बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन भाग ४७

  

बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन

भाग ४७



आता तिच्यासाठी अंतिम मिशन होतं, मिशन बेबी. लग्नाचा सातवा आढदिवस दोघांनीही साजरा केला आणि मग उर्वी भारतासाठी दुसर्‍या दिवसी रवाना झाली. ती सरळ डॉक्टरकडे पाहचली, आता तिला तिकडेच राहायचं होतं. पहिले काही दिवस ती तिकडे थांबून सगळं समजून घेणार होती. ही सायकल ती भरपूर वेळ देवून करायची होती. गेल्या गेल्या ती डॉक्टरला भेटली, मनातलं सर्व बोलून मोकळी झाली, नव्याने तयार झाली होती.

महिनाभर ती आता पंचकर्म करणार होती. नंतर सायकल सुरु करणार होती, असचं डॉक्टर आणि तिने ठरवलं होतं. घरी तिला राहायचं नव्हतं तसं तिला कुठे राहावं हा प्रश्न असायचा, तेही तिने बोलून दाखवलं आणि मग डॉक्टरने तिला कितीही दिवस त्यांच्या गेस्टहोऊसला राहण्याची मुबा दिली. आता सगळं डॉक्टरच्या नजरेखाली होणार होतं.

त्यांच्याच ओळखीच्या आयुर्वेदिक डॉक्टरची ओळख त्यांनी तिला करवून दिली. ते स्त्रीरोगतज्ञ असून त्यांना आयुर्वेदात आयुर्वेदआचार्य ही पदवी प्राप्त होती. आणि मग उर्वी तिकडे त्या पंचकर्म क्लिनिकला पोहचली.

तिची सर्पूर्ण माहिती तिकडे घेतल्या गेली. उर्वीच शरीर कुठल्या दोषात येतंय हे शोधल्या गेलं.

त्रिदोष, म्हणजे वात, पित्त आणि कफ हे तीन दोष आयुर्वेदात गणले जातात. दोष अगदीच विकार नाही बरका... म्हणजे त्रिदोषचा अर्थ शरीरात असणारे तीन दोष असा होत नाही.

“दुषनात् दोषः, धरणात धतावह!”

आयुर्वेदात असे म्हटले जाते की हे शरीरात असणारे वात, पित्त आणि कफ दोष दूषित झाल्यावर रोग निर्माण करतात आणि त्याला संतुलित करण्यासाठी पंचकर्म थेरपी कार्य करते.

उर्वीत पित्त दोष असल्याचं तिला डॉक्टरने सांगितलं होत. आता तो शांत करण्यासाठी तिला सगळी थेरपी करायची होती.

“पण डॉक्टर ह्याचा माझ्या फर्टिलिटीशी काय संबंध आहे.”

डॉ, मनोज हसले, खूप समाधान होतं त्यांच्या त्या हसण्यात, पण त्यांच हसणं उर्विला जरा कोरलं होतं. उर्वीला  आता काही वाटावं अशी ती राहिली नव्हती, तिला तिचं मिशन पूर्ण करायचं होतं, समोरचा काय म्हणेल आणि कसा विचार करेल ह्याच्याशी तिला काहीही घेणं देणं नव्हतं. परिस्थितीने तिला शिकवलं होतं. वेळ काढून नेण्यात ती पटाइत झाली होती.

डॉं. मनोज, “माझ्या कडे येणारे सर्व रुग्ण हे आधी बरेच उपचार करून आलेले आसतात, त्याच्यातही तुझ्यासारखी उत्सुकता असते, सगळ्यांना लवकर गुण यायला हवा असतो, आणि मग ही सध्य फलदायी चिकित्सा अंगिकारली जाते.”

“सध्य फलदायी?”

“हो लवकर फळ देणारी.”

“पण, मी तर ऐकलं आहे कि... वेळ लागतो.”

“तू आययूआय, आयव्हीएफ केलंत, किती वेळ लागला?”

उर्वी गप्प झाली..

“ऋतु क्षेत्राम्युबिजाना समग्र्यात अंकुर यथा!”

“अर्थात अंकुराच्या वाढीसाठी, ऋतु, क्षेत्र, अम्यु, बीज सर्व जेव्हा एकत्र येतात तेवढा ते रुजत असतं.  

उर्वी झाडाला फळ येतं हे तुला माहित आहे ना, पण त्यासाठी किती मेहनत असते त्या झाडाची हेही लक्षात घ्यायला हवं, आता आपलं शरीर, ऋतु म्हणजे मासिक पाळी, नियमित असायला हवी, त्यात स्त्रीचा ऋतुमती काळ अर्थात गर्भ धारण करण्यासाठी योग्य काळ.”

“फर्टाइल विंडो ना?”

“हो, पाळीच्या १२व्या दिवसापासून तर १६व्या दिवसापर्यंत. क्षेत्र म्हणजे, गर्भाशय, बीजवाहिन्या, अंडाशय हे सर्व भाग. ह्यातल्या कुठल्याही भागात जरी दोष असला तरी गर्भधारणा होत नाही किंवा अवघड होते सारं. अम्यु म्हणजे, खात, जसं झाडाच्या वाढीसाठी आपण खत पाणी देतो जे जमिनीपासून रोपाला हवं असते, अगदी तसच... अर्थात होर्मोंस जे आपल्या शरीरात कार्यरत असतात, जे प्रत्येक घडणाऱ्या क्रियेसाठी कारणीभूत असू शकतात. आता बीज, बीज हे निरोगी असेल तेव्हांच गर्भधारणा होवू शकते. आता त्यात पुरुषबीजपण आलेत. 40% स्त्रियांमध्ये वंध्यत्व अंडाशयाच्या (Ovary) समस्येमुळे होते. आता तुझ्या बाबतीत सागायच झालं तर डॉ माधव मला बोलले कि तुझे पहिल्या सायकलला एग्स बऱ्यापैकी होते पण नंतर ते राहिले नाही अर्थात फर्टिलाइजेशनसाठी दोनच निवडल्या गेले.

“पण माझी लॅप्रोस्कोपी झाली आहे, आणि ओव्हरीला पंचर केलेलं आहे.”

“हो, आणि तुला P.C.O.D नाही हे मी माधवला विचारलं आहे. म्हणूनच आपण संपूर्णपणे इथे बोलत नाही आहोत, पण आपल्याला जर तो दोष असेल तर तोही विचारात घ्यावा लागेल.”

“बर मग काय काय असेल माझ्या ट्रीटमेंटमध्ये”

“आपण वमन, विरेचन, उत्तरबस्ती, बस्ती करूया आणि एक, मला तुझ्या नवऱ्याला फोन करायला सांग.”

“का?”

“कारण सगळ्या गोष्टी औषधीने पूर्ण होत नाहीत, मानसिकता हाताळावी लागते. तुझ्या बोलण्यावरून मी आतापर्यंत खूप काही नोंद केलं आहे.”

उर्वी हसली, “म्हणजे हा संवाद सुधा तुमच्या थेरपीचा भाग आहे.”

“असं समज. त्याला सांग बोलायला.”

“मलाही सांगा, मी सक्षम आहे.”

“हो ते जाणवत आहे, तर ऐक, तुझा आतापर्यंतचा त्रागा दिसतोय तुझ्या बोलण्यात. खूप काही केलंस तू पण कौतक तुझ्या पदरी कधी पडलं नाही, मगाशी बोलता बोलता तुझा कंठ दाटून आला होता, पण तू क्षणात आवंढा असा गीळलास मीही ओळखू शकलो नाही. नजरेत आलेलं पाणी सहज आटलं तुझ्या. खूप कमी लोकांना जमतं हे. पण खूप काही आहे, आणि त्याचा तुला त्रास होतोय. ह्यासाठी मला तुझ्या नवऱ्याशी बोलावं लागेल.”

“पण तो कधी मला काही म्हणत नाही.”

“हो, पण तो एकटाच तर कुटुंबात येत नाही ना, आपला आज हा आपल्या कालवर उभा असतो. मनात गुंडाळी मांडून असतो. तुझ्या बाबतीत असं आहे. तू वरवर कुणाचा विचार कदाचित करत नसशील पण मनात युध्य सुरु असते. तुझा कठोरपणा सर्वाना जाणवतो पण मर्दू मन अजूनही लपून आहे... तुलाही आपल्या लोकांची सोबत हवी आहे पण ती भेटणार नाही हे माहित असूनसुद्धा मनाला हवी आहे तुझ्या. बघ मी तुला एवढं ओळखलं, बाकी मी आकाशशी बोलतो. आकाशच नाव ना. तुझ्या सारख्या लाथ मारेन तिथून पाणी काढणाऱ्या स्त्रीला सांभाळणारा आकाशएवढ्या मनासारखाच असेल.

परत डोळ्याच्या पापण्यांनी दगा दिला तिला, येणारे अश्रू अलगत लपल्या गेले, ती म्हणाली,

“आता हे वमन, विरेचन, उत्तरबस्ती, बस्ती म्हणजे काय?”

“वमन, ही एक उलटीची पद्धत होय. ज्यात औषधी देवून उलटी करायला लावल्या जाते. अशी आम्ही औषधी वापरतो ज्याने आपसूकच उलटी येते. यामुळे स्त्री शरीरातील हार्मोन्सचे विकार कमी होतात आणि उत्तम स्त्रीबीज निर्माण व्हायला मदत होते.

विरेचन हे आयुर्वेदात शास्त्रोक्त पद्धतीने जुलाब घडवून आणण्याच्या पद्धतीला म्हणतात.  ज्यात शौचाच्या मार्गाने शरीराची शुद्धीकरण होते. प्रामुख्याने हे शरीरातील पित्त ह्या दोषावर होतं. एक साधारण पाच ते सात दिवस साधे किंवा औषधी तूप वाढत्या प्रमाणात आम्ही देतो.  सर्व अंगाला तेलाने मालीश करून वाफ दिल्या जाते.”

उर्विला तिच्या आत्या आजीने केलेलं सगळं आठवत होतं. आजीला तेवढं कळत नव्हतं पण तिने हाच इलाज सात दिवस केला होता.

“उर्वी कुठे भटकलीस, तुला माहित आहे का ह्याबद्दल, माहित असेल तर उत्तम.”

“नाही, माहीत आहे पण आणि नाही पण... तुम्ही सांगा.”

“आतापर्यंत आपण शरीर शुद्धीकरण बद्दल बोललो, जे शरीरातील होर्मोंसला जवाबदार असते. आता उत्तरबस्ती, ह्यामध्ये आम्ही गर्भाशयात आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेलं तेल, तुप गर्भाशयात सोडतो. साधारण मासिक पाळीच्या ठव्या दिवशी किंवा पाळी संपल्यानंतर उत्तरबस्ती योग्य असते. उत्तरबस्तीने गर्भाशयाची शुद्धी होऊन असणाऱ्या दोषांचे शमन होते आणि गर्भाशयातील आवरणाला पोषक वातावरण  मिळतं. यामुळे गर्भधारणेला योग्य वातावरण लाभतं.”

“लॅप्रोस्कोपीमध्येही गर्भशयाचं शुद्धीकरण होत असतं ना, हेही तसंच का?

“हो. अगदी तसंच नाही पण हो, तू केलीस ना, बस तेच आम्ही ह्या उपचारात करतो. बस इथे कुठले टाके पडत नाहीत, आणि मग लोकांना कळत नाही. उत्तरबस्ती हे वरदान ठरतं कुणाकुणाला... तुझ्याबाबतीत ठरावं असचं मला वाटतं. तुझा हा त्रागा लवकरच संपणार असही वाटत आहे. तुझी इच्छाशक्ती शक्ती आणि स्वतःसाठी लढण्याची तयारी तुझ्या इच्छेला तुझ्या समोर उभं नक्की करेल.

उर्वीचा गळा दाटून आला होता, तिने अलगत हात डोळ्यांना लावला,

“अ.. अ.... वाहू दे कधीतरी... खूप वाहले असतील पण हे अश्रु ते नाहीत. मोकळी होशील... आकाशसमोर कहीदा रडली असशील पण अश्रू आणि मन त्याला त्रास होवू नये म्हणून अळखळत असतील. तुझ्या भावना कुण्या दुसऱ्याच्या तोंडून बाहेर येणं आणि तुझे अश्रू गळणं हे वेगळं समाधान देत असतं. तुमच्या नात्यात मोकळेपणा आहे म्हणून ती इथे आहेस. पण तरीही त्याच्या चिंतेने तू कधी ही भावना मनात आणत नसशील.”

उर्वीचे अश्रू ओघळून गालावर आले, आणि अलगत हसली ती,

“आता बस्ती ह्याला आपण एनिमा देणे म्हणू शकतो, पण आयुर्वेदात तूप, तेल, काढा हे द्रव पदार्थ गुदमार्गामधून आत सोडली जातात. त्याला बस्ती म्हणतात. साध्या भाषेत त्याला एनिमा देणे असेही म्हणू शकतो. यामुळे शरीरातील हार्मोन्समुळे असणारे विकार कमी होतात आणि उत्तम स्त्रीबीज तयार होण्यास मदत होते.”

उर्वीने महिनाभर पूर्ण पंचकर्मची थेरपी करवून घेतली होती. उर्वी सगळं ठरवून घरी आईकडे लग्नासाठी आली होती. आकाशपण आला होता. लग्न झाल्या झाल्या आकाश आणि उर्वी डॉक्टरकडे निघून गेले. उर्वीला परत त्याच सगळ्या प्रोसेस मधून जावं लागत होतं. आणि आता ती तिकडेच थंबणार होती. आकाश परत जपानला निघून गेला.

ह्यावेळी सगळं उत्तम होतं. ती डॉक्टरच्या देखरेखित होती. तो अनुभव वेगळाच होता. तिकडे गेस्ट हाऊसला सगळ्या आयव्हीएफच्या पेशंट होत्या. सगळ्यांचे अनुभव आणि बरच काही उर्वी अनुभवत होती. आता तिला जाणवलं होतं, किती भयंकर आहे सारं, किती हा त्रागा मातृत्वासाठी, तिच्या सारख्या अनेक तिथे होत्या.

पंधरा दिवसाचा जीवघेणा प्रतिक्षेचा काळ आता पूर्णत्वाला आला होता, रोज कुणा ना कुणाची गुड न्यूज येत  होती. काही नाराज होवून रडत असायच्या. उर्वीची धाकधूक वाढली होती. उद्या तिला हॉस्पिटलमध्ये जायच होतं  चेकिंग साठी. मन वाट बघत होतं, अचानक तिला पहाटे जाग आली,

बाथरूमला गेली तेव्हा तिला रक्त जाणवलं, आणि उर्वी कोसळली, आता तिला सकाळची वाट होती. डॉक्टरचा राग येत होता. अश्रू तर आटले होते. हॉस्पिटलच्या पायऱ्या चढतांना आज तिला तिचा आतापर्यंतचा प्रवास आठवत होता. डॉक्टरच्या कॅबीनमध्ये गेली, आणि सगळे प्रश्न केले, उत्तर मागत होती ती, पण उत्तर नव्हतं. सगळं नीट होतं पण तरीही तिचा गर्भ रिकामा होता.

डॉक्टरने तिला समजावलं, “आपण अजून प्रयत्न करूया... तिसऱ्या सायकलला आपण उत्तम पद्धत वापरू या. मी तुझ्या मेडिसिन बदलतो. ट्रेस घेवू नकोस. मी बोलतो आकाशशी...”

उर्वी जरा शांत झाली आणि निघून गेली...

आज तिला काहीच वाटत नव्हतं, नजरे समोर सगळं शून्य वाटत होतं. ती निघली, कुठे चालली होती तिला माहीत नव्हतं. तिने तिच्या धुंदीत रेल्वे फाटक कोर्स केलं होतं, आणि सरळ ती रेल्वेच्या रुळावर चालत होती. तसं त्या रुळावर मालगाड्या येत होत्या नुसत्या मग वर्दळ नव्हती. दुरून कुणीतरी ओरडत होतं तिच्यावर त्याचा आवाज ऐकायला येत होता उर्विला पण मेंदू सुन्न झाला असल्याने तिला काही कळत नव्हत उलट वाटत होतं कशाला हा ओरडत आहे. आता हातातला मोबईल वाजला, हातमधून वाइब्रेशन तिच्या मेंदूपर्यंत पोहचलं, हाताच्या हालचालीने बटण प्रेस झाली,

आणि आकाशचा आवाज आला, “उर्वी..... उर्वी.....”

कथा अंतिम टप्यात लवकरच... 

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

 

Post a Comment

0 Comments