“द बुमरेंग”… एक डाव तिचा.... भाग 4

 

आधीचे भाग इथे वाचा 

द बुमरेंग”… एक डाव तिचा.... भाग ३ https://www.manatalyatalyat.com/2022/03/3.html

द बुमरेंग”… एक डाव तिचा.... भाग २ https://www.manatalyatalyat.com/2022/02/blog-post_25.html

द बुमरेंग”… एक डाव तिचा.... भाग १ https://www.manatalyatalyat.com/2022/02/blog-post_21.html


राजेशच्या बोलण्याने ती परत कात्रीत आली होती. राजेशला सर्व सांगून मोकळं व्हावं हा विचार परत परत तिच्या मनात घुमत होता पण... त्याला सांगूनही मयूर तिला सोडणार नव्हताच ना? उलट राजेशने भलता सलता निर्णय घेतला तर राहिलेली हिम्मतहि तुटायची,  मयूरच तर काहीच जाणार नव्हतं, त्याला दुसरी कुणी मिळाली असती. विचार मनात धिंगाणा घालत होते. समोर ठेवलेल्या झोपेच्या गोळ्या सर्व घेवून संपवावं स्वतःला हा विचार प्रत्येक एका विचारावर तिच्या मनात घुमत होता. पण राजेश जोरात घोरत होता आणि ती त्या विचारातून त्याच्याकडे बघत परत बाहेर येत होती. राजेशच्या चेहऱ्यावर हलकसा हात लावत मनात माफी मागून ती जरा वेळ रडली. नंतर एक मोठीशी उशी तिने कानावर ठेवली नी डोळे गच्च मिटून पडून राहिली.

रात्र विचारात सरकत होती आणि पहाटे अलगत तिचा डोळा लागला. सकाळी नवं वाजले तरी ती झोपून उठली नव्हती. आणि राजेशला तर सवयच नव्हती लवकर उठण्याची. साडेनव वाजता रतीच्या ऑफिस मधून जयूने फोन केला. आणि आवाजाने रती उठली,

“रती कुठे आहेस. अग बॉस तुला दोनदा विचारून गेला. काही महत्वाची मिटिंग आहे म्हणत होता. त्यानेच सांगितलं तुला कॉल करायला. जाम तळपळ सुरु आहे त्याची.”

रतीने गडबडीत फोन तसाही स्पीकर वर टाकला होता आणि सारं काही राजेशने हलकंसं ऐकलं होतं, जयू अजून काही बोलू नये म्हणून रती तिला म्हणाली, “अग काल रात्री पर्यंत काम करत होते, मग आज उठायला वेळ झाला, निघतेच मी...”

“बर... तसा तू मेसेज टाक ग बॉसला, बिचारा, ओरडून ओरडून गळा कोरडा पडायचा त्याचा. आताच तर गोरा गोरा चेहरा लाल घेवून फिरत आहे इकडे तिकडे. आणि तुला म्हणून सांगते, लवकर निघ. ते मोहिते कंपनीचे लोकं आलेले आहेत, बसून आहेत बॉसच्या कॅबिन मध्ये म्हणून तो बोक्या विचारात असणार.“

रतीने गडबडीत फोन ठेवला, कशी बशी तयारी केली, मनात नसूनही तीला जावंच लागणार होतं... जशी ती राजेशमळे अडकली होती तशी तिला मयूरनेही अडकवलं होतं. राजेशहि उठला, त्याने तिला ऑफिस साठी सोडलं, आणि निघतांना परत म्हणाला,

“बॉसला नाराज करू नकोस, परवडायचं नाही आपल्याला, आणि मी आहे ना तुझ्या सोबत.. बस काही दिवस... एकदा का मोठा प्रोजेक्ट मिळाला कि मग तुला ह्या ऑफिसची पायरीही चढू देणार नाही मी.”

रातीच्या तोंडात शब्द घुमत होते ती बोलायला तत्पर झालीच होती तर राजेशने तिच्या तोंडावर हात ठेवला. रती काहीच बोलली नाही. गुमान निघून गेली. ती ऑफिसला तिच्या जागेवर पोहचली तेव्हा तिथे मोठासा बुके ठेवला होता, त्यावर ठेवलेली चिट्ठी तिने उचलली, मोहिते बिल्डर कडून होता तो बुके... सोबत दुसरी चिट्ठीहि तिने उचलली, लिहिलं होतं, “तू खूप सुंदर आहेस... लगेच कॅबिन मध्ये ये... वाट बघतोय.”

