एक डाव तिचा.... “द बुमरेंग” -भाग अंतिम

 


जानवी बाळाला घरी आणूनही अजून बऱ नव्हतं, ती सरखी रडत होती. रती बाईला म्हणाली,

“आज तुम्ही इथेच थांबा, मला आता ऑफिसला जाणं खूपच गरजेच आहे.”

“मॅडम पण माझी मुलं घरी आहेत हो...”

“त्यांनाही इकडे बोलावं आज, घरीच काही तुला वाटते ते कर आणि आज इथेच थांब, आज गरज आहे मला तुझी...तुझे हे उपकार मी विसरणार नाही.... “

कामवाल्या बाईला रतीचा खूप सहारा होता, तिने मुलांना इथेच बोलावून घेतलं. आणि राहण्यासाठी तयार झाली. रतीने बाकीच्या सर्वाना घरी जायला सागितलं होतं, आज काहीतरी भयकार घडणार हे तिने भापलं होतं.

ती जानवीला बाईजवळ सोडून घरातून निघाली, सहा वाजले होते. दीवस हिवाळ्याचे मग अंधार सूर झाला होता. घरापासून ऑफिस दीड तासाच अंतर होतं. रतीने राजेशला फोन लावला, त्याने उचलून त्याला उशीर होईल हे सांगून बंद केला. रती काहीच बोलू शकली नाही. आता तिने गाडीची स्पीड वाढवली.

इकडे मयूर ऑफिसमध्ये सानिकाचा विझीटर म्हणून शिरला होता आणि ऑफिसच्या टॉयलेटमध्ये दडून राहिला. सानिकाला राजेशने त्याच्या कॅबीन मध्ये बोलावलं, तशी सानिका घाबरली, तिला काहीच कळत नव्हतं, तिने तिची बॅग चेक केली, बॅगमधली सुरी बघितली, बॅग सोबत घेवून ती राजेशच्या कॅबीनकडे निघाली. हळू हळू सारा स्टाफ निघून गेला होता.

सानिका राजेशच्या कॅबीन मध्ये गेली आणि. राजेशने कॅबीनची ऑफिसची सर्व सेक्युर्टी बंद केली, चालाख होता आज जे घडणार होतं ते त्याला कुठेही कॅमेऱ्यात बंद होवू द्यायचं नव्हतं. पण त्यालाही माहित नव्हतं कि हाच   सेक्युर्टी अप्प रतीच्या मोबाईलवर सुरवातीच्या काळात टेस्टिंग करतांना अपलोड होता आणि तिने चुकण आज सांर काही बघितलं होतं....

इकडे रतीचा अप्प काहीच पुढचं दाखवत नव्हता. आतापर्यंत तिने सांर काही बघितलं होतं पण.... पुढे ती फक्त अंदाज बांधू शकत होती. तिने गाडी भरधाव काढली...

मयूर लपून राजेशच्या कॅबीनवर लक्ष ठेवून होता. त्याने त्याची दारू काढली आणि घेतली. सानिका खोलीत शिरली, राजेशने ऑफिस मध्ये कुणीही नसल्याची खात्री केली... आणि तो सानिकाच्या जवळ आला,

“सानिका, आज मी जेवण मागवलं आहे, येईल लवकरच, आपण आधी ते स्केच बघून घेवू आणि मग जेवू सोबत.”

सानिका गप्प होती. आणि राजेशने अलगत एक लिफाफा तिला दिला, तिने स्मित हसत तो उघडला,

सानिकाच प्रमोशन लेटर होतं त्यात, तीने स्मित हसत राजेशला बघितलं,

“अरे, काही तर बोल...”

“काय बोलू सर, काही न बोलता मिळालाय, तशी माझी योग्यता अजून हि नाही... “

“म्हणजे. आहेच ती.”

राजेशने तिचा हात धरला, तसा सानिकाने ते झटकला, राजेशनेही मागे घेतला.

