बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
भाग ३५
--
असं आयुष्यात कुणीतरी असावं,
ज्याच्यावर आपण सगळं सोडून
बिनधास्त असावं...
मग येणारं संकटही काही वाटत नाही...
तिने आनंदात जेवण केलं तेच गाणं ऐकत. परत त्या मोठ्या हॉस्पिटलच्या वेबसाईटवर जावून अपॉइंटमेंट घेतली, वाटलं सुरुवातीला तिचं जावून येणार, कारण आकाशला तर सुट्टी मिळणार नाही. पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एकटं जाणं म्हणजे... पण तरीही तिने घेतली.
पंधरा मिनिटात तिकडून फोन आला, पूर्व माहितीसाठी, उर्वीने तिची आताची पूर्ण माहिती दिली. आणि अपॉइंटमेंट कॉन्फ्रोम झाली. ती नर्स शेवटी आवर्जून म्हणाली,
“प्लीज कम टुगेदर...”
उर्वीने बोलण्याच्या नादात हो म्हंटल पण आकाशच जमणार कि नाही हे तिला माहित नव्हतं. तिने आकाशला फोन केला. तोही मिटिंग मध्ये होता. उचलला नाही. मग उर्वी त्याच्या फोनची वाट बघत अजून आययूआय बद्दल अजून माहिती काढत राहिली.
इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (आययूआय) ही कृत्रिम रेतनची (artificial insemination) ट्रीटमेंट आहे. जी वंध्यत्वावर उपचार म्हणून केल्या जाते. ज्यामध्ये धुऊन आणि प्रक्रिया केलेले वीर्य गर्भाशयामध्ये स्त्रीबीज बाहेर येण्याच्या योग्य वेळी कॅथेटरच्या (पातळ निर्जंतुकीकरण प्लास्टिक ट्यूब) मदतीने अलगत ठेवले जाते.
काही वेळाने आकाशचा फोन आला,
“काय ग फोन केला होता ना?”
“आकाश एक गडबड झाली...”
“बोल, तू काही करशील आणि गडबड होणार नाही असं झालं नाही तर मग कसं…”
“ये, काहीही बोलू नकोस आता. किती काही काही करते मी.”
“बोल बोल, आता माझी एन्ट्री आहे का?
“हो, करावी लागेल... अरे आपल्याला दोघांना जावं लागेल परवा...”
“म्हणजे सुट्टी घ्यावी लागले.”
“अर्ध्या दिवसाची घे ना, सकाळी. दुपारपर्यंत होईल ना...”
“किती वाजताची अपॉइंटमेंट घेतली तू?”
“सकाळी नव...”
“ठीक आहे. घेतो मी... अजून काही हुकुम... मग आज आहे काही चान्स...”
“बिलकुल नाही.... घरी ये...”
“लवकर येवू...”
“वेळेवर आलास तरी चालेल.”
आता उर्विला वाट होती परवाची, तिला खूप आनंद होत होता, आता हा महिना राहणार असचं तिला वाटत होतं.
परवा उजळला, उर्वी आणि आकाश ओसकाच्या मोठ्या हॉस्पिटलला पोहचले, इतक मोठं आणि प्रशस्त हॉस्पिटल होतं, बघूनच उर्विला वाटायला लागलं आता इथे नक्की गुण येणार.
नवीन पेशंट आठव्या मजल्यावर होते. दोघे तिकडे गेले. त्याच्या नंबरची वाट बघत बसले. उर्वी सगळीकडे बघत होती. आकाश तिला बघू नको म्हणून सारखं खुणावत होता. हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे जोडपे साधारण चाळीस पन्नासच्या जवळ होते, वाटलं,
“इकडे काय लोक चाळीस नंतर बाळाचा विचार करतात.”
तर आकाश म्हणाला,
“बघ, आणि तू, आता तिशीच्या दारात आहेस तरी अशी करतेस? ह्याला एन्जॉयमेंट म्हणतात.”
“हुम्म, मीच करते का, तू काय करतोस, माझा दिसते, तू बघ.”
तो गप्पच झाला, मग हळूच म्हणाला, “इथे ना लोकं चाळीस वर्षात लग्न करतात, आधीच सारी मजा केली असते ह्यांनी. आणि ह्याचं आयुष्यही आपल्यापेक्षा जास्त आहे ग... आपण तिशीत अर्ध होतो ही आता..”
“नाही रे...”
