बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
जिथे आपल्या नसल्याने फरक पडत नाही तिथे असल्याने कसा पडणार...
गाडी हळूच चालवत न्यायची होती. उर्वीला त्रास होवू नये म्हणून. आणि मग उशीरच झाला.
दोघेही तिकडे हॉलमध्ये पोहचले तेव्हां जेवणं सुरु होती. उर्वीला आश्चर्य वाटलं. स्टेजवर कुणीच नव्हतं. ती गेल्या गेल्या आईकडे गेली तर ती म्हणाली, आग हे लोकं ना थांबायल तयार नव्हते.
उर्वीला मनात राग आला होता, पण दाखवून कुणाल दाखवायचं होतं, आकाशने उर्वीला शांत केलं आणि सुजितला भेटायला गेला. थोड्या वेळाने त्याची होणारी बायको आली, आणि मग सोबत सर्वांनी फोटो काढले,
आकाश मात्र म्हणाला, मी आलोय ह्याचा प्रुफ आहे हा, तुम्ही अंगठ्या घातल्या पण मी आलो....
सगळे हसले, पण....
उर्वी सुजलेली आणि थकलेली दिसत होती, तर बायकांमध्ये कुजबुज होती कि प्रेग्नंट असावी. कार्यक्रम आटोपला होता, आणि उर्वीला आता आरामाची गरज होती. तिला पर्याय नव्हता. मग ती आई बरोबर माहेरी येणार होती आणि आकाश गावी.
उर्वीचे दिवस माहेर आनंदात जात होते, कारण तिला ते आनंदात काढायचे होते, गरज तिला होती माग ती फारसं कुणाला बोलत नव्हती. स्वतःच्या खर्चाने वाटेल ते मागवायची. इकडे आकाशची आई त्याच्या मागे लागली होती तिला विदेशात घेवून चल म्हणून.
त्याने उर्विला फोन केला,
“उर्वी मी आईला घेवून जातोय ह्या वेळी. आता हे राहिलं तर तशीही तू जॉब सोडणार आहेस. आणि लागलीच तर येणार नाहीस, निदान तीन महिने.”
“हो, पण काही नसलं तर मी तिकडे येणार आहे ना? कि नको?”
“ये आता फालतू बोलू नकोस. महिन्याभरासाठी नेतोय.”
“हो, ने आई आहे तुझी, पण...”
“पण बिन काही नाही, उगाच लोकांच्या तोंडावर झाकण बसेल. तिला वाटते ना आपण तिकडे जावून खूप मजा मारतो, बघुदे ना काही.”
“ठीक आहे. माझी तिकीट बघशील पण, तिला एक्सटेंड करावी लागेल.”
“हो, मी भेटून जातो तुला निघतांनी.”
उर्वीला प्रकार तसा समजला होता, आकाशचही बरोबर होतं. उर्वीही सारखी चिडचीड करत होती हेही त्याला जाणवत होतं.
तो त्याच्या आईला जपानला घेवून गेला, आणि उर्वीची आई भडकली होती. तशी उर्वीच्या मनातही चुट चुट होती पण तिने समजवलं होतं तिच्या मनाला, आणि तिच्या आईला सुद्धा,
“कशाला ग, तुला आणि बाबांना घेवून जाईल मी.”
दिवसं जात होते आणि आशा वाढत होती. पंधरा दिसव झालेत, आणि पाळी अगीदच वेळेवर आली, उर्वीला त लक्षातही नव्हतं, बोलणार काय होती कुणाला, गप्प बसून विचार होती. कुणाशी बोलत नव्हती. बाबांच्या लक्षात आलं,
“काय ग काय झालं? फोन आला का अजून त्यांचा.”
आई धावत आली, “उर्वी काय झालं, सगळं ठीक आहे ना...”
उर्वीने दीर्घ श्वास घेतला, आणि म्हणाली, आई फेल झाली ग माझी ही सायकल....
