छत्तीसचा आकडा!
मन नेहमी साधं आणि सरळ असतं, एखाद्याशी मन जुळलं कि सर्व कसं सुंदर वाटायला लागतं. सुरुवातीला आपण प्रत्येक गोष्ट मनाच्या तराजूत तोलतो आणि आनंदाने सर्व स्वीकारतो. नात्यात रमलो कि मन मन राहत नाही त्याला ओढ लागते मेंदूची.
मेंदू हा मनाशी कधीच मेल खात नाही. तो विचारवंत असतो, थोडी अकड असते त्यात. तो सहजा सहजी कुणाला समजून घेत नाही. समोरच्या माणसातला वागण्यातला व्यवहार त्याला नेमका वाचता येतो. 
मनाला नेहमी वाटत असतं कि मेंदूने त्याच ऐकावं पण मेंदू काही मनाचं ऐकत  नाही. आणि आपल्या नात्यात विचारांचा शिरकाव अलगत होतो. मेंदूतले असंख्य विचार मनाला बदलायला भाग पडतात. आणि आपण वाकडे होतो .. 

मी खूप सरळ, साधी आहे पण माझा मेंदू तसा नाही ना! 

मनाच्या नजरेने बघितलं तर समोरचा प्रत्येक मला बरोबर वाटतो, पण मेंदूच्या विचारांच्या तारा माझ्या नजरेच्या पटलावर पडतात आणि समोरच्याचा साधेपणातला व्यवहार कळतो. 
म्हणूनच माझ्या मनाचा आणि माझ्या मेंदूचा छत्तीसचा आकडा आहे. 
तुमचं असं होतं का?

Post a Comment

0 Comments