बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन भाग ३४

 बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन

भाग  ३४

---


म्हणतात, लग्न आपण अश्या माणसाशी करावं,

जो आपल्यावर अतोनात प्रेम करतो,

त्याच्यासोबत कदाचित नाही ज्याच्यावर आपण प्रेम करतो...

संध्याकाळी, आकाश घरी आला, फ्रेश होवून बसला आणि उर्वीकडे बघून म्हणाला,

“काय, डोळे लाल दिसत आहेत. रडलीस ना आजपण?”

उर्वी काहीच बोलली नाही,

“तू काय पागल बिगल आहेस काय ग, अभ्यास कर, किती ठिकाणी अप्लाय केलं आज?”

“केला एका ठिकाणी, ओसाका यूनिवर्सिटीमध्ये...”

“एकच...”

“हो, वेळ नाही मिळाला.”

“काय करतेस घरी दिवसभर?”

“सिरीयल बघते ना, ऑनलाइन...”

“उर्वी वेळ वाया घालवू नकोस, परत येत नाही. “

“मीही तेच म्हणते, तू वेळ घालवू नकोस.”

“ये फालतू बोलू नकोस.”

आज आकाश जरा चिडला होताच, त्याच्या ऑफिसमध्ये काही प१ इनसिडेंट झाला होता. त्याला टेन्शन होतं. आणि उर्विला आज त्याला विचरायचं होतं पण तो काही केल्या धड बोलत नव्हता. आकाशने आज काम घरीही आणलं होतं, आणि तो त्याचा लॅपटॉप घेवून बसला होता. उर्वी गुमान स्वयंपाक करत होती पण तिचं मन काही लागत नव्हतं. ती सारखी बेडरूममध्ये येत होती. पण आकाश काही केल्या तिच्याकडे लक्ष देत नव्हता. त्याला जेवायला बोलावलं तर तिथेही तो लॅपटॉप घेवून आला, उर्वीच्या मनात खूप काही येत होतं. पण आकाश आल्या आल्या तिच्यावर भडकला होता. मग तीही गुमान गालातल्या गालात खास फिरवत होती.

आकाश जेवला आणि कामाला परत लागला. उर्वी मात्र ह्या खोलीतून त्या खोलीत फिरत होती. तिला आजचं आकाशशी बोलायचं होतं. शेवटी बेडरूममध्ये सर्व आवरून आली, आणि बसली,

आकाश, “काय आज झोपणार नाही आहेस का? तुला तर लवकर झोप येते. झोप झोप मला वेळ होईल आज.”

“आकाश...”

“काय... आज काही नाही... तू झोपं.”

“काय रे, तुझ्या काय डोक्यात तेच येते...”

“तुला असं बघून तरी तेच येत आहे...”

“मग सोड ना तुझा लॅपटॉप.”

“नाही सोडू शकत... तू झोप, नाहीतर अभ्यास कर.”

“काय रे नुसता अभ्यास कर अभ्यास कर म्हणत असतोस, मला काही ती जापनीज भाषा समजत नाही खूप. तिला अभ्यासाला घेतलं कि मला वाटते आपलीच एक भाषा तयार करावी... “

आकाश हसला, “कर मग... कुणी अडवलं आहे.”

आणि आकाशचा फोन वाजला, ऑफिसमधून होता. उद्या सकाळी निघायचं होतं, इनसिडेंटमुळे इमर्जन्सी होती.

आकाशने फोन ठेवला आणि म्हणाला,

“तू झोप, मला सकाळी लवकर उठव मग.”

उर्वी ओठातच म्हणाली, “झोपणार नाहीस तर उठवू कशाला...”

“आणि माझं तर काही ऐकतही नाही आहेस.”

नंतर अवघ्या पाच मिनिटात त्याने लॅप टॉप बंद केला, 

“घे झोपतो आता,usची टीम लागली आहे कामाला. उद्या आता.”