“अग हो, पण काही असेही आहेत जे विशीत लग्न करतात, त्या आधी सुद्धा मग त्यांना बघ चार चार मुलं आहेत. इकडे ह्यांची सरकार मुल जन्माला घाला म्हणून पैसे देते मग, तश्या लोकांना... हे इकडे बसले आहेत हे सगळे मजा मारून आता बसले आहेत. आणि त्यांचाही काही मोठा प्रोब्लेम असेल नाहीतर कुठे ग, झालं तर झालं नाहीतर सोडलं असचं आहे इकडे. आपल्यासारखं नाही, बेबी नाही होत नाही म्हणून ते जोडपं सोडून सर्वाना जास्त चिंता असते... काय तर गावभर उगाच ती चिंता दाखवण्याची, काय तर, करत तर काही नाही बस बोलायचं असते.”
उर्वी हसली, “आकाश तू ना ह्या विषयावर स्पीच दे... तुला जमेल मस्त.”
“काय करू! इथे बायको आणि आई सांभाळत नाही... आणि आली मोठी स्पीच दे म्हणणारी.... तूच आहेस सगळं करणारी...”
“आकाश, तू आहेस माझ्यात म्हणून...”
आणि आकाशने उर्वीला डोळा मारला, हे असचं बोलून बोलून फसव मला... मी बिचारा गरीब गाय...”
आकाश तू आणि बिचारा.... तू कसा आहेस ना मला माहित आहे.
असं, आत्ताच बोललीस मी तुझ्यात आहे म्हणून...
“मग आहेसच ना, आतमध्ये आणि बाहेरपण, आतला आकाश खूप मस्त आहे आणि बाहेरचा तू...
“म्हणजे मी दोन दोन आहे...”
“आकाश गप्प बस ना...”
“मग आज पक्क न?”
उर्वीला समजलं होतं आकाश उर्वीच्या चेहऱ्यावर असणाऱ्या टेंशनला वाचू शकत होता म्हणून तिला असं बोलून मोकळं करत होता. उर्विला हॉस्पिटल बघून खर्चाची आणि काही त फायदा व्हावा ह्याची चिंता वाटत होती. आकाशने उर्वीच्या मांडीवर हात ठेवला.
उर्वी आणि आकाश त्या भल्या मोठ्या हॉलच्या सोफ्यावर बसून भिंतींवर लागलेल्या सगळ्या सर्टिफिकेट बघत होते. खूप डॉक्टर होते तिथे. उर्वीने डॉक्टरांच्या खोल्या मोजल्या तर बारा होत्या. आता ह्यापैकी आपल्या कुठला बोलावणार ह्या विचारात ती वाट बघत होती. आणि मग एक नर्स त्यांच्याकडे आली. तिने आकाशला फोर्म दिला, आणि सोबत घेवून सगळ्या हॉस्पिटलची माहिती दिली. तिकडे चहा कॉफी फ्री आहे हेही सांगितलं. तिने स्वतः कॉफी मगमध्ये घ्यायला मदत केली. पहिली भेट असल्याने आज उशीर होईल असं ती म्हणाली, आणि आकाशने ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं.
त्यांचा नंबर आला, एक नर्स त्यांना सोबत घेवून गेली. डॉक्टरने सर्व माहिती दिली, आणि दोघांना विरोलॉजी टेस्टची लिस्ट दिली. आकाशला सेमन सैंपल लगेच घ्यायला सांगितलं. तिचे आधीचे सगळे रिपोर्ट बहितलेही नाहीत. आकाशला विचारलं, आययूआय की आयव्हीएफ
उर्वी पटकन बोलली, “आययूआय.”
त्याने आययूआय बद्दल सगळं सांगितलं. आणि मग त्याचे प्रकार सांगत होता.
हे तर उर्विला माहीत नव्हतं, तिने आकाशकडे बघितलं, त्याने तिला नजरेने खुणावलं.
डॉक्टरने सांगितलं, “आययूआयचा सक्सेस रेट 15% असून, साधरण पहिल्या तीन सायकल मध्ये 80 टक्के स्त्रिया गर्भधारणा करतात. कारण इथे मुख्य कारण हे स्त्रीच्या गर्भात स्पर्म न पोहचणे असतो. आणि त्याच्या मदतीला ही पूर्ण यंत्रणा असते.”
