जेव्हा ex परत येतो...अंतिम भाग

 


अरुंधतीच मन भरून आलं होतं. माधव तिच्या पायाशी बसून माफी मागत होता

“अरु आपण अर्थला खूप मोठ्या हॉस्टेल मध्ये ऍडमिशन देऊया, USAला पाठवू त्याला. आणि आणि इवलीशी अनवि तिला ... ती तुझी मुलगी आहे ना...? मग ती माझीही.... किती गोड  बोलते ती. तुझे आई बाबा आपल्या सोबतही राहू शकतात. मला काहीच हरकत नाही. मी ना आताच समाधान निवासात सर्व व्यवस्था करायला सांगतो.”

माधव उठला, त्याने फोन हातात घेतला, आणि मॅनेजरला सांगायला लागला, “साने, मॅडम आणि माझी खोली रिनोव्हेट करायला सांगा. वरच्या माळ्यावर अनवी बाळाची खोली सज्ज करा. खाली स्टडीच्या शेजारची खोली अर्थ साठी जमवा. खालच्या हॉलच्या लागून असेलली खोली लगेच तयार करा. आई बाबांसाठी योग्य राहील ना अरु...”

माधव आवेशात बोलत होता. अरुंधतीच्या डोळ्यात अश्रुंनि गर्दी केली होती.. आणि अचानक बाहेर वातावरण बदललं, जोरात वारे वाहू लागले. विचा चमकायला लागल्या. ढगांनी गर्दी केली आणि क्षणात पाऊस धारा बरसल्या  लागल्या. माधव खिडकीजवळ उभा होता. आणि म्हणाला, “बघ अरु ऋतू हि ग्वाही देतोय आज... बघ. आह पाऊसधारा बरसल्या, धरणी शांत झाली... मी ... शांत झालोय... आज मी मला गवसलोय... तुझ्या विना मी काहीच नव्हतो, तुला माहित आहे तो परवा झालेला ऍक्सिडेंट मी मीच ठोकला ग, कंटाळा  आला होता मला जगण्याचं... संपवायच होतं  मला सारं काही... पण म्हणतात ना... जिथे अशा संपते तिथेच नवीन सुरूवात होते.. आज तू मिळालीस परत, आयुष्यात बहार आली माझ्या. आता बस तू आणि मी...”.

माधव परत अरुंधतीच्या समोर आला, तिला आता तो तिला बिलगणार होता तर अरुंधती मागे झाली, माधव परत जवळ येत तिच्या केसांना हात लावण्याच्या तयारीत म्हणाला, “अरु, आपण किती दिवसाने एकत्र आलोय...” तो परत जवळ आला, अरु परत  मागे झाली, ती मागे होता होता, अमितच्या फोटोजवळ आली,

अमितच्या फोटोला बघता बघता चक्क तिची प्रतिमा तिथे दिसली तिला, “अमित आजही अश्रू वाहू दिले नाहीस रे... बघ ना बरसलास... मी शांत झाले. आता कस सगळं वाहून गेलं... स्पष्ट झालं सारं...” तिने अमित जवळ दिवा लावला.

त्याच दिव्याच्या प्रकाशात तिला सार काही आठवायला लागलं, आई त्या दिवशी तिच्या बाबांच्या फोटोसमोर दिवाच लावत होती, आणि एकाकेकी खाली पडली, अरुंधतीला काहीच सुचलं नाही, ती आईला घेवून तिच्याच हॉस्पिटल मध्ये गेली, पण डॉ ती नव्हतीच ना, आणि रीसेप्शनिस्टला कोण भाव देणार, पण आईची प्रकुर्ती बिघडतं होती, हॉस्पिटल ओळखीचं होतं मग कुणाचीही पर्वा न करता ती सांर काही पटापट करू लागली, जोपर्यंत डॉ आले तोवर तिने सार काही मॅनेज केलं होतं. त्या दिवशी अचानक तेच हॉस्पिटल बांधणारा बिल्डर अमित राणेही डॉक्टर सोबत आला होता, डॉकटर ने अरुंधतीच्या आईला तपासालं आणि म्हणाले, कुणी उपचार केलेत ह्याच्यावर...”

अरुंधती जवळ आली आणि पायाशी बसली, मी केलेत, क्षमा असावी... माझी आई आहे ती, मी थांबू शकत नव्हती.. तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे... पण... आणि माझ्या पेमेंट मधून तुम्ही कापून घ्या खर्च.”

डॉक्टरानी एक नजर स्टाफ कडे बघितलं, तर नर्स म्हणाली, डॉ तीच MBBS होता होता राहिलं आहे, मग मी तिला मदत केली... चूक झाली माझी.”

अरुंधती तू रीसेप्शनिस्ट म्हणून काम करतेस इथे. तू आताच कॅबीन मध्ये ये...”

अरुंधतीने एक नजर आईवर टाकली आणि ती डॉक्टरांच्या आणि अमितच्या मागेच कॅबीन मध्ये गेली.

हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर आणि अमितची घनिष्ट मैत्री होती. त्या हॉस्पिटलचे तीन पार्टनर होते. आणि आज त्यांची महत्वाची मिटिंग होती हॉस्पिटल वाढवण्या साठी, आणि म्हणून आज डॉ, हॉस्पिटलला नव्हते.

अमित त्याच्या मित्राला म्हणजे डॉ सावंतला म्हणाला, मित्रा मी निघतो, मला आज बाबांना काव्य संमेलनात सोडायचं आहे. आणि अर्थ राहत नाही रे माझ्याशिवाय.”

तो निघणारच होता तर अरुंधती आत शिरली, आणि मग अमित का कुणास ठावून तिथेच थांबला. कदाचित अरुंधतीच्या चेहऱ्यावरच्या भावना त्याला तिथून हलू देत नव्हत्या.

डॉ सावंतानी अरुंधतीला बसायला सांगितलं, “काय ग, कॉलेज का सोडलं, करायचं आहे का परत?”

अरुंधती काहीच बोलली नाही...हळूच म्हणाली, “सर, करेन मी, फिसही रक्कम जमा करत आहे...”

“आणि मी भरली तर...?”

“सर,... मी करेन ना, पण आज मला क्षमा करा आपण... मी आईला तसच ठेवू शकत नव्हती आणि मी  तुम्हाला नेहमी बघत आले आहे. मग केलं धाडस.”

“मग हे धाडस रोज कर... उद्याचं मुंबईला निघ, हवं ते कर पण ती MBBSची डिग्री घेवून इथेच यायचं.”

“सर पण...?”

“पण बिन काही नाही... त्यांनी लगेच फोन लावला, आणि अमितला म्हणले, “अबे ये, तुझा तो flat खाली आहे ना, किल्या पाठवून दे उद्या...”

अमित काहीच बोलला नाही, पण नंतर म्हणाला, “मी जातोय दोन दिवसाने माझी मिटिंग आहे आपल्या नवीन साईट साठी... हिची हरकत नसेल तर सोडतो मी हिला, आणि अडमिशनच पण बघून घेतो.”

“काय हो अरुंधती मॅडम,तुमचं अंतिम वर्ष बाकी आहे ना?”

“हो, म्हणजे अडमिशनच घेतली नव्हती, घेणार होते पण... मग ...”

“असुद्या, तुमच्या आई बऱ्या होतात मग आपण निघूया, आणि बघा आता अडमिशन होणार आहेत सूर. अबे साल्या, तू फोन कर त्या डीनला, सांग त्याला हिला पाठवत आहे म्हणून.”

अमित आणि डॉ सावंत एकमेकांची खेचत होते. पण अरुंधती खूप खुश होती, म्हणाली, “सर पण माझं...?”

“पण बिन काही नाही, तुझा पगार सुरु ठेवू आम्ही... काही हरकत नाही...”

अमित जरा थांबला, म्हणाला, “तू एकटीच आहेस का?”

“नाही, माझा भाऊ आहे, पण तोही आताच त्या नवीन राणे कन्स्ट्रकशन मध्ये लागला आहे, त्याचा पहिला पगारही अजून आला नाही... नवीन आहे मग सांगता येत नाही...”

आता मात्र अमित आणि डॉ सावंत हसायला लागले, डॉ सावंत म्हणाले, “अग अरुंधती तू राणे कन्स्ट्रकशनच्या मालका समोर उभी आहेस.”

अरुंधती घाबरली, “माफ करा, मला महित नव्हत, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतंच, मला इकडल काही माहित नाही...”

“अग अग, असुदे, हेच राणे कन्स्ट्रकशनचे मालक आहेत. काही काळजी करू नकोस. मला तुझ्यात एक खूप मोठी सर्जन दिसत आहे, येवढ्या बारकाईने इथे कुणीच काम करत नाही, तुझ्या आईला खूप नाजूक अवस्थ्ते हाताळलस. आम्हाला तू हवी आहेस, डॉक्टर म्हणून, चला अभ्यासाला लागा....”

आणि ते अमितसोबत गप्पा करत कॅबीन मधून निघून गेले, निघतांना अमितची नजर मात्र अरुंधतीवर खिळली होती, तिच्या गालावरची नाजूक खळी त्याला आवडली होती... गप्पा करता करता खूप पुढे जावूनही तो परत मागे आला, अरुंधती मागे होतीच, तिला बघून म्हणाला, “काही काळजी करू नकोस, तू योग्य माणसाला गवसली आहेस... डॉ सावंतांची नजर जोहरीची आहे.... आणि आता तू हिरा आहेस.

तुझं नंबर मी घेवू ऑफिस मधून कि देतस? परवा मी सोडतो तुला, म्हणजे माझे आई बाबा पण असणारं आहेत सोबत. तुही चल, flat मध्ये सोडून देईल, तुझ्या आईलाही घे सोबत, त्या बऱ्या होतीलच हे ऐकल्यावर... काय हसतेस ना आता...”

अमित नुसता बोलत होता आणि अरुंधती बघत होती, बघता बघता तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली, रडक्या आवाजात तिने नंबर दिला, अमित हसला... म्हणाला, “आय हेट टियर्स ....आता इथे त्सुनामी येवू देऊ नकोस... मी फोन करतो...” अमितच्या अश्या स्वभावाने तिच्या रडक्या चेहऱ्यावर अश्रू अलगत हसू आलं होतं.

 पुढे वर्षभरात अमित आणि अरुंधती बऱ्याचदा भेटले, दोघांही एकमेकांबद्दल सांर काही माहित झालं होतं, अमितची बायको बाळाला जन्म देताच वारली होती, जातांना त्याच्या बायकोने वचन घेतलं होतं सदा आनंदी राहण्याचं आणि तोच प्रयत्न अमितचा असायचा. पण कधीच खुलत नव्हता. अचानक अरुंधतीच्या आयुष्यात येताच तोही मोकळा होतं चालला होता. अमित अर्थसाठी नेहमीच काळजीत असायचा,

त्या दिवशी अर्थची प्रकृती नाजूक झाली होती आणि ही गोष्ट अरुंधतीला कळताच ती लगेच त्याच्या घरी पोहचली होती, तिने अर्थची खूप काळजी घेतली.. अर्थ बरा झाला. आणि मग जे झालं त्यावर कुणाचाच आपेक्ष नव्हता, अमितच्या आईने अर्थला अरुंधतीच्या हातात दिलं, “अरुंधती आई होशील अर्थची?”

अरुधातीलाही अर्थचा लडा लागला होता, तिने तर तिचं बाळ गमावलं होतं मग तिच्यातली आई अर्थंमुळे जागी झाली होती. अमित आणि अरुंधतीने सर्व संमतीने कोर्ट मॅरेज केलं. दोघांच्या नात्यात अवघडपणा होता पण सहज सहज झाला. अरुंधतीसोबत मुबईला आता अर्थ, तिची आई आणि सासू सोबत राहत होत्या. अमितची ये जा सुरु असायची. अरुंधतीने एमबीबीएस पूर्ण केलं आणि रुजू झाली हॉस्पिटलला... अमित आणि अरुंधती दोघेही भिन्न व्यवसायातले होते पण मनाने सहज जुळले, दोघांचीही नवीन सुरुवात होती. नात बहरत गेलं तसे दोघही मोठे होतं गेले. अरुंधती सर्जन झाली होती तर अमित नावी बिल्डर. अरुंधतीचा भाऊ आता विदेशात नौकरी करत होता. नंतर लग्न करून तो आईलाही सोबत घेवून गेला. आणि अरुंधती डॉ सावंत सोबत हॉस्पिटलची ३० % मालकीण झाली होती. अमितला सामजिक कार्याची खूप आवड होती, त्याने अनाथआश्रम, वृद्धाश्रम, वसतिगृह बांधली होती आणि त्याचा कारभार अरुंधती बघत असायची. दोघीही रमले होते एकेमेकात. अर्थ आईच्या मायेत मोठा होतं होता आणि अमित अरुंधती प्रेमात मुरत चालले होते. दोघांही एकमेकांच्या जखमा भरल्या होत्या.