तो परत स्मित हसत म्हणाला, “काय खायचं आहे आज, बोल मी मागवून घेतो.”

“सर आपण प्रोजेक्टवर बोलणार होता, खाण्याच्या मेनूवर नाही...”

“काय ग, ते तर सहाच्या आतमध्ये , आता नाही,...”

राजेशने तिला तिच्या पायापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत बगितल, “हा फिकट गुलाबी रंग उठून दिसतो तुझ्यावर, पण जरा ओठ...”

“सर....”

सानिका धडकन उठली, तिने तिची पर्स घेतली, ती दारापर्यंत आलीच तर राजेशने दार ऑटो लॉक केलं. सानिका उघडत राहिली पण काहीच अर्थ नव्हता...तिचा आवाज खोलीतून बाहेरहि जात नव्हता...

राजेश तिच्या जवळ आला, “ये भंकस करू नकोस, एवढ्या वेळचा तुला बऱ्या बोलाने सांगतोय ते कळत नाही का. गुमान बसं इथे.”

त्याने रमची बॉटल काढली. आणि घ्यायला लागला, सानिका बॅग आवरून बसली होती. अश्रू जमले होते, मनात गोंधळ उडाला होता, तोच राजेशने तिची ओढणी ओढली आणि तिलाही. तिचा जीव धडधड होता, राजेशने तिला मिठीत गच्च पकडलं होतं, ति स्वतःला वाचवत बॅगजवळ आली. बॅगमधली सुरी तिने काढली, मनाला गच्च घट्ट केलं, राजेश तिला मिठीत घेवून तिच्या स्तनांना स्पर्शू पाहत होता, त्याचा तो स्पर्श असह्य झाला तिला आणि डोळे गच्च बंद करत तिने त्याच्या पोटात ती सुरी पूर्ण ताकतीने भोसकली...

राजेशने मिठी मोकळी केली आणि तो खाली पडला, त्याचा फोन तो शोधत होता, सानिका घाबरली आणि शांत खाली बसून होती, राजेश मदतीसाठी ओरडत होता, पण तिला काहीच ऐकायला येत नव्हतं, राजेशने कसाबसा फोन शोधला, त्याने रतीला फोन लावला,

“रती लवकर ऑफिसला ये, ह्या मयूरच्या बायकोने मला मारलं आहे, तिने सूड घेतला ग, तू ये लवकर....”

त्याचा फोन पडला.... राजेशहि आता अर्धमेला झाला होता,

रतीने गाडी थांबवली, ती जोरात ओरडली,  फोन सुरूच होता... राजेश रतीच्या उत्तराची वाट बघत होता, ती काहीच बोलत नव्हती... परत जोरात ओरडली,

“नालायक माणसा अरे आता तरी खर बोल, तुला जे माहित आहे ते.... सानिका तशी नाही.... मी जे करू शकली नाही तिने केलं ....मी सकाळ पासून बघत आहे तुला... मर.. भोग तुझ्या कर्माची फळ...”

तिने फोन बंद केला... राजेशला आता काहीच कळत नव्हतं, अर्धमेला झाला होता तो, लोडत फोनजवळ आला, मोबाईलमधला हॉस्पिटलंचा नंबर शोधत होता पण दिसत नव्हता.... शेवटी तो पडला....

सानिका मात्र रतीचे शब्द ऐकून चकित झाली होती... रतीचे शब्द तिच्या कानात धिंगाणा घालत होते.... ती उठली, काहीच कळत नव्हतं, हॉस्पिटलचा नंबर शोधला, तोच रती ऑफिस मध्ये पोहचली, तिच्याकडे असणाऱ्या चाबीने तिने कॅबीन उघडली, राजेश पडून होता, सानिका घाबरून बसली होती. रती ऑफिसमध्ये धावत येतांना बघून मयूर त्याच्या नशेतून जागा झाला, तिच्या मागेच तोही कॅबीन मध्ये शिरला,,,

सांर बघून तो चकाकला, तो पळून निघणार होताच तर रतीने टेबलवरचा पेपरवेट त्याच्या डोक्यावर मारला....तो नशेत बडबडत खाली बेशुद्ध पडला...

