भिंगरी_“द_रिव्हेंज”_(भाग ६)





संपूर्ण अंडरवर्ड दणाणला होता आणि उदयोग जगतात हाहाकार माजला  होता. कुख्यात गुंड आणि सम्पूर्ण राज्यावर सत्ता गाजवणाऱ्याच्या मुलीचा किडन्याप ही  खूप मोठी न्युज होती. खुद्द गुणवंतराव हैराण झाला होता आणि पेटून उठला होता.

नेपालकडे स्वतः रवाना होण्याआधी त्याने गुप्त सभा बोलावली ज्यात त्याचे जुने सोबती होते. तो त्याच्या विश्वासू बबनरावला म्हणाला, “अबे बटाट्या, लाव ना बे दिमाक, माझं तर चालुनच नाय राहिलं यार, गुण्या भाईच्या मुलीवर नजर .... गुण्या भाई हाय मी! कोण साला पैदा झाला आता नवीन बे, कोणाची शामत आली रे बटाट्या. कोण असू शकतो बे. मी तरी सोनाला किती लपून बाहेर ठेवलं आणि जे नाही घडायला हवं होतं ते कसं झालं. कुणाकडून तरी आपल्या सोनाची खबर सुटली हाय. इथे आपुन पाचच लोकं, मग कोण फुटलं?“

म्हणत त्याने त्याची पिस्तोल बाहेर काढली, रागात त्याने त्याच्या जिगरी बटाट्यांला बंदुकाच्या नोकीने मारणं सुरु केलं,

“अबे माजलास साल्या तू, कुठ लक्ष हाय बे तुव.... अबे पत्ता लावतस क देवू ठोकून सहाच्या सहा.”

आणि त्याने उलट्या हाताने बटाटा भाईच्या गळ्याला जोरात आवरलं. त्याला असं बघून बाकीचेही घाबरले. पण हिंमत कुणाची नव्हती गुण्या भाईला थांबवण्याची.

आता त्याने बटाट्या भाईला सोडलं, स्वतः शरीर मोडलं, मानेला झटका पाडला मग बोटं मोडत मूठ बांधली आणि एक ऐकाला लाता बुक्या मारायला सुरुवात केली. सारेच गुण्या भाईच्या रागाचे शिकार झाले होते.

मारून मारून गुण्या भाईपण थकला होता पण खबर कुठून फुटली हे काही कुणाला माहित नव्हत आणि कुणी खबर बाहेर सोडलीही नव्हती तरीही गुण्या ‘द अंडरवर्ड डॉन’ ची मुलगी किडन्याप झाली होती.

गालाच रक्त्त पुसत बटाटा भाई गुण्या भाईच्या जवळ आला, “भाई हममेसे कोयिबिन नही हो सकता. अरे सोना आमची बी जाणं हाय. भाभी को वचन दिया था मैने... आम्ही नाय भाई. माझा तर जीवं बसतो तिच्यात.”

गुण्या भाईने परत बटाटा भाईची मान पकडली, आणि ओरडला, “मग कोण हाय तो, ज्याने त्याची मौत लिहिली हाय ह्या यमाच्या हातून, अबे सारा नेपाळ खोदून काढा पण माझी सोना समोर पाहिजे मला अन तिच्या नखालेबी धक्का लागला नाय पाहिजे “ आणि त्याने परत मान मोडली.

“हो भाई तसचं होईल, माई काय बोलतो भाई, भाई अभी आपल्याला अजून आपलं जाळं परत विनाव लागलं, कुठून फाटलं माहित नाही.... पण आता ते म्हत्वाच नाही...आपली पोरगी आपल्या जवळ पाहिजे. ते बी ...”

“अबे साल्या, गुण्या भाईची पोरं, शेर का बच्चा है ओ. जिथं असल ना त्याले कच्च खयाल ते...अन तू असा बोलतस...साल्या बटाट्या चूप राय.”

“भाई मी काय बोलतो, ती साबूत येयील...तुम्ही जरा थंड ठेवा भेजा.”

“अन ती कशी येईल बटाट्या? संगशीन काय बे.”

‘भाई एक बात बोलू क्या ?”

“आबे बोल, नाहीतो  इथंच खोचपतो तुले... साला भाभीको वचन  दिया था म्हणे.”

“भाई अभि आपुन सारे व्हाईट कॉलर वाले लॉग है. सिधा बंदूक तानके किसीको मार नाही सकते. म्हणजे आपली समाजात एक इमेज  हाय ना भाई आता ... “

“मग काय करू त्याचं, मालेही समजते, किती मेहनत केली मी हे राज्य आणि हा दरारा बसवाले...पण कोण असा पैदा झाला बे. लय दिमाकात चालल सारं आता.”

“भाई शांत, मैइ क्या बोलता?”

“अबे बोल नाही तो ठोकता तुझे.”

“भाई, एक नया छोकरा है, म्हणजे तो मछली भाई आहे ना त्यांच्यासाठी काम करतो.”

“अरे भोकू का साल्या. माझ्या कट्टर दुश्मन आहे तो...साल्या त्यानं तर केलं नसलं ना.. त्याची त ...”

“भाई, सुनो ना. तो पोरगा त्याच्या साठी काम करतो पण पैस्या साठी काहीही करतो... काम बोलतो त्याले, आपलं कामं झालं का देऊ उडवून...”

“तुले वाटते, तो करल म्हणून?”

“११०% भाई.”

“पण विश्वास कसा ठेवायचा तो तर माझ्या दुष्मनाचा माणूस हाय...”

“तो कोणाचा नाही... मछली भाईपण त्याचा वापर करून घेते. ती आपली मागच्या महिन्याची ड्रग्स डील त्यानंच आपल्याकडून हुशारीने काढून मछली भाईला दिली होती. पोरगा लय चाम्पर आहे. माग पुढं कुणबी नाही त्याच्या. म्हणून मरणाले भेत नाय.”

“त्याची हिस्ट्री काय बे? ते पता हाय का तुले. मले सारां त्याचा इतिहास अन भूगोल पाहिजे बे.”

“खूप काही कोणालेबी माहित नाही पण दहा वर्ष जयल मंदी काढले त्यानं, त्याच्या पापाने त्याच्या मायले विकलं होतं अन रागात ह्याने बापाचा खून केला म्हणे. माय सदमा बरदाश नाय करू शकली अन मेली. जयलातून तिथून बाहेर निघाल्यावर सुपारी घ्यायला लागला म्हणून मछली भाईने त्याला हाताशी ठेवला हाय. मागच्या वेळी इलेक्शन मंदी त्या सुदामला माह्या सांगण्या वरून गचकवलं त्यानं. छोकरा कामाचा ह्या तसा.”

“बोलावं त्याले आताच....म्हणणं ते किंमत देऊ म्हणा पण माझी पोरगी जशी च्या तशी परतली पाहिजे. अन दे सुपारी माझ्या पोरीच्या किडन्याप करणाऱ्याची.”

गुण्या भाईने जोरात समोरच्या खोक्यांना लात मारली आणि ओरडला, नंतर शांत झाला, म्हाणाला, “साहेबजीच्या सेक्रेटरी मॅडमजीले लाव फोन जरा मदत मागतो.  बटाट्याने फोन लावला, आणि गुण्या भाईच्या हातात दिला,

“मॅडमजी मी गुणवंतरावं बोलतो.”

“गुणवंतराव? कोण? मी तर गुण्या नावाने सेव्ह केलाय.”

“हो हो म्या गुण्याचं बोलतो, मॅडमजी.”

“असं... आता कसं आपलं पण वाटते. बोला काय म्हणता... अरे गुण्या भाई न्यूज आलीय, तुझ्या पोरीला किडन्याप केलं म्हणे....आणि तू गुमान गुप...अर अर ... गुण्यान कण्या खाल्या काय रे.” आणि ती हसायला लागली.

“म्हणूनच फोन केला मॅडमजी, साहेबजीला सांगून जरा मदत मिळेल काय... पोरीचा काहीच पत्ता लागत नाही हाय.”

“साहबेजी समोर आहेत आणि विचारात आहेत की आज १००० बंदुका येणार होत्या इकडे त्याचं काय झालं?”

“अरे मॅडमजी भारी टेन्शन मदी हाय मी, करतो काही तरी म्हणजे अजून आल्या नाही का जहाजावर?”

“आधी ते करा, आमचं किती नुकसान होईल, आणि पकडल्या गेल्या तर तू जवाबदार राह्शीर, पैसा घेतला आहे तू...” आणि परत भिंगरीचा तो कर्कश आवाज ऐक्याला आला.

गुण्याने रागात फोन फेकला, “आयला समजते काय ही स्वतःला, समोर आली ना कि असा चिरतो...बाईची जात साली... गवसू दे एकटी. मले मले , ह्या गुण्या भाईले..”

आज दुपारी गुण्या भाईच्या हातून मोठा सौदा सुटला होता... करोडोचा लॉस झाला होता. त्याचा माणूस त्याला सांगत आला, “भाई वो मछली भाई ने अपुनका माल दुबई भेज दिया. आपले लय माणसं मारले त्यानं... लोचा झाला भाई.”

आत मात्र गुण्या भाईचा राग अनावर झाला, आणि त्याने त्याला गोळ्यांनी भाजून काढलं.

बटाटा भाईचा फोन वाजला आणि तो म्हणाला “अबे रख, पायतो मी.”

तो धावत बाहेर गेला आणि हातात पेनड्राईव्ह घेऊन आला. गुण्या भाईकडे बघत त्याने तो टीव्हीशी कनेक्ट केला.

गुण्या भाईने समोरच्या टेबल वरचं रिमोट उचलून टीव्ही लावली.

गुण्या भाईच्या पोरीचा ओरडण्याचा आवाज येत होता आणि पाच सहा मोठी मोठी माणसं तिच्या कडे वळत होती. व्हिडीओ मध्ये सर्व माणसं फक्त मागून दिसत होते. आणि गुण्या भाईची सोना जोरात ओरडत होती. नंतर व्हिडीओत सोनाचे नग्न फोटो होते, अंगावर नुसता शर्ट होता तिच्या आणि ती निपचित पडून होती कुणीतरी तिच्यासमोर आलं आणि नाकासमोर हात लावत म्हणालं, “गुण्या काही आठवते का...नाय नाय मेली नाय...आणि आमी फेकणार नाय तिला.. पोरगी अजून जिवंत हाय रे. आणि मग तिच्या गालाला हात लावत म्हणाला, काय चीज आहे यार, साल्यानं सात समुद्रापार लपून ठेवली होती... पाहिजे असेल  तर स्वतःला माझ्या हवाले कर. नाहीतर राय बिडात घुसून. उंदीर साला. सांर रान पोकळून लोणी खाते अन बिळात जावून लपते, असलं दम तर ये.”

आणि व्हिडीओ संपला. पण कथा आणि रिव्हेंज अजून बाकी आहे ..... बघूया गुण्या भाई कसा धाराशायी होतो ते...आणि अरुण आणि भावनाला न्याय मिळतो का ते .....न्याय हा कधी कधी न्यायालयात मिळत नाही... आणि तो दारात उभाही सहज राहत नाही ....लवकरच भेटूया.

कथेच्या अपडेट साठी तुम्ही माझ्या पेजलाही लाईक करू शकता. https://www.facebook.com/manatlyatalyat

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments