मी मानिनी आहे माझ्या स्वाभिमानाची.....

 



मी मानिनी आहे माझ्या स्वाभिमानाची.....

अरुणाचा फोन वाजत होता, पण ती उचलत नव्हतीच, शेजारी बसलेली सवि तिला म्हणाली, "किती वेळचा वाजतोय, उचल कि

"असूदेत .. आज त्याची पाळी आहे... कधीकाळी मीही अशीच फोन करायची आणि समोरून कुणीच उचलत नव्हतं

तो फोनवर काय बोलणार आहे हे मला माहित आहे ... "

"बोलावतोय ना तो तुला ..काय विचार केला तू ...परत जाणार का त्याच मार्गावर?"

सवि बोलत होती आणि अरुणा तिचे बोट लॅपटॉपवर भराभरा चालवत होती आणि अलगत भूकाळात शिरली ... अमित त्या दिवशी तिला बघायला आलेला तरीही त्याची बोट लॅपटॉवर भराभरा चालत होती,  अरुणा जशी चहा घेऊन बैठकीत आली जरा वेळ शांतता पसरली. सर्व पाहुण्यामंडळीत फक्त अमितच्या कीपॅडचा आवाज होत होता. अमित भानावर आला आणि त्याने अरुणाला बघतच लॅपटॉप बंद केला.

अमित अमेरिकेत सेटल होता आणि घरच्यांच्या आग्रहास्तव भारतात येवून अरुणाशी लग्न करायला तयार झाला होता. आणि त्या दिवशी लागलीच टिक्याचा कार्यक्रमही होता. अरुणाला अमित खूप आवडला होता आणि ती खूप आनंदांत होती कि तिलाही आता अमेरिकेत जायला मिळेल. तिला सहज वाटलं, काय अटीट्युड आहे ह्या मुलाचा, भारीच दिसतोय, पण आवडला मला, नाहीतरी हे विदेशात राहणारे प्राणी असेच असावेत .”

अमितने अरुणाला सहज गोड हसत बघितलं आणि मग अरुणा फसलीच... अमितचा होकार होता आणि अरुणा निशब्द, मग सोयरीक फिक्स होती. आता मामाने मुलगा सांगितला म्हटल्यावर सगळं कसं निश्चित होतं. आणि ते खरंही होतच.  लग्नाचा बार जबरदस्त उडवला गेला. म्हटलं तर एकदम राजेशाही लग्न होत. महिन्याभरात सर्व आटोपलं. अरुणा लागलीच दोन दिवस सासरी राहून अमेरिकेला निघणार होती. माहेरी अरुणाची काळजी राहिली नव्हती कि तिला सासरी काही करावं लागेल... होता तो राजा राणीचा संसार, आणि तोही साता समुंद्रा पारं...

अरुणा अमितसोबत खूप आनंदात अमेरिकेला पोहचली. पहिले काही दिवस तिला घर लावण्यात आणि सगळं समजून घेण्यात तिला वेळ लागला. तसा अमितही कामावर रुजू झाला होता. महिना कसा गेला अरुणाला कळलंही नाही. घरातच एवढी बिझी असायची कि तिला कुठे अमित घेवून जात नाही हे लक्षातही आलं नाही. हळूहळू मग ऑर्कुट, नंतर फेसबुकशी ओळखी झाली.

घरापासून काही लांब एक भारतीय काकू पार्लर चालवायच्या, त्याच होत्या तिला बोलायला. त्यांच्याशी बोलल्या नंतर तिलाही अमेरिका फिरावं असं सहाजिकच वाटलं. त्या दिवशी अमित लवकर घरी आला आणि अरुणाच्या मागे लागला... अरुणाला हे त्याच तिच्यासाठीच प्रेमच आहे असच वाटायचं, प्रेमात तिने तिची इच्छा बोलून दाखवली आणि अमित भडकला,

"कशाला जायचं तुला बाहेर, काय कमी आहे घरात?"

"जावुयाना बाहेर, माझी आई विचारात होती, कुठे कुठे फिरायला गेलीस म्हणून ."

"तुझ्या आईला सांगायसाठी जायचं का ? "

"नाही तसं नाही, त्या काकू सांगत होत्या इथून जरा काही दूर एक धबधबा आहे म्हणे... जावुयाना तुला वेळ असेल तर."

"तुझे फालतू चोचले पुरवण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही"

अमितने रागात त्याचे कपडे केले आणि अमित खोलीतून सिगारेट ओढत निघून गेला.

अरुणाला क्षणभर कळलंच नाही, साध्याश्या माध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी होती ती, पदवीधर होती पण जरा खेडयात मोठी झालेली मग जिभीचा पट्टा चालवू शकली नाही.

अमित खोलीत परत आला आणि तिच्यावर आणखीनच जबरदस्ती करायला लागला... ती जरा अमितच्या अश्या वागणुकीने सावरलीच नव्हती मग तिने हलकासा नकार दिला तर त्या दिवशी तिने त्याचा खूप मार खाल्ला.

आता हळूहळू अमितचा उग्रपणा वाढत होता. कधी रात्री तिला मारणं, जारदस्ती करणं, नाही म्हटलं तर धमकी देणं.  घरात कंटाळून ती बाहेर मॉल मध्ये जायची.

एक दिवस अमित दुपारी नशेत घरी आला आणि अरुणा घरी नव्हती. काकू कडे थ्रेडींग करायला गेलेली, आणि मग काकूंनी तिला भारतीय मुलींच्या ग्रुपसोबत मिळूवुन दिलं होतं. बोलण्यात गप्पा गोष्टी करण्यात वेळ कळलाच नाही तिला. सर्वाना फ्रेंड लिस्ट मध्ये ऍड केलं तिने आणि आनंदात घरी आली. येतच तिला दारातून ओढत अमित खोलीत घेवून गेला आणि मग त्याने तिचा मोबाईल फोडला आणि तिला बेदम मारलं. आता मात्र तिने त्याचा हात पकडला, अमितचा अहंकार जागृत झाला त्याने तिला चक्क घरातून काढलं. तीही निघाली.. कुठलीही पर्वा न करता. रात्रभर बगिच्यात बसून होती. सकाळी नवीन मत्रिणींच्या मदतीने छोटस काम मिळवलं, पैसे जमवलेत आणि भारतात परत आली.

घरी कुणालाही विश्वास बसत नव्हता पण अरुणाच्या डोळ्यात ते जाणवत होत. सगळं थांबलं होतं पण तिने पुढे जाण्याचं ठरवलं, अर्धवट सोडलेलं शिक्षण परत सुरु केलं. रीतसर सोडचिट्ठी साठी अमित तयार नव्हता मग अरुणाने त्यातही रस ठेवला नाही. मनातून नातं मिटलं होतं मग कागदाचं काय असा विचार करत ती पुढे सरसावली.

शेजारी टेबलवर ठेवलेली कागदांची फाईल पडली आणि अरुणाने तिचा हात कीपॅड वरून काढला.

सवि परत तिला म्हणाली, अग पण तो तुला रीतसर सोडचिठी का देत नाही?”

ती हसली, मग दोष सिद्ध होईल ना त्याचा त्याच्या घरच्यांनसमोर...आता पक्त मी दोषी आहे. सोडून आले ना त्याला.

भारतात परत आल्यावर माझ्या बाबांनी आणि मामांनी खूप प्रयत्न केले त्याच्याशी बोलायचे पण तो उत्तर देत नव्हता. शेवटी माझा मामा देवाघरी गेला, हात जोडून माफी मागत होता आणि शेवटचं बोलला, एवढी मोठी आणि सक्षम हो कि एक दिवस तो तुला फोन करेल आणि तू उचलणार नाहीस.

त्याला वाटायचं कि मी त्याच्याकडे परत जाईल पण आज दहा वर्ष झालीत मी मागे वळून बघितलं नाही. नौकरी करतांना क्लास लावले होते, जाता येता एक भिकारीण गोडश्या मुलीला घेवून उभी असायची त्या दिवशी ती अचानक वारली आणि ती मुलगी मी तिच्या मृत शरीरा जवळून उचलली. दत्तक घेतलं तिला. माझी मुलगी म्हणून, मी आणि माझी लेक मस्त मजेत जगतो.

नात्यातली लोकं माझ्या बाबांना त्याच्या बद्दल सांगत असतात ,त्याची नौकरीही गेली म्हणे, इकडे भारतात असतो आता असं कळलं आहे.  जावू दे आता तो कितीही माफी मागत असला तरी मी मानिनी आहे माझ्या स्वाभिमानाची. अहंकार नव्हताच ग कधी पण ...आज मी मानिनी जरून आहे, मी माझी!

 

जावू दे आता तो कितीही माफी मागत असला तरी मी मानिनी आहे माझ्या स्वाभिमानाची. चल निघू  आज माझ्या मुलीचा डान्सचा शो आहे. येतेस ना तिची मावशी म्हणून"

सवि खूप सन्मानाने तिच्याकडे बघत म्हणाली, "हो येतंय, नक्कीच, एक स्वाभिमानी स्त्री एका अनाथ मुलीला मानाने जगायला शिकवते आहे आणि तो सोहळा मला बघायचा आहे. तेवढाच तो मान तुझ्यातल्या स्वाभिमानाला माझ्यातल्या मानिनी पाहू होणाऱ्या मनाचा.."

दोघीही ऑफिस मधून निघाल्या होत्या. अरुणाचा फोन वाजत होता पण तिने तो तसाच पर्स मध्ये टाकला.

कथा कशी वाटली नक्की कळवा! आणि like comment  आणि  share नक्की करा!  णीतरी उगाच पेजची चुकीच account असल्याची तक्रार FB ला केली आहे. तेव्हा मदत करा, तुमची एक कथेवर comment त्या तक्रारीला मागे करण्यास मदत करेल

आणि अश्याच कथा वाचण्यासाठी तुम्ही माझ्या पेजलाही लाईक करू शकता !

मनातल्या तळ्यात

मनातल्या तळ्यात लवकरच घेवून येत आहे एक मराठी वेब सिरीज तेव्हा channel ला subscribe करा 

मनातल्या तळ्यात channel


-उर्मिला देवेन 



 

Post a Comment

0 Comments