चलो... जाने भी दो यारो...



राणी मोठी सून होती. लहान दीराचं लग्न होणारच होतं. त्याची होणारी बायको MBA आणि सुंदर होती. राणीच्या मनात वाटत होत जाऊबाई आल्या कि सर्वच तिचं गुणगान करतील. मग ती सर्वांचं मन जिंकण्याच्या मागे लागली. 

सासू जसं म्हणेल तसं करायची. सर्वांची काम स्वतःहून ओढून घेत होती. कुणालाच नाही म्हणत नव्हती. सकाळपासून प्रत्येकाचं करण्यात तिला स्वतःच भान राहत नव्हतं. प्रत्येकाच्या ओठावर तिचंच नाव राहावं ही तिची इच्छा पूर्ण होत होती. घरात सकाळपासून राणी आणि सुनबाईचा गजर होत होता. आणि राणी मनातल्या मनात सुखावत होती कि नाही हे तर तिलाच कळत नव्हतं.

घरात लहान सुनेने पाय ठेवला पण अगदीच दिरालाही प्रत्येक गोष्टीसाठी वहिनी लागायची. पण रंजिता कधीच मनाला लावून घेत नव्हती. सासूने एखाद काम सांगितलं आणि तिला जमणार नसलं तर ती सहज मला जमणार नाही पण तुम्ही सांगा असं म्हणून करायची. 

कामाचं श्रेय स्वतः कधीच घेत नव्हती. नेहमी घरातल्या लहानांपासुन तर मोठयापर्यंत प्रोसाहन देत होती. जिथला विषय तिथेच संपवून नवीन गोष्टीला लगेच हात लावण्यात ती तेज होती. रंजिता काहीही न करता सर्वाना प्रिय होती आणि ती स्वतःवरही लक्ष देत होती. आणि राणी मी स्वतःच सर्व करावं ह्या नादात एकटी पडली होती. तिला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळही मिळत नव्हता. राणीच्या लक्षात येतच नव्हतं कि असं का होत आहे. मग ती कानोसा घेण्यासाठी रंजिता कडे गेली.

राणी, "तू काहीच न करता सगळं कसं करतेस ग?"

रंजिता, "ताई मी काही गोष्टी जाने भी दो असं म्हणतं सोडून देत."

राणी, "म्हणजे ग!"

रंजिता, "ताई रोजच्या कामात अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्याने आपलं काहीच बिघडत नसतं आणि आपण मात्र उगाच त्या गोष्टीला वाव देता आणि अडकून बसतो "

राणी, "म्हणजे घर आपलं आहे. मग माणस जपायला नको"

रंजिता, "अगदीच,पण माणसं जपण्यासाठी आपण त्याच्या मागे पुढेच राहायला हवं असंही नाही. मी प्रत्येक गोष्टीत निपुण तर राहूच शकत नाही ना. मग अश्या गोष्टी मी जावूच देत. त्याच्या मागे लागत नाही. ज्या गोष्टी ज्यांना जमतात त्याची स्तुती करायला मागे पुढे करत नाही. 

आता तुम्हाला माझ्यापेक्षा उत्तम स्वयंपाक येतो मग मी का म्हणून मिरवू. माझ्याकडे नसणाऱ्या गोष्टीच्या मागे धावतच नाही. मी माझ्या गोष्टीच रमते आणि त्यालाच फुलवते सर्वांसोबत. मनातल्या गोष्टी सहज बोलून मोकळी होते.

समोरचा काय विचार करेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि कुणी काही म्हटलं आणि न पटणारं असलं तर जाने भी दो यारो असं म्हणत सोडून देत. जशी मी आता तुमच्याशी बोलत आहे कुठलाच आड परदा न ठेवता."

राणीने डबडबल्या डोळ्याने तिला मिठी मारली आणि रंजिता हसत म्हणाली, 

"काय हे... चलो ...जाने भी दो यारो ... "

आणि मग राणीने दोहींसाठी चहा केला आणि दोघीही बैठकीत निवांत बसुन गप्पा करत होत्या. लागलीच सासूबाई आल्या आणि म्हणाल्या 

"अरे रे ... काय हा स्वयंपाक घरात पसारा."

 रंजिताने सासूला हात धरून बसवलं आणि म्हणाली, 

"जाने भी दो ना आई ... आज चहा पार्टी, ताई ने खास तुमच्यासाठी आल्याचा चहा केलाय. गरम गरम घ्या आणि चिल करा." 

आणि मग घरात महिला मंडळाच्या गप्पा खूप वेळपर्यंत रंगल्या.

मग मित्र मैत्रिणिनो, असं होतं  असेल तर काय वाईट जाने भी दो ना म्हणायला... बघा पटलं तर...

©उर्मिला देवेन

धन्यवाद!! माझ्या नवीन कथा माझ्या पेजला नक्की वाचा !!https://www.facebook.com/manatlyatalyat

जोडीदार तू माझा कथेचे भाग मनातल्या तळ्यात channel ला प्रकाशित झाले आहेत. नक्की बघा!



------------------------------------------

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.


फोटो आभार गुगल

Post a Comment

0 Comments