घरात पाय ठेवताच मोहन राधिकेला म्हणला, "मस्त पार्टी होती ना, मज्जा आली, यार मिसेस राणे खुपच मॉर्डन ना, काय फिगर आहे यार... मस्त मेंटेन केलं आहे त्यांनी. आणि ड्रसींग सेन्स तर शिकायला पाहिजे त्यांच्याकडून, शिक ग जरा, मानलं आपण त्यानां."
असं म्हणत मोहनने पायातले सॉक्स काढून बेडच्या खाली कोंबले आणि बेडवर
ताणून पडला आणि पार्टीचे फोटो मोबाईलवर बघत होता. आणि राधिका भडकली," हे असं... हे.. संदीप करत नाही ना म्हणूं संजना राणे ला वेळ मिळतो, उचल
ते सॉक्स आधी बेडखालून आणि पाय धुवून ये.. आला मोठा ड्रेसिंग सेन्स शिक म्हणारा." मोहनने स्वतःच्या
पायच वास घेतला आणि नाक मुरडत लगेच बाथरूम
मध्ये पळाला. इकडे राधिका, हातातल्या बांगड्या काढत ड्रेसिंग टेबल
पुढे बसली होती आणि पुटपुटायला लागली, "मी एवढ्या दिवसाने
अगदीच नवीन फॅशनची साडी घातली, त्याची
एक शब्दाचीही तारीफ नाही आणि दुसऱ्याच्या बायकोची मोठी स्तुती करत आहेत." असं म्हणत तिने
जराही वेळ न घालवता साडी काढली आणि चोळा मोळा करून बेडवर फेकली. तेवढ्यात मोहन खोलीत
शिरला आणि म्हणाला, "अरे... हि साडी तू कधी घेतली आणि तिला अशी का फेकली ?"
राधिका अगदीच चिडून बोलली, "मला आवडली नाही ती,
संजना
सारखे ड्रेस घ्यायचा विचार करतेय आता.. "
मोहन हसतच म्हणाला,
"आधी वजन कमी करा.. मग
घाला तसले मॉर्डन ड्रेस .."
आता मात्र मोहनच खरं नव्हतं. पण राधिकाने स्वतःला खुपच आवरलं आणि खोलीतून
निघून गेली वॉश रूम मध्ये.
परत येवून ती भांडण्याच्या मूड मध्येच होती पण मोहनराव
निवांत झोपले बघून राग गिळून तीही झोपली.
सकाळी राधिका सगळं विसरून कामाला लागली, स्वयंपाक घर आवरून
ऑफिसच्या तयारीत होतीच तर मोहन मध्ये मध्ये करत ऑफिस साठी तयार होत होता. राधिकाने
आज जीन्स घातला होता आणि ती टॉप मॅच करण्यासाठी कपाट खोलून बघत होती, तेवढ्यात
महाशय ओरडले, "हे काय?.... कसला
चॉईस ग तुझा.... ना तुला धड तुला एक टॉप मॅच करता येत,"
राधिका म्हणाली,
"ये इकडे जरा... तुझा
चॉईसचा घालावं म्हणते, आणि काय रे जेव्हा तेव्हा माझा चॉईस काढतोस, तू माझाच चॉईस आहेस
ना..." मोहनची बोलती बंद झाली होती. तो तिच्यासमोरून निघून हॉल मध्ये ऑफिसच्या
फाईल्स जमा करायला निघून गेला. राधिकाने सुंदर गुलाबी रंगाचा टॉप अंग झाकेल असा काढला
आणि त्यावरच सगळं मॅचिंग घालून ती ऑफिस साठी तयार झाली. ती स्वतः तयार झाली आणि आता
ती मोहनला मदत करत होती. पण मोहन काही तिला स्तुतीचा एक शब्दही बोलत नव्हता. शेवटी
वैतागली आणि म्हणाली, "ये जरा आवर लवकर मलाही वेळ होत आहे तुझ्यामुळे. मी खाली पार्कींग मध्ये थांबते आणि मला
त्या वॉच मॅन सोबतही बोलायचं आहे." ती
घरातून निघाली.
मोहन मस्त खूप पर्फुम लावून, गॉगल वगैरे लावून हातात गाडीची चाबी हलवत
खाली आला. समोर शेजारची लतिका स्कुटी सूर करत होती आणि तिची स्कुटी काही केल्या सुरु
होईना. मग मोहन ने स्वतःच गॉगल आवरत तिला म्हण्टलं, "वहिनी, मी जरा प्रयत्न करतो. मोहनने लतिकाची स्कुटी सुरु करवून दिली आणि तिला
असा चोक द्यायचा हेही समजावून सांगितलं. राधिका दुरूनच वॉच मॅनशी बोलत सर्व बघत होती आणि मनातल्या मनात मोहनला
बघतेस तुला असं म्हणत होती.
संध्याकाळी ती घरी आली आणि छान मोहनच्या आवडीची वडीची भाजी बनवली. मोहन घरी आला आणि जेवायला
बसला आणि त्याने लोणचं मागितलं. आता राधिका बोलली, "का? भाजी छान झाली नाही का? लोणचं तुला का हवं? तू तर फक्त भाजी तुझ्या आवडीची नसली कि
खातोस ना". मोहन
उत्तराला, "भाजी बारी झाली पण यार तशी चव नाही जी तुझी ती मैत्रीण करते, शिक
ग तिच्या कडून, काय नाव आहे तीच .." राधिका
रागातच म्हणाली, "सुनीता,"
आता राधिका हसली
आणि म्हणाली, "मोहनराव आता तुम्ही मला काही प्रस्नाची उत्तर द्या
लग्नाआधी मी साडी नेसले कि तुमचा जीव खाली वर व्हायचा, हो कि नाही?"
मोहन.. "हो ग
काय दिसायची तू.. म्हणजे आताही दिसतेस... "
राधिका, "माझ्या
हातच्या वडी भाजीची सर कोणत्याच भाजीला नाही हे तुमचंच वाक्य, हो कि
नाही?"
मोहन, "म्हणजे, बायको कुणाची आहे
"
राधिका, "पंधरा
दिवसाआधी माझी स्कुटी बंद पडली होती, ती अजूनही तू बघतली नाहीस. हो कि नाही?"
मोहन, "अग,
बघणारच
आहे मी .. "
राधिका, "आता
तुला, मिसेस राणे चा चॉईस मस्त वाटतो, ललिताला चोक कसं
लावायचा गाडीला तुला छान समजावून सांगता येत, सुनीताच्या हातची
वडी भाजी तुला खुप आवडली.. ह्या सर्वांचा माझ्यावर काहीच फरक पडणार नाही का? माझ्या मनाला कुठलाच त्रास होत नसेल का? आता तर मी मानूनच घेते कि माझा चॉईसच खराब आहे आणि ती माझी चुकी आहे...”
मोहन, "अग पण त्यात काय एवढं, जे खरं
आहे ते आहेच ना."
“हो ना, म्हणजे तुही माझा चॉईस आहेस, समजलं."
ती सरळ स्वयंपाक घरातून निघून आणि गुमान झोपली. मोहनला कळून चुकलं होत
कि आपल्या बोलण्याने राधिका दुखावली आहे म्हणूंन पण तो तिला जाणून होता आणि त्याला
माहित होत कि तो जर आता तिच्याशी बोलला तर वाद हा होणारच मग तोही हळूच बेडवर जावून
झोपला.
दुसऱ्या दिवशी मोहन राधिकाला घ्यायसाठी तिच्या ऑफिस मध्ये पोहचला आणि हे राधिकाला माहित होत. तो ऑफिस
मध्ये येताच ऑफिस बॉयने त्याला बसायला सांगितलं आणि मॅडम मोठया साहेबांसोबत अतिशय महत्वाच बोलत आहेत असंही
सांगितलं. अर्धा तास झाला तरी राधिका काही बाहेर आली नाही. मग ती आणि तिचा बॉस दोघेही
हसतच बाहेर आले. राधिकाने मोहनची ओळख करून दिली. तिचा बॉस म्हणाला, "मोहन,
तू खूप
नशीबवान आहेस, बायको हुशार आहे तुझी. मला ती माझ्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये हवी असते". तिचा बॉस ज्या
पद्धतीने तिची तारीफ करत होता मोहन पूर्ण चिलबिचल झाला होता. त्याने राधिकाला लवकर
घरी चल असं म्हण्टलं. नंतर टू व्हिलरवर राधिका बॉस च्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वावर
खूप वेळ बोलत राहिली आणि ते दोघेही घरी पोहचले.
शेवटी मोहन म्हणाला, "पुरे आता ..
राधिका," काहीतरी जळतंय का ?
मोहन, "मी जस्ट फॅन लावला .." आणि मोहन थांबला
.. त्याला राधिकाच्या बोलण्यातला ओघ कळला होता ..
मग राधिका मोहन जवळ जावून म्हणाली, "अरे मन मोहना.. माझंही
मन जळतच ना ... तुझ्या पेक्षा दुसरा कुणीच रुबाबदार नाही माझ्यासाठी.. पण, नेहमीच आणि प्रत्येक गोष्टीसाठी
दुसऱ्याची स्तुती समोरच्याला जाळते रे .. थोडं थोडं .. आणि ह्यालाही प्रेमच म्हणतात..
पण अतिरेक समोरच्याला धाराशीही करतो .. जसा तू झालास आता.. आणि समोरच्याचा तोल बिघडू
शकतो नात्यातला... मन जाळावं थोडस पण थोडं थोडं करून पूर्ण
नाही .. आणि विसरू नका समोरचा प्रेम करणाराहि तुझंच प्रतिबिंब असतं. आणि स्वतःला जाळण्याचं
काम अजूनतरी कुणी केलेलं मला आठवत नाही .. "
मोहन पार धाराशाही झाला होता आणि परत तिच्या प्रेमात पडला... आणि लाडात येवून म्हणाला, "आता तर मी तुझ्यामुळे
जळालो..."
राधिका, "मग मी आहेच तशी .. "
मोहन राधिकाला मिठी मारत म्हणला, "बायको कुणाची आहेस.."
कथा कशी वाटली नक्की कळवा.
माझ्या नवीन कथेसाठी पेजला लाईक करायला विसरू नका....https://www.facebook.com/manatlyatalyat
जोडीदार तू माझा कथा मालीका भाग 6 पर्यंत YouTube channel आहेत
©उर्मिला देवेन
0 Comments