समीक्षा - अंतू बर्वा



समीक्षा - अंतू बर्वा
पुस्तक - व्यक्ती आणि वल्ली
लेखक- पु. ल. देशपांडे. 
प्रकाशन - मौज प्रकाशन. 

Pages: 202    

व्यक्ती आणि वल्ली हे पु. ल. देशपांडे ह्यांच्या काल्पनिक पण वास्तविकता दर्शवणारं व्यक्तिरेखां  संग्रह आहे. पु. ल. देशपांडे ह्यांनी प्रत्येक व्यक्ती हि अशी रेखाटली आहे जी आपल्यामध्येच जाणवते. आयुष्याच्या प्रत्येक चढउतारात आपण अश्या अनेक विसंगती करतो पण सहजासहजी दर्शवत नाहीच. मग तिची व्यक्ती आपल्यासमोर पुस्तकातून दिसली कि मनाला भरारी येते. कुठेतरी आपल्या सुप्त भावना आपल्याला शब्दात भेटतात आणि आपण मग्न होतो त्या पुलांच्या जादुई भाषेत.
माझ्या शबदात मी त्या पुस्तकाला एक जादूची झप्पी म्हणते. कारण जेंव्हाही मनातलं दुःख, त्रास, वेदना आणि बरच काही ज्याला शब्दाची बांधिलकी नाही त्या सर्व गोष्टी व्यक्त करण्यासाठी व्यक्ती आणि वल्ली वाचावं. चढणाऱ्या प्रत्येक श्वसात एक टॉनिक मिळते.
पुलांनी बऱ्याच व्यक्ती पुस्तकातून आपल्या भेटीला आणल्या, नारायण, हरीतात्या, चितळे मास्तर, बबडू, नाथा कामात.... पण ह्या सगळ्यांमध्ये मला एका स्त्री मनाला भावून जातात ते अंतू बर्वा काका. 
व्यक्ती तीलं वल्ली अचूक टिपलेलं ह्या पुस्तकातील प्रत्येक पात्र वाचतांना जिवंत होतं, त्यातले काही पात्र जिवंत होवून आपण त्यांना काल परवाच भेटल्याचा भास होतो. माझ्या माहेरी गेली कि मला शेजारी आणि नातेवायकात अंतूशेट सापडता ज्यांच्या मनात जावयाला न दुखवता, त्यांच्या मनासारखं बोलून, स्तुती करून मुलीसाठी काळजी असावी हा भाव त्यांच्या अलगत शिरवतात. गावातल्या नवीन जवायला गावाशी नातं जोडण्यासाठी ओळखी नसतांनाही केलेला हा अंतू शेट चा प्रयास चटकन मनाला भावून जातो.
वकीलसाहेबांचे जावई ना ?"
"हो!"
"झटक्यात ओळखलेंच मी! बसा! बापू, जावयबापूंना चहा मागवा"
"तुमचे सासरे दोस्त हो आमचे. सांगा त्यांना अंतू बरवा विचारीत होता म्हणून."
"ठीक आहे !"
"केव्हा आलात पुण्याहून ?"
"परवाच आलो."
"बरोबर. दिवाळसण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी! काय?"
"तुमचे दोस्त आहेत ना, तुम्हीच सांगा."
"वा! पुण्याचे तुम्ही. बोलण्यात ऐकणार काय आम्हाला! मग मुक्काम आहे की आपली फ्लाईंग व्हिजीट ?"
"दोनतीन दिवसांनी जाईन !"
"उत्तम ! थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कपोसकर वकिलाच्या जावयासारखं नका करू. त्यानं सहा महिने तळ ठोकला. शेवटी कपोसकर वकिलान् एक दिवस खळं सारवायास लावलं त्यास ! जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो. कसं ?"
"बरोबर आहे !"
"बापूशेट, ओळखलंत की नाही ? आमच्या वकिलांचे जावई ! आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार हो !"
हेगिष्ट्यांनी नमस्कार केला.
"चहा घेता ?"
किती वास्तव दर्शविणार सवांद आहे हा, कदाचित सर्वांच्या परिचयाचा. काल्पनिक वाटतच नाही.
जगातल्या सर्व घडामोडींना विनोदाने उत्तर देणारे जरा मित्राच्या मुलींसाठी भावुक होतात तो क्षण समोर उभा राहतो. जावयाशी बोलतांना त्याच्या मनात जाणवणारी गावातल्या मुलीविषयीची काळजी त्यांच्या त्या स्वभावाचा अतिशय आतला गाभारा दर्शवते.
 "वा वा ! कांग्रेचुलेशन हो जावयबापू ! इंग्लंड ला जाणार कळलं आम्हांला. जाऊन या हो. एक रिक्वेष्ट आहे. आता इंग्लिश बोललं पाहिजे तुमच्याशी."
"कसली रिक्वेस्ट ?"
"तेवढा कोहिनूर हिरा पाहून या. माझी आपली उगीचच तेवढी इच्छा राहिली हो ! पिंडाला कावळा नाही शिवला तर कोहिनूर कोहिनूर म्हणा. शिवेल ! परत आल्यावर सांगा कसा दिसतो. लंडन, प्यारिस सगळं बघून या."
"आयुष्यमान् व्हा ! श्रद्धाळू आहात, म्हणून यश आहे हो तुम्हाला."
"ओ जावयबापू --- !"
"काय अंतूशेट ?"
"जाताय ते एकटेच की सपत्नीक ?"

"आम्ही दोघेही जातोय."
"हे चांगलं केलंत ! उगीचच एक किडा आला डोक्यात. म्हटलं, परदेशी विद्या शिकायला निघाला आहात --- देवयानीची कथी आठवली. काय ? आमच्या मुलीलाही आशिर्वाद सांगा हो ! तुमचं भाग्य तिच्यामुळं आहे. तुम्हांला म्हणून सांगतो. मनात ठेवा हो. कुठे बोलू नका. चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली. दारचा हापूस तेव्हापासून ह्या घटकेपर्यंत मोहरला नाही. शेकड्यांनी आंबा घेतलाय एके काळी त्या आंब्याचा. पण भाग्य कुठल्या वाटेनं जातं बघा. असो. सुखरूप या. इथून प्रयाण केव्हा ?"
 मनाला भावून जाणारा संवाद आहे हा. एका स्त्रीसाठी एवढे शब्द पुरेसे आहेत, मुठभर मास चढायला. अंतूशेट ची बायकोवरची माया आणि मुलीचं प्रेम सवादांत दिसतं पण पुलांची शब्द रचना अशी आहे कि त्या रेखाटलेल्या व्यक्ती  स्वतः मध्ये असलेला वल्ली दर्शवत नाहीत.
वाल्याचा वालीमिकी झाला हि कथा सर्वांना माहित आहे पण प्रत्येक व्यक्ती मध्ये वल्ली हा असतोच हे सांगणारा एकमेव पुस्तक म्हणजे पुलांच व्यक्ती आणि वल्ली.

Post a Comment

0 Comments