रती सानिकाजवळ आली, “सानिका, तू घरी जा, तुला काय हव नको ते मी बघेन, निघून जा कुठेतरी... मयूर तुझ्या लायकीचा नव्हता ग कधी...”

“मॅडम पण राजेश सर...?”

“हुमम .. जो नवरा स्वतःच्या बायकोचा सन्मान वाचवण्यासाठी कधी उभाच झाला नाही तो मला कधीच हवासा नव्हता... तू निघ मी सगळं सांभाळते. हे सगळं कसं हाताळायच हे मी बघेन, मला माहित आहे तुझा विश्वास नसणार.... पण ठेव... अंतिम पर्याय म्हणून...”

सानिकाने कसातरी आवंढा गिळला, आणि ती निघणार, तोच ती पालटली,

“मॅडम, आजपर्यंत मी तुम्हाला वाईट समजत आले, पण....”

“मी वाईटच आहे, पण वाईट लोकांसाठी.... तुझ्यासाठी नाही... माझं मन बदलन्या आधी निघ... माझ्यात बायको शिरली ना तर तुला सोडणार नाही....”

“पण मी कुठे जावू, मलाही कुणीच नाही...”

“अग बाई, आता निघ, मी सांगेन तुला पुढचं ते... आता जा... नाहीतर तो वाचमन जेवण करून येईल आणि तुला बघेन... मग मी काहीच करू शकणार नाही...”

सानिका घाबरत निघून गेली...

रतीने राजेशला बघितलं, त्याचा श्वास मंद होतं चालला होता, लगेच त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं नाही तर तो वाचू शकत नव्हता..... रतीने त्याला बघून परत हंबरडा फोडला....

“राजेश तुझ्याकडून नव्हती रे अपेक्षा अशी, माझी मजबुरी तुला माहित होती... का केलंस असं तू सानिकासोबत..... तू ना मारण्याच्या लायकीचा आहेस.....सल्या.... मर तू...”

ति तशीच बसून राहिली..... राजेश आता थंड पडला होता... आणि मयूर नशेत पडून होता.... रतीने सारे पुरावे मयूरकडे सरकवले.... ती शांत घरी निघून गेली....

सकाळी तिला वाचमनचा फोन आला.... तोच रतीचा फोन वाजला... ती भानावर आली...

(कथा परत सुरवातीपासून.....जिथून सुरु झाली तिथून....)

रतीने भानावर येत फोन उचलला, जानवी US वरून बोलत होती, रती तिच्याशी बोलली. दीर्घ श्वास घेतला.

आणि स्टुडीरूमकडे निघाली. सानिका तिला बघताच उभी झाली,

“मॅडम, कश्या आहात तुम्ही.”

मी ठीक आहे ग, तू कशी आहेस. आज कसं काय येणं केलंस...?

सानिकाने एक पत्रिका तिच्या हातात दिली, “मॅडम, हे आमंत्रण आहे, मुख्य अथितीच, आमच्या संस्थेने एंट्री ऑफ वूमन इन कॉर्पोरेट वर्डवर चर्चा ठेवली आहे. अनेक मान्यवर आमंत्रित आहे. पण माझ्या मते आपल्याशिवाय दुसरं कुणीही ह्या कार्यक्रमच चीफ गेस्ट म्हणून हक्कदार नाही....”

“सानिका, मी एवढी मोठी नाही ग....”

“पण मला माहित आहे.... आपला स्ट्रगल... आणि आपली खरी कथा...”

“असो, येयील मी, तू कशी आहेस. समीर कसा आहे. तुझा मुलगा इंजीनिअर करत आहे ना, त्याच्या आडमिशनचा चेक मी पाठवला होता मागच्या महिन्यात.”

