बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!”भाग ४२

 बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन

भाग ४२ 


---

आशा ही एक अशी किरण आहे....

जी विश्वास निर्माण करतो आणि यशाकडे घेवून जाते...

म्हणूच जिथे जीवन आहे तिथे ती आहे...

उर्वीचा एकटेपण मनातच वाढत चालला होता. आता ती अजूनच घाबरून राहयाला लागली होती. अश्यातच आकाशच्या ऑफिसमध्ये मागच्या वर्षी लग्न होवून आलेल्या जोडप्याला मुलगा झाला. त्याच्या कडे पार्टी होती. त्या बाळाला हातात घेतांना उर्वीच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं, तिच्या नजरेत आता तिच्या मातृत्वाची ओढ लपण्यासारखी राहिली नव्हती. उर्वी आधीसारखी राहिली नव्हती. जरा जरा कारणासाठी रडत बसत असायची. स्वतःलाच तिने टाकून दिल्यासारखं केलं होतं. नजर मिळवून कधी बोलत नसायची.

तीच एकटीच करिअर जोरावर होतं, तिकडे नवऱ्यासोबत येणार्‍या बायकांमध्ये तिलाच जोब होता. तिचं बोलणं तीच वागणं जसं तिच्या माहेरी आणि सासरी कुतूहल आणि ईर्षेचा विषय होता तसा इथेही होता, पण आता तिच्या नजरेत अपराधी भाग शिरला होता. दोन बायका बोलत असल्या कि त्या उर्वीबद्दलच बोलत आहेत असचं तिला वाटायचं. मग बोलण्यात आत्मविश्वास राहत नव्हता. मोठं मोठ्या पार्ट्यामध्ये उर्वी एका कोपर्‍यात बसून सगळ्यांच्या मुलांशी गप्पा करायची. आशेने की तिलाही हा दिवस मिळेल...

सर्व हातातून सुटत होतं, मोजका संवाद घडत होता, आता आकाश तिला हवं तेव्हा जवळ घेत नव्हता. गरजेच्या वेळी वेळेवर येत नव्हता.

ती सुखाची पहाट कधी येणार ह्या विचारात रात्र रात्र आता ती जगायला लागली होती, आपण अजून काय करू शकतो असा विचार मनाला कोरत होता. लगनाला सहा वर्ष झाली होती. सगळ्यांच्या मनात आता हिला काही मुलं होणार नाही

त्या दिवशीही तो आला नाही आणि उर्वी जाम भडकली,

“आकाश तू आज आला नाहीस. माझं पोट दुखत होतं ना रे.”

“ते काय नेहमीच आहे. पुढल्या वेळी बघू.”

“मग, पण एक चान्स जातो ना.”

“एवढे गेले, त्यात एक अजून... उगाच आशा वाढते, तुझी....”

“असं कसं म्हणतोस रे...”

“हो बाजूला, मला काम आहेत.”

“मला बोलायचं आहे.”

“मला नाही, आणि सारखं सारखं ते मनाला आवरून दिवसांची वाट बघणं मला जमत नाही. कंटाळा आला आता. हवंय आता तुला?”

“आकाश...”

“हे बघ, काय आहे हे, तुला पाहिजे असते तेव्हां तू म्हणतेस, माझी इच्छा नाही का.”

“पण आकाश, नंतर काऊंट नसतो ना मग... आणि आपण प्रयत्न करतोय. मग समजून घे ना.”

“केलं ना मी तुला वाटते ते, आता वाट सोड माझी.”

“असं म्हणजे आता तुला मी नकोय. दे ना मग सोडून मला. मलाही कंटाळा आला आहे. निघून जाते मी कुठही म्हणजे सगळ्यांचा आत्मा शांत होईल. नाहीतर संपवते मी स्वतःला.”

“जा ग, जा... आताच निघ. काय ते कर...”

“आकाश... बघ हा....”