आता उर्विला कसंतरी झालं. तर त्याने परत सांगितलं,
“अर्थात ह्यात फक्त पुरुषबीज कारणीभूत नसते तर स्त्रीच्या शरीरातील बऱ्याच लहान सहान गोष्टी कारणीभूत असतात ज्या सहसा कारण म्हणून लवकर समोर येत नाही. कधी कधी स्त्रीच्या योनीमार्गात असणारा म्यूकस हा शत्रूच काम करतो, हयात अगदीच ओव्हूलेशनच्या काळात कधी कधी एंटीस्पर्म एंटीबाॅडीज असतात जे पुरुषबीजाला शत्रू समजून हल्ला करतात.
उर्वीने गळ्याला आता जरा ओलं केला. आणि तिला जरासं हायसं वाटलं,
ती पटकन म्हणाली होती की, त्यांनी ही टेस्ट केलेली पण नॉर्मल होती. म्यूकसची कन्सिस्टन्सी उत्तम होती. ती रिपोर्ट बघत होती तर डॉक्टर म्हणाला,
“नो नीड...”
कारण ह्या सगळ्या गोष्टी नंतरची ही ट्रीटमेंट असते. आता काय फरक पडणार होता. स्पर्मला अगदीच फॅलोपियन ट्यूबच्या तोंडाजवळ ठेवल्या जात होतं.
नंतर त्याने सर्व प्रकारचे आययूआय समजवून सांगितले. नैसर्गिक सायकल, ज्यात कुठलीच औषधी दिल्या जात नाही, ओव्हूलेशन ओव्ह्युलेशन प्रेडिक्शन किट्सच्या मदतीने ओळखून, पेशंटला तसं हॉस्पिटलला यावं लागेल, हया आययूआयमध्ये ८ ते १०% चान्स आहे.
नंतर ओरल औषधि वापरल्या जाते आणि फर्टिलिटी बुस्ट केल्या जाते. आणि नंतर HCG शॉट दिल्या जातो. ह्याच्या यशाचा दर १४ ते १५% पर्यंत आहे.
यापुढेही इंजेक्टेबल गोनाडोट्रोफिनच्या वापरामुळे चान्सेस १८ ते २०% पर्यंत वाढतात.
त्यापुढेही आहेत, पुढे तो थांबला, आणि म्हणाला,
“व्हीच विल यू प्रीफर...”
आकाश बोलला, नैसर्गिक सायकल करूया, आणि मग बघू. त्याने उर्वी एक्यूपंक्चर ट्रीटमेंटपण घेत आहे असं सांगितलं. तेव्हां त्याने होकार देत उर्विला तिची आताची कॅन्डीशन बघ्यासाठी अल्ट्रासाऊंडला घेतलं, पाळीचा बारावा दिवस तर होताच, फोलीकॅल उत्तम तयार झाले होते. दोन दिवसात फोलीकॅल बाहेर येण्याच्या उत्तम तयारीत आहे. दोन दिवसाने अपॉइंटमेंट घ्यायला सांगितली.
आजच ब्लड सैंपल आणि सीमेन सैंपल द्यायला सांगितलं. आणि आकाशला दोन दिवसाचा गॅप घ्यायला सांगितला. अर्थात आता दोन दिवस काहीही करायचं नव्हतं. जेणेकरून स्पर्म उत्तम आणि संख्या जास्त मिळेल.
आकाश बोलला, कि सीमेन सैंपल आययूआयच्या दिवशी घेतलेलं उत्तम राहील. त्याचा प्रोब्लम त्याला माहित होता. असं हॉस्पिटलच्या खोलीत जावून काढणं म्हणजे अवघड होतं हे त्याला कळालं होतं.
तर डॉक्टरने पुरुषबीजांचा चार्ट काढला, किती प्रकारचे असतात हे बघून धक्काच बसला,
नॉर्मल स्पर्म सोडून, काही मोठ्या डोक्याचे, काही छोट्या डोक्याचे, काहींना दोन तोंड. तर काहींना दोन शेपट्या... डॉक्टरने सांगितलं, त्याला % माहित करायचं आहे योग्य स्पर्मच. कारण जेवढे जास्त हेल्दी स्पर्म तेवढी शक्यता जास्त असते.
आता उर्वी बोलणार होती, कारण त्यांच्याकडे आकाशच्या स्पर्मची रिपोर्ट होती. पण आकाशने तिचा हात पकडला. आणि त्याने हसत होकार दिला. दोघेही बाहेर आले.
बारा तर वाजले होते. आणि अजून खूप काही बाकी होतं. आकाशने परत ऑफिसमध्ये सांगितलं कि तो आज येवू शकत नाही. आणि मग त्याला नर्सने सीमेन सैंपलसाठी खोली दाखवली. उर्वीचं ब्लड सैंपल घेतलं. उर्वीच्या मनात सारखी धाकधूक होत होती, पैसे किती लागणार हा प्रश्न होताच ना. तिचं झालं आणि ती आकाशची वाट बघत होती. तो काही येत नव्हता. ती मनात हसतही होती. आणि आकाश आला, त्याला लगेच नर्सने ब्लड सैंपलसाठी घेतलं.
आता ते सगळे रिपोर्ट दोन दिवसात येणार होते. आता पर्यंत आयुष्यात ह्या सगळ्या टेस्ट केल्या नाही, त्या सगळ्या त्या टेस्ट मध्ये होत्या, एचआयव्ही, प्रोलैक्टिन, थायराइड, एचआईवी, एंटी एचआईवी, वीडीआरएल, एचटीएलवी, आरपीआर, सिकलिंग टेस्ट....
आकाश सैंपल देवून आला आणि म्हणाला,
“आता जगातल्या सगळ्या टेस्ट झाल्या उर्वी, इथेच काय ते कळणार ग, ह्या सगळ्या बेसिक पण कामाच्या टेस्ट आहेत.”
“पण तुझी ऑफिस मध्ये होते ना?”
“हो पण ते फक्त रुटीन असते ग, हे बघ इथे एचआयव्ही पण आहे.”
“अरे पैसे खूप लागतील ना?”
“आता काय, आलो इकडे, विचार करू नकोस. होवून जावू दे ना एकदाच. काय ते माहीत तर होईल, किती केलंय तू, सगळे डॉक्टर सांगतात, सगळं नीट आहे म्हणून. मग असा कुठे बेसिकमध्येही प्रोब्लेम असू शकतो, दोघांमध्ये.”
उर्वीने परत कंठ ओला केला, नी एवढ्यात थंडीत आलेला घाम पुसत होती.
तेवढ्यात नर्सने आवाज दिला, आकाश आणि उर्वी काऊंटरवर गेले, उर्वीने बिल बघितलं, आणि तिचा घसा परत कोरडा पडला होता. आकाशने क्रेडिट कार्ड दिलं.
नंतर नर्स सीमेन सैंपल आणण्यासाठी प्लास्टिकचा छोटा डबा दिला. आणि त्याला आणण्याची प्रोसेस सांगितली. आकाश दोन दिवसाने परत येवू शकणार नव्हता. मग उर्वी येणार होती.
परत येतांना, उर्वी सारखी बोलत होती,
“आकाश खूप खर्च झाला ना?”
“हो, पण आता झालंय ना... विचार करू नकोस.”
“आणि अजून ११ तारखेलापण येईल.”
“हुमम ... आता माझी बायकोच महाग आहे तर काय करू...”
“आकाश...”
“उर्वी जावूदे, कशासाठी कमावतो आपण, आनंदासाठी, आणि आहेत ना आता पैसे. लग्नाआधी तुला जॉब होता आणि मी नौकरीसाठी फिरत होतो तेव्हा तू मला कधी नाही म्हटल नाहीस. मग मी का ग... जेव्हा हे आपले दोघाचे पैसे आहेत. तेव्हा तर तू माझी बायकोपण नव्हतीस.”
उर्वीने त्याचा हात घट्ट पकडला, ट्रेन आली होती. दोघेही घरी आले. उर्वीने पटकन खिचडी लावली. आणि मग खातांना हळूच म्हणाली,
“काय रे मस्त मजा आली का खोलीत?
“हुम्म्म, अबे तुला काय सांगू, काय अरेंजमेंट होती ग...”
“म्हणजे असं काय होतं?”
“तिकडे सीडीज होत्या, मैगजीन होत्या,आणि सगळं ती नर्स सांगून निघून गेली.
"मग काय, लागलो कामाला... गप्प बस. जेवूदे ग, नको आठवण देवू आता. जाम पूर्ण दिवस गेला, उर्वी मी सुट्टी घेऊ शकत नाही ११ तारखेला, तुला एकटीला जावं लागेल. सगळे रिपोर्ट समजून घेशील. बाकी तुला माझ्यापेक्षा जास्त माहित आहे.”
आता उर्विला वाट होती ११ तारखेची..
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
0 Comments