बीइंग नारी... भाग २५

 बीइंग नारी... भाग २५ 

“जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन

--



परत पाच दिवसाने म्हणजे बारावा दिवस होता, आकाशने सुट्टी घेतली होती, त्यालाही पहिल्यांदा सीमेन प्लास्टिकच्या बॉटल मध्ये घ्यायच होतं. तो सकाळपासून हसत होता, आणि उर्वी त्याला रागवत होती.

आणि तो हसत होता,

“उर्वी येतेस का, कठीण आहे ग, हे  सीमेन सैंपल कलेक्शन… च्याला काय काय करावं लागेल आता...”

“आकाश नुसते बहाणे सांगू नकोस, टेस्ट करायची आहे, मी काय एकटीच जवाबदार नाही ना... आणि तूच कर्ताधर्ता आहेस ह्या प्रक्रियेत...”

“उर्वी...”

“करतोस कि....”

“भीती दाखवू नको ना... नाहीतर यायचं नाही...”

“गप्प बस, मस्करी सुचते का तुला...”

“उर्वी काही दुसरा पर्याय नाही का?”

“मग कर ना हॉस्पिटल मध्ये... असतात तिकडे खोल्या…”

“तुला बर माहित आहे ग.”

“हो, आता करते काय मी दिवसभर...”

शेवटी कसं तरी त्याने सेमिन बॉटलमध्ये घेतलं. ओरडला,

“झालं बाबा...”

“आकाश कुठे तर सिरीयसनेस दाखव... गप्प राहा ना, कि जगाला सांगतोस.”

“माझ्या जगाला तर सांगू दे, हे बघ, झाला मी सिरीयस, चल आता लवकर.”

आणि ते दोघं लगेच निघाले, डॉक्टरने ते सीमेन सैंपल ताबोडतोब लॅबमध्ये घेतलं. काही वेळाने नर्सने दोघांना आतामध्ये बोलावून माइक्रोस्कोप द्वारे सीमेनमधले स्पर्म दाखवले. उर्वी आणि आकाशने बघितलं, काही खूप जोरात हालचाल करत होते तर काही हळू...

आकाश हळूच म्हणाला, “च्याला एकचं पाहिजे, एवढे नको, एक तरी जावून आदळा.”

उर्वी हसली, “काय हे, काहीही बोलतोस.”

“काय मग, चुकीच बोललो का? किती आहेत बघ, फक्त एक कामाचा आहे. आणि आपल्याला एकचं हवा आहे. भाव खातात यार हे, आतमध्ये गेल्यावर...”

उर्वी हसली, “काहीही रे तुझं...  तू पण काय कमी भाव खातोस.”

“मग काय आज... पावणार आहे का हि देवी...”

उर्वीने त्याला चिमटा काढला, “चल, ती नर्स बघ तुला बघून हसत आहे तिकडे.”

शेवटी डॉक्टरने बोलावलं, सांगितलं, कि सेमिन रिपोर्ट ठीक आहे. नंतर त्याने उर्वीला फॉलीकल स्टुडीसाठी सोनीग्राफीला घेतलं. सांगितलं कि दोन्ही अंडाशयात फॉलीकल आहेत. साईज योग्य आहे. सगळं सांगून त्याने परत उर्वीला दोन दिवसाने यायला सांगितलं.

परत दोन दिवसाने त्याने फॉलीकल साईज मोजली, आणि आज इंटरकोर्स करा असं बजावून सांगितलं. उलट हसत बोललाही, आज उद्या, परवा... चोवीस तासाच्या फरकाने इंटरकोर्स करा म्हणून.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उर्वीच्या पोटात दुखायला लागलं, आता तिने हेही जाणून घेतलं होतं.

अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर येतांना हा त्रास जाणवत असतो, साधारण ज्या अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर येत असेल त्या बाजूला, पोटाच्या खालच्या भागात सौम्य ते त्रीव वेदना जाणवत असतात, ज्या तीन ते चार तासात नाहीश्या होतात. त्याला ओव्यूलेशन पेन असं म्हटल्या जातं. जे साधारण मेंस्ट्रुअल साइकलच्या मधल्या काळात जाणवते, त्याला मिडिल पेन असंही म्हणतात. सॅनटिफिक भाषेत ह्याला मित्तेलश्मेर्ज़ (mittelschmerz)  नावाने ओळखतात.