आकाश मागच्या काही दिवसापासून डिस्टर्ब होता, त्याच्या आईने त्याला बोलून बोलून हैराण केलं होतं. तिचं सारखं सारखं उर्वीत कमी काढणं त्याला आवडत नसायचं. पण उर्वीत कमी आहे हे आता सर्वाना जाणवत होतं मग तोही थांबवू शकत नव्हता. उडवाउडवीचे उत्तर देवून कधी पर्यंत थांबवू शकत होता. नात्यात कुणालाही फोन केला तरी त्यालाही सहज का होईना प्रश्न विचारल्या जायचा. आणि हि त्याच्या आईची करामत होती हेही तो जाणून होता. तिला आकाशकडून उत्तर मिळालं नाही कि नात्यातल्या लोकांना त्याच्याशी बोलायला लावायची. एवढच नाही तर आकाशचे जुने गावातले मित्र तेही त्याला बोलायचे, आईच्या सांगण्यावरून, उर्वी आईला नीट वागवत नाही आणि मुलही होवू देत नाही ह्या वार्ता त्यांच्याकडून त्याच्याकडे येत होत्या. आईला बोलून काही अर्थ नव्हता, आणि लोकांच्या तोंडावर झाकण तो ठेवू शकत नव्हता.

उर्वी त्या दिवशी तुटली होती, एकटी पडली होती, रात्र तशीच गेली आणि महिना कोरडा निघून गेला. ताण वाढत होता. आणि आता कुणीच तिचं राहिलं नव्हतं.

अचानक फेसबुक चाळत बसली होती, तशी ती आता ऑनलाइन राहत नसायची. पण त्या दिवशी लॅपटॉप उघडलं आणि फेसबुक उघडल्या गेलं. ती जेव्हा नागपूरला जॉब करायची तेव्हां, तिच्यासोबत ज्योती मॅडम काम करायची, जिने वयाच्या चाळीशीत प्रेमविवाह केलेला. आणि तिचा मुलांसाठी प्रयत्न उर्वी बघून होती. नंतर उर्वीच पुण्यात येणं, आणि तिथून विदेशात आणि आता संपर्क तुटला होता. उर्वी आणि ज्योती मॅडम सोबत असायच्या मग सर्व दोघींना माहित होत एकमेकिंबद्दल, दोघीही प्रेमात होत्या. आणि दोघीही स्वतःच्या मर्जीने जगणाऱ्या होत्या.

मॅडमच्या प्रोफाईलला आज तिला दोन मुलांचे फोटो दिसले. कुतूहल म्हणून तिने त्यांचं प्रोफाईल बघितलं, त्यांना जुडे झाले होते, एक मुलगा आणि एक मुलगी. बस जुनी डायरी शोधून तिचे नंबर शोधला, मनात धाकधूक होती नंबर बदलाल असले तर... पण लावला.... आणि लागला,

“मॅडम उर्वी बोलत आहे.”

“हा... कुठे आहेस ग? किती वर्षाने तुला आठवण आली, मध्ये तू इमेल करायची पण नंतर तेही बंद झालं.”

“आहे अजून ह्या भूतलावर...”

“का ग, अशी का म्हणतेस? आकाश कसा आहे?”

“तो एकदम मजेत, प्रगतीचे नवनवीन शिखर गाठत आहे.”

“आकाश आहे ना तो म्हणून आणि तू?”

“मी अडकली आहे कुठेतरी खालच्या पायरीवर, समोर जाण्याची इच्छा आहे पण मी जावूच शकत नाही आहे हो.”

“असं काय बोलतेस ग, तुला काय मी ओळखून नाही. जगावं कसं मी चाळीशीत तुझ्याकडून शिकले होते. सोबत किती सुंदर वेळ घालवला आपण. मी किती कंटाळली असायची आणि तूला जेव्हाही बघायचे तर आयुष्याने भरपूर वाटत असायची तू. तुझ्यात शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद बघितली आहे मी... आणि तू शून्यावर यावी! आजही तुझा विषय सुरेश काढतो तेव्हा तासतास बोलत असतो आम्ही, आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये तुझं आजही कौतुक आहे. तुझे विध्यार्थी तर तुझा आदर्श ठेवतात, प्रेमाला अस उभ करणं तुलाच जमू शकत उर्वी. नाहीतर पैस्यासाठी मुली काय करत नाही. आकाश काही...? तू असं बोलणं म्हणजे... सांग वेळ आहे माझ्याकडे.”

“नाही हो मॅडम, आकाश तर आजही आकाशा एवढं प्रेम करतो. त्याची तिचं सीमा आहे, ज्याची काहीच सीमा नाही.”

