ओळखीतले अनोळखी...




ऋतुजाला तिची वकील सगळ समजावत होती, आज कोर्टात खूप महत्वाची गोष्ट मांडल्या जाणार होती. तिच्यासोबत तिची आई आणि बाबाही होते. भावाला तिचा निर्णय मान्य नव्हता मग तो दूर भाचीला घेवून उभा होता. त्या दोन वर्षाच्या मुलीला काय कळणार होतं की आज नंतर ती बाबांनसोबत खेळू शकणार नव्हती.


ऋतुजाने निर्णय घेतला होता वेगळं होण्याचा पण आज ती काही भानावर नव्हती. सर्वांसोबत असूनही तिच्या नजरा आज रंजीतला शोधत होत्या. तशी गाडी समोर थांबली, रंजित आणि त्याच्या घरची सर्व माणसं गाडीतून बाहेर आली. राजन आणि ऋतुजाची नजर भेट झाली, बघूनही दोघांनी नजरा मारल्या.    


ऋतुजाने बघूनही तिने त्याला बघितलं नाही हे भाव चेहऱ्यावर आणले आणि रंजितने तिला बघून न बघितल्या सारखं केलं. दोन ओळखीतले अनोळखी समोरा समोर आले होते. आणि दोन वर्षा पूर्वी जुळलेली सर्व नाती आज ओळख दाखवत नव्हती.


घंटा वाजली, आणि कोर्टात त्याची केसं लागली, दोन ओळखीच्या लोकांसाठी तो वेगळेच अनोळखी वकील एकमेकांशी वाद घालत होते. ज्यांचा ऋतुजा आणि रंजितशी काहीच संबंध नव्हता. त्याच्यासाठी ते त्यांचे फक्त केसं होते. दोन वकिलांच्या वादानंतर शेवटी केसला शेवटीची दिनांक लागली.


काय दुर्द्यव आहे ना, माणूस स्वतः भांडून थकला की वकील करतो, ज्याला भावनाशी काहीच करायचं नसतं... तो मेंदूने चालतो पण नाती मनाची असतात हे कुठे कळत असतं कुणाला...


दोघही समोरा समोर आले, रंजितच्या मनात कालवा कलावं सुरु होती त्याच्या नजरा त्याच्या मुलीला शोधात होत्या पण ऋतुजाच्या आणि त्याच्या घरच्या लोकांमध्ये तो ऋतुजाला हे विचारन्याच धाडस करू शकला नाही. ऋतुजा समोर उभी असूनही त्याने तिला जराही मुलीबद्दल विचारलं नाही, आणि त्याच्या आईला पकडून गाडीपर्यंत घेवून गेला. त्याच्या आईला धक्का बसला होता, त्यांच्या घराण्यात हा पहिला घटस्पोट होता, खूप पर्यंत करूनही हा थांबला नव्हता. त्यानुळे रंजित आणि त्याच्या घरचे ह्या निर्णयाला ऋतुजाला दोषी ठरवत होते.


इकडे ऋतुजा कडेही हेच होतं, बाबांना अजिबात ऋतुजाचा निर्णय मान्य नव्हता पण जेव्हा त्यांना कळलं की रंजितने ऋतुजाला गंभीर मारहाण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ऋतुजाच्या निर्णयाला काहीशी सहमती दिली होती. पण भाऊ आजही तिच्या ह्या निर्णयावर दुखी होता. कधी कधी त्याला मनात त्याच्या बहिणीची चूक दिसत होती. पण बहिणीचे घाव त्याला बघवत नव्हते आणि मग तोही काहीसा गप्प होतं ह्या निर्णयाला रंजीतला दोषी ठरवत होता.


घरी सगळे आले आणि ऋतुजा रडायला लागली, बाबांना येवून बिलगली, “बघितलं ना बाबा, त्याला नकोय मी अरे निदान मुलगी तरी, साध मुलीसाठी त्याने विचरलं नाही...”


“अग, त्याच्या आईची तब्यत बिघडली होती कदाचित.“ बाबा तिला समजावत म्हणाले.


आई पाणी आणत म्हणाली, “कसलं हों, नाटक सुरु होतं सांर, मला नाही का त्रास होतं, एक पावलं पुढे केलं नाही त्यांनी, आम्हाला काय हौस आली आहे मुलीचा घटस्पोट करुवून देण्याची. येवढ सहन करूनही आपली ऋतुजा आहेच ना मनात तयार तिकडे जाण्यासाठी...”


ऋतुजा आता परत रडायला लागली, “आई मला नाही जायचं, कशाला जावू मी? माझी काहीच गरज नाही त्यांना, आणि माझ्या मुलीला आता मीच आहे.”


भाऊ, मुग्धा खेळवत होता म्हणाला, “तुला नाही ग पण हिला आहे ना, काय सांगशील? ही मोठी होवून विचारेल तेव्हा, हीही तुझ्यासारखी होईल ना...”


बाबाने ओरडून भावाला गप्प केलं, आणि सगळं वातावरण गप्प झालं, घटस्पोट कुणालाच नको होता तरही होत होताच ना!


रंजितकडे आईला त्याच दिवशी हॉस्पिटल मध्ये ico मध्ये हलवलं होतं. त्याच्या घरात खूप गोंधळ उडाला होता. माळ्यावर ऐकटाच बसून विचार करत होता, “तिने जराही आईच्या तब्येती बद्दल विचरलं नाही, तिला तर सगळं माहित आहे. आणि माझी मुलगी तिलाही आणलं नव्हत तिने. जावूदे हे दोन वर्ष नव्हतेच कदाचित माझ्या आयुष्यात, आधी आईला सांभाळायला हवं, एक नातं संपतंय पण एक सुटायला नको. माझी चूक झाली त्या दिवशी चुकून माझ्या हातून पट्टा लागला तिला आणि मग मीही.... “ रंजीतने दोन बियर उतरवल्या आणि हॉस्पिटल कडे निघून गेला.


पंधरा दिवसाने कोर्टात शेवटची तारीख होती, आणि रंजित एकटाच आला होता, त्याला मुग्धा दिसली, तो गाडी लावताच तिच्या जवळ गेला, खूप लाळ केला, जरा रडला आणि कोर्टात धावत निघून गेला. ऋतुजा तिच्या घरच्या लोकांसोबत बसली होती. रंजीतला बघताच तिला धडकी भरली, ओठ बोलते झाले होते पण....


कोर्टात निर्णय लागला होता....


निशब्ध झालेली दोन मन आज अनोळखी झाली होती. बाहेर दोन गाड्या दोन दिशेन सुसाट पळून गेल्या आणि त्या धुळात त्या नात्याला धूळमय करवून गेल्या. दोन ओळखीतले आज परत अनोळखी होवून वेगवेगळया वाटेने निघून गेले होते.


कथा कशी वाटली नक्की कळवा ... लवकरच मनातल्या तळ्यात घेवून येत आहे मराठी वेब सिरीज तेव्हा  इथे मनातल्या तळ्यात channel ला subscribe करा


©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव!]

 


Post a Comment

0 Comments