बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
भाग ४१
---
लढत राहणं म्हणजे आयुष्य....
जोपर्यंत जीव आहे माघार नसते
आणि माघार जिथे आली मग आयुष्य नसते...
त्या दिवशी ती ऑफिसमध्ये असतांना तिला पोटात दुखायला लागलं, तिने बाथरूममध्ये जावून बघितलं तर गुलाबी लाल टिशू पपेरला लागलेलं दिसलं, तिचा तर हृदयाचा ठोका चुकला होता. नंतर परत काही तासाने तिने बघितलं, काहीही नव्हतं. जरा बर वाटलं, पण आकाशला कसं सांगायचं हा प्रश्न होता. तीने फोन केला,
“आकाश काही तरी गडबड झाली आहे, मगाशी ब्लड दिसलं मला, पण आता नाही आहे.”
“काही होत नाही, असेल, ते तू म्हणत होती ना, इम्प्लांट झाल्यावर ब्लीड होतं कुणाकुणाला म्हणून. तसचं काही असणार. आता नाही आहे ना... ये घरी तू आपण लगेच हॉस्पिटलला निघूया. मी निघतो.”
उर्वी लगेच ऑफिसमध्ये बोलून निघाली, घरी येईपर्यंत तर ब्लीडीन्ग सुरु झाली होती. उर्वीचा चेहरा उतरला होता. आकाशला तर काही सुचत नव्हतं. दोघेही हॉस्पिटलला पोहचले, डॉक्टरने टेस्ट करायला लावली, निगेटीव्ह होती. अल्ट्रासॉऊंड केला तर काहीच दिसत नव्हतं. धाराही जोरात सुरू झाल्या होत्या.
सगळं वेगाने वाहत निघून चाललं होतं, डॉक्टर खूप वयस्कर होती, उर्वीला बघून म्हणाली,
“डोंट वरी, बाळ नक्की होणार तुला...”
पण कधी हे मात्र कुणी सांगत नसायचं.... आनंदाचे क्षण येता येता परत मागे गेले. आकाश चिडला होता, कुणावर त्याचं त्याला माहित नव्हतं. उर्वीला आता संताप आला होता स्वतःचा, घरी आल्या आल्या आकाश दुसऱ्या खोलीत बराच वेळ बसून होता. उर्वी बेडरूममध्ये. संवाद संपला होता, पण मन दोघांची एकमेकांना शब्दावीणा सांभाळत होती कदाचित. दोघांही सावरायला वेळ लागणार होता. मग कुणीच कुणाला सावरायला पुढे आलं नव्हतं. रात्री दहा वाजता आकाशने बाहेर जावून जेवायचं आणलं आणि दोघही जेवले. कुणीही फारसं बोलत नव्हतं.
दुसऱ्या दिवशी उर्वीने डॉक्टर मानसीला फोन केला, आणि सांगितलं तर ती म्हणाली,
“निगेटिव्ह घेवू नकोस, असं होतं, काही नाही, प्रयन्त सुरु ठेवा... राहिलं होतं ना म्हणजे काहीही प्रोब्लेम नाही... वर्षभर बघ, नाहीतर तू कधी येणार आहेस... सांग आपण IVF प्लॅन करूया. बट स्टील आय से, किप ट्राईंग... लॅप्रोस्कोपी नंतर रिजल्ट आहे. माझ्याकडे ८०% लोकांना रिजल्ट ह्या प्रोसेस नंतर येतोच. आणि अजून खूप आहे. बस तुझी तयारी हवी.”
आईला बोलली तर आई, बाबा नाराज झाले होते, पण प्रयन्त कर म्हटल्याशिवाय कोण काय म्हणणार होतं, आणि आता प्रयत्नाने जीव जाण्याची पाळी आली होती.