आकाश बेडवर आला, म्हणाला, “बोला, काय म्हणणं आहे आता राणी सरकारच, किती वेळची वाट बघत आहेस समजलं मला. बोला आता लवकर, उद्या लवकर निघायचं आहे. आता झोपलो नाही तर वाट लागेल...”

उर्वी तरीही बोलत नव्हती, तिला कळत नव्हतं काय म्हणायचं ते, मानत गुंता सुरु होता, आकाश वाट बघत घोरायला लागला, आता उर्वीला राग आला, ती चिडली,

“तुला ना काही ऐकायचं नसतं, बस तुला काही करायचंच नाही ना, मी अशीच खुडत राहायला पाहिजे असच वाटत असेल ना. तू कामात असतोस रे पण मी मला काही वाटत नसणार काय...”

“आत काय वाटते ते सांग लवकर, झोपुदे, काय वैताग आहे यार... तुझा काय कधीपण PMS डोकं वर काढतो काय ग, आताच शांत झाली होतीस. झोपुदे आता.”

“झोप तू झोपच.... मी ना काही करुन घेतलं म्हणजे तुला समजेल. मग तुझ्या लोकांनाही बर आणि माझ्याही. इथे तर कुणाला माझी पडली नाही आहे. सगळे पाण्यात बघतात.”

“उर्वी जोरात बोलू नको, रात्र झाली आहे. आवाज होतो उगाच कुणी दार ठोकायचं. आणि उगाच फालतू बोलू नकोस. मला काही फरक पडत नाही.”

“अस मी जोरत बोलत आहे, हा माझा नेहमीचा आवाज आहे. तुला ऐकायचं नाही माझं. म्हणून तुला फरक पडत नाही.”

“उर्वी आपण उद्या बोलूया का?”

“तुला वेळ आहे.”

“मी उद्या लवकर येतो. तू चिडली आहेस उगाचच, आणि काय ग कधी माझंपण समजून घेत जा ना.”

“आणि काय समजून घेऊ मी तुला, काय फरक पडतो. इथे माझं काय झालंय ते.”

“काय झालंय म्हणजे, तू ना... बोलण्याच्या लायकीची नाहीस...”

“हो का, कोण आहे मग ते तरी सांग.... आणि भेटवं मला, बघते मी कोण आहे अशी ती.”

“ये फालतू बोलू नकोस. तुला काय आहे, नुसत्या त्याचं गोष्टीशिवाय जगात काही दुसरं नाही का. लोकं काय जगणं सोडून देतात.”

“हुम्म.... हो तो तर माझाच प्रश्न आहे मा... तुझा कसा राहील... मला इथे एक एक दिवस महत्वाचा आहे आणि...”

“हो ना, मग गप्प राहा, उद्या बोल.”

“एक दिसव जाईल माझा.”

“मग काय, कार्यकर्म करायचं आहे आता... तयार मी...”

“आकाश, तू ना, नालायक आहेस. असा नवरा नसतो रे, बायकोच्या मनात काय आहे ना हे त्याला महित असते.”

“किती अनुभव आहे तुला...”

“आकाश...”

“जोरात बोलू नकोस, मी बहिरा नाही.”

“आकाश तुला समजत नाही का?”

“मला हळू आवाजात बोलेलं समजते. आणि आता जोरात बोलली ना तर देयील एक.”

“मार ना मार मला... तुला तर तेच वाटत असणार... तुझ्या काही कामाची नाही ना मी... तुझ्यासाठी मी माझा जॉब आणि सगळं सोडून आली...

“च्यायला, झाली कॅसेट सुरु.... बंद कर उर्वी, इथे आधीच टेन्शन आहे मला ऑफिसच आणि तू ना... तू आहेच तशी. दिवसभर काय बघत बसतेस काय माहित. मी चाललो तिकडे सोफ्यावर झोपायला.”