रतीने, इकडे तिकडे बघितलं, चिट्ठी अगदीच तुकडे तुकडे फाडली आणि फेकून दिली. लॅपटॉप घेतला आणि मोठ्या हिंमतीने ती मयूरच्या कॅबिनकडे निघाली.

कॅबिन मध्ये आधीच मोहिते कंपनीचे लोकं बसून होते, रतीला बघताच मयूर म्हणाला,

“आह, हिअर शी इज... वाट बघत होता आम्ही सर्व तुझी, मीट मिस्टर देवधर, मोहिते कंपनीचे मॅनेजर आहेत, तुला ह्यांच्या सोबत काम करायचं आहे. सारे डिटेल तुला हेच देतील.”

रतीने सर्वांना हसून हाय केला. आणि लॅपटॉप सुरु करून प्रेझेंनटेंशन काढलं... एक नजर तिने मयूर वर टाकली, त्याने तिला नकळत डोळा मारला, तिने खाली बघितलं, नंतर डोळ्यात डोळे घालत ती मिश्किल हसली, मनात म्हणाली, “बस तो VDO डिलीट करू देत मला... नाहीतर माझ्या हातात लागू दे... आधी तुझ्या बायकोला सांगून ह्या सर्व मालमत्तेतून हद्दपार करते बघ... तिच्या जीवावर उडतोस आणि तिलाच दगा देतोस.”

मयूर हसत म्हणाला, “काही फायदा नाही.”

रती दचकली, तिलाही कळालं नाही कि ती मनात बोलली कि तोंडाने, जराशी बावरली. तर मयूर परत म्हणाला, “रती मी प्रेझेंनटेंशन बद्दल बोलतोय, तू त्यांच्या नुसार एडीट कर, मिस्टर देवधर सांगतील तुला सर्व डिटेल.”

आणि मिस्टर देवधर, “शी इज व्हेरी इंटेलिजन्ट, शी विल डू इट.”

नंतर मयूरने रतिला देवधर सोबत जायला सांगितलं आणि तो मॅनेजमेंट सोबत बोलत राहिला. रती गुमान देवधर सोबत बोलत निघून गेली, निघतांना परत तिने नजर मयूरवर टाकली, मयूर हसला, तीही स्मित हसली पण मनात युद्ध सूर झालं होतं, जे तिला जिंकायचं होतं.

आज रतिला देवधर सोबत काम करतांना बऱ्याच गोष्टी कळल्या होत्या. तो त्याच काम करून निघून गेला आणि आज परत सहा वाजायला आले. रेतीच्या अंगावर काटा उभा राहिला. सर्व घरी निघत होते. रती अवघडली होती. तर तिला मयूरचा फोन आला आणि ती घाबरतच कॅबिन मध्ये गेली.

“डार्लिंग, कम, सीट...”

रती, “सर तो VDO प्लीज डिलीट करा ना, काय उगाच नकोय असं काही.”

“हो हो करतो...घाई काय, एक डिलिट मारला कि होईल ग, पण...” आणि त्याने सिगार पेटवली, तिच्या आणखीनच जवळ आला, तिच्या गालावर पडणाऱ्या लटेला कुरवाळत म्हणाला,

“काय घाई आहे ग, घे कि फायदा करून, बघ तुला लवकर मॅनेजर करतो कि नाही... तू बस मला...”

“सर मी निघते ना.” रती जरा स्वतःला आवरत आणि दूर होतं म्हणाली.

आता मयूरने तिचा हात जोरात पकडला, “सर, दुखतोय सोडाना.”

“असं म्हणतेस... घे सोडला.” आणि त्याने तिला त्याच्या कडे जोरात ओढलं, रती मयूरच्या छातीजवळ आली होती. मन घट्ट करून तिने त्याला दूर करत जरा वेगळ्याच नादात ती म्हणाली, “मयूर... सॉरी.”

मयूर जवळ आला, “आह, किती गोड वाटते ग. तू ना मयूर म्हण मला, निदान माझ्या कॅबिन मध्ये तरी. कसा गोडवा राहिलं आपल्यात.”

रती जवळ आली, “मयूर आज काही नको रे... जरा प्रॉब्लेम झालाय.”

