मी माझी ना राहिले... अंतिम भाग

 

भाग १ इथे क्लिक करा 
भाग २ इथे क्लिक करा 

आसावरी निघाली होती, मनाच्या ओढीने, आज तिला ओटो ही मिळत नव्हता, तर समोर एक बाईक उभी राहिली, हेल्मेट काढत सुधीर म्हणाला, काय वहिनी इकडे कश्या तुम्ही, मी देतो ना सोडून.”

आसावरी दचकली, नाही हो, मी जाईल, येईल ऑटो, तुम्हाला कशाला त्रास?”

सुधीर रंजितचा जिगरी मित्र होता,  रंजितच्या जाण्याचं दुखं त्यालाही खूप होतं, खरं तर तो त्या दिवशी त्यालाच भेटायला ऑफिस मधून परस्पर गेला होता. पण कुठेतरी दूर पोहचला. आणि ही गोष्ट सुधीरला लागली होती. आग्रह त्याचाच होता त्याला तिकडे बोलवण्याचा. आसावरीला सार काही आठवत होतं. डोळे डबडबले होते तिचे. रागही येत होता सुधीरचा. तिला असं बघून सुधीर म्हणाला, “वहिनी कुठे सोडून देवू तुम्हाला, आपली कावू कशी आहे हो, शाळेत जायला लागली असेल ना?”

“राहूद्या, मी निघते,” आणि आसावरी ने ऑटो ला हात दिला,

आसावरी जायला निघाली होती तोच सुधीर म्हणाला, “वहिनी, मीच होता रंजित जवळ त्याच्या अंतिम वेळेस, खूप काळजी करत होतां तुमची, मला बोलला होता, तुमची काळजी घ्यायला, मी जावून आलो होतो घरी पण रंजित कडले काहीच बोलले नाही तुमच्या बद्दल. तुमच्या माहेरी जावून आलो होतो मग समजल कि तुम्ही भावाकडे होत्या आणि आता... जावूद्या, आज मोठ्या ऑफिस मध्ये काम होतं माझं म्हणून इकडे आलो होतो आणि तुम्ही दुरूनच दिसल्या मला.”

“आता मी ते सगळं विसरायचं ठरवलं आहे, नको त्या आठवणी, कावू ने केव्हांच अमितला बाबा मानलं आहे आणि मी, त्यांची बायको आहे आता. रंजितला कधीच विसरू शकत नाही मी, पण माझ्या मुलीच्या बाबाला मी नाकारू शकत नाही”

आसावरी बोलून गेली पण तिचं तिला सुचत नव्हतं, सुधीर तिला असं बघून म्हणाला, “वहिनी तुम्ही आनंदी राहावं असचं वाटतं मला, द्या त्या पिशव्या, मी सोडून देतो, अमितलाही भेटून घेईल, रंजितला बोललो होतो तुमची भावासारखी काळजी घेईल म्हणून.”

“अहो पण, नको ना... “

“ठीक आहे, अवघड वाटत असेल तर असुद्या.” म्हणत त्याने ऑटो बोलावला, आसावरी मनात परत रंजित पर्यंत शिरली, त्याची काळजी तिला जाणवली, पटकन म्हणाली, “ठीक आहे, सोडा तुम्ही.”

आसावरी सुधीरच्या बाईक वर बसली आणि सुधीरने ती सांगेल तशी गाडी वळवली, घरी आली तेव्हा अमितही नुकताच घरी आला होता, बाईकच्या आवाजाने बाहेर आला,

आसावरी पिशव्या सांभाळत उतरत होती तोच सुधीर समोर वळत अमित जवळ आला, “नमस्कार, मी रंजीतचा मित्र, वहिनी बऱ्याच दिवसांनी दिसल्या. बसं बोलावस वाटलं, म्हणून इथवर सोडून दिलं, निघतो मी.”

तेवढ्यात कावू बाहेर आली आणि बाबाला बिलगली, कावूला बघताच सुधीर हळवा झाला पण परत बाईक पर्यंत आला.

अमितने कावूला कळेवर घेतलं आणि सुधीरला म्हणाला, या हो आतमध्ये, चहा घेवू या सोबत,

आसावरी चहा ठेव ग मस्त कडक.

असवारीही दचकली, सुधीरही थांबला, अमित तसाच बोलला होता जसा रंजित बोलायचा.

सुधीर परत म्हणाला, नको हो, मला वेळ होईल, गावात परत निघायचं आहे. येतो मी.”

अमितने कावूला पटकन बाईकवर बसवलं आणि तिने किल्या काढल्या, आता मात्र सुधीरचा नाईलाज होता. अमितने त्याला आग्रहाने आत बोलावलं, बैठकीत त्याने त्याच्या आवडत्या विषयावर चर्चा केली,अमितचे बाबाही गोष्टीत रमले. सुधीरही राजकारणावर बोलण्यात पटाईत होता. मस्त गोष्टी रंगल्या, चहा झाला आणि सुधीर जायला निघाला, अमित् म्हणाला, येत राहा, इकडे काम असलं कि, नुसता चहा घ्यायला जरी आलात ना तर माझे बाबा जाम खुश होतील, आज खूप दिवसांनी ते किती बोलले… सुधीर हसला. आसावरीवर त्याने नजर टाकली, कावूचा लाळ केला आणि तो निघाला.

रात्री आसावरीने, अमितला सहज विचारलं, “अहो, तुम्हाला अवघडलं तर नाही ना, सुधीर रंजीतचा मित्र आहे...”

“नाही ग, त्याला किती काळजी होती हे त्याच्या नजरेत बघितलं मी, आणि जग खूप लहान आहे, अशी माणस आपल्याला मिळतीलच, त्यांना सहज जावू दिलं तर त्रास आपल्याला होईल. त्यापेक्षा सहज स्वीकारायचं ना...त्याचं जावूदे तू रंजितची बायको होतीस हे मी नाकारू शकतो का....नाहीना! मग.....”

त्याने परत आसावरी वर नजर टाकली, म्हणाला, “तो रंजितचा जिगरी मित्र होता ना?”

“हो, अगदीच, बरीच महिने लागली त्याला ह्या धक्यातून निघायला...”

“पण निघाला ना तो, तुझी काळजी होती त्याला... म्हणून तो मला भेटायला आला होता हे मी ओळखलं होतं, त्याला आतमध्ये घेतलं नसतं तर कदाचित तुझ्यासाठी अजून काळजीत असता...

निघतांना किती शांत होवून गेला तो, बसं अजून काय हवं... सत्य स्वीकारायचं ग, सोपं होतं आयुष्य.”

“पण तुम्ही....”

“मी काय ग, आपण सारेच असे आहोत बघ, सत्य लवकर स्वीकारत नाही, मलाच बघ ना किती वर्ष लागली नयनाला मनातून काढायला... पण अजूनही डोळे बंद केले ना कि तिचे ते टपोरे डोळे दिसतात आणि माझे डोळे उघडले जातात. पण नयनाला मनाच्या बंद कोपऱ्यात ठेवून सारे कोपरे रिकामे केलेय मी तुझ्यासाठी.” अमित बोलत होता आणि आसावरी त्याला बघत होती, तो भानावर आला आणि म्हणाला,

“जावूदे, झोपं बघू, उद्या मला लवकर निघायचं आहे ऑफिस साठी, आणि यायला जरा उशीर पण होईल. आणि आता महिनाभर तरी मी उशिरा येणारं घरी.. नवीन प्रोजेक्ट सुरु होतोय.”

अमितच बोलणं आसवारीच्या मनामनात शिरलं होतं. पटलं होतं रंजितला विसरणं शक्य नाही, तो ह्या ना त्या मार्गाने समोर येईलच पण अमितच अस्तिव आता जास्त म्हत्वाच आहे. मनात विचार पक्का झाला होता. आसावरीच्या ओठंवर शब्द आले होते, पण तिने ते गिळले, पलंगाच्या कोपरयाशी झोपली आणि हाताने पलंगाला सावरत म्हणाली, “हा येवढा मोठा पलंग, ह्या वर मी कधीची एकटी झोपते ना...” विचारात डोळा लागला

अमित तिला आवडायला लागला, तिच्या मनामनाच्या कप्प्यात अमित शिरला होता. त्याच्या आवडीच करायला तिला आनंद येत होता. सासू सासरेही दोघांना निवांत भेटावा म्हणून सतत घरातून बाहेर राहत असतं, कधी ह्या मुलीकडे तर कधी त्या मुलीकडे त्यांची वारी सुरु होती. ह्या महिन्यात ते देवदर्शनाला गेले होते.

अमितची प्रत्येक गोष्ट हळुवार हाताळत आता आसावरी स्वतःची राहिली नव्हती, त्या दिवशी तो परत घर आवरून सामानाची लिस्ट तयार करत होती. लिस्ट मध्ये फक्त अमितला आवडणाऱ्या वस्तू होत्या, सहज तिने विचार केला आणि उत्तर मिळालं. मी आता माझी ना राहिले.

तीने वहिनीला फोन लावला, कावूला शाळेतून घेवून जायला सांगितलं, अमितने तिच्या वाढदिवसाला आणलेली साडी नेसली. तयार झाली, ती अमीत ची वाट बघत होती, अमित आज त्याची रोजच्या वेळवर आलंच नाही, आसावरीने फोन लावला पण तोही तो उचलत नव्हता. लक्षात आलं होतं तिच्या कि तो उशिरा येणारं होता म्हणून पण आता खूप उशीर झाला होता, आसावरी घाबरली, तिची कासावीस वाढत होती. बाहेर वातावरण अचानक बदलंलं, विजा चमकत होत्या तसं तसं असवारीच मन बैचेन होतं होतं. ढग आदळले कि असवारीच्या मनातले विचारही जोरात आदळायचे आणि ती सैर वैर व्ह्यायचे. आज ती पूर्ण अमितमय झाली होती पण अमित घरी पोहचला नव्हता.

स्वतःला दोष देत होती तोच तिला गाडीचा आवाज आला, ती दार उघडायला धावली, अमित ओला चिंब आणि जरा रक्ताळलेला दारात उभं होता. ती त्याला असं बघून त्याला गच्च बिलगली.   

अमितनेही तिला अलगत हात लावून सावरलं, “अग ओला झालोय, टॉवेल घे बघू आधी.”

“अहो पण हे काय लागलय हो.”

“अग माझी गाडी घसरली ग, जरा लागलं, काही नाही, तू गिझर लाव मी अघोळ करून घेतो, चहा ठेव मस्त कडक.” म्हणत त्याची नजर आसावरीवर पडली.

अरे व्हा आज स्वारी मस्त तयार दिसते... आसावरी लाजली, अमित गुणगुणत आंघोळीला गेला. बाहेर आला तेव्हा आसवारीने त्याच्या आवडीचा चहा आणि मस्त भजी खायला घेतली.

आज बऱ्याच दिवसांनी दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि मग नभातला चंद्र उगवला, रात्र चढत होती तसं प्रेम खुलत होतं... आणि दिवे विझले... आसावरी तिची राहिली नव्हती...ती अमितमय झाली होती...

सकाळ खूप आनंद घेवून आली होती. अमित सकाळीच कावूला घ्यायला गेला. आणि मग घरात आनंद ओसंडत होता...

महिन्या भरानंतर आई बाबा घरी आले होते. अमित आणि आसवारीचा चेहरा खुलला होता. अमित आज खूप दिवसांनी गाणं गुणगुणत होता. त्याला असं बघून आई स्वयंपाक घरात काम करत असणाऱ्या आसवारीला म्हणाली, “आसावरी, खूप दिवसांनी अमितला येवढ खुश बघितलं ग मी, तो गाणं गुणगुणतोय, सुखी राहा दोघं अनुज काय हवं आम्हाला... तू त्याला स्वीकारलं, आता सगळं नीट होईल ग...”

“आई, त्यांनी मला स्वीकारलं मनापासून, मग मी कशी मागे राहू... मी माझी ना राहिले आता...” म्हणत तिने अमितला आवाज दिला, “अहो जरा येताय का इकडे, ह्या डब्याच झाकण फिट्ट बसलं आहे... भजी करायची म्हणते... या मदतीला...”

अमित आवाजावर आलाही, आणि मग दोघेही भजी करण्यात गुंग झाले...

कथा कशी वाटली नक्की कळवा...

माझ्या नवीन कथा वाचण्यासाठी stay connected to मनातल्या तळ्यात! https://www.facebook.com/manatlyatalyat

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

 माझ्या पुढच्या कथेसाठी माझ्या पेजला लाईक करायला विसरू नका https://www.facebook.com/manatlyatalyat

 

 

 

Post a Comment

0 Comments