आकाश हळू हळू सावरला, सगळं सुरळीत सुरु झालं. पण उर्वी मात्र त्या गोष्टीसाठी अडकून पडली होती. तिने परत असं का झालं ह्याचा शोधा शोध सुरु केला. आपण कुठे कमी पडतो ह्यावर परत अभ्यास सुरु झाला, घरी ऑफिसमध्ये जिथे वेळ मिळेल तिथे ती स्वतःचा कमीपणा भरून काढण्यासाठी काय काय करावं लागेल हे शोधू लागली. जणू मनाने मानलं होतं कमी आपल्यात आहे.
अश्यातच तिच्या ऑफिसच्या USच्या सोबत काम करणाऱ्या जासिकाने काही हर्ब्स आणि ऑइल्स तिला सांगितले. म्हणाली,
“टेक गुड प्रीनेटल विटामिन्स अँड डायट, अॅड सम हर्ब्स आणि ऑइल्स अॅज नॅच्युरल मेडीसीन.”
उर्वी मनात म्हणाली, “हेच घेवून घेवून आता वीट आलाय, प्रीनेटल विटामिन्स आणि ओव्हूलेशनच्या मेडीसीनने माझी अर्धी बॅग भरून येत नेहमी. नको वाटतं आता, आपण काय औषधांचा गोदाम आहोत.”
पण आशा कुठे सुटली होती. तिने जे सांगितलं, त्यातलं उर्वीने आधीच बरच काही सुरु केलं होतं आणि जे नवीन होतं ते तिला आता बघायचं होतं, कुठल्या औषधीने, हेर्ब्सने, किंवा कश्याने काय होईल आणि ती प्रेग्नंट राहिली काय माहित... म्हणून ती काहीही सोडत नव्हती. आणि त्या सगळ्या गोष्टी अंबलात आणण्यासाठी तिला सर्व माहिती असणे गरजेच असायचं. काय, कसं, किती, केव्हा आणि का म्हणून घ्यायच हे तिला माहित करणं तिची आता गरज बनली होती.
काही तिला तिच्या जापनीज क्लासच्या सेनसेईनेही जपानीज हर्ब सांगितल्या. सगळं परत आता नव्याने तिच्यासाठी उभं झालं होतं.
सगळं ऐकून जणू मन म्हणत होतं, “आपल्याला तर हे अजूनही माहित नाही.”
आता त्या सर्व हर्ब्स ऑनलाइन शोधून काढणं आणि मग ऑनलाइन शॉपिंग करून मागवणं तिने सुरु केलं,
इवनिंग प्रिमरोज़ ऑइल, स्त्रीमध्ये आढळणाऱ्या हार्मोनचे असंतुल, चिडचिड, नैराश्य ह्यासाठी पाश्चिमात्य देशात वापरले जाते. ह्या ऑइल्सचा वापर प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम अर्थात pms च्या उपचारासाठी प्रभावी असतो असंही महटल्या जाते.
“हुमम, मग माझ्यासाठी उत्तम, हल्ली खूप चिडचिड होते माझी, तीही मनात, आता बोलून काही फायदा नाही, मनात बोलून मनात मोकळं होणं काय असतं हे मला माहित. उगाच लोकं बोलत बसतात, कुणाशी बोलल्याने मन मोकळं होतं म्हणून... मला तर असं कुणी भेटलं नाही... सल्ले देणारे मागे बर झालं म्हणत असतील...”
जखम उघडी केली की फुंकर मरायला कुणी नसतं
चोळायला मिठ मात्र सर्वांकडे असतं.
इवनिंग प्रिमरोज़ ऑइल हे ओमेगा-6 आवश्यक फॅटी ऍसिडस् (EFAs) चा समृद्ध स्रोत आहे. ज्याने स्त्रियांच्या प्रजनन क्षमता देखील वाढवते. विशेषतः ह्याच्या सेवणाने अंडाशयातील सिस्ट्सची शक्यता कमी करते, ते अंडाशयांची स्थिती सुधारते आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा द्रव अर्थात सर्व्हायकल म्यूकस वाढवून शुक्राणूंना सहज अंडाशयापर्यंत पोहचवते. पण ह्याच सेवन हे ओव्हूलेशनच्या दिवसापर्यंतच योग्य.