“हो मॅडम चेक मिळालाय, आणि समीरपण मजेत आहे. ह्या वेळी आम्ही गोव्याला जाणार आहोत. लग्नाचा पंधरावा वाढदिवस आहे आमच्या.”

रती परत तिची डायरी बघत होती, सानिका तिच्या बोटांशी खेळत अजूनही बसून होती, रती तिला असं बघून म्हणाली,

“सानिका, तुला अजून काही बोलायचं आहे काय ग, अजून काही हव आहे का? समीर?”

सानिकाचे शब्द निघत नव्हते, तरही ती मोठ्या हिम्त्तीने म्हणाली, “मॅडम, तुम्ही माझ्यासाठी खूप केलत पण अजूनही मला ती गुत्ती सुटली नाही, कि हे सार तुम्ही केलं कसं, आणि तुम्ही जे सोसत होता त्यातलं मी काहीच सोसलं नाही, माझं आयुष्य उभं केलस, समीर माझ्या आयुष्यात आला, त्याचा मुलगा आणि मी आनंदात आहोत. मयूरला जन्मठेप झाली, आणि तोही मागच्या वर्षी तापाने तुरंगात वारला हि बातमी आली मला.... तुम्ही एकट आयुष्य काढत आहात... आणि मी आता आनंदात आहे...”

“सानिका, पुरुष स्वतःला खूप हुशार समजतो ग, पण चुकतो, त्यालाही जन्म देणारी स्त्रीच असते हे तो विसरतो.... तुझ्याबद्दल काहीच मला राजेशने सांगितलं नव्हतं ग, पण त्या दिवशी त्याच्या वागणुकीतून मला जरासा गंध आला... आणि मग सांर कसं स्वतः हुन माझ्यासमोर उघडं होतं गेलं. त्याने  सेक्युर्टी VDO बंद केले होते पण मी त्याआधीही जेही घडलं ते सांर बघूनच ऑफिससाठी आधीच निघाले होते तुला वाचवायला.... मयूर ऑफिसच्या बाहेर होता हेही मला त्या सेक्युर्टी VDO मधून कळालं होतं. बसं जरा वेळ झाला ट्राफिकमुळे पण हरकत नाही, जे झालं ते उत्तम होतं. पोलिसांना सर्व पुरावे जे हवे होते ते मिळाले. मयूर नशेत होता, त्याची मदत झाली... अजून काय, डाव मांडलेला होता, एक राजा त्याच्या कर्माची फळ भोगत पडून होता, एक आधीच उध्वस्त, मी संधी साधली, राणी म्हणून त्यात राज्य केलं आणि महाराणी झाले. स्त्रियांना कमी आखणारे त्यांच्यात आखलेल्या डावात डूबले... एक डाव मयूरने मांडला होता, एक राजेशने पण त्या मध्ये माझा डाव कुणाला कळाला नाही हे त्याचं दुर्द्य्व...”

म्हणजे, हा सारा तुमचा डाव होता....

रतीने चष्मा काढला, ती स्मित हसली, तिने मधूला दोन कॉफी परत आणायला सांगितल्या. सानिकाला बसायला सांगितलं, सानिका, तू खूप भोळी आहेस ग, पण मी कधीच भोळी नव्हते, महत्वाकंशी होते. वापरणं आणि वापरून घेणं हे कळत होतं मला... मयूरच वागणं कळत होतं, पण त्याने माझ्यासोबत जे केलं ते मला धोका देवून केलं... हलकं फुलकं हसणं बोलणं चालायचं ग, स्त्री पुरुष मैत्री का असू शकत नाही कामात? त्याच्या नुसत्या मैत्रीने मी सारकाही मिळवू शकले असते, तो मला मदत करू शकला असता, पण जे झालं ते माझ्या विश्वासाच्या बाहेर होतं... त्यात मयूरच ते त्या VDOसाठी मला ब्लॅकमेल करणं, सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देणं आणि अजून काय काय ते सांर तर मला आठवायचं नाही... एकदा खपले होते आणि मग त्या VDOसाठी कहीदा खपले.... त्यात नवऱ्याने जे केलं ते तर अपेक्षेच्या बाहेर होतं.”