“मग, अग तुमची जोडी म्हणजे, आकाश आणि उर्वी, म्हणजे धरणीच मिलन तेही आकाशासोबत. अनमोल आहे ते बघण्यासाठी सुद्धा त्या प्रेमाची पातळी गाठावी लागते. जे खूप दुर्मिळ आहे. काय लव स्टोरी आहे तुमची. कुणी प्रेमात भरकटलं तर आधी तुझ्याबद्दल सांगते त्यांना. मला खूप कौतुक आहे तुझं आणि आकाशच, आता मागे मोन्घे सर आले होते,  वेलनटाइन पार्टी होती, तुझा विषय निघाला होता,त्यांना तुझा प्रोफिअल दाखवला, सगळे तुला ग्रेट म्हणत होते. तू इथे नव्हतीस तरीही सर्वांनी तुला बेस्ट कपल म्हणून गौरांकित केलेलं.”

उर्विला भरून आलं होतं, एवढ्या दिवसांनी कुणीतरी तिचं कौतुक केलं होतं नाहीतर ती समजून बसली होती कि तिच्यात काहीही नाही.

“मनाचा मोठेपणा आहे सर्वांचा, आपला ग्रुप वेगळाच होता. आणि मीच होती त्यात लहान.”

“मग, तरीही आज सगळे तुला स्यालूट करतात, म्हणजे विचार कर... आली की भेट ग.... तुला बघून सगळ्यांना आनंद होईल. आणि मला सांग काय झालाय, आज काय झगडा झालाय का आकाशसोबत... तुझा तर त्याच्याशी झगडा पण खूप काही शिकवून जायचा मला. बिचारा माझ्या फोनवर फोन करून करून थकत नव्हता. आणि तू फोन बंद करून बसायची.”

उर्वीला हसू आवरलं नाही,  

“तो आजही तसाच आहे. मीच जरा चिडचिड करते... माझचं कठीण झालंय सगळं...”

“अरे, एका महाकाठिणच कठीण कसं होवू शकते ग, हेच म्हणायचा आकाश तू म्हणजे ना महाकठीण आहेस... “

“आजही तो हेच म्हणतो...”

“मग बोल बोल, बिनधास्त बोल.”

“मॅडम अजून बाळ होत नाही आहे हो, खूप करून झालंय, कंटाळली मी आता, कुठेतरी निघून जावसं वाटते, माझ्यामुळे आकाशला पण त्रास होत असेल ना.”

“ये वेडाबाई असं नाही, त्याला ओळखते मी. तुला त्रास होवू नये असा वागत असेल तो...”

“हो पण आता तेही नकोय मला. माझं काहीच गणित सुटत नाही आहे. काय करू कळत नाही आहे.”

“हे असलं बोलणारी नाहीस तू, जमिनीवर राहून आकाशात आकाशसोबत उडतेस तू... मला सांग किती प्रयत्न केले तू?”

“सगळं झालं, आता कंटाळा आला, काही करायची इच्छा होत नाही. सगळे गणित सुटलेत मॅडम पण हे एक गणित खुप कठीण आहे. सोडून देते आता... त्याच्या मागे राहिली तर आयुष्य जगायचं राहून जाईल, आणि मला तेही सोडायचं नाही. आयुष्य जगायचं आहे मला.”

“ये ऐक, आता काहीच करून होत नसेल ना तर IVF कर, माझे जुडे त्याचं ट्रीटमेंटच आउटपूट  आहे. आपल्या रागिणी मॅडम माहीत आहेत ना?”

“हो, त्यांची हालत माझ्या सारखी होती, आता कळलं मला, तेव्हा वाटायचं काय ह्या नुसत्या एकाच विषयावर बोलत असतात. त्यांच्या आणि काळे मॅडमच्या ह्याच गोष्टी सुरू असायच्या.”

