बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
भाग ४४
---
मनाच्या अंतिम कोपऱ्यातून इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करणारे कमी असतात.
काही इच्छा ठेवतात पण भरकटत जातात... आणि मग इच्छा तिथे मार्ग निघत नाही...
---
विचारात लॅपटॉप वरची बोटं थांबली, आणि उर्वीची मनात प्रचंड कोलाहल माजला... अवतीभवती अनेक उदाहरणं दिसली.
किती तरी लोकं अश्या ट्रीटमेंट लपून करतात, समजाच्या भीतीने, आपल्यातला दोष उघडीस येईल ह्या धाकाने. काही जगाला प्रेरणा देतात, मदत करतात. आता ह्या दुर्गाच्या आईवडिलांना वाटत होतं, कि जगाला माहित झालं तर कदाचित त्यांच्या मुलीला त्रास होईल. लोकं काहीही बोलून तिला त्रास देतील, तिच्यात खोड काढतील.... मग त्यांनी गुप्ताता पाळली. आणि असे अनेक लोक आहेत जे ह्यापलीकडे जावूनही खूप सहन करतात पण जगासमोर येत नाहीत. काही तर दूरू निघून जातात आणि मुलं झाले कि परत आपल्या लोकांमध्ये येतात. कुणी दत्तक घेवून गुप्तता पाळतात त्या जीवासाठी, काही गौरवल्या जातात तर काही हास्यास्पद बनून जातात.
ज्यांना गौरव लाभतो त्याने भारावून जावू नये कारण डॉ सुभाष सारखे अजूनही आहेत, ते डॉक्टर होते पण साधी माणसंही खूप आहेत जे एका जीवासाठी सगळं आयुष्य पणाला लावतात. आणि आयुष्यभर त्याच्या कार्याला मनात गाडून ठेवतात. कसं वाटत असेल ना जेव्हा मुठभर यशाने किंवा कार्याने स्वतःला डोक्यावर घेवून फिरणाऱ्या व्यक्तीला असा एखादा स्त्री किंवा पुरुष नजरेसमोर बघत असेल.... तो हसत असेल मनात, की स्वतःला कोसत असेल.?
उर्वीने मनात नवीन धडा घेतला होता, काहीही झालं तरी अभिमान बाळगायचा नाही, आपण काहीच नाही, जगात रत्न जमिनीत पडले आहेत. आज उर्वीने मनाची दारं उघडली होती. तिने जे आतापर्यंत अनुभवलं होतं ते तिला गाडून ठेवायचं नव्हतं ना त्याच्यावर अभिमान करायचा होता. तिच्यासारख्या असंख्य स्त्रियांच्या आवाजाला शब्दबद्ध करायचं होतं. हा मातृवाचा प्रवास तिचा एकटीचा नव्हता, अनेक स्त्रिया तिच्यासोबत चालत होत्या. तिला तिचं मनाला बोचणारं दुखं कमी वाटलं. आपल्याला यश मिळालं तर निदान कुणाच्या कामी आपण यावं असंच तिला वाटत होतं. इच्छाशक्ती किती महत्वाची असते हे समजायला हवं पण मनात वाटलं नाही यश आलं तर?
पण उत्तर मिळालं, “तरीही मी मागे हटणार नाही.... मुलं हेच सर्वस्व नाही. हेही पटवून देणं गरजेच आहे. मला आकाश मिळाला, ज्याच प्रेम आकाशएवढं आहे, जायच्यासाठी मी महत्वाची आहे. मग मला हेही जगाला सांगणं गरजेच आहे. जोडीदाराचा हात पकडून मी ही लढाई लढत आहे. पण ह्या माझ्या लहानश्या लढाईतून जगाला काही मिळावं असं नक्की करेन.”
दोन दिवसांनी तिने ज्योती मॅडमला फोन केला, डॉक्टरचा नंबर घेतला, इमेल घेतला. आणि आकाशची वाट बघत होती.
