मी माझी ना राहिले...भाग १

 


मी माझी ना राहिले

सजलेल्या त्या खोलीत आसावरी निवांत आरश्यासमोर बसून दागिने काढत होती, आज तिची लाग्ना नंतरची पहिली रात्र होती, अचानक तिच्या खांद्यावर हात पडला, ती दचकण पलटली मागे रंजित उभं होता, ती त्याला लगेच बिलगली, “कुठे निघून गेला होतास रे तू, मी किती वाट बघितली मी तुझी आणि आपली कावू तर राहतच नव्हती तुझ्या शियाव, आता मी नाही जावू देणार हा तुला, रंजित ने तिच्या डोक्यावर हात फिरवला, “मी कुठे गेलोय मी आहेच ना सदा सोबत पण आता तूला पुढे निघावं लागेल, आता तू फक्त माझी राहिली नाहीस ग, आता तू तुझी आहेस. आनंदी राहा...” आसावरी परत त्याला गच्च बिलगली आणि दचकण पडल्या सारखी झाली, भानावर आलीच तर दार वाजलं, अमित खोलीत शिरत होता, असावारीला असं खाली वाकलेल बघून तो तिच्या जवळ आला, “सर्व ठीक आहे ना आसावरी. काय होतंय.”

आसावरी स्वतःला सावरत म्हणाली, “हो, मी ठीक आहे, कावू झोपली का?”

“हो, हा काय मी तिला झोपवूनच आलोय. तू फ्रेश हो आणि झोपं बघू, उद्या कावूची शाळा पण आहे.”

“पण आज तर...”

“ते राहू दे, आधी तू आपल्या नात्यात मोकळी हो, मला काही घाई नाही, तुझ्यासाठी खूप वेळ आहे माझ्याकडे.”

आसावरी फ्रेश झाली, वाश रूम मधून आली तेव्हा अमितने त्याचा बिछाना खाली टाकला होता. आणि तो पुस्तक वाचत होता.

आसावरी काहीच बोलली नाही आणि निमूटपणे झोपली.

आसावरी आणि अमितच हे दुसरं लग्न होतं, अमीतची पहिली बायको, बाळंतपणात वारली होती आणि नंतर काही महिन्यात बाळही राहिलं नाही, दोन वर्ष त्याला ह्या धक्यातून निघ्याला लागले. कसाबसा तो लग्नाला तयार झाला होता. खरं तर तो कावूच्या प्रेमात पडला होता, तिला बघतातच त्याला त्याची मुलगी मिळाली होती. कावूही अमितला बाबा मानून चुकली होती.

कावूने तीन वर्षा आधी एका अपघातात तिच्या बाबांना गमावलं होतं. साधारण एक वर्षाची होती ती तेव्हा, बाबांचा चेहराही तिला माहित नव्हता पण आमित आता तिचा बाबा होता.

तसं म्हटल तर असावारीने ह्या लगनाला मंजुरी कावू मुळेच दिली होती. रंजितशी तींचा प्रेमविवाह झाला होता, आणि तो देवाघरी गेल्याने तिला सासरी जागा नव्हती. भावाने बहिणीला स्वतः कडे ठेवलं होतं, त्याचाही प्रेम विवाह होता मग तिला तो समजत होता, भावाच्या प्रयत्नाने आज ती परत लग्नाच्या बंधनात होती.

सकाळी ती उठली तेव्हा, अमित तिला खोलीत दिसला नाही, त्याने त्याच अंथरूण गुंडाळून ठेवलं होतं. असवारीने भ्र्राभर स्वतःला आवरलं आणि ती खोलीच्या बाहेर आली, ती कावूच्या खोलीत शिरली तेव्हा अमित कावूला भरवत होता. ती शाळेसाठी तयार झाली होती. आसावरी दिसताच म्हणाली,

मम्मा, बाबाने मला तयार करून दिलं, हे बघ माझ्या पोनी पण टाकून दिल्यात, मस्त दिसत आहेत ना.

असवारीने तिला उचललं, गोड पापा घेतला, आणि तिला खाली ठेवत ती अमितला म्हणली, “अहो मला उठवायचं ना, आज कावू चा पहिला दिवस आहे ना ह्या इकडल्या शाळेत.”

“अग तू निवांत झोपली होतीस आणि मला तर सकळी उठायची सवय आहे, आणि कावू रडत होती, आईला आवरत नव्हती मग मी आलो लगेच उठून. “

आसावरी जरा गोंधळली, काहीच न बोलता ती कावूच्या खोलीतून ती स्वयंपाक खोलीत वळली, तिकडे तिची सासू आणि सासरे एकमेकांशी बोलत पोहे करत होते. आसावरी लगेच म्हणाली, “मी करते ना, तुम्ही व्हा बाजूला आई.मी आवरते आता, मला जरा वेळ झाला, उद्या लवकर उठते आ आई...”

सासू तिला म्हणाली, :असुदे ग, मला सवय झाली आहे आता आणि आम्हाला कसा कमी तिखट, कमी मीठ असा हवा आता, तू अमित साठी कर. झणझणीत...”

“नाही हो आई, करेन मी, आज बघते मग उद्यापासून करते मी.. सांगा मला.”

“बऱ तेही ठीक, पण तू अमितसाठी कर, आम्ही आमच्या दोघांचा केलाय बाबा, काय हो, जा तिकडे बागेत खुर्च्या टाका, मी आलेच पोहा घेवून.”

नंतर ती प्लेट घेवून जात होती तर परत वळत म्हणाली, “आसावरी तू फक्त अमितला बघ, बाकी मी आहे ग, मला ह्या घरात परत प्रेमाची हिरवी पालवी फुटतांना बघायची आहे. अमित खूप वयस्कर वागतो, त्याच ते खळ खळून हसणं ह्या घराने वर्ष झालीत ऐकलं नाही... आम्ही म्हातारे झालोत आता. त्याला कुठवर साथ देणार...” आईचे डोळे पाणावले होते. जातांना त्या परत म्हणल्या, “काही घाई नाही ग आमची...”

मग हळूच म्हणाल्या, “तो चहा ठेवला आहे जरा गरम करून आणुन देशील ना...”

आसावरी दचकत म्हणाली, “हो आणते मी.”

काही वेळाने अमित आणि कावू अगीद्च तयार होवून हॉल मध्ये आले. आसावरीने खमंग पोहो केला होता, अमित ने मस्त मज्जा घेत खाल्ला, त्यालाही आज खूप दिवसाने नवीन चव चाखायला मिळाली होती.   दोहेही कावू सोबत बोलत एकमेकांशी बोलत होते.

दिवस भराभर जात होती आणि रात्री कुशी पलटत होत्या. अमित कावू सोबत खूप रमला होता पण अजूनही आसावरी स्वतःला त्याच्याकडे ओढल्या जात नव्हती. तिच्या मनात रंजित अजूनही घर करून होता. घरात वावरतांना ते आसावरी अगदीच शांत असायची पण मनातून तितकीच ती अशांत होतं गेली होती. रंजितच्या आठवणी आता फक्त तिच्या मनात राहिल्या होत्या.

त्या दिवशी असावारीच्या पर्स मधून रंजीतचा फोटो कावूने अलगत काढला, म्हणाली, “मम्मा हा फोटो कुणाचा ग, बाबांचा नाही, तू बाबाचा ठेव ना.”

म्हणत तिने रंजित चा फोटो काढून खाली टाकला, आणि ती अमितचा फोटो आणायला धावली.

आसावरी क्षणभर स्तब्ध झाली, गरगरलं तिला, तोच समोर रंजित उभा राहिला, “आसू काय हे, मला विसरू नकोस पण समोरचा असून त्याला तू विसरत आहेस. आपली कावू .....”

“आपली कावू विसरली रे...”

“विसरली नाही ती पण तिने सगळं स्विकरलं आहे आणि जगत आहे आनंदाने.... तू अजूनही अडकली आहेस माझ्यात, मी निघालोय ग कधीचाच तुझ्यातून.”

आसावरी रंजितला थांबवत रडत होती, तोच कावू खोलीत शिरली, आईला रडतांना बघून ती बाबांना बोलवायला परत धावत गेली.

अमित कावू सोबत खोलीत आला, त्याने कावूला जायला सांगितलं, दार लावलं, निवांत बेडवर बसला, “आसू, “

आसू म्हणताच आसावरी चकित होवून त्याच्या कडे बघत राहिली

“चालले ना आसू म्हटल तर....”अमित शांत पणे म्हणाला

आसावरी काहीच बोलली नाही

अमित परत म्हणाला, “आसावरी, सगळं नीट होईल, तू त्रास करून घेवू नको, तुला काही कुणी बोलत आहे का. मग तुझ्या कलाने घे ना... आपल्याला तर बाबा काही घाई नाही.” आणि तो उठून जवळ आला, तोच आसावरी त्याला बिलगली, रडत होती, अमितने मोठ्या हिमतीने तिला हात लावला, त्याचही मन कही दिवसापासून कोरडच होतं, एका ओल्याव्याची जाणीव झाली.

कावूने दार ढकललं आणि ती ओरडायला लागली, “बाबा मम्मा ची गट्टी झाली वाटते.” आणि ती दोघांच्या जवळ आली,

पुढे आसावरी आणि अमितच नातं कसं बहरत जातं वाचूया पुढच्या भागात, पुढचा भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2021/07/blog-post_4.html


पुढच्या अपडेट साठी पेजला लाईक करा https://www.facebook.com/manatlyatalyat

-उर्मिला देवेन 

Post a Comment

0 Comments