सकाळी सुमधुर गाणं कानावर पडलं
राधिकाच्या, हळुवार रोमांचित करणारी ती सकाळ तिला मोहून गेली. स्वतः च्या मस्तीत
उठून ती गाणं गुणगुणायला लागली,
“गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे
व्हावे मिलन
व्हावे मिलन....”
तोच मोठा भाऊ ओरडला, “हो होणार ग, होणार... हो तयार, आई सकाळपासून कामाला लागली आहे. आणि
तू, काय सुरु आहे तुझं, येणारं आहे ना आज तुला बघायाला मुलगा... मग..”
“ये दादा, गप्प रे, मी तर गाणं म्हणत
होती, किती सुंदर गाणं आहे हे... अणि तूच लावलास ना?”
“हुम्म... मग, व्हा तयार. आईला मदत
कर, तिची कंबर दुखत आहे ग, आणि बाबा आज नुसते चीडचीड करत आहेत. माहित नाही काय
बिनसलय. आजचं पाहुणेही येणारं आहेत! हे बाबा पण ना! मनात नाही तर सांगायचं होतं त्यांना ग.”
“दादा, काही गडबड तर होणार नाही ना
रे...”
“तू काळजी करू नको, मी सांभाळतो. तू
आधी तयार हो, स्थळ उत्तम आहे. आणि तुला पसंत केलंय त्यांनी आधीच, मी सांभाळतो बाबांना. बघू काय होत
ते ”
मोठा भाऊ रंजित काळजीत होता, बाबांचा स्वभाव
त्याला माहित होता, खर तर बाबांना कशातच रस नव्हता, ना आईत ना मुलांमध्ये. घरात
पायही त्यांचा नसायचा. आईने स्वतः सगळं आता पर्यंत ओढलं होतं. आई बाबांच्या सतत घरातल्या
कुरकुरीमुळे घर कधी आनंदात नाव्हून निघालं नव्हतं. पण दोघे बहिण भाऊ मनाने गुंतले
होते. आई बाबा भांडत असले कि रंजित एका खोलीत राधिकाला घेवून गुमान बसून असायचा,
आणि तिला सांभाळता सांभाळता तो तरुण झाला, तिच लग्न व्हावं म्हणून तोच प्रयत्नात
होता. नौकरीला नुकताच लागला होता पण अजून लग्न केलं नव्हतं त्याने. बहिण राधिका
त्याची बहिण कमी आणि मैत्रीण जास्त होती. लहान असली तरी नेहमी त्याच्या सोबत
असायची. लहान सहान गोष्टी
तिच्यासोबत तो बोलून मोकळा व्हायचा. बहिण भावाच्या मधुर
नात्याने घर आजही श्वास घेत उभं होतं. आई सतत स्वतः त हरवलेली असायची आणि बाबा तर
म्हण्यापुरते होते.
आईने घर आवरलं होतंच, पण बाबा सकाळीच
घरातून निघून गेले होते. आज शनिवार होता तरीही ते घरी नव्हते. ते गेले होते रसिका
कडे, त्यांची दुसरी बायको. जी कायद्याने नव्हती पण होत ती त्यांची मनाची बायको. आई
वडिलांच्या मनानुसार त्यांनी रत्नमालाशी लग्न केलेलं पण कधी मन जुळली नव्हती.
रसिकापासूनही त्यांना दोन मुली होत्या. रसिका त्यांची जिवाभावाची मैत्रीण होती. कॉलेज
मध्ये सोबत होते, प्रोजेक्ट सोबत केलेला आणि मन गुंतत गेली, खूप प्रेम होतं दोघांचं,
कॉलेज
संपताच दोघांनी लग्नही केलं पण राजेशच्या बाबांना ते मंजूर नव्हतंच. रसिका आपल्या समाजाची
नाही आणि ती ह्या घराण्याची सून कधीच होवू शकत नाही हे ऐलान त्यांनी केललं. त्यात भर म्हणजे रसिकाला दोन्ही मुली झालेल्या मग
काही मार्गच नव्हता रसिकाला घरी आणण्याचा राजेशकडे.
