“कधी लग्न करणार आहेस ग तू, वय वाढत
चाललं आहे तुझं. चांगली हातची स्थळ नाही म्हणालीस. आता कुठून राजकुमार शोधायचा
आम्ही. ते काही नाही, आज घरी ये लवकर. मधु मावशीने स्थळ आणलंय...”
“आई, झालंय का सुरु तुंझ, आज नाही
जमणार मला माझी महत्वाची मिटिंग आहे.”
“काही ऐकणार नाही...’
“बाबांना दे फोन.”
“अजिबात नाही.. तू येतेस असं मी
सांगून टाकलंय त्यांना. मला तू पाच वाजता घरी हवी आहेस. बसं... “
आईने फोन ठेवला आणि श्रुतीने तिचा
फोन रागात बंदच केला. आता दिवसभर तिचा फोन बंद होता.
पाच वाजले होते अन आईची धावपळ सुरु
झाली होती. श्रुतीकडून काहीच प्रतिसाद नव्हता. बाबाने ऑफिसला फोन करून चौकशी
करण्याचा प्रयत्न केला पण काहीच कळत नव्हतं. शेवटी पाहुणे परत निघून गेले.
श्रुती रात्री आठ वाजता घरात शिरली.
आई बाबा दोघेही गुमान हॉलमध्ये बसून तिची वाट बघत होते.
ती येताच आई रागात म्हणाली, “श्रुती
आता पाणी डोक्यावरून जात आहे. तू उत्तर देणार आहेस कि नाही. कि तुझ्या मनात कुणी
आहे. तेही चालेल पण आता मला तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे. “
बाबा, “अग ती आत्ताच आली आहे. जरा
तिचही ऐकून घे, अडकली असेल ती.”
आई, “तुम्ही गप्प बसा, आज मला ह्या
गोष्टीचा शोक्ष मोक्ष लावायचा आहे.”
आईने श्रुतीला बसायला सांगितलं, आणि
म्हणाली, आज सांग, तुला का ग लग्न करायचं नाही? कि काय अजून आहे?
श्रुतीहि आईच्या नेहमीच्या कटकटीने
त्रासली होती, वैतागून म्हणाली,
का ग, मुलींनी लग्नच करावं असा काही
नियम आहे का?
प्रथा आहे ती. मुलीने लग्न करून
सासरी तिचा संसार सुखाचा करावा. मी नाहीका आले ह्या घरात सून म्हणून.
मग फक्त लग्न हेच अंतिम असतं का ग,
मुलींसाठी?
प्रथा आहे म्हणाले ना?
कुठे आहे?
जास्त बोलू नकोस, आपल्या पूर्वजांनी
आखून ठेवल्या आहेत त्या पाळाव्या आपण. काय वाईट आहे ग लग्नात, मी हि केलंय. खुश
आहे. माझ्या
बाबांनी तर मला विचारलही नव्हतं.
ती तुझी मर्जी होती. माझी नाही. मला
नाही करायचं. का मी अशीच आनंदी नाही राहू शकत
असं...
आजपर्यंत ह्या प्रथेविरुद्ध कुणीही गेलेलं
नाही. मुलींनी लग्न करून सासरी जावं हेच अंतिम, कितीही शिकल्या आणि कितीही मोकळ्या
वातावरणात मोठ्या झाल्या तरीही.
नाही... नाही जायचं मला. आणि कुठली
प्रथा ग. शिकून मोठं व्हायचं, आणि ध्येय मात्र लग्न ठेवायचं, का त्याच्या पुढे
जावून काहीच नाही का?
श्रुती मला उद्धट उत्तर नकोय. मधु
मावशीने सुचवलेलं स्थळ उत्तम आहे. मी होकार दिलाय, शिवाय आज तू आली नाहीस तरीही ते
काहीही बोलले नाही. त्यांना पसंत आहेस तू. मुख्य म्हणजे मुलाला पसंत आहेस.
मग कशाला विच्रातेस मला? तुझं तू
ठरवलं ना?
श्रुती, आवाज कमी, आमच्याही इच्छा
आहेत. डोळ्यात अंजन घालून आम्ही त्या दिवसाची वाट बघत आहोत.
माझ्या इच्छेच काय, मला कश्यात आनंद
आहे ते बघ ना? कशाला अंजन लावून वाट बघतेस? मी म्हणाले तुला!
श्रुती रागात तिच्या खोलीकडे निघाली
होती. आता मात्र बाबा तिच्या मागेच तिच्या खोलीत शिरले.
बाळा श्रुतू काय झालय, का नाही
म्हणतेस. आम्ही कधीपर्यंत सोबात असणार, तुला कुणी हवं ना सोबत?
का हो बाबा, का हवंय मला सोबत कुणी,
मी माझी का नाही राहू शकत. इथेच इथेच हा समाज मुलींना अबला करवून ठेवतो, तिला
सहाऱ्याची गरज आहेच असं म्हणून प्रथा तिच्या पायात बांधतो...
श्रुती तसं नाही ग? आनंदही असतोच ना ग त्यात.