आई डोक्याला हात लावत खाली बासली, बाबाने उर्वीच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते बाहेर निघून गेले.
एवढ्या वर्षात आई बाबांना आकाश जवळपास कळला होता, त्याने दिलेली उर्वीची साथ त्यांना उमगत होती. पण अजूनही मनात अळी होतीच, ती उलगडण्याचा प्रयत्न ते कधीच करत नसायचे. त्याचं मुद्देसूद बोलणं कधी पटत नव्हतं, आणि तो त्यांची पसंत नव्हता मग मोकळेपणा नव्हता. पण आई बाबा होते ते उर्वीचे त्यानाही वाटत होतं.
आई उर्विच्या जवळ जवळ येवून विचारात होती,
“ते तर भ्रूण असते ना मग का नाही राहिलं. आता कसं करायचं ग, एवढा पैसा लावला तुम्ही. काय म्हणतील जावई. आणि ती तुझी सासू....तिला समजते काय ग ह्यातलं नाही. नशीब नसेल समजत. मलाच पूर्ण समजत नाही.
उर्वी शून्यात बघत होती. आकाशला कसं सांगायचं हा प्रश्न होता. तो तर उर्वीची तिकीट कॅनसेल करण्याच्या मागे होता, कालच खूप खुश होता बोलतांना.
आई परत म्हणाली, “मग ग, आता काय करायचं?”
“तीन सायकल आहेत कोर्स मध्ये... करेन दुसरी... मी पण बघते अजून किती परीक्षा राहिली आहे. मलाही जिद्द चढली आहे. माझी माझ्याशी ही लढाई आहे.”
आई, “होईल ग तुला.... अजून किती त्रास आहे कोण जाने... पण आमच्या घराण्यात असं कुणी नाही मग तुला नक्की होईल.”
तिचं दिवसभर सूर होतं काय चुकलं म्हणून, नंतर दुपारी उर्वीजवळ येवून बसली,
“बाई, आपल्या घरात लग्न जुळ्या जुळ्या गावाच्या पहाडीवर जेवण देतात. आणि मग संसार सुरु करतात... राहिलं होतं ग माझं... आता सुजितच लग्न जुळलं, तेव्हा तुझी मोठी आई म्हणाली होती, मग आठवलं की तुझ्यावेळी आम्ही गेलोच नव्हतो. आता तू तिकडे गेली कि करतो आम्ही तुझ्या आणि जावयाच्या नावाचं जेवणं.... चूक झाली ग कदाचित....”
तिने मोठ्या आईला फोन लावला, आणि सगळं सांगितलं, तर तिच्याकडून समजलं की असं काही नाही, पण द्यायला हवं.... तरीही आईच मन मानत नव्हतं. नंतर तिला ती कुंडलीची गोष्ट आठवली,
“उर्वी मी तुझ्या सांगण्यावरून कुंडली तयार केली होती तुमच्या दोघांची, आहे ग योग, पण तो पंडित म्हणत होता खूप त्रास आहे, काहीतरी होम करा म्हणत होता... बाबा म्हणत होते, त्याच्या मागे लागू नको. होईल तिला, करत आहेत ते प्रयत्न. पण आता...”
उर्वी स्पष्ट बोलली, “काही करू नकोस, ही माझी लढाई आहे, मी पण बघते.... अशी मागे येणार नाही... इच्छाशक्ती आई, त्यापुढे त्या इच्छेला माझ्या इच्छेत यावं लागेल. आज जाते ज्योती मॅडमला भेटून येते.”
“आणि जावई, त्यांना सांग ना...”
“करुदे ना फोन, तोही आईसोबत आहे...”
उर्वीने तयारी केली आणि ज्योती मॅडमला भेटायला गेली. तिकडे तिच्या दोन मुलांसोबत दिवस मस्त गेला. उलट तिला मॅडमने दोन दिवस राहायला सांगितलं.