आकाशने फोन लावला, आणि आयव्हीएफ स्पेशालिस्ट डाँ. माधवशी तो बोलला, त्याला सगळं सांगितलं. त्याने आतापर्यंतच सगळे रिपोर्ट्स इमेल करायला सांगितले पाळीच्या विसाव्या दिवसाच्या आधी इथे यायला सागितलं.
उर्वीला महिन्याभराच्या सुट्या होत्या आणि पुढचा महिना ती सुट्टी घेणार होती. आकाश मात्र जास्त दिवस थांबणार नव्हता. ह्या दोन महिन्याच्या काळात उर्वीने तिचा पहिला आयव्हीएफ प्लॅन केला.
दोघही सरळ मुंबईला पोहचून तिकडेच गेले. आयव्हीएफच प्रसिद्ध क्लीनक होतं ते. रोज निदान दोन तीन तरी केसेस पॉसिटीव्ह असायच्या. ओपिडी सुद्धा भरून होतं,
वाटलं, “एवढे लोकं आयव्हीएफसाठी तयार होता. बापरे, मुल जन्माला यावं म्हणून सब कुछ, मीपण तर आली. आलोय आता दरबारात, इथे गुण तर येणारच आणि नाहीच तर आता पुढे काहीच नाही.”
उर्वी विचारत बसून होती, तोच डॉक्टरने बोलावलं, दोघही आत गेले, डॉक्टर खूप मोकळ्या स्वभावाचा होता. त्याच्याकडे जवळपासच्या सगळ्या खेड्यापाड्यातील लोकं येत होते. खूप नावाजलेला होता त्या भागात. ज्योती मॅडमने सांगितली म्हटल्या खुश झाला होता.
त्याने सगळं उर्वीच ऐकून घेतलं. आणि सगळी प्रोसेस समजावून सांगितली.
“उर्वी तू बरीच माहिती काढली आहेस. असे जागरूक पेशंट असले की ट्रीटमेंट करायला सोपं होतं.”
“डॉक्टर होता होता इंजिनियर झाले...”
“आणि मी इंजिनियर होता होता डॉक्टर... तुला खूप माहिती आहे. मग माझं अर्ध काम इथेच झालंय. आयव्हीएफ प्रक्रिया करणाऱ्या ४० ते ४५ टक्के जोडप्यांना पहिल्या प्रयत्नात यश येते. आपण तुझी तपासणी करून घेवू. पण यश वयानुसार सुद्धा असतं, आणि त्यात शरीर वेगळं मग, प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी वेगळी असते. प्रत्येकाची बॉडी वेगळीवेगळी रेस्पॉन्स देते. कुणाला पहिल्या सायकाल मध्ये रिझल्ट मिळतो तर कुणाला शेवटच्या. तर कधी पेशंट परत मोकळ्या हाताने परत जातात.... आम्ही प्रत्येक पेशंट सोबत असतो. काहींची आर्थिक परिस्थिती नसते तीन सायकलच्यावर परत काही करण्याची. मग त्यांना आम्ही मदत करतो पण कधी कधी काहीच हातात नसते आमच्या... पण आशा हीच निराशेला दूरू करू शकते. आणि ही आशा आणि विश्वास आम्ही प्रत्येक पेशंटमध्ये भरतो. माझी सगळी प्रोसेस खूप फ्लेग्झीबल आहे. तुला इथेच नेहमी यावं लागेल असं नाही.”
नंतर त्यांनी चार्ट काढला, आणि संपूर्ण प्रक्रीया सांगितली,
“आज तुझा पाळीचा २०वा दिवस आहे, मग आज पासून आपण तुला पोटावरची इंजेक्शन सुरु करूया, नंतर तुला नर्स ट्रेन करेन, ते तुझं तुला घ्याचं आहे रोज, आजपासून पंधरा दिवस. ज्या वेळेवर घेशील अगदी त्याच वेळेवर दुसर्या दिवशी सुद्धा.”
