भिंगरी_“द_रिव्हेंज”_(भाग ८)

अँकी तिच्या त्या रुपाला बघून आधीच घायाळ झाला होता, गुमान खुर्चीवर बसला, जरा शांतता होती दोघात, आणि अँकीने तोंडातली सिगार तोंडाने फेकत तो म्हणाला, “एवढं सुंदर रूप समोर असल्यावर मला इथेच बसून मरण आवडेल. कोण तू...काय दिसतेस गे.”

“असं! मग तुझी इच्छा पूर्ण करते मी.” आणि तिने तिची बंदूक ताणली.

“हाय हाय...काय अदा...पण ही बंदूक तुझ्या ह्या गोऱ्या हातामध्ये? काही कळत नाही ग ... ह्यात तर हिऱ्याने जडलेल्या बांगड्या हव्या.. काय म्हणतेस...आवडलीस तू मला.. होशील माझी राणी?”

“ये झम्प्या तुझ्यासारखे छप्पन खिश्यात घेऊन फिरते मी. कोण रे तू चमचा...आणि माझा पाठलाग का करतोय? बघतेय मी तुला मागच्या सात दिवसापासून...सारखा माझ्या मागे असतोस.”

“हाय हाय राणी, मला बघूनही तू इथे मौजूद राहिली. माझी वाट बघत होती काय ग, चिकणे!”

“भिते काय तुला रे! चल हो तयार मरणाला. टापू साला, टपोरी.”

“हाय हाय...अरे मी तर केव्हाच तयार आहे... पण एक उत्तर दे.”

“हो बोल, मारण्याऱ्याची अंतिम इच्छा पूर्ण केली जाईल.” आणि तिने बंदूक परत ताणली.

“सोना कुठे आहे? वाटलं होतं इथे असेल म्हणून...”

“आहे ना. अजून जिवंत आहे. आणि कही दिवसांपासून इथेच होती, पण आता इथे नाही... तू होतास ना माझ्यावर लक्ष ठेवून मग...गेली ती कुठल्या कुठं. घे आता तिचा शोध.”

अँकीतिच्या कडे एकतार बघत होता, त्याच्या अश्या रुबाबाला बघत ती परत म्हणाली,

“अबे ये, खाली बघ, मारून सोडीन ना....तर... हे गावं माझं आहे, माझं! तुला कुणी इथे पाणीही विचारणार नाही विचारायला गेलास तर.”

अलगत तिची एक लट तिच्या गालावर पडली आणि ती सावरतांना तिचा तोल गेला आणि ती अँकीच्या मांडीवर पडली...

तिची आणि अँकीची नयन भेट झाली, एकमेकांना तो अलगत स्पर्श शहारून गेला, अँकी बांधून होता मग तिला हात लावू शकला नाही पण तो पुरता तिच्या त्या खोल घाऱ्या बोलक्या पण गप्प झालेल्या डोळ्यात बुडला होता. ती रहस्य मय डोळ्यांची खोल दरी त्याला आकर्षित करत होती. क्षणात ती भानावर आली, उठली आणि परत बंदूक ताणून उभी राहिली,

“काय रे चमच्या, तो गुण्या आला नाही...त्याच्या मुलीला घ्यायला...तुझ्या सारख्या टपरीला पाठवलं. साला नामर्द...समाजाला पीडून परत त्याच समजाचा कर्ता बनून फिरतो साला.“

“मी काही त्याचा माणूस नाही... मला कुणी पाठवू शकत नाही...माझा मी आलोय...तुला शोधत.”  

“असं! तुझं रे काय नातं त्या सोनाशी...? आणि काय म्हणालास मला शोधत!”

“हो तुला शोधत, पण तुझं काय ग नातं तिच्याशी.”

“तुझं काय ते सांग?”

“माझं काहीच तिच्याशी नातं नाही... पण...”

“पण काय रे टापू आधी नजर खाली, माझं तर बदल्याच नातं आहे. बस्स! त्याच्या पोरीशी माझं वैर नाही, बस्स त्याच्याशी आहे. आणि ती भोगेल...”

“पण माझं आणि तुझं नातं जन्मोजन्मीच आहे असं वाटतं मला.”

“ये, भंकस नको मारू, वेळ नाही माझ्याजवळ. तुझ्या सारख्याला झेलायला. बोलतोस की.”

किती वेळची म्हणतेस, दे ना ठोकून, कुणी थांबवलं तुला, मी बांधून आहे.

ती परत त्याच्या त्या बोण्याला फसली, मनात हसली पण बंदुकीने ताणलं तिला आणि ती परत जोशात आली, “अबे ये, फंडे मारू नको, उतरवल्या ना त, तर इथेच गड्डा करून टाकून देईल.” तिने आता बंदूक त्याच्या डोक्यावर ताणली, आणि.....

“ओळखलं मी तुला... भावना ना तू ?” आणी तो गाणं म्हणायला लागला, ऐक होती भिंगरी ...एक होती भिंगरी ...तिचं नावं झिंगरी ... “

क्षणात गरागली ती,आता तिने बंदूक अजून ताणली, “कोण रे साल्या तू? मी नाही ओळखत तुला आणि माझं हे नावं तर कुणालाच माहित नाही, साला आपली तर ओळखच ही नाही आता... भावना!”

ती आठवणीत स्मित हालसी परत बोलली, “किती वर्ष झाले हे नावाने मला कुणी बोललं नाही. आणि  हे  गाणं? मग, सांगतोस की देवू टाकून साऱ्या तुझ्या ह्या स्टाईल वाल्या भेज्यात.”

“बापरे!!! घाबरलो मी, भावने!”

“ये त्रास होतोय आता, सटकवू नको माझं, सांगतो, की सोडू माझा नेम. तिने ट्रिगर दाबलं ...आणि अँकी ओरडला, ”अरुण!!”

अरुणचं नावं ऐकताच भावना कासावीस झाली, बंदूक हातातून खाली पडली तिची, "अरुण दादा, कुठे आहे?  कसा आहे....आहे का तो? किती वर्ष झाली मी शोधते आहे पण मला नाही भेटला....तू कोण आहेस. अरुण दादा!"

तिने पडलेली बंदूक परत भाम्बाव्ल्या अवस्थेत उचलली, “अबे सांग तू कसा ओळखतो. तू अरुण दादा तर ...”

“अरुन नाही राहिला आता.... तो कधीच देवाघरी गेलाय.” अँकी अगदीच दबक्या आवाजात म्हणाला.

आत मात्र भावना खाली बसली... आणि तिच्यासमोर वीस वर्षा अगोदरचा तो प्रसंग चित्रफिती सारखा सरकू लागला होता.

विष वर्षा आधी....

भावना खूप आनंदी होती, आज अरुण ठेला घेवून येणारं होता. तिने त्या ठेल्याच स्वागत म्हणून आरती सजवली होती. दादाची आवडती खिचडी केली होती. आणि घरात अरुनची वाट बघत अभ्यास करत होती, पाचचा पाढा जोरात म्हणत होती, तोच घरात काही माणसं शिरली, तिला ओढलं, तिने तिच्या लहान हाताने तिथेच असलेलं बेलन घेतलं पण काही फरक पडला नाही, काका कोण तुम्ही कोण तुम्ही ती म्हणत राहिली पण त्या लोकांनी घरातल्या सामोनाची फेका फेकी केली.

भावनाने बनवलली खिचडी एकाने पायाने फेकून दिली, तिचे पुस्तक तिच्या हातून ओढून चुलीत टाकलं आणि तिला उचलून बाहेर आणलं, बाहेर येताच भानू काकाने तिला त्यांच्या हातून तिला ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी भानू काकावर गोळ्या झाडल्या आणि ते कोसळले. बटाटा भाईने तिला गाडीत कोंबलं.

गुण्या भाईच्या गाडीतून जातांना तिला दुरून अरुण दादा ठेला घेऊन येतांना दिसला होता. आणि ती अरुण दादाच्या नावाने ओरडत गुण्या भाईच्या शेतातल्या वाड्यावर पोहचली होती. वाड्यावर येताच गुण्या भाईने तिच्या एक जोरात थोबकडीत लावली, ती बेशध्द झाली, नंतर तिला बटाटा भाईने गुण्याच्या खोलीत सोडलं.

आता पुढे भावनाने हे रूप कसं घेतलं, अरुणच काय झालं, हा अँकी कोण आणि कथेतले सर्व पात्र पुढच्या भागात उलगडतील, पण तुम्ही मात्र गुंतू नका...मी हा गुंता सोडवते. तुम्ही काळजी घ्या, स्वतः ची आणि घरच्यांची. आणि वाचत राहा माझ्या कथा... माझ्या पेजवर...https://www.facebook.com/manatlyatalyat

आधीचे सर्व भागही इथेच मिळतील.https://www.facebook.com/manatlyatalyat

तुम्ही इथेही वाचू शकता http://www.urpanorama.com/14107/ प्रत्येक भागाच्या सुरुवातीला आधीचा भाग आहे.

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

Post a Comment

0 Comments