का शोधायचा मी आनंद त्यात ज्यात मला
नाही. का मुलींनाच हि प्रथा. ह्या असल्या प्रथा पाडून ठेवल्या आहेत ना म्हणून
मुलींना आजही संन्मान मिळत नाही. लहानच
मोठं व्हा, आणि मग लग्न करा, दुसऱ्याच्या घरी जा, मग त्याचं करा... नाही, हे नाही
करायचं मला. लग्न हेच का अंतिम मुलींसाठी?
अग पण सारेच करतात ना, काय वाईट
त्यात.
पण सर्व चांगलच आहे आणि होईल ह्याची
हमी आहे का? मग एखाद्याला नाही करायचं असलं तर जगू द्या ना त्याला त्याच्या मनाप्रमाणे...
का त्याला प्रथेच्या आहारी घालता.
नात्यात गुंडाळता.
ती जरा शांत झाली, बाबांनी तिला जवळ
घेतलं, म्हणाली, रती दीदी माहित आहे ना, काय झालं लग्न करून तिचं, शिक्षण अर्ध
सोडून, प्रथेच्या नावाखाली काकांनी लग्न लावून दिलं, दोन मुली झाल्या, नवऱ्याने दुसऱ्या
बाईच्या नादात सोडून दिलं, आता कुठे राहते ती, काका, काकू तर तिला आता विचारतही
नाहीत, मी बघितले आहे हाल तिचे. तिला नव्हतं करायचं होतं हो लग्न, पण शिकूनही
लग्नच करावं लागतं ह्या विचाराने मग ती वळत गेली आणि आता वाळली...
त्या वरच्या माळ्यावर वरच्या माधवी
काकू, लग्न करायचं नव्हतं त्यांना. पण लोकांनी अगदीच नाकी नव आणले होते त्यांच्या
घरच्यांच्या, शेवटी वडिलांनी अट घातली आणि तिने अगदीच वयस्कर माणसाशी लग्न केलं. काय
झालं दोन वर्षात ते काका वारले, आता असते त्यांच्या घराच्या लोकांच करत. तिला
कुठला आनंद हो. त्याग म्हणे... कुठलं काय. मी बघितलं आहे त्यांना खालच्या बगीच्यात
एकट्याच बसून रडत असतात.
का हो, आपला समज अश्या प्रथा आखतो,
आणि त्यात आनंद शोधायला सांगतो, आपण स्वतंत्र प्रथा नाही का आखू शकत.... ज्याने
जसं जगायचं तसं त्याला जगू द्यायचं नां...
बाबा शांत झाले होते, तर श्रुती
भावनेत परत बोलली, कशाला, आपल्या घरीच बघा ना, आईला मी काहीदा बोलतांना बघितलं आहे,
कशाला लग्न केलं आणि हे भोग आले माझ्या वाट्याला, मला माहित आहे तिची तळमळ तुमचं नातं
वाचवण्यासाठीची, बाबा, आईने किती मनाला मारून नात कायम ठेवलं आहे हे समजायला मी
लहान नाही... तुम्ही आणि ती रसिका....
श्रुती बोलतांना गप्प झाली, पण लगेच
म्हणाली, तरीही ती एक स्त्री असून मला माझ्या मनाविरुद्ध ह्या प्रथेचा भाग
होण्यासाठी भाग पाडत आहे हीच प्रथा आहे ना... नकोय मला हे....
आता मात्र बाबा गुमान खोलीतून निघून
गेले.... आई बाहेरून ऐकत होतीच तीही बाबांच्या मागे निघून...
आईने बऱ्याच वेळाने, मधु मावशीला फोन
लावला,
“मधु, पाहुण्यांना नकार कळव, आपल्या
श्रुतीला लग्न करायचं नाही, तिला तिचं आयुष्य तिच्या मनासारखं जगायचं आहे. पुढे
मागे तिला वाटलं तर ती विचार करेल पण आता तिच्या ह्या वीच्याराला आम्ही ह्या
प्रथेत बांधणार नाही. शिवाय प्रथेच्या नावाखाली मी माझ्या मुलीला नाही झोकणार,
मुलींनी स्वतंत्र विचार करत जगावं हि प्रथा आपण समजात आणण्याची पहल करूया ग... "
मग, लग्न हाच अट्टाहास असावा का मुलींसाठी, नाही करायचं एखाद्याला लग्न मग तिला स्वतंत्र जगण्याच स्वतंत्र बघल करणारी प्रथा आपल्या समजात असवी ना? बघा पटलं तर... माझ्या विचारांशी सर्व सहमत असतील असं नाही... पण विचार करावा एवढं तरी ह्या प्रथेत नक्कीच आहे....
माझ्या नवीन कथेसाठी पेजला लाईक नक्की करा .. खाली लिंकला क्लिक करून तुम्ही पेज लाईक करू शकता. धन्यवाद!!
https://www.facebook.com/manatlyatalyat/
©उर्मिला देवेन
तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोसाहन देतील
फोटो साभार गुगल
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव!
धन्यवाद!!! 🙏🙏
0 Comments