“पण  मॅडम, तुम्हाला कधी माझा राग आला नाही, तुमचं आयुष्य असं उध्वस्त केलं म्हणून

“छे, ग, तू कुठे उध्वस्त केलसं, ते तर परत नव्याने सुरु झालं, आज मी बिझनेस टायकून आहे. ह्या कॉर्पोरेट जगातला प्रत्येक डाव ओळखू शकते. तुझ्यासारख्या कही सानिका आणि माझ्या सारख्या कही रती मी ओळखून घेते.. आणि त्यांना मार्ग दाखवते, यशासाठी कुठलाच शोर्टकट नसतो.... मेह्नेत असते फक्त...

डाव माझा कधीच नव्हता, पण त्या दोघांच्या डावात मला अजून पिसायचं नव्हतं, मग बायकोला थांबवलं आणि स्त्रीत्व पुढ केलं.... बघ, मी डाव न मांडता जिंकले... स्त्रीला डाव मांडायची गरजच नाही, ती स्वतः एक डाव आहे... ज्याला ओळखणं खुद्द त्या घडणाऱ्याला जमलं नाही मग हे कोण होते.... माझ्यातलं स्त्रीत्व जेव्हा उभं झालं तेव्हांच हा डाव माझा झाला....”

“मॅडम, काळजी घ्या. निघते मी, आणि कार्यक्रमाला नक्की या, मी वाट बघेन....”

सानिका निघून गेली, रतीने मधूला आवाज दिला. गाडी काढायला सांगितली आणि आजचे शेडूल बघायला सांगितले.... रती निघाली होती तिच्या उभ्या केलेल्या साम्राज्यात....

मित्र मैत्रिणिनो, कुठलीच स्त्री डाव मांडत नाही... पण डाव पालटू नक्कीच शकते.... जेव्हा ती उभी राहते तेव्हां कुणाचीच हिम्मत होवू शकत नाही तिला खेचण्याची.... आणि चुकून कुणी डाव मांडलाही तिच्यासाठी तर तो बुमरेंग ती कसा करेल ना ते कळूही देत नाही.... 


कथा कशी वाटली नक्की कळवा आणि माझ्या नवीन कथेसाठी पेजला लाईक नक्की करा..

एक डाव तिचा.... “द बुमरेंग” -भाग ७ आणि अंतिम

सानिका रोज मरत होती आणि रती रोज राणी म्हणून आयुष्य जगत होती. रतीशी राजेशच गोड बोलणं सानिकाला खटकतं असायचं पण राजेशहि रतीच्या ह्या वागण्यात तेवढाच सहभागी होता हेही ती जाणून होती. साऱ्या गुन्हेगारांना ती समोर जगतांना बघत होती पण धाडस नव्हतं स्वतःची सीमा लांघून धडा शिकवण्याचा.

इकडे रती जळवजवळ सांर विसरली होती, तिने अजून राजेशला माफ केलं नसलं तरी मुलीचा बाप म्हणून तिने त्याला माफ केलं होतं.  पण स्वतःला ती माफ करू शकत नव्हती तरीही खुश होती मुलीसाठी. सांर काही रुळावर आलं होतं...पण एकांतात तिला स्वतःला राग मात्र येत होता... मुलगी तीन महिन्याची होतं आली होती आणि तिने हळूहळू ऑफिसच्या फाईल्स बघणं घरूनच सुरु केलं होतं...

कथा कशी वाटली नक्की कळवा... लवकरच नवीन विषय घेवून पेजवर येत आहे,.. तेव्हां पेजला लाईक करायला विसरू नका... ब्लोगला फॉलो करा... पेज शेअर करा... 

नवीन कथा वाचण्यासाठी पेजला लाईक नक्की करा!

कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव 

फोटो साभार गुगल

©उर्मिला देवेन

Urmiladev@gmail.comPost a Comment

0 Comments