“काय! पण मी सील वापरलं होतं.”

“मयूर तसं नाही... अरे माझा तो महिन्याचा प्रॉब्लेम झालाय.”

“असं, बर, काही हरकत नाही... पण एक किस्सी तर...”

“मयूर... “

पण तो कुठे थांबणार होता, तिच्या स्तनांना हाताने चोळत त्याने तिच्या ओठांना पार पिळून काढलं. रती डोळे मिटवून, हाताच्या मुठा बांधून होती. तब्ब्ल पाच मिनिटाने त्याने तिला सोडलं, गरगरल्यागत झाली होती. मयूर तिला सांभाळत म्हणाला, “आह, काय गुलाबी ओठ झालेत ग तुझे! काय ती लिपस्टिक कि काय त्याची तुला गरज नाही... अस्सल रूपाची राणी आहेस...”

रती ओठ चोळत होती जणू मनातून कीळसली होती पण चेहऱ्यावर भाव लाजल्याचे आणण्यात तिला त्रास होतं होता, अर्थात पर्याय नव्हताच तिच्याकडे. त्याने परत सिगार पेटवली, तोंडात भरली, एक सिप घेतली, “काय करतेस त्या फुकट्या राजेश सोबत काय माहित... असो आता माझ्या सोबत आहेस तर बघ तुला कुठे पोहचवतो. जा, काळजी घे, हवं तर घरी जा, आराम कर, माझ्या कडून सुट्टी तुला चार दिवसाची.”

रती हळूच म्हणाली, “पण मोहिते प्रोजेक्ट...”

“घरी घेऊन जा फाईल आणि लॅपटॉप... ये चार दिवसाने मस्त फ्रेश होऊन... मी वाट बघतोय तुझी...”

रती कशीतरी आज सुटली होती पण हा बहाणा कधीपर्यंत राहणार होता. ती विचारात घरी आली. मयूरच काळजीत बोलणं भावून गेलं होतं पण ती काळजी तिला भावत नव्हती. राजेश घरी आला आणि मोहिते प्रोजेक्टची फाईलं बघायला लागला, रतीने त्याला खूप थांबवलं पण...त्याला जे मिळवायचं होतं ते जेमतेम त्याला गवसलं होतं... धाडकन म्हणाला,

“रती बसं तुझा बॉस जे म्हणेल ना ते कर अजून काही दिवस.. बघ ह्या वर्षीचा मोहिते बिल्डरचा मोठा कॉंट्रॅक्ट आहे आणि तो मलाच मिळणारं, मग मग... तुला काम करण्याची गरज राहणार नाही.”

रती शांत पणे म्हणाली, “होरे सारं काही कळालं कि तुला माझी गरज राहणार नाही कदाचित. दुसरी लगेच शोधशील, मी मात्र काही बोलूच नये ना तुला, नुसती तुला तुझी सूद आहे, माझं काय होतं आहे माहित आहे का? ऐकूनपण गेह्त नाहीस.”

“अग, काय बोलतेस!”

रेजेश तिच्या अगदीच जवळ आला, “तुझी गरज मला नेहमी राहिल, अरे बायको आहेस माझी, अर्धांग आहेस. पण आता तू बॉसच ऐक... बसं... आपल्याला मोठं व्हायचं आहे... बघ तुला बरोबरीच पार्टनर करेन ना कंपनीत, मग अशे छोटे मोठे कार्य करावे लागलतील.”

नंतर त्याने रमचे दोन पॅक तयार केले, त्याने त्याचा पॅक गटकन गीटकला, निशब्द शांतता होती दोघांत आणि जरा वेळेन रतीचा ग्लास तिच्या हातात देत म्हणाला,

“रती तू जे करत आहेस ना मला माहित आहे... काही काही काळजी करू नकोस... एन्जॉय इट... मी सोबत आहे तुझ्या ”

राजेश नशेत बोलत होता आणि तसाच सोफ्यावर झोपला, रती मात्र विचारात सुन्न झाली, पुरुषांचा तिला राग येत होता, क्षणात तिला वाटायला लागलं, “राजेशला सांर कळलंय का? हा का असा बोलला, नाही नाही असंच बोलला असेल, भोळाच आहे... माझा राजेश. जावूदे तो VDO येवू देत माझ्या हातात मग सांर काही सांगून मोकळी होती राजेशला. आणि मयूरच्या बायकोलाही. पण हा असा कसा बोलतो, बॉसच ऐक म्हणून, नकोच विचार करायला, आधी मला मयूरच्या तावडीतून निघायला हवं मग बघते राजेशलाही. साली पुरुषाची जात, सारे सारखेच त्या भिंगातून, नसलं काही तर वापर स्त्रीला.”

चार दिवसं रती शांत होती, कुठेतरी हरवलेली रती गुमान शांत झाली होती आणि राजेश पुढच्या टेंडरची वाट बघत तयारी करत होता. सुट्टी संपली आणि सकाळीच रती ऑफिससाठी तयार झाली, मनात खूप काही ठरवलं होतं तिने. मयूर कडून तिला तो VDO काढून घ्यायचा होता आणि राजेशही तिच्या मनातून उतरला होता...

आज ती अगदीच मस्त तयार झाली होती, ऑफिस मध्ये पोहचली, अगदीच फ्रेश वाटत होती. जणू तिने सांर काही मनात ठरवलं होतं. पुरुषांना पुरुषांच्या पद्धतीनेच मात करण्याचा तिचा विचार होता, येताच तिने तिची बॅग जागेवर ठेवली आणि मयूरच्या कॅबीन कडे निघाली, मयूर तीला असं बघून खूप खुश झाला, ती येताच त्याने तिला हलकीशी मिठी मारली, कॉफी बोलावली, आणि मग तिच्याशी सहज गप्पा करत तो बोलत राहिला, त्यालाही रतीतला हा बदल खूप आवडला होता. रती कॅबीन मधून निघालीच होती तर म्हणाला, “रती मी आज थांबतोय.... तू?”

“ओ.... आज नको ना रे, जस्ट नको वाटत आहे... त्यापेक्षा आपण बाहेर जावूया दोघंच, ईफ यू डोन्ट माइंड.”

मयूर आणखीनच अनादांत म्हणाला, “चालले... तू आणि मी आज बाहेर जावूया. लेट मी बूक टेबल फॉर डिनर.”

रती हसली, आणि हसतच तिच्या जागेकडे निघून गेली, मयूरच्या मनातला मयूर अगदीच नाचायला लागला होता, म्हणाला, “आता ही लांडोर काही मला सोडायची नाही, बसं अजून काय हवं.... चायला ती बायको काही तिच्या त्या जुन्या विचारातून बाहेर येत नाही... कधी हे तर कधी ते... उपवास करते आणि माझा उपवास ठेवते. पण रती बेस्ट... सारं कसं लगेच कळालं तिला. स्मार्ट वुमन, आय लाइक इट.”

मयूर बिनधास्त झाला होता आणि रतीत धाडस शिरलं होतं. रतीने आजही त्याला कसतरी अगदीच जवळ येण्यापासून टाळलं होतं. पण पुढे काय.... रतीला पुरषांची जात कळायला लागली होती.... मग तिचा डाव तसा तसा कलाटणी घेत होता.... कथा लवकरच नवीन वळणार, पुढचा भाग नक्की वाचा.... अर्थातच जास्त भाग नाहीत पण पूर्ण कथा उलगडल्याशिवाय मजाहि नाही....


कथा कशी वाटली नक्की कळवा! कथा कॉर्पोरेट विश्वाची घाणेरडी बाजू दाखत उलगडल्या जाणार आहे. दीर्घ कथा आहे, निदान १० भागांची, तेव्हां आपला प्रतिसाद अनमोल आहे. प्रत्येक भागाच्या अपडेटसाठी आजचं पेजला लाईक करा. आठवड्यातून दोन दीर्घ भाग प्रकाशित होतील, बुधवारी आणि शुक्रवारी तेव्हां पेजला आवर्जून भेट द्या. प्रतिक्रिया नोंदवा आणि मनातल्या तळ्यात सहभागी व्हा!

नवीन कथा वाचण्यासाठी पेजला लाईक नक्की करा!

 https://www.facebook.com/manatlyatalyat


जोडीदार कथेचे भाग सर्व भाग इथे आहेत - कादंबरी कथा- जोडीदार... प्रवास तुझा माझा 

https://www.manatalyatalyat.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE?&max-results=8

पेजला लाईक करा 

कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव 

फोटो साभार गुगल

©उर्मिला देवेन

Urmiladev@gmail.com

Post a Comment

0 Comments