फ्लेक्स सिड(जवस तेल) आणि फिश ऑइल या दोन्हीमध्ये ओमेगा 3 आवश्यक फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते, जे महिला आणि पुरुष दोघांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् स्त्रीबीजांचा दर्जा सुधारण्यास आणि संपूर्ण शरीरात जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे गर्भधारणेच्या एकूण शक्यता आणि निरोगी गर्भधारणा होवू शकते. ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् सर्व्हायकल म्यूकसची कन्सिस्टन्सी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. पुरुषांसाठी, ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् निरोगी शुक्राणूंची उत्पत्ति करण्यास मदतकार असते.
उर्वी उठली आणि आधी स्वयंपाक खोलीत आली, जवसच्या बिया आता तिने काढल्या, तेल तर नव्हतं, ते ऑनलाइन घेण्याच ठरवलं. पण जवस साफ केले, त्याची मस्त कोरडी लसूण टाकून बाटलबार चटणी करून डायनिंगवर ठेवली.
ऑर्डर करण्याच्या विचारात स्वयंपाक केला. अजून आकाश यायला वेळ होता, परत चाळत बसली पुस्तक, ज्यात हेर्ब्सबद्दल बरंच काही होतं.
आजकाल आपण जे अस्वास्थ्यकर आहार खाणं पसंत करतो, आपली गोंधळलेल्या जीवनशैली मुळातच खूप धका धकीची आणि धावपळीची आहे आणि त्याचा परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवर होतो असं डॉक्टर जोर देवून म्हणत असतात. आता हे सगळं आहे म्हणून ह्या मोठं मोठल्या हॉस्पिटलच्या बिल्डिंग आहेत, हो ना? मग खायचं काय आणि राहायचं कसं हाही प्रश्न ना?
माका रूट खाल्ल्याने स्त्री आणि पुरुष दोघांची प्रजनन क्षमता सुधारते,
पण हा निष्कर्ष निघाला कसा? तर माका रूटचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. पेरू नावाच्या देशा लगत असणाऱ्या भागात जिथे हवामान खूप कठोर, कडक आहे, जिथे कुठलीही वनस्पती साहसा वाढत नाही तिथे माका रूट नावाची वनस्पती आढळते. अर्थात वांझ प्रदेशात हिरवळ..
तिथली स्थानिक लोकं पाळीव प्राण्यांसाठी ह्याच वनस्पतीचा वापर चारा म्हणून करत असायची. हळू हळू लक्षात यायला लागलं की प्राण्यांची प्रजनन क्षमता त्या भागात वाढत होती. स्थनिक लोकांनाही हे लक्षात आलं आणि मग वंध्यत्ववर उपाय म्हणून ते देखील ह्याचा वापर करू लागले. ह्याच तर्कातून जेव्हां माका रूटच्या अने क चाचण्या करण्यात आल्या तेव्हा प्रजनन दर वाढवण्यात ह्या वनस्पतीमध्ये चमत्कारिक गुणधर्म दिसून आले. अर्थात वांझ हवामानात जी वनस्पती उगवते ती वंध्यत्ववर रामबाण इलाज म्हणून हजारो वर्षापासून स्थानिक लोकं वापरत होते आणि ते आता जगासमोर होतं.
माका ह्याच जन्म स्थान पेरूत असल्याने त्याला पेरुव्हियन जिनसेंग (Peruvian ginseng) असंही म्हणतात. माका रूट ही क्रूसीफेरस भाजी आहे, ज्याची मूळ खाल्ले जातात. आता त्या प्रदेशात त्याची भाजी मिळत असावी पण आपल्या ते पावडर किंवा टॅब्लेटच्या स्वरूपात मिळते. ज्याचा वापर स्त्री आणि पुरुषांची फर्टिलिटी बूस्ट कण्यासाठी केला जातो. देश विदेशात मिळणाऱ्या अनेक बुस्टर मेडीसीन मध्ये माका प्रमुख असतो.
