पंगा- जो सपने देखते है ओ पंगा जरूर लेते है...
समीक्षा- सिनेमा पंगा
निर्देशन- अश्विनी अय्यर.
अश्विनी अय्यर तिवारी निर्देशित पंगा ह्या सिनेमातील अतिशय सहज बोलल्या गेलेला डायलॉग ज्याने सर्व मातांना मनातून भावूक करून टाकलं, 'मैं एक मां हूं और मां के कोई सपने नहीं होते।' पण हे बोलतांनाही नायकेच्या जया निगम (कंगना रनौत) मनातले दुखलेले भाव सहज पडद्यावर दिसतात आणि नायिका सर्व मातांच मन पडद्यावर आणते.
नायिकेने मनातल्या भावना सहज परद्यावर साकारल्या आहेत जणू ती एक सामन्य स्त्री भासते. तिची मुलासाठी आणि घरासाठीची तळमळ हे हुबेहूब पाहायला मिळते.
स्त्रीचे स्वप्न लग्नानंतर समाप्त होतात हा विचार करून मुलाच्या आणि नवऱ्याकडे बघत जगणारी कुठेतरी मनात खुडत असते हा दाखवला संवाद मनाला हालवून टाकतो. चक्क बघणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तो आपलासा भासतो, 'तुमको देखती हूं तो बहुत खुशी होती है, इसे (बेटे) को देखती हूं, तो खुशी होती है, मगर खुद को देखती हूं, तो खुश नहीं हो पाती'
सिनेमाची नायिका हि लग्ना आधी कब्बडी प्लयेर असते आणि कॅप्टनहि. प्रेमाच्या दुनियात अलगत पाऊल ठेवते आणि लग्नाच्या बांधत बांधली जाते. येणाऱ्या परिस्थितीला सामोरी जात तिची नौकरी, घर, सात वर्षाचा मुलगा आणि प्रेम करणारा नवरा ह्यात ती खूप खुश असते पण कुठतरी मनात खुडत असते. एकेकाळी स्वप्नांच्या पंखांना लावून उडणारी आज स्वप्न बघते तेही मुलासाठी आणि नवऱ्यासाठी.
सामन्य स्त्रियांचा जसा घरात कुणीही अपमान करतं तसा काहीसा तिच्या मुलाकडूनहि तिचा होतोच पण मुलाला जेव्हा वडिलांकडून समजतं कि त्याची आई हि कब्बडी चाम्पियान राहिली आहे आणि तिने कब्बडी सोडण्याचा निर्णय फक्त मुलासाठी घेतला तेव्हा मात्र मुलगा जिद्द घेवून बसतो कि आईने ३२ व्या वर्षी परत कमबेक करावं. कब्बडी खेळावी आणि चान्पियन व्हावं. मुलाला समजण्यासाठी केलेलं नवरा बायकोचं नाटक केव्हां तिचं पडीत राहिलेलं स्वप्न जिवंत करतं हे तिलाही कळत नाही आणि मग ती तिच्या सांसरिक जीवनात पग्गा घेते.
परद्यावर साकारलेलं प्रत्येक पात्र हे अगदीच सहज आणि वस्तीवक आहे. त्यातल्या त्यात बिहारी भन्नाट नायिका रिचा चड्ढा हिची देहबोली आणि रसरशीत संवाद सेनेमाला आणखीनच पंगेदार बनवतात. तिच्यासारखी सपोर्ट करणारी एखादी मैत्रीण आयुष्यात असावी असाच वाटून जातं.
सिनेमा आणि तोही कब्बडी ह्या खेळावर तोही हाऊसवाईफ वर केंद्रित, अगदीच सामान्यपणे सामान्य लोकांसाठी चित्रित करणं हा खरंच एक पंगा होता अश्विनी अय्यर साठी. पण स्वप्न बघणारे पंगा घेतात हे दाखवून दिलंच त्यांनी.
जरा विचार करा. खरच पग्गा आहे कि नाही स्वतः हून गाडलेल्या स्वप्नांना पुन्हा जागृत करणं सोपं असतं का? होणारी मानसिक चीलबीचल अगदीच नेमकी साकारली आहे नायिकेने.
म्हटलं तर सिनेमा पूर्ण आधीच समजतो पण प्रक्षकांना खिडवून ठेवण्याच काम प्रत्येक नायक नायिकेने अगदीच मनातून पूर्ण वाव देवून केलय.
शिकलेल्या आणि लग्नाआधी स्वतःची अशी एक ओळख असणाऱ्या कहि जया निगम आपल्या समाजात आहेत ज्या स्वतःच्या स्वप्नांना जगण्याची इच्छा मनात मारून आहेत.
सिनेमा सांगून जातो कि घरात सपोर्ट सिस्टीम स्ट्रॉंग असली कि कुठलीच स्त्री कुठलाही पंगा घ्यायला मागे पुढे पाहत नाही. आज समाजाला अश्या सपोर्ट सिस्टिमची जास्त गरज आहे. घरातली स्त्रीच जर पंगा घेत असेल तर तो काहीसा घरातल्या सर्वांसाठीच पंगा असतो नाहीका ...
पंगा हा सिनेमा प्रत्येक प्रेक्षकाला आणि स्त्रीला हेच सांगू इच्छिते कि प्रत्येक स्त्री हि आयुष्यात पंगा घेवू शकते हा तिचा स्वतः चा अधिकार आहे. आणि तिने तो गाजवावा कि नाही हा हि सर्वस्व तिचाच अधिकार आहे. आणि प्रत्येक स्त्री हि स्वतःच्या स्वप्नांना जगू शकते जर घरच्यांची साथ असली तर.
मग घेताय ना पंगा...क्युकी जो सपने देखते है ओ पंगा जरूर लेते है... स्वप्न जगण्याची नवीन उभारी हवी असेल तर पंगा जरूर बघावा ...
©️उर्मिला देवेन
तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव
0 Comments