माझा शृंगार माझा अधिकार आहे.





आयुष्यही कसं ना? खूप अनपेक्षित समोर घेवून येतो.  मनालीच जेमतेम लग्न झालेलं. लग्नाची नवलाई सरली आणि आता कुठे ती घरात रुळायला लागली होती तर तिच्याच वयाची तिची नणंद लग्नाच्या अवघ्या दोन वर्षात अचानक विधवा झाली. तिच्या रंगिबिरींगी आयुष्यात अचानक पांढऱ्या रंगाने शिरकाव केला. आई बाबा तिला माहेरी घेवून आले.

चंचल स्वभावाची नणंद सुधा काहीशी स्वतःमध्ये मग्न राहत होती. रंगाशी खेळणारी अचानक पांढऱ्या रंगात गुरफटून गेली. स्वतःला सतत आरश्यासमोर ठेवणारी आरश्याकडे ढूंकूनही बघत नव्हती. तिच्या मॅचिंगच्या कॅललेक्शची तोड कुणाचंकडे नसायची. श्रुंगार कसा करावा हे सुधाला पक्क माहित होतं पण आता ती शांत झाली होती. तिच्यातला श्रुंगार निघून ती फक्त गार झाली होती.

आता मनालीलाही प्रश्नच पडला होता. नणंद एवढ्या दुःखात लोटली आहे मग ती भरभरून श्रुंगार करू शकत नव्हती. लहानपानपासून नवनवीन गोष्टी घालणं,  स्वतःला टपटीप ठेवणं तिला खूप आवडत होतं. पण नणंदेच्या दुःखात तीही मनाने दुखी झाली होती. लग्नाला जेमतेम दोन महिने झाले होते आणि तिच्या इच्छा आता मनातच कोंडून राहत होत्या. नणंदेसमोर ती काही हौसेने नवीन घालून मिरवूही शकत नव्हत , सासू तिला बघून चिडायची आणि मुलींसाठी अश्रू गाळायची. दोन महिने अशेच निघून गेले. मनाली मानसारखं काहीही घालून मिरवू शकत नव्हती, नणंद श्रुंगार विसरलेच होती आणि सासू मनात असूनही सुनेच कौतुक करू शकत नव्हती उलट तिला कटू शब्द बोलून मुलींसाठी पांझरा झाली होती.

मिथलेश मनालीला समजवायचं कि आई तशी नाही, जरा ताईच्या दुःखात वाहवत आहे, जरा सगळ्यांना वेळ दे. मनालाही सर्व समजुन घेत होती.  पण आता तिलाहि नणंद आणि सासूला असं बघवत नव्हतंच. त्या दिवशी ती स्वतः बाहेर गेली आणि सर्वांसाठी खरेदी करून घरी आली, बैठकीत सर्व बसले असतानाच तिने सर्वाना नवीन कपडे दाखवले. सासू हक्का बक्का झाली आणि काही बोलणंच तर मनाली नणंदेला म्हणाली, "ताई, मला ना कळतच नव्हतं, ह्या साडीवरच नेमकं मॅचींग ब्लॉउज कसं राहील, तुम्ही जरा माझ्यासाठी उद्या आणाल का? तुमचा चॉईस आणि मॅचिंग सेन्स उत्तम आहे. मी आपलं कसही घालते. मला हसतात त्या शेजारच्या काकू. मेथिलेशचा वाढदिवस येतोय ना. काहीतरी नवीन करावं म्हणते." सासूला मनात वाटत होतं, माझ्या लेकीची दुनिया लुटली आणि हि तिचं मनही लुटते आहे पण घरात मुलगाही होताच मग तिने सुनेला काहीच म्हण्टलं नाही आणि गुमान बैठकीतून निघून तिच्या खोलीत निघून गेली. आता फक्त सुधा आणि मनाली बैठकीत होत्या. हळूहळू सुधा मनालीला मॅचींग कसं करायचं सांगता सांगता अगदीच मग्न होवून गेली. तेव्हढ्यात मनालीने नवीन पॅटर्नचा आणलेला सूट तिच्या हातात ठेवला आणि म्हणाली, "सुधा ताई प्लिज माझ्यासाठी करा ना सगळं मॅचींग कलेक्ट." आणि सुधाने बोलण्याच्या ओघात तिला होकार दिला.

दुसऱ्या दिवशी सुधाने सगळं मॅचींग जमवलं होत सुटनुसार. आणि ती सगळं घेवून मनालीकडे निघणारच होती तर मनाली तिच्या खोलीत आली आणि म्हणाली, "ताई ते सगळं तुमच्यासाठी आहे. तुम्हाला आवडतं हे सगळं करायला मला माहित आहे. घाला तुम्ही सगळं, कुणीही काही म्हणणार नाही.. शृंगार हा तुमचा अधिकार आहे. तो कुणीही हिरावून घेवू शकत नाही. पतीसोबत सर्वच श्रुंगाराचे अधिकार संपतात हे कुणी सांगितलं तुम्हाला. लग्नाधीही तुम्ही श्रुंगार करायच्याच ना! मग आता का नाही?"

 सुधाने सर्व सामानाला हात लावला आणि खूप रडली.... जे अश्रू गोठले होते तेही वाहून निघून गेले. ती हळू हळू श्रुंगारात परत रस घेवू लागली. हलकंसं सगळंच मॅचींग वापरायला लागली होती.
सासूला सुधाला असं सुंदर बघून खूप बरं वाटत होतं आणि मनालीला मनमोकळ्या मॅचिंगच गॉसिप करायला मैत्रीण मिळाली होती. तिलाही अवघडल्या सारखं वाटत नव्हतं. सुधा आज मनालीसोबत बाहेर निघाली होती अगदीच दोघीमध्ये मॅचींग आणि सर्वच गोष्टीच स्पर्धा होती आणि हे स्पर्धा आनंद देणारी होती.

बाहेर सुधाला तिच्या सासरच्या गावची शेजारीण दिसली, तिला असं बघून अवाकच झाली, आणि तिला जवळ येवून म्हणाली, "ये सुधा शोभत का ग तुला? असं मेकअप वगैरे करून बाहेर फिरणं!  नवरा जावून वर्ष नाहीना झालं तुला. काय बाई कहर आहे.. कलयुग आहे हे ... कलयुग! " सुधा आणि मनाली  एकमेकींकडे बघत जरा शांत झाल्या, मनाली समोर जावून बोलणारच होती तर सुधाने तिला थांबवलं आणि म्हणाली, "काकू, नवरा जाण्याचं दुःख काय असते ते तुम्हाला नाही कळणार हो!  त्यासाठी त्यातून जावं लागतं. त्याला मी अशीच आवडत होती मग मी अशीच राहणार.... आणि माझा श्रुंगार माझा अधिकार आहे. जो त्याचा कधी नव्हताच मग तो हिरावून का नेणार ...

आणि मग दोघीही तिथून निघून मिथलेशसाठी शॉपिंग करायला निघून गेल्या. काकू खूप वेळ पर्यंत त्या दोघींकडे बघत राहिली आणि मग स्वतःच हसली आणि म्हणाली, "बरोबर तर आहे, माझा श्रुंगार माझा अधिकार आहे .

कथा कशी वाटली नक्की सांगा.
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव






Post a Comment

0 Comments