उर्विला विचार पडला, घ्यावं का, काय हरकत आहे. मग तिने तो कसा घ्यायला हवा काय नाही, साइड इफेक्ट काय असेल, काय नसेल, सगळं जणू माहीत करून घेतलं, आणि ऑर्डरच्या लिस्ट मध्ये टाकलं.
पुढे तिची नजर जेष्टमधाच्या कांड्याच्या चित्रांवर पडली,
“अरे हे तर मुखशुद्धीच्या त्या पावडरमध्ये वापरायचो आम्ही. हळदीकुंकू असलं की मजा असायची. आई नेहमी घरी करून ठेवायची. त्यात चिकन सुपारी, बडी शोपसोबत थंडाई मस्त वाटत होती. आवाज गोड व्हावा म्हणून वापरतात आपल्याकडे. पण हयात काही वेगळं नाव तिला दिसलं, लीकोरिस (Liquorice).”
आणि शाश्वती झाली,
“हे तर जेष्टमध आहे, मागच्यावेळी मी मोठं पाकेट घेवून आले आहे. ऑनलाइन मागवण्याची गरज नाही. पण नेमका उपयोग तो काय? पण प्रेग्नसी दरम्यान खायला नको असं म्हणत आहे हे, असो, पण हार्मोन्स असंतुलनाला संतुलित कण्यासाठी योग्य ना... सूर करूया जरा जरा रोज.”
मग तिने काही रेसिपीज बघिल्या, जेष्टमधच पावडर वापरून केलेल्या, मग काय उर्वीच्या दिमाकात परत आयडिया आली, आणि आता तिला ती पटकन करायची होती. बरच वाचायचं बाकी होतं, वेळ झाला होता, परत उद्या ती रेसिपी करूया म्हणून ती पुढे वाचायला लागली.
“हे, तर ते सिंहपर्णी आहे, पिवळी फुलं मी खेळायला घ्यायची, आणि मग कुठला वेळ होता तो माहित नाही, पण त्याचे ते कापसासारखे उडायचे, आम्ही उडत खेळत असायचो, ती पिवळी फुलं, शेवंती नव्हती ती, लहान शेवंती पण नाही, कुठेही लागले राहायचे. ह्याला डैन्डलाइअन म्हणतात! आणि किती माहिती आहे ह्याच्याबद्दल....”
डैन्डलाइअनचा वापर फर्टिलिटी क्लीनसिंग म्हणून केल्या जातो. शरीरातील टॉकजीक काढण्यासाठी ह्याच्या चहाचा वापर केल्या जातो.
“म्हणजे हे पिवळ्या रंगाची फूले येणारं रानटी फुलझाडाचे मूळ आणि पत्ते शरीरात साठलेली घाण बाहेर काढतात. युनिवर्सिटीच्या आवारात तर खूप आहेत.”
उद्या आणते मग, ह्या विचारात तिने त्यांना ऑर्डरच्या लिस्ट मध्ये टाकलं नाही.
रेड रास्पबेरी लीफ टी, हजारो वर्षा पासून लोकं ह्याचा वापर प्रजनन क्षमता वाढवण्या साठी करतात..
“आणि मला आता माहीत झालं!”
उर्वी हसली,
“अजून किती रत्न माहीत होतील पण कुठला धारण केल्याने मला गुण येईल काय माहीत... किती औषधी किती वनस्पती आहेत. देश विदेशात... म्हणजे प्रब्लेम आहे. वरवर सोपं वाटणारं आयुष्य किती कठीण आहे...
मीचं बघ ना, आकाशशी लग्न व्हावं म्हणून काय काय नाही केलं, ती विचारांची लढाई होती प्रेमासाठी ज्यात प्रेम होतं, आहे, असणार पण दुसऱ्यांचे बघणारे डोळे नाहीत.