वडिलांच्या हट्टासमोर राजेशच काहीच
चालल नाही, रात्नाशी लग्न केलं नसतं तर सर्व संपती त्यांचे बाबा समजाला दान देणार
होते. शेवटी नाईलाज मग, ते हयात असे पर्यंत त्यांनी रत्नाशी त्यांनी संसार केला, सासू
सासरे वारले आणि रत्ना पोरकी झाली. समोर अचानक आलेलं
सत्य ती काहीशी सांभाळू शकली नाही, तीच राजेशची दुसरी बायको ठरली. तिचा त्रागा
योग्य होता पण समोरचा नाईलाजाने उभा होता. दोन मुलं पदरी पडली होती आणि हा उभा वाडा तिला सून म्हणून
स्वीकारून उभा होता. राजेशवरचा विश्वास तुटला
होता, जाण्यात अर्थ नव्हता. पण ती ह्या साम्राज्याची मालकीण होती मग अहंकार
तिच्यात शिरत गेला. रसिकाला ती तिची दुश्मन समजायला लागली होती.
नात्यात दारी वाढत गेली आणि एका छत्रा खाली दुष्मन राहायला लागले.
रंजित बाबांची वाट बघत होता, खूप फोन केले त्याने पण बाबा काही उत्तर
देत नव्हते. तर आई म्हणाली, “कशाला वाट बघतोस त्या माणसाची, मी आहे
ना?”
“ग, पण बाबा आहेत ते राधिकाचे.”
“मी आई
आहे, मला मान्य आहे तो मुलगा..”
“आई,
तुला
का मान्य आहे हे मला माहित आहे.... बाबा नाही म्हणतात म्हणून, बस .... बाकी तुला काही माहित आहे का ग?”
आईने तोंड वाकडं केलं आणि आतल्या खोलीत निघून गेली.
रंजितने नाईलाजाने रसिकाला फोन
लावला आणि निरोप दिला.
रसिका बाबांना नक्की निरोप देईल आणि बाबा येतील ह्याची त्याला शाश्वती होतीच. रसिका मनाने खूप हळवी होती. तिलाही स्वतः मध्ये ग्लानी होतीच, राजेश आणि रत्नाच नातं अजूनही होतं ते मुलांसाठी आणि त्याला कारणीभूत फक्त रसिका होती. तिने कधीच रंजित आणि राधिकाला राजेशला भेटायला किंवा कुठल्याही गोष्टीसाठी अडवलं नव्हतं. तिच्या साठी तिच्या दोन मुली तसे हे दोघ होते.
आणि हे रंजित जाणून होता.
पण आई रसिकाच नावं ही घरात घेतलं कि तांडव उभ करायची आणि मग रसिका साठी रंजितच्या
मनात अळी पडत गेली. तरीही जेव्हापासून समज आली, त्याला रसिका नेहमी शुद्ध मनाची
वाटली, आजही तिच्याशी बोलल्या नंतर त्याला बाबा येणारं ह्याची खात्री झाली होती.
बाबांच्या काहीदा सांगूनही त्याने तिला कधी आई ही हाक मारली नव्हती पण ती त्याला
मुलगाच मानायची. मग तिने त्याची काळजी जाणली होती.
बाबा निघाले होते, रसिकाच्या आग्रहाने, येणारा मुलगा त्याना पसंत नव्हता,
त्यांच्या मते तो त्यांच्या तोला मोलाचा नव्हता. आणि मुख्य म्हणजे रसिकाच्या लहान
मुलीसाठी ते स्थळ कुणीतरी त्यांना सुचवलं होतं जे त्यांनी तेव्हाही नाकारलं होतं,
मग आज परत त्याच लोकांना समोर बघायला ते तयार नव्हते.
पण मुलगा आता रंजीतच्या मित्राचा भाउ होता, आणि रंजितला त्यावर
विश्वास होता. राधिकालाही त्याने पसंत केलं होतं. आणि त्या मुलाला घरची
परिस्थितीही माहित होती....पण तरही हे मिलन सोपं नव्हत...
राधिकासाठी तिचा भाऊ तिच्या सोबत होता आईला नेमकं तेच करण्यात आनंद असायचा जे बाबांना पसंत नसायचं. आणि बाबा तर नावाचे बाबा होते... मग बघूया हे मिलन होतं का..
कथेचे पुढचे सर्व भाग मनातल्या तळ्यात पेजला प्रकाशित झाले आहे. तेव्हा लाईक करा आणि नक्की वाचा !
https://www.facebook.com/manatlyatalyat
कथा कशी वाटली नक्की कळवा... कथेच्या पुढच्या भागासाठी पेजला नक्की लाईक करा...https://www.facebook.com/manatlyatalyat
©उर्मिला देवेन
0 Comments