अर्थच्या आयुष्यात आल्याने अरुंधतीला दिवस गेले होते जे तिलाही कळालं नव्हत... आणि जेव्हा माहित झालं तेव्हा आनंद मनामनात होता, तो क्षण अमित खूप जगाला होता. त्याला मुलगीच हवी होती आणि अनवी झाली, कुटुंब पूर्ण झालं होतं...

अमित आणि त्याच्या घरच्या कुणीच अरुंधतीला कधीच कशासाठी थांबवलं नव्हती, ती नावी सर्जन होती, तिला अमेरिकेत कॉनफेरन्स बोलावलं होतं, आणि अमित स्वतः तिला एअरपोर्टला सोडायला निघाला होता. तिला सूचना देता देता, अचानक त्याचा तोल गेला आणि गाडी ट्रकला आदळली, समोरचा ट्रकही वेगात होता, त्यालाही सुचलं नाही, पण काहीच वेळात अमितने अरुंधतीला जोरात बाहेर ढकललं, अरुंधती बाहेर गाडीच्या बाहेर पडली आणि अक्ख्खा ट्रक अमितला चेंगरून निघून गेला. स्वप्न चेंगरून जावी असचं झालं होतं.

अमितने शेवटचा श्वास अरुंधतीच्या मांडीवर घेतला, शेवटी पर्यंत म्हणत राहिला, हे अश्रू नकोत मला...तू हवी आहेस...

अरुंधती जोरात ओरडली, “अमित.... अमित ........”

ओरडतच ती भानावर आली, “अमित ....”

“अरु काय झालं, हो अमित... अमित आहेच ना आपल्या सोबत....” माधव अरुंधतीला जवळ घेत म्हणाला.

अरुंधतीने माधवचा हात सोडवला, इकडे आई बाबांनाही आता अरुंधतीच्या अमित म्हणून ओरडल्याने काळजी वाटत होती, पण बाबांनी आईला अडवून ठेवलं होतं.

अरुंधतीने दीर्घ श्वास घेतला. तोच माधव परत अमिच्या फोटोजवळ आला, “अमितराव, मी घेवून जातोय अरुला, तुम्ही सांभाळलं ह्यासाठी, धन्यवाद.... म्हणजे खूप खूप उपकार हो, माझी अरु आधीसारखी खदखदून जगते, आणि मला काय हवंय. आध्न्या द्यावी आता... खूप सहन केलंय तिने अजून मी नाही करू देणार... तुम्ही तिला माझ्या साठी जपलय... मी कधीच विसरणार नाही... अरु माझी आहे आणि माझीच राहणार.. अरु चल.... तुझं सामान बांधूया आपण....”

तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर तिकिट्स मिळाल्या म्हणून मेसेज आला, तो लगेच ओरडला, “अरु तिकिट्स आल्यात, उद्या सकाळी निघ्याच आपल्याला, सगळ्यांना. म्हणजे आपण आधीही जावू शकतो... तू म्हणशील तसं...पण मुलांना घेवून जावू सोबत...मला काहीच हरकत नाही... अरे मला आता कुणाचीच काही हरकत नाही...”

अरुंधतीने, डायरी काढली, ती काहीतरी शोधात होती, माधव परत बोलला, काय बघतेस, अजूनही डायरी वापरतेस काय ग? मोबाईलवर लिहित जा ना, नोट मध्ये.”

अरुंधती हसली, माझ्या उद्याच्या सर्व आपॉइनमेंट बघते.

“हो कर कि रद्द! अरु चल आपल्याला आताच निघायचं आहे, मला आता एक क्षणही तुला इथे ठेवायचं नाही....

“माधव तुला जाणून घ्याचं नाही कारे, मधल्या काळात काय काय झालं ते....”

“अरु तू मिळालीस, आणि काय हवंय... मान्य आहे मला खूप सहन केलंस तू... आणि सांग ना नंतर...

असं.... तू ऐकणार?

अग....का नाही...?

अरुंधती परत स्मित हसली, “ असो, उद्या मला दोन सर्जरी आहेत, अर्थचा पहिला पेपर आहे दिवाळी परीक्षेचा... बाबांचं काव्य संमेलन आहे रात्री ऑनलाई.. आईच्या काही रिपोर्ट्सही मिळणार आहेत. माझं गेस्ट लेकचर आहे....”

“सर्व cancel कर....उद्या आपण निघतोय....”

“माधव, किती वेळचा फक्त तू बोलत आहेस, मला एकदा तरी विच्रारलस मला काय हवय... सर्व स्वतःचे मनोरे बांधत गेलास... हाच फरक आहे तुझ्यात आणि अमित मध्ये...

“अरु... तू माझी आहेस ग... त्यात काय?”

“आणि गृहीत धरलंस...”

अग तसं नाही, बऱ तू म्हणशील तसं.... मी ना हा इथे राहायलाही तयार आहे बघ....”

अरुंधती हसली, आणि मग म्हणाली, चल निघ... खूप बोललास... जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर बोलत नव्हतास... किती वाट पहिली मी, अगदीच प्राण कंठात आले होते माझे....पण तू आला नाहीस... आणि आज मी खूप आनंदात आहे तर आलास परत मला तुझ्या नरकात घेवून जायला....”

“अरु मला माफ कर ग, मला आता काहीच फरक पडणार नाही... तू तुझी डॉकटरकी मुळीच सोडायची नाही....”

“पण मला आता तुझ्या असल्यानेही फरक पडतो.... तुला काय वाटलं अमित ह्या जगात नाही तर मी परत तुझ्या जवळ सहज येईल... काय समजतोस रे, स्त्री काय नवऱ्या शिवाय राहूच शकत नाही का?”

आता तुला म्हणून सांगते, अमित होता ना तेव्हा मी जेवढी त्याच्या प्रेमात होते ना त्यापेक्षा जास्त तो नसतांना आहे.... त्याच्या प्रत्येक कार्यात मी आहे... का कुणास ठाऊक माहित होतं त्याला... प्रत्येक गोष्ट मला सांगून गेलाय... त्याची स्वप्न जगायची आहे... आणि ती तुझ्यासोबत नाही जगता येणारं मला...

काय बोललास अर्थला तू USAला पाठवशील.... अरे तो ह्या संपूर्ण संपत्तीचा वारस आहे.... राणे कन्स्ट्रकशन त्याचं आहे. हा त्याला आता माझ्या सारखं सर्जन व्हायची इच्छा आहे पण अनवी आहे....मी आत्ताही राणे कन्स्ट्रकशनचे महत्वाचे निर्णय घेते, बाबा जावून येतात ऑफिस मध्ये, किती कमावलंय त्याने बघ ना तो नाही तरी कंपनी अगदीच तशीच चालते जशी तो असतांना चालायची... माणसं जिंकली त्याने. तुझं काय.... कोण आहे तुझ्यासोबत... इथे ह्या घरात माझ्या रक्ताचं कुणीच नाही पण... माझ्या रक्ताचा एक बुंद जरी पडला ना तर आसवांची नदी वाहेल इथे. असो तुला हे कळायचं नाही.

अग पण... मी सुध्रालोय

नाही रे... तू तसाच आहेस...अजूनही...

पण आपली ही भेट...

बसं काही हिशोब बाकी राहिला होता... तसा समज...

अरु ...

बसं !! मला अरु तरी म्हणू नकोस... मी अरुंधती अमित राणे आहे...अरु असा निर्णय कधीच घेवू शकली नसती... असं मला अमितने केलंय...

अरु तू समज ना... अग हे सगळे वापर करत आहे तुझा..

आणि तू नाही करणार...

“खूप वेळ झालंय, मी तुझी वाट खूप बघितली पण माझी वाट बदलली आता... आता परत त्या वाटेवर जायचं नाही... जे होईल ते आता अरुंधती राणेच होईल..... निघ तू... माझे आई बाबा माझी काळजी करत असतील...

उगाच त्यांची प्रकृती बिघडायची आणि मग धावपड होईल...”.

माधव पुरता नाराज झाला होता. अरुंधती खिडकीत आली, नभाकडे बघत स्मित हसली... माधव मात्र अजूनही परतत नव्हता... आता अरुंधतीने हात जोडले, “निघा मिस्टर पंडित.... आपला वेळ संपला, मी जास्त वेळ पेशंटशी घरी बोलत नाही.” आणि तिने बाबांना आवाज दिला, “बाबा अहो मोठ्या गेटची किल्ली घेवून या”

आई बाबा तर झोपलेच नव्हते, बाबा आले आणि त्यांनी किल्या अरुंधतीच्या हातात दिल्या, “बाबा तुम्ही गेट खोलून द्या, मिस्टर पंडित निघणार आहेत.”

 अरुंधती हॉलमधून निघून परत तिच्या खोलीत निघणार होती, तर जरा अमितच्या फोटोजवळ थबकली, फोटोत बघत राहिली, म्हणाली, तुचं दिलीस ना एवढी शक्ती माझ्यात... जोवर आहे तोवर फक्त तुझी आहे.

तो ex म्हणून आला होता आणि तसाच परत जाणार..... चला उद्याची तयारी करते.”

माधव निघून गेला. बाबा आई हॉल मध्ये गुमान गप्प बसून होते. अरुंधतीला काहीही विचारण्याची हिंमत तर नव्हतीच त्यांची पण सांर काही कळालं होतं. आई बाबा कडे बघत होती आणि बाबा आईकडे, अरुंधती सहज पाण्यासाठी स्वयंपाक खोलीत आली आणि तिची नजर आई बाबांवर पडली, “आई बाबा, झोपा आता...वेळ किती झालाय...”

आई गुमान उठून अरुंधतीच्या जवळ आली, “अरुंधती ह्या किल्ल्या आहे वाड्याच्या आणि तिजोरीच्या... तुचं खरी मालकीण आहेस ह्याची...”.

“आई... अहो मी कशी ठेवणार...”

“नाही म्हणू नकोस... आणि तसही मी उद्यापासून जॉगिंग सुरु करते... तू म्हणतेस म्हणून सूट घालायला सुरवात करणार आहे, मग कुठे खोचू... तु ठेव मला नको आता.... मी आपली तू जे म्हणशील ते करेन.”

बाबानेही अरुंधतीच्या खांद्यावर हात ठेवला... अरुंधती काहीच बोलली नाही, तिने किल्ल्या ठेवून घेतल्या... आणि म्हणाली, “अलाराम लावते आहे. मी उठणार नाहीच पण दोघांही उठायचं आणि जॉगिगला जायचं....”

बाबा हसत आईला घेवून त्याच्या खोलीत गेले.... हॉल मध्ये अमित फोटोतून सांर काही बघत होता... हलक्या वाऱ्याने त्याचा हार हलत होता आणि घरात टांगलेल घंट्या हळुवार वाजत होत्या. रात्र शांत झाली होती.... निसर्ग मोहक झाला होता.... अरुंधती आज परत अमिच्या प्रेमात पडली होती....

कथा कशी वाटली नक्की कळवा... आणि माझ्या कथा वाचण्यासाठी माझ्या पेजला नक्की लाईक करा... माझ्या कथा फक्त मनातल्या तळ्यात पेजवरच आधी प्रकाशित होतात... तेव्हा स्टे tune.... मनातल्या तळ्यात https://www.facebook.com/manatlyatalyat


जोडीदार तू माझा कथेचा पुढचा भाग इथे प्रकाशित झाला आहे ... आणि कथा वाचकांच्या आग्रहास्तव दुसऱ्या आणि पहिल्या पर्वा सोबत पेजवर लवकरच येत आहे.




Post a Comment

0 Comments