तू काळजी करू नको, रीलॅक्स हो. मी सांगते नर्सला बाहेर लक्ष द्यायला.”
तिला ऍनेस्थेसिया दिला गेला, आणि तिच्या कानावर आकाशचा वाजला आला, आता डोळे मिटले होते.
डोळे उघडले तेव्हा ती बाहेर तिच्या खोलीत होती. आकाश बसून होता, डॉक्टर येवून बघून गेली.
दोन दिवस तिकडे राहून ती आईकडे जाणार होती. आईचा तर सगळा प्लन कदचित फसला होता. तिची चिडचिड तिच्या डोळ्यात दिसत होती. पण उर्विला वेळ काढून घ्याची होती. सासूला राग होता कारण सगळा खर्च आकाश करत होता. आणि आकाशच्या नजरेत काळजी आणि अश्रू होते. दोन दिवस त्याने तिची खूप काळजी घेतली होती. जे खुपत असायचं नजरेत तिच्या सासूच्या. आणि आईंला उगाच आपण इथे अडकलो ह्याचा भाव देत असायचं.
उर्वीच्या सासरचे जेवढे जवळपास होते सगळे भेटायला येवून गेले होते, उर्वीच्या लक्षात आलं होतं आकाशने त्याच्या आईला संभाळतांना, त्याच्या बहिणीने जसं म्हटलं त्याला हो ला हो केलं होतं,
आकाशची बहीण रतनने दोन वर्षाआधी अबॉर्शन झाल्या नंतर, ऑपरेशन करून गर्भाशय धुवून घेतलं होतं तेव्हां ती अशीच हॉस्पिटलला होती. आणि मग सासूबाई जरा शांत झाल्या होत्या.
दोन उर्वी आणि आकाश डॉक्टरला भेटायला त्यांच्या खोलीत गेले,
“हुम्म, ऑल गुड उर्वी, आम्ही आकाशला बोलावलं होतं... काही सिस्ट होत्या. सगळं धुऊन झालंय.”
“आणि ओव्हरी?”
“दोन्ही ओव्हरीजला पंचर केलंय.”
“मग एग्स काऊंट मोजावा लागेल का?”
“नाही त्याची गरज नाही, पण ओव्हरीज पंचर केल्याने अधिक जोमाने कार्य करतील.”
“तुम्ही सात दिवसाने या, मी टाके बघून घेईल. म्हणजे ते डीझोल होणारे आहेत. पण बघून घेईल एकदा सगळं, आणि मेडिसन घेवून जा, सगळं नीट आहे. आणि सगळं नीट झालंय. आणि सीडी तुला पुढच्या वेळी देते. जरा एडिट करायला लागेल.”
आकाश ने गाडी बुक केली आणि उर्विला तिच्या आईकडे सोडलं. तो मात्र थांबला नाही. पाच दिवसात तिला बर वाटायला लागलं. आकाश तिकडे यायाल तयार नव्हता. तोही खूप महिन्यांनी आलेला मग खूप काम होती. उर्वी स्वतः तिकडे गेली. नंतर सोबत त्यांनी डॉक्टरची भेट घेतली आणि सगळं मेडीसीन वगैरे घेवून जाण्याच्या तयारीला लागले.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments