तू हो पुढे...
बोटं तेच उचलता जे बोटं लावू शकत नाही...
लोकांचं काय? तू हो पुढे, तू खचायचं नाही!

कितीही केले कुणासाठी, तरी ते सरत नाही...
लोकांचं काय? तू हो पुढे, तू खचायचं नाही!

तू हसला कि जग रडेल,
तू रडला कि ते हसेल,
तू जिंकला तर जळेल,
तू हरला तर ते मोहरतील,
आत्मविश्वासाशिवाय तुला कुणाची खरी साथ कधी मिळणार नाही...
लोकांचं काय? तू हो पुढे, तू खचायचं नाही!

तू स्वार्थी होशील, जेव्हा तू प्रगती करशील,
तू शिखरावर असशील, तेव्हा तुझे पाय ओढल्या जातील,
तू सर्वांचा राहशील, पण आपल्यांचा राहणार नाही...
लोकांचं काय? तू हो पुढे, तू खचायचं नाही!

भावना ठेचल्या गेल्या, कि मन मरतं,
मेलेल्या मनात, नकारात्मक वारं शिरतं,
खिळलेल्या नजरांना, तेंच हवं असतं,
मग नजरेतून उतरल्यांचा त्रास करून घ्यायचा नाही...
लोकांचं काय? तू हो पुढे, तू खचायचं नाही!

अपयशातून यशाकडे जाणारा अनुभवांचा राजा असतो
तो राजा मग काहींच्या मनात तर काहींच्या मेंदूत राहतो
आयुष्याचा काळ मानवी संकटाने पुढे जातो
मग अश्या आयुष्यातल्या संकटांना आता घाबरायचं नाही
लोकांचं काय? तू हो पुढे, तू खचायचं नाही.


©उर्मिला देवेन
तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!
सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव
नोट- मनातल्या तळ्यातच्या वेबसाईटच्या पुनर्वसनाच काम सुरु आहे. अश्या करते आपण समजून घ्याल.
धन्यवाद!

Post a Comment

0 Comments