“म्हणजे चोवीस तासात एकदा.”
“बरोबर.”
“पण हे का, मी तर पाळीच्या विसाव्या दिवसावर आहे आता. आणि पुढची पाळी आठ दिवसात तरी येईल मला.”
“थिस इज कॉल्ड डाउन-रेग्युलेशन. हे शरीरातल्या होर्मोन्सला सप्रेस करते, सो दॅट व्हेन यू ओव्ह्युलेट वी कॅन टेक कंट्रोल ऑन इट. अर्थात आपल्या आयव्हीएफसाठी एकापेक्षा जास्त डॉमिनंट फॉलीकल हवी असतात. आणि त्यासाठी ही शरीराची तयारी असते.”
“हुमम, निसर्गाला हातात घेतोय आपण, अर्थात नॅच्युरल ओव्हुलेशन आणि हार्मोन्सला स्विच ऑफ करून बॉडीचा कंट्रोल हवाय. नाहीतरी ही सायकल कशी व्हायची. बॉडी तिच्या पद्धतीने कार्य करेल आणि मग आपलं काम होणार नाही.”
“करेक्ट! हुशार आहेस.”
“तर हे GnRH एगोनिस्ट आहे, तुला दोन बॉटल ल्यूप्रोनच्या आणि सिरींज हॅंडओवर केल्या जाईल, हे दोन आठवते सुर ठेवायचं. पाळी मध्ये येईल. तसा फोन कर हॉस्पिटलला तुला साने मॅडम असिस्ट करतील. नॅच्युरल सायकल सप्रेस झालेली असेल आणि मग फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH) चे इंजेक्शन सुरू करायचे. ते हिप्सवर घ्यायचे आहे. तुझी पहिली सायकल आहे, एक एक दोन्ही साइडला घ्यायचे. हे तू तुझ्या जवळपासच्या डॉक्टर कडून लावून घे. तू नागपूरची आहे ना, मग तिकडे माझे काही डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे जायचं, आणि प्रत्येक दोन दिवसाने अल्ट्रासाऊंड करून घ्यायचा. एग्स किती आहेत आणि त्यांची वाढ कशी आहे ते मला किंवा मॅडमला फोनवर सांगायचं, म्हणजे तशी इंजेक्शन मात्र बघता येईल. आत तुझ्या बाबतीत तुला हे सगळं समजतं म्हणजे काम वेळेवर होतील. कारण मग त्या माझ्या मित्राला मला फोन करून विचारावं लागणार नाही आणि तुला योग्य वेळी मार्गदर्शन मिळेल. असे पेशंट खूप कमी असतात...”
उर्वी हसली, पण जरा नाराज दिसत होती, म्हणाली,
“साईड इफेक्ट?”
“हो, आहेत, पण ट्रेस घ्यायचा नाही, भरपूर पाणी प्यायच, आनंदी राहायचं, बाकी तुला सगळे साईड इफेक्ट हळू हळू कळतील पण त्याच्या विचार करू नकोस आतातरी.”
“आकाश ह्या प्रोसेसमध्ये उर्विला जपावं लागेल, अर्थात इंजेक्शनचा भरगोस वापर असल्याने, स्त्री भावनिक होते, चीड चीड वाढते. ही संपूर्ण ट्रीटमेंट ट्रेसफूल आहे पण ट्रेसच नको असतो हयात. मग पुरुषाची भूमिका महत्वाची असते आणि घरच्यांची सुद्धा आणि इथे आपण अर्थात तूच नाहीस सगळे पुरुष मागे असतात. म्हणून पुरूषांच कॉन्सिलिंग माझ्याकडे असते”.
आकाश हसला, “हो तशीही ही चीडचीड करणारी आहेच, आता अजून सहन करावं लागेल.”
“मग झालं तर...”
“मग मी इकडे हॉस्पिटलला कधी यायचं?” उर्वीने प्रश्न केला.
“ओके, जेव्हा फॉलिकल्स योग्य आकाराचे आहेत असं आपल्याला अल्ट्रासाऊंडमध्ये दिसलं, कमीत कमी सात फॉलीकल तरी हवे असतात, नाहीतर सायकल होणार नाही, आणि सगळं परत बघून करावं लागेल. तर सात पेक्षा जास्त फॉलिकल्स उत्तम आहेत ह्याची खात्री झाली कि मग HGC(ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रॉफिनचे इंजेक्शन) शॉट घ्यायचा, म्हणजे ओव्हुलेशनला चालना मिळेल आणि ते ३६ ते ४८ तासात होईल आणि मग त्याच वेळेत आम्ही ते बाहेर काढून घेवू. HGC शॉट इकडे येवून घेताय कि घेवून प्रवास केला तरी चालेल, वेळ असतो आपल्याकडे.”
आकाश, “म्हणजे ही फॉलिकल्स काढण्याची पद्धत ऑपीरेटिव्ह आहे तर?”
“हो, ऍनेस्थेसिया देवून योनीमार्गातून ते थेट ओव्हेरीमधून काढले जातील. यू कॅन ऑल्सो कम इन ऑपेरेशन रूम अट दॅट टाइम, आम्ही नवऱ्याला बोलवतोच.”
उर्वीने आकाशच्या मांडीवर अलगत चिमटा घेतला. आकाश दबक्या आवाजात म्हणाला,
“बर, मग किती वेळात शुद्धीवर येतात.”
“साधारण अर्ध्या तासात.”
“मग तेच असेल ना, काही खायचं नाही सकाळी असं सगळं…”
“हो, पण त्यानंतर तुम्ही जेवण करा.”
तेवढ्यात नर्स आली, “सर, सोनोग्राफी रूम खाली आहे काही वेळासाठी. तुम्ही बोलला होता ना.”
“हो, उर्वी मॅडमला पोजिशनला घे, मी आलोच.”
“उर्वी नर्स सोबत जा, मला जरा तुझे काही टेस्ट करायचे आहे. मी तिशी खात्री करून घेतो. आणि नंतर ब्लड सैंपलपण लागेल.”
“आकाश, तुझं सैंपलपण टेस्टिंगला लागेल. बऱ्याच टेस्ट करायच्या आहेत. आणि आम्ही तेच सैंपल फ्रोझनपण करू, इफ यु रेडी ऑर फ्रेश अल्सो ओके टू अस...”
उर्वी आणि आकाश खोलीतून निघाले, परत तेच नव्याने करायचं होतं, उर्वीच अल्ट्रासाऊंड डॉक्टरने केलं आणि काही वेळाने परत दोघांना खोलीत बोलावलं.
“ऑल गुड, आपण आयव्हीएफ करू शकतो, एक दोन चार दिवसात आकाशचे रोपोर्ट येतील आणि तुझे बल्ड रिपोर्टसपण, मी बोलतो काही अडचण असली तर फोनवर, मग तशी औषधी बदलू आपण. मी मेल करेन प्रेसक्रीपशन, तू घे तिकडून.”
उर्वीने प्रश्न केला, “आणि मग त्या नंतरची प्रोसेस काय असेल?”
“गुड, म्हणजे लक्ष आहे तुझं. नाहीतर कुणी विचारत नाहीत. तू इकडे आल्यावर एग्सच कलेक्शन, ते मीच करतो आपल्याकडे. इट्स जस्ट मायनर प्रोसीजर, विल टेक अबाऊट १५ टू २० मिनिट.”
आकाश, “ऍनेस्थेसिया देवून असते ना ही प्रोसेस?”
“हो, मगाशी बोललो मी, इट्स ऑपेरेटिव्ह, बूट डू नोट वरी. वी विल बी देअर, यू विल बी देअर. ऑल विल बी गुड.”
उर्वीने आकाशकडे बघितलं, आणि ती डॉक्टरला म्हणाली,
“किती दिवस लागतात फर्टिलाइजेशन प्रोसेसला?
“लगेच हँडल केल्या जाते, एग्सच कलेक्शन नंतर सेमिन प्रिपेर करण्यात येतं आणि मग नंतर एमबऱ्योलॉजिस्ट विल वर्क ऑन दॅट. आपल्याकडे आपली स्वतःची लॅब आहे. फूल टाइम एमबऱ्योलॉजिस्ट आहेत आपल्याकडे. सगळं माझ्या देखरेखित होते. आम्ही सहसा पहिल्या सायकलला इंट्रा-साइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (आईसीएसआई ICSI) प्रोसेस प्रीफर करत नाही. आता स्पर्म अनॅलिसिस मध्ये कळेल काय करायच ते. गरज वाटली तर आम्ही करू, तुम्हाला सांगून. इथे काहीही लपून नाही. माझ्या कडे सगळ्या पद्धती आहेत. अगदी सोरोगेट प्रोसेस सुद्धा आमच्या कडे आहेत. बूट ऑल विथ कंसर्न. जस्ट ३ टू ५ डेज विल बी फॉर एम्ब्र्यो डेवलपमेंट, विल चेक द क्वालिटी अँड विल थिंक. कधी ते ट्रान्सफर करायचे ते. ती प्रोसेस सुद्धा मी करतो.”
“आणि आकाश ह्या एम्ब्र्यो ट्रांसफर प्रोसेस मध्ये ऍनेस्थेसिया दिल्या जात नाही. तीन ते पाच मिनिट लागतात. पंधरा वीस मिनिट पडून राहून तुम्ही घरी जावू शकता. बस काही खबरदारी घायची. मुख्य म्हणजे ४८ तास स्विमिंग किंवा स्टीम बाथ नको, तसं आपल्याकडे हे कुणी करत नाही. पण एक्यूपंक्चर किंवा ट्रेस रिलीफ थेरपी घेतली तर उत्तम. कशात तरी गुंतून राहायचं. आणि जसं हेवी सामान उचलायच नाही. बाकी तुला सगळी माहिती माहीत असेलच आणि काही वाटलं तर आपल्या डॉ.साने मॅडम आहेत त्यांना हमखास फोन करायचं.”
डॉ.साने मॅडम आणि नर्स कॅबीन मध्ये आल्या, “सर उर्वी मॅडमला इंजेक्शन बोटल्स किती द्यायच्या आहेत. त्यांचा शेडुल माहीत झाला तर..”
“तुम्ही बोलून घ्या ह्याच्याशी, एक्सक्यूज मी, मला लंच करायचं आहे. बायको वाट बघत आहे. जायला हवं. उर्वी तुला काही अजून विचारायच आहे का. मी येतो अर्ध्या तासात. जातांना भेटून जा. अँड नो ट्रेस, आज दहा केस पॉसिटीव्ह आहेत आपल्या हॉस्पिटल मध्ये. सो बी हॅप्पी. सकाळपासून पेढे खात आहोत आम्ही.”
“आणि आकाश थंबायच असेल तर आपलं गेस्ट रूम आहे. सगळ्या ट्रीटमनेट करणाऱ्या तिकडे असंतात ज्याना दूर पडतं.”
“नो, थॅंक यू, मी हॉटेल बुक केलं आहे. आणि आम्ही उदय सकाळी फ्लाइटने निघणार. बँक अकाऊंट नंबर प्लीज.”
“डॉ.साने मॅडम प्लीज गिव हिम ऑल डीटेल्स.”
काही वेळात उर्वीच्या हातात पन्नास इंजेक्शनची कॅरि बॅग दिल्या गेली, एवढे इंजेक्शन आणि एका सायकल साठी. नंतर तिला पटावर इंजेक्शन घेण्यासाठी ट्रेनिंग दिल्या गेली.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments