भिंगरी_“द_रिव्हेंज”_(भाग ९)




गुण्या भाई तिला बघताच तिच्यावर जनवरासारखा तुटून पडला. त्यातच ती शुद्धीवर आली आणि ओरडून ओरडून परत बेशुद्ध झाली, कोवळ्या कायेवर जखमा पडल्या होत्या. होती ती वस्त्र लाल झाली होती. पण गुण्या भाई काही थांबत नव्हता. त्याने त्याची पूर्ण मनाची कुइच्छा शांत होईपर्यंत तिला सोडलं नाही. ती ओरडून परत बेसुध पडून रहिली.

लहानश्या जीवावर नामर्द तुटून पडला होता आणि मग तिला नग्न सोडून बाहेर आला. मोकळ्या हवेत त्याने स्वतःला मोकळं केलं, मानेला झटका दिला तोच त्याच्या मानेवर अरुणने मागून येऊन दंड्याने वार केला, सावरतच गुण्या भाईने त्याच दंड्याने अरुणला मारणं सुरु केलं. मार खाता खाता काही वेळाने अरुणच लक्ष खोलीत पडून असलेल्या नग्न त्याच्या बहिणीवर पडलं, तो धावत तिथे आला आणि अंगातलं शर्ट काढू त्याने तिला झाकलं, आवाज देत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता तोच गुण्या भाईने त्याला ओढत बाहेर नेलं.  त्याला तो लाथा बुक्या मारत होता.

दुरून पोलिसांच्या सायरनचा आवाज येत होता. बटाटा भाई धावत आला,

“भाई जानेदो ना. मई संभालता इसको. आप निक्लो भाई.”

बटाटा भाईने प्रकरण सांभाळण्यासाठी गुण्या भाईला तिथून निघण्याची विनीवनी केली,  गुण्या भाई जोरात ओरडला,

“ये चिंध्या, अपुन को जो पसंत ओ किसीकी मा बहेन नाही होती सिर्र्फ अपुनकी....” आणि त्याने जोरात अरुणाला लाथ मारली.

अरुण एका कोपऱ्यात असाह्य पडला होता, नजर बहिणीवर होती आणि मन रागाने लाल झालं होतं. स्वतःला सावरत तो उठ्याचा प्रयत्न करत होता.

गुण्या भाई जोशात खोलीत आला, त्याने भावनाच्या नाकाजवळ हात लावला आणि अरुण कडे बघत म्हणाला,

 “हाय अजून जीती हाय...अजून कामाची हाय माझ्या... ये तू तिला घ्याले, जिता राहिला तर...”

म्हणत त्याने तिला तसंच उचललं, खांद्यावर टाकलं आणि अरुण समोर गाडीत टाकलं, अरुण जखमी होता तरीही गाडीवर धावला, त्याला तसं बघून आणि भावाच्या नावाचा टाहो फोडत परत भावना शुद्धीवर आली, आणि अरुणच्या नावाने ओरडायला लागली, परत गुण्या भाईने तिच्या थोबकड्यात लावली ती परत गाडीत कोलमडून पडली. गुण्या भाईने गाडी जोरात काढली, अरुण दूर पर्यंत धावत राहिला आणि म्हणत राहिला,

“भावने, भिंगरे मी येईल वं, तुले नक्की घ्यायले येईल. काळजी घे वं भावने...भिंगरी आहेस तू माही वाली, येयेल मी.”

तोच गुण्या भाईने बंदूक काढली आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या, अरुण जखमी झाला होता, एक गोळी त्याच्या खान्द्याला चाटून गेली होती तर दुसरी पायाला लागली होती. भावनाला तो अंधुक अंधुक खाली कोलमडून पडतांना दिसतं होता.

बेसुध भावना ती गुण्याभाई सोबत मुबईत पोहचली, तीला एका गोदामात टाकून गुण्या भाई तिथून पसार झाला, बऱ्याच वेळाने भावनाला जाग आली, कणहत उठली, अंग तापलं होतं. जखमा शरीर ओढत होत्या.

अंगावर फक्त तिच्या भावाचा शर्ट होता. ती त्या गोदामात एकटी होती,  रडून रडून अश्रू आता आटले होते. भाऊ सोबत नव्हता पण त्याचा तो शर्ट तिच्या अश्रूंना पीत होता.

जरा शांत होवून तिने हळू हळू पूर्ण गोदाम शोधून काढलं पण त्या रद्दीच्या गोदामात कुठूनही निघण्याची जागा नव्हती. ती थकली आणि कोपऱ्यात गुमान पडून राहिली.

काही वेळेने सटर वाजलं, गोदामात माणसांचा आवाज तिला ऐकायला आला. निपचित पडलेली धाडकन उठली, लपली, ती मानसं तिला शोधत होती.

बराच वेळ शोधा शोध झाल्यानंतर ती त्यांना सापडली. तिला परत ओढत ते सोबत घेवून गेले. भावना घाबरली होती. गुमान गाडीच्या कोपऱ्यात बसून होती.

अर्धा रस्ता पार झाल्यावर गाडी थांबली आणि एक अतिशय सजलेली बाई त्या गाडीत बसली. तिने भावनाला लाडाने कुशीत घेतलं, तिच्या त्या हळुवार प्रेमळ स्पर्शाने भावना तिच्याकडे सरसावली, ती तिच्या जखमांना कपड्याने पुसत होती. अंगावर चादर टाकली, पर्स मधून तिने एक डब्बा काढला, आणि कचोरी भावनाला भरवली, नंतर पाणी प्यायला दिलं. भावना तिच्या कुशीत पडून झोपली आणि गाडी काही वेळात एका मोठ्या हवेली समोर थांबली.

त्या बाईने तिला अलगत झोपेतून उठवलं आणि हळूच आतमध्ये घेवून गेली, तिन वर्षाची होती तेव्हाच मायचं प्रेम गमावलं होतं त्यानंतर माय अन बाप दोन्ही अरुण होता तिचा, अशी हळुवार माया करणार कुणीही भेटलं नव्हतं पण आज त्या बाईच्या मातेच्या स्पर्शाने ती भारावून तिच्या कडे आकर्षित झाली होती.

हात धरून ती तिच्यासोबत ती जिथे म्हणले तिथे गेली आणि एका खोलीत पोहचली. ती बाई तिला म्हणाली, “बेटा मला इथे सर्व अम्मा म्हणतात. तुही म्हटलं तर चालेल, तू आराम कर आधी आपण नंतर बोलूया.”

नंतर ती खोलीतून निघून गेली. भावना घाबरली होती, तिच्यासोबत घडलेला प्रसंग आठवणून आठवून तीला हुळहुळी भरली होती. तेरा वर्षाच्या त्या जीवाला काहीच सुचत नव्हतं. रक्ताने चादर भिजत होती. अंग दुखत होतं, ती रडायला लागली, अम्मा परत खोलीत आली, आता तिच्या हातात औषध होतं, तिने ती नजरेने इशारा करत भावनाला दिलं आणि आराम करायला सूचना देत म्हणाली, “खूप काही करायचं आहे तुला, माहित आहे तुझ्या सोबत काय झालंय, मीही तुझ्या एवढी होती इथे आली होती तेव्हा, पण मला माया करणार कुणीच नव्हतं... तुला मी आहे... मी उभं करेन तुला. पण आता तू झोप. ते माणसं काय म्हणत आहेत ते मला ऐकू दे.”

पालटतांना तिने परत भावनाला बघतील कि ती रक्ताने भिजली आहे मग ती परतली आणि खोलीतलं कपाट खोलून त्यातले तिने कपडे काढले. भरा भरा कपडे फेकल्या नंतर तिला एक सूट भावनाच्या मापाचा दिसला तो तिने भावनाकडे फेकला, हा घाल आत्ता नंतर मी तुझ्यासाठी मागवते सूट्स. म्हणून ती खोलीतून निघून गेली. भावना शब्दहीन झाली होती, दादाला आठवत गुमान कपडे बदलले आणि झोपली.

भावना एका वेश्यालयात पोहचली होती, जे गुण्या भाईच होतं. इथे असणारी प्रत्येक स्त्री हि त्याच्या वासनेचा शिकार होती. आणि ह्या दलदलीत फेकल्या गेली होती. अम्मा हा वेशालय चालवत होती पण तिच्या मर्जीने तो चालत नव्हता. तीही तिच्या हातून घडलेल्या गुन्ह्यांमुळे भीतीने सारं काही गुण्या भाईचं ऐकत होती. पण आज भावनाला पाहून तिला ती आठवली आणि मनात ममता जागृत झाली होती तिच्या. ती गुण्या भाईच्या माणसांकडे आली, ते म्हणाले,

“अम्मा, ये लडकी भाई की जाणं है. खास तयार करो इसे. पुरा खयाल रखा जाये पर मानली नाय तर सांगा... आपल्या नेहमीच्या जागी नेवून गाडून येऊ, हुकूम हाय भाईचा तसा, पटली तर सेट नाहीतर गाड्यात फेक.” आणि तो फिकीर फिकीर हसायला लागला.

पुढचा भाग लवकरच...

कथा अंतिम चरणात लवकर येत आहे, कथेतला सर्व गुंता आणि तुम्हाला पडलेले प्रश्न लवकर उत्तरासोबत पुढच्या भागात. वीस वर्षाच्या काळात काय काय झालं हे आपण आता जाणून घेत आहोत मग जरा धीर धरा....आणि तोपर्यंत stay connected to मनातल्या तळ्यात https://www.facebook.com/manatlyatalyat

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

फोटो साभार गुगल

सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

Post a Comment

0 Comments