“अग त्यांनी मागच्या वर्षी, सोरोगेट मदर मार्फत एका मुलीला जन्म दिला. तू काय घेवून बसली आहेस. IVF कर, मी आधी काही वर्ष केलं हे बारीक सुरिक, मग मला रागिणी मॅडम म्हणाल्या, IVF कर म्हणून. त्या तर कन्सीव करूच शकणार नव्हत्या. डॉक्टर बोलले त्यांना. आणि ते आता त्यांना वयाच्या पंचेचाळीस वर्षात समजलं, कधी कधी डॉक्टर सांगत नाहीत, त्याचा व्यवसाय ग, पेशंटची आशा कमी होऊ देत नाहीत. आणि काय हा निसर्ग नियम ना, काही सांगता येत नाही, कधीच बाळ होणार नाही अश्या बायकांना सुद्धा फुक पाणी करून बाळ होतं, अर्थात त्याने नाहीच, वेळत जुळून येतं सगळं आणि निसर्ग... मग ह्याच कारणाने अजूनही हे सगळं ह्या एकविसाव्या शतकात कायम आहे.”

“मॅडम, आयव्हीएफ ने राहतं काय हो? म्हणजे खूप महाग ट्रीटमेंट आहे ही, मी मागे वाचली होती. मी आययूआय पण केलेत.”

“मग सकसेस रेट खूप असतो, आययूआय पेक्षा जास्त आणि तू  चाळीशीत नाहीस, मग आहेच. आता मला पहिल्या सायकलमध्येही  राहिलं होतं, पण मग काही महिन्यात ते निघून गेलं. मग मी परत दुसरी सायकल केली. तेव्हां काही जमलं नाही. आणि मग तिसरी, ह्यावेळी तीन एमबरीयो ट्रान्सफर केलेले, नि बघ दोन राहिले. मुलगा मुलगी... काही दूसरा चान्स घेण्याची गरज नाही.  हमखास तीन सायकलमध्ये रिजल्ट असतो. आणि तुम्ही करू शकता ग आता, उगाच काय जीवाला त्रास देतेस, म्हणजे ह्या प्रोसेस मध्येही खूप त्रास आहे, पण रिजल्ट मिळाला ना की सगळं विसरतो आपण. मी तर एकटी जायचे, तुला तर माहित आहे ह्याचं पार्टीच काम. समाजसेवा म्हटलं कि काही सुचत नाही.”

“मग स्पर्म?”

“फ्रोजन करून ठेवले होते. ते पहिल्यावेळी आले होते. मग कदाचित एकदा आलेले. मग मीच सर्व केलं, माझ्या बहिणीकडे एक दोन दिवस थांबायची आणि मग परत आपल्या नागपूरला. त्या डॉक्टरचं इथे पण कॉनटॅक्ट आहेत. खूप हेलपिंग आहे तिथला स्टाफपण. आणि आपल्याला बरच कळत असतं मग खूप प्रोब्लेम येत नाही.”

“पण मी तर इकडे राहते ना?”

“मग काय, गॅप घेवून सायकल करायच्या. वर्ष चालून पकड आता. जर तुला करायची असेल तर. वर्षभरात पाच सायकल करतात लोकं, म्हणजे मी नाही केल्या, तीन झाल्या माझ्या... तुला जसं जेमेल तसं. पण वर्ष पकड.”

“हुम्म... म्हणजे अजून एक वर्ष...”

“हो, खूप मोठी ट्रीटमेंट आहे, बघ विचार करा दोघं, आणि कशाला असा विचार करतेस. आकाश चांगला मुलगा आहे. नाहीतर लोकं सोडून मोकळे होतात, त्यांच्यात काही दोष असला तरी सुद्धा. मानसिकता नाही ग लोकांची अजूनतरी बदलली. आता मी नारी वादी मंडळात काम करते, तुला तर माहित आहे ह्याचं काम मी पण बघते आता. नौकरी मी कधीच सोडली. तुला सांगू अजूनही ह्या काळात लोकं तसेच आहेत. आपण नारी शक्ती, फेमिनिझमच्या गोष्टी करतो आणि लोक त्याला गुंडाळून रद्दी करतात. आपला बेस नाही तसा स्त्रीला समजून घेण्याचा. कठीण आहे ना ते, जसं कठीण असलं कि आपण प्रयन्त करत नाही ना तसं आहे. पण ज्यांनी स्त्रीला समजून घेतलं ना ते खरच साथ देतात. आणि ह्यात सगळ्यात कारणीभूत आपल्या स्त्रीयाच आहेत बर. आता मला मुलं होत नव्हती तर माझी नणंद मला मार्गातून काढण्याच्या नादात होती.”

“पण ती तर डॉक्टर आहे ना... तरीही?”

“हो, संपती, वारस, तिच्या मुलांना मिळालं असतं ना सगळं. आणि हे तर जय भोले शंकर आहेत. काही वाटत नव्हतं ह्यांना. म्हणायचे तूला मिळवताना वयाची चाळीशी गाठली आता काय, हेच सर्वस्व आहे. आणि बहिण तर जीव कि प्राण आहे ह्याची.”

उर्वीच्या मनात सारं घुमायला लागलं होतं, अजून बराच वेळ ज्योति मॅडम बोलू शकल्या असत्या. त्यांना बोलण्यात कुणी हरवू शकत नव्हतं. आणि विषयांची कमी तर नव्हती. उर्वीने विषय परत वळवला,

“मॅडम, तुम्ही तिकडे का केली ट्रीटमेंट?”

अग इकडे डॉक्टर खूप खातात, आणि तू तर फॉरेनर आहेस. म्हणजे तुला सांगू छोट्या छोट्या गोष्टीचे पैसे घेतात. आणि तुला रोज हॉस्पीटलमध्ये जावं लागणार. ते पोटावरची इंजेक्शन असतात ना त्यासाठीसुद्धा, आणि मग तिथल्या नर्स ते कोर्समध्ये असूनसुद्धा पैसे घेतात. नाही दिले कि मग काहीही बोलतात यार, आपलं कसं अडून राहते, काही बोलूही शकत नाही, आशीर्वादाचे भुकेले असतो आपण. धंदा झाला आहे ग. तू बघ माझा अनुभव तिथला छान आहे. मला असं म्हणायच नाही. माझं मी सांगितलं.”

“मॅडम मला नंबर देता का?”

“नंबर... तुला नंतर देते ना, आता ना मुलं सात सात महिन्याची झाली, फिरतात म्हणून सगळं सामान ना मी खोल्यातून उचलून तिकडे अडगडीच्या खोलीत ठेवलं आहे. फाईल्सपण तिकडे असतील, तुला देते मी, इमेल आणि सगळं, तू सगळे डिटेल्स पाठवं त्यांना. सांगतील ते तुला सगळं. तू आधी बोलून तर घे आकाशसोबत.”

“बर, ठीक आहे.”

“देत ग मी, तू मला आठवणीने फोन कर दोन दिवसाने... असं समजू नकोस कि देणार नाही, मला माहित आहे खूप घाण आहे हे सगळं, लोकांना गुण आला कि लोक सांगत पण नाहीत माहीत आहे. करतात मोठं मोठ्या ट्रीटमेंट आणि नॅच्युरल झालं म्हणतात, कमीपणा वाटतो ना, सांगण्यात कि त्यांना होतं नव्हतं म्हणून. अग तुला सांगू, स्पर्म डोनर, स्त्रीबीज डोनर सगळं होते, लपूनपण करतात सर्व. आणि सांगत नाहीत. कधी कधी तर डॉक्टर सुधा पेशंटच्या भल्यासाठी बाहेर बोलत नाही. हि खूप घाणेरडी अवस्था आहे. आता तू तिकडे गेली ना की तुला वेगळी दुनिया दिसले. कुणाच काय आणि कुणाच काय काय नसतं आणि असतं काही सांगता येत नाही. लपवाछपवी चालते. मानवी स्वभाव ना, आपली कमतरता नाही समोर येवू देत कुणी, पण समोरच्यावर आरोप करतात. पण तू काळजी करू नको, ते डॉक्टर आहेत तसे, तुला हवी असेल तर ते गुप्तता  पाळतील.

“नाही हो मॅडम, ज्याच्या हातून गुण गेईल त्याचे गुणगान कमी नको, ह्यात डॉक्टर खूप हुशार लागतो.”

“मग, बर जावूदे, तू बोल आकाशशी आणि मला कर कॉल, मीपण शोधून ठेवते.”

मॅडमच म्हणणं बरोबर होतं आकाशशी बोलावं लागणार होतं. आता पैसा जरी उर्वी कमवत असली तरी हा निर्णय दोघांना घ्यावा लागणार होता.

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

 

Post a Comment

0 Comments