सारं काही ठरलं होतं, आकाश खुश होता आता उर्वी त्याला रोज पावणार होती. पण रोज करणं जरा कठीण होतं. तरीही आकाश आणि उर्वीने त्याचं काम आनंदाने केलं होतं. आणि डॉक्टरच्या साल्यानुसार त्याने उर्वीने दिलेल्या चायनीज औषधीही सुरु केल्या होत्या.

तो महिना तर राहिला नाही. आणि एचएसजीमुळे जी काही आशा होती ती पुढ्याच्या तीन महिन्यात मोवळली. तीन महिन्याचा चायनीज मेडिसनचा कोर्सनेही काही काम केलं नाही.

आता जे काही कानावर येत होतं उर्वी तसंच करायची, मसाले बंद झाले होते. आता सध्या भाज्या घरी बनत असत. आई बोलली, “तुम्ही चिकन, मटण खूप खाता, गरम होतं ग.”

उर्वीने तेही कमी केलं. कुणीतरी सांगितलं, “एन्डे नंतरच्या दिवसात खायचे नाही, हिट जास्त होते आणि मग गर्भ चीपकत नाही.”

एका मैत्रिणीने फोलिक एसिड टॅबलेट सुचवल्या, म्हणाली,

“हे घे, तुला द्यायला हवे होते डॉक्टरांनी.”

उर्वीने उत्तर दिलं, अग इकडे कुठेलीच अशी औषध दिल्या जात नाही बघ, काय ते चायनीज मेडिसिन दिली होती पण मला काही उपयोग झाला नाही.

“कुठलीच नाही, म्हणजे प्रोजेस्टेरॉन टॅबलेट पण देत नाहीत का? नंतरच्या दिवसांमध्ये.”

“ते देतात, प्रोजेस्टेरॉन लेवलसाठी, बस... पण त्याच्याआधी काहीच नाही... कदाचित तेही अगदी सुरवातीच्या काळात.”

“असं, म्हणजे, प्रोटीन, विटामिन, आयरन जे सुरुवातीला देतात असं काहीच नाही... नंतर राहिल्यावरही काही नाही.”

“नाही, इथे कसं सगळं नैसर्गिक व्हावं असा प्रयत्न असतो, म्हणजे ते सगळं चेक करतील, आणि अडचण असेल तर मग काय ते औषधी देतील, पण कुठे काही अडचण दिसत नसेल तर काहीही देत नाही. बस बेसल टेम्परेचर मोजायचं आणि आपलं कार्यकम करत राहायचं, आणि तेच बेसल टेम्परेचर वाढत राहिलं तर मग डॉक्टरकडे यायचं. नंतरही गरज असली तर मेडिसिन नाहीतर नाही...

“हो का ग, बापरे, आपल्याकडे तर मेडिसीनची बॅग भरते असलं कुणी घरी असलं की... पण तुझ्या सारख्या म्हणजे वाईट मानू नकोस, असल्या तर मग तर झालं, बसा वाट बघत, काहीच देत नसतील तर...”

“हुम्म, पण सोयी उत्तम आहेत इकडे. आता माझ्या ओळखीच्या बऱ्याच भारतीय आहेत, त्यांना तर एकही मेडिसिन दिलेली नाही डॉक्टरने. ना आधी ना नंतर...