आकाशचा रात्र नेहमीप्रमाणे फोन आला, उर्वी गप्प होती, समोर बसल्या असलेल्या ज्योती मॅडम तिला इशार्यात सांग म्हणू खुणावत होत्या.
उर्वी उठून बाहेर आली, आकाश मी ज्योती मॅडमकडे आहे
“का ग.... तिकडे का गेलीस? घरी आराम करायचा ना.”
“गरज नाही त्याची, माझी तिकीट कॅनसेल करू नकोस, मी येते तिकडे.”
“उर्वी काय झालं.... रिपोर्ट्स निगेटिव्ह आहे का?”
“हुम्म्म...”
“अरे यार.... साला... तू खोटं बोलत आहेस.”
उर्वीने फोन काटला....
अश्रू गिळले... परत फोन आला,
“आकाश सॉरी...”
“हुम्म्म.... मीपण सॉरी.... चल मग तयारीला लाग... ये इकडे, मला काही करमत नाही.”
“काय! आई आहे ना तुझी तिकडे. मजा आहे मायलेकांची.”
“आहे ना...”
“मग?”
“पण बायको नाही ना.... ती काय खोलीत बसून राहते दिवसभर, इकडे काय काही बोलायला नाही आणि काही नाही. मी तरी किती बोलू आणि तेही ऑफिस मधून आल्यावर. मलाही वेळ होतो... तू नसतेस, मग मलाही घरी लवकर येण्याचा कंटाळा येतो, ये आता लवकर...”
“आता येवू...”
“नाही, काही कामाची नाहीस.... पाळीचे दिवस संपले कि ये...”
“सॉरी आकाश....”
“कशाला... सॉरी ह्या शब्दाची मालकीण तू नाहीस, माहित आहे ना... तो माझ्याकडे राखीव आहे. सॉरी... कळलं... मी सॉरी... तू नाहीस.... मग आज काय तिकडेच रहातेस?”
“हो, बर वाटत आहे, जरा वेगळं, तसंही मला आईकडे करमत नाही. आता फ्लॅटपण होत आलाय. तेपण बघून घेईल मी.”
“आणि डॉक्टरशी बोलून घे, पुढ्च कसं ते, पैसे दिलेत तीन सायकलचे, आहे अजून वेळ आपल्याकडे. कारण विचार त्यांना फेल होण्याचं.”
“फोन केला होता मी, कारण काय रे, काही कळत नसतं आपल्या केस मध्ये, बस राहत नाही, साने मॅडम म्हणाल्या होत्या, एकचं एम्ब्र्यो उत्तम होता म्हणून असेल, पहिली सायकल होती असंही म्हणाले, ब्लड टेस्ट करायला सांगितल्या आहेत. इकडेच करते आणि पाठवून देते. पुढचंही बोलून घेते.”
उर्वी परत कर्मभूमि मध्ये परत आली होती. ड्रीम बेलीच स्वप्न अजूनही स्वप्न होतचं, इच्छेला पंख होते पण अजूनही इच्छा पूर्ण होत नव्हती. आता खूप बदल झाला होता दोघात. आकाशची आई महिन्याभराने निघून गेली. आकाशने तिची सर्व व्यवस्था केली होतीच. ती नेहमीप्रमाणे सुनेबद्दल खूप काही परत गावात पेरण्यासाठी घेवून आली होती.