आकाशने उशी उचलली आणि झोपायला गेलाही. उर्वी रडत राहिली. आकाश थकला होता मग त्याला झोपही लागली. इकडे आज उर्वीच्या मनासारखं झालं नव्हतं. ती चिडचिड करत राहीली, आपण उगाच आकाशला बोललो म्हणून मन खात होतं तिचं, “सरळ विचरायचं होत ना, काय बोलले मी...”

ह्या विचारत तिही अलाराम लावून झोपली.

कसं असतं ना, कधी कधी आपल्या मनात काही वेगळी लढाई सुरु असते, आणि बाहेर काही वेगळी. बोलायचं काही औरच असतं आणि शब्द काही औरच बाहेर येतात. काही सांगण्याच्या नादात आपण समोरच्याला समाज देतो... मनातला ज्वालामुखी मनात फुटत असतो आणि आपण कुठेच राहत नाही... ना स्वतः ला कुणासमोर मांडूही शकत नाही. आणि समोरच्याला समजूही शकत नाही.... उर्वीच असच काहीसं झालं होतं.

तरीही सकाळी आकाशला तिने उठवलं नाही, स्वयंपाक खोलीत आवाज झाला आणि आकाश हळबडीत उठला,

“उर्वी, उठवायचं ना.”

“वेळेवर उठलास, चिडू नको.”

आकाशने लक्ष दिलं नाही आणि चहा नाष्टा करून त्याचा जेवणाचा डबा घेवून निघून गेला. उर्वी काही बोलूच शकली नाही.

सकाळपासून तिला काहीच सुचत नव्हतं, मग परत वाचत बसली, डायरी काढली, परत कालच्या पानावर आली,

सर्व्हायकल म्यूकसवर उपचार काय असतात ह्यासाठी ती वाचत राहिली, तर खूप काही माहित झालं, तिने पुस्तक उघडली, एक तास वाचून मग पेन हातात घेतला,

सर्व्हाइकल म्यूकसचा एकमेव उपचार आययूआय आहे. म्हणजे ह्या फलन प्रक्रियेत जो अडथडा म्यूकसमुळे येतो तो आययूआय मध्ये दूरू केला जावू शकतो. अर्थात ह्या प्रक्रियेत स्पर्मला युटेरसमध्ये सर्व्हाइकल म्यूकस असणाऱ्या भागाच्यावर आणि फेलोपियन ट्यूबच्या अगदीच जवळ नेऊन ठेवलं जातं. ज्यामुळे फर्टिलायझेशन घडून येण्यासाठी उत्तम मदत होते.

पण ह्या सर्व्हाइकल म्यूकसची गुणवत्ता सुधारू शकते, ती संतुलित आणि  पौष्टिक आहाराने, भरपूर पानी पिल्याने कारण ती हायड्रेट राहावी लागते. दूध, आणि दुग्ध उत्पादनांचे सेवन केलं तर आपला म्यूकस मजबूत आणि उत्तम होऊ शकता.

“अरेच्या, तो पतंजलिचा डॉक्टर म्हणाला होता, रोज एक ग्लास दूध पिवो म्हणून... आणि मला तर दूध तोंडासमोर घायलाही नको होते. चहा चालले पण दूध...येयेयेय...” 

उद्यापासून सुरु करूया ह्या विचारात उर्वी पुढचं शोधू लागली.

आता आययूआय बद्दल तिला माहीत करून घायचं होतं, हॉस्पिटलची वेबसाईट काढली, आधी तर फीस बघितली, मनात परत वाटलं, खूप आहे यार, आपल्या भारतात कमी असेल ना, मग तिने नागपूरची फीस बगितली, कमी होती पण मुंबईच्या मोठं मोठ्या हॉस्पिटलची फीस आणि इथल्या हॉस्पिटलची फीस तिला बरोबर वाटली, पण एवढा खर्च कसा करायचा हा प्रश्न होता. उलट आकाशच आणि तिचं काल बिनसलं होतं.

आणि आज पाळीचा आठवा दिवस मग कसं करायचं, आकाशने होकार दिला नाही तर हाही महिना असाच जाणार ह्या विचारात राहिली. जेवायला घेतलं आणि गुमान विचार करत जेवत होती, तर भिजित मीठ नाही.

यार... आत आकाश, काय म्हणेल. जेवला तर असेल ना....

तोच फोन वाजला, आकाशचा होता, उर्वीला उचलतांना कसतरी होत होतं. तिने उचलला नाही, फोन परत वाजला, आता तिने मनाला घट्ट करत उचलला,

“उर्वी, काय करत आहेस? जेवण झालं का? भाजी मस्त झाली आज.”

“हो हो, मीठ नाही आहे.”

“असं, मला तर वाटलच नाही, तू मीठ खाई आहेस, मला तर तुझ्या रागाने ती खराट वाटत होती.”

“मग हे सांगण्यासाठी फोन केला का?”

“नाही... बोल तुला काही बोलयचं होतं.”

“वेळ आहे?”

“हो आता आहे... प्रोब्लेम संपला... मी घरी वेळेवर येईल आज...”

“मग घरी बोलू.”

“नाही, तुझा काही नेम नाही, घरी आल्यावर माझ्यासोबत परत भांडशील, भांडखुदाड आहेस.”

“आणि तू?”

“मी गरीब गाय...”

“तू आणि गरीब काय... जा रे सांगू नको...”

“तू सांग मग...”

आता मात्र उर्वीला उगाच विषय ओढायचा नव्हता, तिला हा महिना घालवायचा नव्हता,

“आकाश आपण आययूआय करूया का?”

“हे काय आहे?”

“तुला ना काही माहित नसते.”

“तू कशासाठी आहेस?

“अरे ज्यात स्पर्म स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात..."

“ह ह... ते जात नाहीत म्हणून... नाहीतर डोनर स्पर्म असले तर ना...”

उर्वीला घाम फुटला होता, एवढी मोठी गोष्ट आकाश असा बोलला होता.

“तसं नाही, ते डोनर बिनर मला काही माहित नाही, आणि अगदीच तेच कारण नाही, पण खूप प्रयत्न करून जर नैसर्गिक रित्या फर्टिलाइजेशन होत नसेल तर त्याचे चान्सेस वाढवण्यासाठी हे असते. अनएक्सप्लेंड इनफर्टिलिटीमध्येही ही ट्रीटमेंट करतात.”

“बर, मग मला काय करावं लागेल?”

“आकाश... अति होत आहे. तुला कसं रे असं बोलता येते...”

“उर्वी ठीक आहे. करूया...”

“ऐक ना, खर्च खूप आहे...”

“मग, नाही करायचं का?”

“तसं नाही... पण

“बघ तू, सगळं, अरे माझी बायको एक तरफ आणि पैसा एक तरफ... सगळं बघून घे आणि सांग... मला अपॉइंटमेंट घ्यावी लागले कि घेशील...”

“मी घेईल...”

“अरे व्हा, बायको ह्या बहाण्याने तर जपानीज शिकेल.”

“तिकडे इंग्रजी बोलणारे डॉक्टर आहेत. मोठं हॉस्पिटल आहे ते...”

“सगळं सेट आहे वाटते, मग काय... करा पटपट... उर्वी कर तू... आपण घरी आल्यावर बोलू... माझी मिटिंग आहे दहा मिनिटात, साल किती वेळच टेन्शन होतं. आता कसं मस्त वाटत आहे... बायको बायको... जय बायको... बाय बायको.”

उर्वीने एकदम उडीच मारली, अश्रू डोळ्यातून व्हायला लागले होते, मन गाणं गुणगुणत होतं,

आज फिर तुम पे प्यार आया है
आज फिर तुम पे प्यार आया है
बेहद और बेशुमार आया है…..

--

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

Post a Comment

0 Comments