“व्हावं ग, पण कधी कधी ह्या मेडिसिन मदत करतात यार... चान्स इम्प्रूव करण्यासाठी मला तर झाली बाबा, मी फोलिक एसिड टॅबलेट तीन चार महिने घेतल्या, बहिणीने सांगितलं, काही होणार नाही, घे... आणि मला राहिलं मग... प्रत्येकाच शरीर वेगळं वेगळं असतं ना, मला ह्याने गुण आला, म्हणून मी बोलले, तुला अजून काही लागत असेल, पण हल्ली सगळे डॉक्टर सुरुवातीला हेच सगळं देतात. आणि आता कसं हे सगळं प्रोटीन, विटामिन अगदीच बाहेर मिळतात, कुठल्या डॉक्टरच प्रिस्क्रिप्शन लागत नाही, खूप आहेत. कसं आहे ना, आजकाल, ह्याची गरज पडते, आपलं खाणं पिणं, राहणिमान आधीच्या लोकांसारखं राहिलं नाही, सगळीकडे भेसळ असते... वातावरण अशुद्ध आहे, म्हणून अश्या समस्या वाढल्या आहेत हल्ली...  त्यात आपण काय कमी ताण घेतो असल्या गोष्टीचा, बघ बाबा मी सांगितलं जे मी केलं. पण फोलिक एसिड टॅबलेट बद्दल बघ आणि घे तिकडे मिळत असेल तर, त्याने काही तुला साइड इफेक्ट होणार नाही, तेवढा विश्वास ठेव. माझ्या बहिणीशी बोलून घे. मी नंबर देते तुला.”

बस उर्वीने तेही केलं. तिकडे तिला औषधांच्या दुकानात मिळाल्या फोलिक एसिड टॅबलेट... पण बाकीचे महिनेही तसेच गेले.

आकाश प्रगती करत होता. दोन वर्षासाठी आला होता पण कंपनीने त्याला आता तिकडे परमनंट करून घेतलं होतं. बऱ्या पैकी पैसा जमा झाला होता, आता दोघांना इन्वेस्टमेंट करायची होती. आकाश आताच काही महिन्याआधी भारतात त्याच्या पीएचडीसाठी जावून आला होता. आणि त्याला सुट्या नव्हत्या. मग त्याने उर्वीच तिकीट करवून दिलं.

भारतात येण्याआधी तिने आकाशला खडसावून सांगितलं,

“हे बघ, मी जात आहे तर मी माहेरी जाणार, उगाच मला तिकडे पाठवू नकोस. मला वाटलं तर मी जाईल नाही तर नाही. माझ्याशी उगाच भांडायचं नाही. मला ट्रीटमेंटही करायची आहे. इकडे काही होत नाही आहे, काहीच मेडीसीन वगैरे देत नाहीत इकडे.”

स्वभावाप्रमाणे आकाश काही बोलला नाही, पण मनात वाटायचं त्याला उर्वीने आईकडे जावं.

ह्या वेळी उर्वी भारतात तिच्या ट्रीटमेंटच्या हेतूनेही आली होती.  आल्या आल्या काही दिवसात तिने आईच्या मदतीने तिने गॉयनेकॉलॉजिस्ट शोधली.

डॉ मानसी, MD होती, गेल्या १५ वर्षापासून ती प्रक्टिस करत होती. अनेक जवळपासचे आणि दूर दूरचे पेशंट तिच्याकडे येत असायचे. उर्वीने सगळं तिला सांगितलं, परत फाइल तयार झाली, आणि डॉक्टर तिचे रिपोर्ट्स बघून म्हणाली,

“आपण एक टेस्ट करून घेवूया, तशी तुझी एचएसजी झाली आहे तिकडे, पण माझी ट्रीटमेंट माझ्याकडे सर्व टेस्ट करून करते. तूला बाकी करायची गरज नाही. पण केलेस तर उत्तम. बस आपण एक हिस्टेरोस्कोपी करून घेवूया.”

हिस्टेरोस्कोपी हे नावं ऐकताच उर्वीला काटा उभा राहिला, म्हणाली

“हे ऑपरेटिव आहे का?”

“नाही ग, इट्स जस्ट अॅन डायग्नोस्टिक  हिस्टेरोस्कोपी, नो प्रॉब्लेम अट ऑल.”

“म्हणजे कशी प्रोसेस आहे ही, माझा नवरा इकडे नाही सध्या. तुम्ही सांगा कशी ते.”

“काही नाही, इट्स डायग्नोसिस फॉर यूटेरस, काही दहा ते तीस मिनिटात होणार. आम्ही सांगतो पण दोन तीन मिनिटात होते. इट्स थ्रू व्हजायना ओन्ली, लाइक सोनोग्राफी प्रोसेस. डू नॉट वरी.”

तिने पाळीचा दिवस विचारला आणि मग हिस्टेरोस्कोपीची वेळ आणि दिवस ठरवला. उर्वीनेही होकार दिला. आई मात्र डॉक्टरला विचारात होती,

“मॅडम हे झाल्यावर उर्विला दिवस राहतील ना? म्हणजे मी ऐकलं आहे काही माझ्या ओळखीच्या लोकांकडून.”

“शक्यता नाकारता येत नाही, म्हणजे निदान झाल्यानंतर तशी औषधी दिली जाईल. आणि मग लागलीच तिचं सगळं बरोबर असलं तर राहतील ना. काळजी करू नका. आता माझ्याकडे आले ना, आपण निकाल काढूच. बस तिची तयारी असायला हवी.”

“पण ती तिकडे विदेशात राहते ना.”

“तर काय झालं, माझ्याकडे खूप असे पेशंट आहेत. येतात काही महिन्यासाठी, चेकअप करतात आणि औषधी घेवून जातात. मी फोनवर पण तिच्याशी बोलत राहणार. ती इमेल करू शकते मला. “

“हो का, मग ठीक आहे.”

“काय आहे ना, आपल्याकडे प्रोसेस जरा फास्ट आहे. तिकडे स्लोव असते सर्व अगदीच बेसिकपासून तयारी करतात, मग उशीर होतो. म्हणजे तेही बरोबर आहे, पण गॉयनेकॉलॉजिमध्ये आपल्याकाडली ट्रीटमेंट पहिल्या नंबरवर येते, विदेशातले कितीतरी कपल भारतात येतात ह्या ट्रीटमेंटसाठी. आपल्याकडे भरपूर पद्धतीने ह्यावर इलाज केल्या जातो, शिवाय स्वस्त पडतो. आयुर्वेद, होम्योपैथी आणि एलोपैथी आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. हिला मी काही आयुर्वेदिक औषधी  लिहून दिल्या आहेत. त्या आजपासूनच सुरु कर म्हणा.”

परत आईने प्रश्न केला, “पण राहत का नसेल हल्ली लोकांना, आमच्यावेळी असं नव्हतं.”

आता मात्र डॉक्टर हसली, घडीकडे लक्ष देत, तिने तिची प्रिस्क्रिप्शन वही घेतली,

“बघा, कंसीव न होण्यासाठी तसं बघितलं तर स्त्री आणि पुरुष सारखेच जवाबदार असतात. साधारण ३५ % केसेसमध्ये पुरुष तर पुढे ३५% मध्ये स्त्री, आणि बाकींच्या केसेसमध्ये दोघेही थोडेफार असतात, २० % म्हणता येईल. उरलेली १०% हे अनएक्सप्लेंड फर्टिलिटी मध्ये येतात. स्त्रीमधील मुख्य कारण, जसे फॅलोपियन ट्यूबमध्ये काही अडथडा असल्यास, असामान्य आकाराचा गर्भाशय आणि ओव्हुलेशन डिसऑर्डर. पुरुषांमध्ये स्पर्मची समस्या असते, म्हणजे  शुक्राणूंची संख्या कमी, किंवा शुक्राणूंची असामान्य हालचाल किंवा त्यांचा आकार. पण ह्याला सहज हाताळता येवू शकते. पण जर शक्राणु नसतील तर मात्र कठीण होतं सर्व, अर्थात त्यातही आपली वैदकीय शास्त्र पुढे आहे. आता उर्वीच्या बाबतीत सांगायचं तर ओव्हुलेशन तिचं होत आहे, एचएसजीचा रीपोर्ट बघितला तर सगळं नीट आहे, गर्भाशय ठीकच आहे. पण मी एकदा बघून घेते. मग आपण ठरवू या.”

आपणही पुढचा भाग वाचूया...

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

Post a Comment

0 Comments