समाज किती गोष्टी करतो पण किती लोकं त्यातून शिकतात... नात्याला समजून घेण्याची गरज असते पण समजून सांगावं लागलं आणि मग काय... समजणारे मिळत नाहीत आणि समजवून सांगणारे गळत जातात.”
परत वळली,
लाल रास्पबेरी लीफमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम आणि अनेक ह्या पानांमध्ये खूप जास्त आहे प्रमाणत आहे. ल्यूटियल फेज, अर्थात पाळीचा शेवटचा टप्पा, ह्याला वाढविण्यात मदत करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका हा चहा करू शकतो. विशेषत: ज्यांना ल्यूटियल फेज दोष आहे आणि फलन झालेलं बीज रोपण होत नसल्यास ह्या चहाच्या सेवनाने मदत होते... आणि बाकी गोष्टीसाठीही उत्तम आहे.
“हुम्म, म्हणजे माझं मागे झालेलं मिसकॅरेज, ह्यातला प्रकार होता तर... पण माझं तर सगळं नीट आहे... काय माहित... असतं तर राहिलं असतं ना... मी तर अश्यात येते जायचं कारण माहित नाही... पण ह्याला गर्भ धारण केल्यानंतर घेता येत नाही आणि लेबरपेन साठी घेता येते. व्हा व्हा... म्हणजे माहिती गरजेची आहे.”
सगळ्यांची लिस्ट तयार केली, अजूनही खूप काही माहिती काढली आणि ऑर्डर केला.
तोच विचार फिरत होता, आणि आकाश आला, उर्वी जेष्ठमध बघत बसली होती. आल्या आल्या आकाशने जेवनाच लाव म्हणून ऑर्डर सोडला, आणि येवून बसला. समोर ठेवलेली जवसाची चटणी बघून हसला,
“हे काय आज नवीन काय? शेंगदाण्याची नाही ही, कसली आहे ग.”
“खा, रोज जेवणासोबत खायची. जवसाची चटणी आहे. अरे ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् असतात हयात, आपण अश्या छोट्या छोट्या गोष्टी सोडून मेडिसिन घेतो. आणि साइड इफेक्ट होतो तो वेगळा. जो सहजासहजी कळत नाही, पण शरीर भोगत असेल ना...””
“बस बस खूप झालं ज्ञान आता, दे, मला खायची आहे समजलं.”
“तुला ना काही समजत नाही.”
“आता मला ते समजून घ्यायचं नाही. तू सारखा तो विचार करू नकोस. आणि मलाही देवू नकोस. मला त्याच त्रास होत नाही मला तुझा विचार येते.”
“मी तर सोडू शकत नाही तो विचार, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झालाय आता. मलाच वाटते मी स्त्री आहे कि कोण, कुठेच रेस्पोस्न्स देत नाही, एवढी कठोर आहे काय रे मी....
“हो आहेस ना, महाकठोर... भयंकर, वाया गेलेली...स्वतःच करणारी... तुला तुझी आई म्हणते ना. काय डायलॉग आहे तो, काय पोरगी आहे बाबा, आग जशी, जवळ जा जळून जालं.”
“असं.. मी भयंकर आहे.”
“पण मला काही फरक पडत नाही.”
“पण मला पडतोय आता...”
आकाश कामाच्या टेन्शन मध्ये होता, आणि आता तो फरसा ह्याबद्दल खूप बोलत नसायचा. तो असा बोलत असला तरी आता उर्वीला त्रास होत असायचा. त्यालाही कळत असायच मग बोलणं टाळलं होतं त्याने. उर्वी मात्र मनातून काढू शकत नव्हती. सर्व करायची पण तीच सर्व फिक्क पडायचं जेव्हा ती स्वतः ह्या नजरेने बघायची. स्वतःच उठून उभी व्हायची... आकाशच्या नजरेत खूप काही असायचं. पण बोलून आता कुणीच दाखवत नव्हतं. जणू जखमा मनातच घट्ट झाल्या होत्या.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments