जोडीदार...तू माझा...भाग १
"अहो ऐकलं का?"
"नाही ना, राणीसाहेब! तुम्ही बोललाच नाहीत अजून! मग कसं ऐकणार."
"काहीपण हो तुमचं, जरा मिठाई घेऊन या, सकाळी ऑर्डर केला होता ना आठवणीने, कि विसरले होते?"
"नाही नाही .. लिहून ठेवलं
होतं मी आणि ऑर्डर केला होता आठवणीने, निघतो आता आणि घेऊन येतो. हा निघलो आणि
हा आलो बघ!"
आरती अरुणरावांना ओरडून ओरडून सांगत होती आणि ती स्तवतःची तयारी
करत जणू घरातल्या सर्वाना तयार करत होती.
अरुणराव गाडीची किल्ली घ्यायला आत आले आणि मग
डोक्यावरचा चष्मा डोळ्यावर ठेवत ते म्हणाले,
"काय दिसतेस ग तू! अजूनही... "
"तुम्हाला बऱ सुचतं हो असलं, काही
बोलायला, एवढी धांदल सुरु आहे घरात आणि... या आता, आलेच
तर माझा पदर मागून बरोबर टाचा बर."
"मग, तू तर आपली जीगरा आहेस ग! आण ती
पिन इकडे. बघ कसा एकदम फिट टाचून देतो."
अरुणराव पिन टाचत होते आणि आरती त्यांना
म्हणाली,
"काय हो, तुमची लाडाची लेक येणार आहे
ना आज तरी वेळेवर घरी?"
"हो तर! हाफ डे घेतो म्हणून सांगून
गेली ती.. येईल माझं पोरं वेळेवर... तू तिला बोलायचं नाही. नुसती
बळबळ करत जावू नको माझ्या पोरींच्या मागे. कामाची पोरं आहे माझी, कळलं!"
भाग १
जोडीदार तू माझा - भाग १ - Jodidar Tu Majha - part 1 bhag 1 Manatalya Talyat, Urmila Deven, Jodidar
क्लिक करा आणि नक्की बघा.
0 Comments