होममेकर....

 



मम्मा, इथे मी काय लिहू?”

कुठे रे ?

अग, इथे बघ ह्या फॉर्मवर, मदर प्रॉफेशन लिहीलं आहे.


संगीताने फॉर्म हातात घेतला, तिलाही विचार पडला, अल्लड प्रश्न तिने रुद्रला केला,

तुझ्या मित्रांनी काय लिहीलं रे?”

“मम्मा माझ्या सर्व मित्रांच्या मम्मा ना, काही ना काही करतात ग? मी काय लिहू तुझ्यासाठी. तू असं काय करतेस? इंजिनिअरींग केलसं ना तरीही जॉब करत नाहीस.”

संगीता हसली, “लिही होममेकर...”

“मम्मा, म्हणजे हाऊसवाईफ ना ग?”  

संगीता शांत झाली, मनाला काचकन भेग पडली होती, भर भर समोरून ती कॉलेजमध्ये मिरवणारी संगीता तिला दिसली, मोठं मोठ्या इमारतीच्या डिझाईन काढण्याचे स्वप्न बघणारी, घर तयार करण्याचे स्वप्न बघता बघता होममेकर कधी झाली कळालच नाही,... ती विचारात वाहवत होती तोच रुद्र परत म्हणाला,

“मम्मा काय लिहू... तू तर घरीच असतेस. होममेकर म्हणजे नेमकं काय ग?”

“नाही, होममेकर म्हणजे जी घरातल्या साऱ्यांना घडवते ती.... जिच्यापासून घरातलं काहीच घडू शकत नाही. जिच्या असल्याने तू घर म्हणून घरात राहतोस, जी सर्वांच्या मागे असते पण खर तर तिचं नेहमी पुढे असते...”

“मम्मा, लिहिलं आता, माझी मम्मा होममेकर आहे. पुढच्या आठवड्यात यायचं आहे तुला शाळेत.”

संगीताने रुद्रला कसं बसं समजावलं, पण मनात तो प्रश्न घर करुवून गेला. तू काय करतेस? मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तो प्रश्न पुन्हा पुन्हा जावून परत परत तिथेच उत्तर शोधत होता? मोठं मोठाल्या डिग्र्या घेवून कपाटात ठेवल्या आहेत आणि इथे मुलीचे डायपर बदलते.... कुठे जातात साऱ्या गोष्टीत अव्वल असणाऱ्या त्या कॉलेजातल्या मुली हे कोडं तिला सुटलं होतं... पण?

स्वयंपाक झाला, लहान मुलगी खेळत बसली, रुद्र अभ्यास करत होता. ती खोलीत आली, कपाट उघडलं, कागदपात्रांची फाईल काढली, हाताने हळूच स्पर्श केला. अलगत त्यातून जुना फोटो पडला, चार मैत्रिणींचा,

कुठे असतील ह्या आता ह्या विचारात पडली, नाव आठवत तिने सर्वाना फबवर शोधलं, एकीचा चेहरा जरा ओळखीचा वाटला, रिवेष्ट पाठवली. मन वाट बघत होतं उत्तराच.... दोन दीवस तसेच गेले. शेवटी हैराण होवून सोडून दिलं.

पण अचानक फब वर मेसेज पहिला, “कशी आहेस संगु, शोधलस मला.”नंबर होता. लगेच संगीताने लावला.

अक्षरासा अश्रू आवारात नव्हते... सारी चौकशी करून झाली, आणि प्रश्न आला, “तू काय करतेस?”

आशाने मजेत उत्तर दिलं, “होममेकर आहे... मज्जा करते...”

“कशी काय ग, मनाला बोचत नाही.”

“का ग का म्हणून...”

“तू तर टॉपर होतीस... जॉब करणं तुझं स्वप्न होतं...”

जॉबची कमी नव्हती पण आई गेली आणि आईची किंमत कळाली, तिच्याशिवाय घर घरचं नव्हतं ग, वडिलांनी स्थळ बघून लग्न लावून दिलं, नारोबाने कधीच थांबवलं नाही. नौकरी मिळणं मला अशक्य नव्हतं, पण बायकोच्या नात्याने ह्यांच्या सोबत उभी राहिले, मुलगा झाला, आई झाले, हळूहळू सांर काही माझं झालं आणि मी आता होममेकर झाले... पण खंत नव्हती आणि नाही... आनंद होता आणि राहील... आपण कॉलेज मध्ये विचार करायचो, आपण नाही असं करणार, घरी नाही राहणार... आई वडिलांचा पैसा काय फुकट घालवायचा...”

ती हसली, संगीताहि हसली, “पण आपण तेच करतोय ना, शिक्षण तर गेलं वाया...”

“अरे मी ते करते जे कुणाला जमत नाही...”

“त्यात काय कुठल्याच कॉलेजमध्ये हि डिग्री मिळत नाही तरीही सर्वच करतात ना?”

“कुणाला म्हणजे, जे पुरुषांना जमत नाही.... ते आपण करतो?, घराला घरपण येतं ते बायकोमुळे, आईमुळे, स्त्रीमुळे... ज्या घरात ती नाही ते घर कुठे असतं...?”

“हुम्म्म, खर बोललीस, पण किंमत नाही ना ग त्या कामाला, सांर करून आपण शून्य?”

“त्या कामची कुठलीच किंमत नाही संगु, त्या कामाला कुणीच मोजू शकत नाही. आपण शून्य म्हणून मागे उभे राहतो म्हणून आपल्या घरच्या प्रत्येकाची किंमत वाढते. आणि काय ग शिक्षण कधीच वाया बिया जात नाही... उगाच मानून ठेवलं आहे ते, आयुष्य जगायला शिकवत असतं ते, नौकरी म्हणजेच शिक्षणाच चीज नाही, शिक्षणाने आयुष्याचा दृठीकोन बदलतो... गरज, आवड आणि शिक्षण आहे म्हणून नौकरी खूप वेगळेवेगळे पैलू आहेत.... आणि ह्या वरही एक बाजू आहे... घरातल्या प्रत्येकाला घडवणं... जे होममेकर करते.”

“व्हा आशा... सुरेख... कॉलेजची टॉपर होतीस, आणि आज आयुष्याची आहेस... उद्या माझ्या मुलाच्या शळेत जायचं आहे मला. बघ कशी जाते आत्मविश्वासाने...मनात अडी होती ग, पण आता नाही...”

मग मित्रीनिनो होममेकर असाल तर खंत नकोच.... कारण समोरच्याला घडवणं हे अतिशय महान कार्य आहे. आणि महान कार्याला किंमत नसते कारण ते अनमोल असतं....

 नवीन कथा वाचण्यासाठी पेजला लाईक नक्की करा!

 https://www.facebook.com/manatlyatalyat

कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव 

जोडीदार कथा लवकरच पेजवर.....

एक डाव तिचा.... “द बुमरेंग” -सर्व भाग इथे वाचा 


फोटो साभार गुगल

©उर्मिला देवेन

Urmiladev@gmail.com

Post a Comment

0 Comments