मध्ये तीन महिने लोटले होते, आता उर्वी हळवी झाली होती. तिला काहीच सुचत नसायचं. उर्वीच्या भावाचं लग्न ठरलं होतं आता, आणि उर्वीची दुसरी सायकल तिला करायची होती. ह्या वेळी तो जॉब सोडणार होती. कारण ही धावपळ तिला नको होती. आकाशपण तयार झाला होता, उर्वीने तिच्या घरी भांडून भावाच लग्न तिच्या येण्याच्या वेळेवर काढायल लावलं होतं
उर्वीने जॉब सोडला, आणि तिला आता सर्व लक्ष आयव्हीएफवर द्यायच होतं, घरी डायट उत्तम सुरू ठेवलं होतं, डॉक्टरने दिलेल्या मेडिसीन घेत तिने स्वतःला तयार केलं होतं. तिचं जाणं निश्चीत झालं होतं, ह्या वेळी तिने IVFच्या आधी आयुर्वेदिक पंचकर्म थैरेपी घ्याची ठरवलं होतं. आधीच तिने सगळी माहिती काढली होती. हॉस्पिटलच्या जवळच एक मोठं पंचकर्मचं क्लीनक होतं. त्यात तिला काय काय करता येईल ही सगळी माहिती काढली होती. पंचकर्मची थैरेपी ती घेणार आहे असं ती डॉकटरला बोलली होती. डॉकटरच्या सल्याने आता ती लुफ्रोन पाळीच्या विसाव्या दिवसापासून घ्यायला सुरुवात करणार होती. पण आता तिला पंचकर्म थैरेपी कारायची होती. मागे येतांना तिने इंजेक्शन सोबत आणले होते, तीही एक वेगळी गोष्ट होती, इंजेक्शन फ्लाइट मध्ये सोबत आणणे म्हणजे प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यावं लागते. तिचं इंजेक्शन पायलटच्या केबिन मध्ये बसून आलं होतं.
असो, आज तिने परत काही महिन्यानंतर परत मनातलं मांडायला सुरुवात केली. तिचं ड्रीम बेलीच स्वप्न आता हळू हळू अंतिम टप्यात आलं होतं.. जगातल्या सर्व ट्रीटमेट झाले होत्या. आणि आयव्हीएफ ही अतिशय उत्तम आणि भरपूर यश देणारी ट्रीटमेंट होती. वयानुसार ३५ ते ४० %चान्सेस होते तिचे अजून तिने पस्तीशी गाठली नव्हती. मग ती काय काय करू शकते ज्याने हे IVF यशश्वी होण्याचे चान्सेस वाढतील.
पंचकर्म करून तिला आता IVFच्या आधी शरीर शुद्धीकरण करायचं होतं जेणेकरून IVFची औषधी उत्तम काम करेल. तसं घरगुती पंचकर्म तिने सुरु केलं होतंच, रोजचा आहार आणि दिनचर्या, व्यायाम, प्राणायाम, योग्य झोप, सगळं तिने योजलं होतं. त्याशिवाय काही पर्याय नव्हता आता, कारण आता पुढे वेळ नव्हता आणि हाच वेळ तिला वापरायचा होता. मनात जखम घटत बसली होती पण त्याच मनाला हळुवार फुंकर सुद्धा तिची तिलाच मारायची होती.
पंचकर्मामुळे शरीर कसं मोकळं होतं आणि कार्यक्षमता वाढते. रक्तवाहिन्या आधीच जोमाने कार्य करतात त्यामूळे गर्भाशयाच्या अस्तराचं पोषण होतं. शरीरात रस आणि रक्ताचा संचार वाढल्याने शरीराला नवीन चेतना मिळते.
गरजेनुसार पंचकर्मात अनेक चिकित्सा आहेत, त्यात रसायन, सुवर्ण भस्म, बृहन चिकित्सा असे उपचार करता येतात. पंचकर्मामुळे आपल्या शरीराला औषध लवकर लागते आणि म्हणून ते लाभदायी असतं. अनेक मोठं मोठ्या ट्रीटमेंटमध्ये पंचकर्म ही थेरपी मनशांती आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी वापरली जाते.
आणि आयव्हीएफ सारखी ट्रेस पूर्ण ट्रीटमेट हाताळण म्हणजे आपसूकच मनावरचा ताण वाढतो. उर्वी आता हेही करायचं होतं. ती ज्या मानसिक त्रासातून जात होती ते तिलाच माहित होतं. तिच्याकडे आज सर्व होतं, नव्हतं ते मातृत्व जे तिच्या स्त्रीत्वावर प्रश्न करत होतं.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments