जोडीदार... तू माझा.. भाग ४
सानू घरी आलेली होती, तयारीत मग्न होती आणि मध्येच तिच्या त्या बोलण्याने राणीला स्वपांच्या दारात घेवून गेली होती. राणी हळुवार मनात हसत, मनाशी संवाद सादत जरा मनातल्या त्या प्रेमाच्या धाग्यांना हळुवार कुरुवाळत लाजली होती. तो मंदसा मनाशी तिचा चाललेला संवाद लपणार नव्हताच ना सानुच्या नजरेतून.
तिला असं बघून सानू राणीला म्हणाली,
“राणी काय म्हणते ग मी, तुला आहे का ग पसंत तो फ्रेंच कट दाढीवाला?”
राणीचे गोरे गोरे गाल गुलाबी झाले होते, "तायडे काहीहीपण तुझं. तो तुला बघायला आलाय ग.”
“बघायला आलाय! बघेल ना... मी कुठे नाही म्हणते, त्याच्या काय डोळ्यावर मी हात नाही ना ठेवू शकत.”
“काहीही काय ग तायदे तुझ.”
“हे बर तुझ आईसारखं बोलणं...”
“तायडे!”
“जावूदे, पण तो तुला आवडलाय असं वाटत आहे मला, मग काय विचार आहे तुझा?”
“ही काही मला आवडलेली गोष्ट नव्हे कि तू बाबांना सांगून मला मिळवून देशील किंवा तुझ्या वाटणीचही तू मला देशील, जोडीदार आहे तो होणारा तुझा."
"व्हा जवाब नही तेरा...मेरी बेह्णा...दिलं खुश हो गया... अब तो तू कुछ भी मांग...”
“तायडे, तू पण ना... बाळू वादळ म्हणतो ते खरं आहे...”
“ये पण तू तरी थोपू नको ग बाई... तो काही माझा होणारा जोडीदार वगैरे नाही. मी बसं माझ्या बाबांच्या शब्दाला मान म्हणून आले. आपला तर नियमच वेगळा, मी माझी आणि हा सारा राळा... जमणार नाही ग त्या दाढी वाल्याला....”
“तायडे गप ग, काहीही पण ग तुझं... बघ कि त्याला आवडशील तू.”
“अरे, हे तू आई कडून बरोबर घेतलंस. उगाच आशेने बोलणं.”
“तायडे, काहीहीपण ग तुझं...” राणी अलगत केसांना कुरवाळत होती.
“पण तुला कुणी सांगितलं कि त्या राजनने मला पसंत केलय म्हणून."
"सांगायचं काय? तुला कुणी नाही म्हणूच शकत नाही ताई... सुंदर आहेस तू, नौकरी करतेस. अजून काय हवं आजकाल मुलाकड्ल्याना?”
“अग बाई, हो का ग?”
“तायडे, तुला कुणीच नाही म्हणू शकत नाही ताई... बघ किती सुंदर दिसत आहेस साडीवर. हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहेस ग तू."
"राणीसाहेब पुरे तुमचं हे ताई प्रेम, इकडे ये, एक गुपित सांगते.”
राणी पटकन पलंगावरुन सानुच्या अगदीच जवळ गेली,
“काय ग तायडे, अजून काही नाही ना ग तुझं?”
“ये गप ग...”
“मग काय?”
“तुला सांगू मला ना येढ्यात लग्न करायचं नाही...”
“आ... पण तो तर आलाय... आणि आईने पसंतही केलाय त्याला तुझ्यासाठी...”
“ते जावूदे! तूला हा राजन पसंत असेल तर सांग. लावतो मस्का बाबांना."
राणी अजूनच उत्सुकतेत म्हणाली, “काहीहीपण तुझं ग तायडे ! आईच काय करशील? तिने तर त्याला बघताच जावईबापू म्हणून हाक मारली... तुला सांगू... काय आवभगत सुरु आहे त्या राजनची, बाबा खुणावतात आईला पण आई पार मानून बसली आहे कदाचित. कि तो राजन ह्या घरचा जावई होणारंच..."
"ही आई पण ना! आता इथेच मंगळसूत्र बांधायला लावते काय बुवा...! काही नेम नाही हिचा, काहा फस गयी यार... ये राणी काय ग हे आईच... कसं आवरू मी हिला, उगाच ना... हा माझ्यावर होणार इमोशनल अत्याचार आहे."
"तायडे असलं काही होणारं नाही हा... बरीच हौस आहे आईची. लग्न चांगलं थाटामाटात राहिलं. आणि काहीहीपण तुझं... इमोशनल अत्याचार वगैरे काहींनाही, तुला विचारेलंच ना ती."
"हुम्म नावापुरती. नाहीतरी कुणी बोलू शकतं का ह्या घरात... नुसता दरारा पसरवून ठेवला आहे आईडीने.”
सानुने साडी अगदीच नीट केली. ओठंवर लिपस्टिक नीट बसवत ती म्हणाली,
“तिच्या हौसेमुळेच तर हा दिवस आला ना माझ्यावर, माझा तर ह्या बघण्याच्या कार्यक्रमाला सक्त विरोध आहे... येतात घर बघायला... झुंड घेवून, आणि काय ग नुसत्या नजरेने पारखता येतो का मुलगा?"
“तायडे प्रथा आपली, कर ना ग, मजा येते, मी तर करेन हौसेने.”
“असं, थांब तुझाच नंबर लावते आता...”
“माझी परीक्षा आहे आता, नंबर तर तुझा आहे तायडे,
सुन सुन सुन मेरी सानू दीदी तेरे लिए
एक रिश्ता आया है
सुन सुन सुन लड़के में क्या गुण
सुन सुन दीदी सुन
सुन सुन सुन मेरी सानू दीदी तेरे लिए...
“ये गप ग राणी... उगाच गुणगुण नको करू. मला नाही आवडणार तो राजन बिजन....”
"मग आहे का कुणी मनात शिरलेलं, ते तरी सांग... तू काय बाबा बाबांची लाडाची! तुला कसला धाक ग, घे बेधडक निर्णय."
सानू जरा स्वतःला आरश्यात बघत हसत होती, हातात तने आईलाइनर घेतलं, सुंदर कोर काढली, स्वतःला चुंबन दिलं आणि म्हणाली,
"मी असं काही केलं ना तर आईसाहेबांना धक्का बसायचा ना राणी...
“आयला तायडे... “
“पण तसला अजूनतरी नाही गवसला कुणी मला... ‘हमारा पहिला प्यार हम खुद हे जानेमन. देखते, दुसरा कोई मिलता है तो....अभी तो हम बस उपर है....आसमा नीचे आने को है डार्लिंग..,”
"तायडे भारी दिसत आहेस ग... कोण नाही म्हणेल तुला!" राणी तिला बिलगत म्हणाली आणि दोघीही आरश्यात बघत होत्या.
सानुने तिला मिठी मारली, म्हणाली, “मी म्हणले ना नाही समोरच्याला...”
सानू दचकली, म्हणाली, “ताई, लग्न करायचं की नाही ग तुला? हे असलं बोलत असतेस. आईने मनाला लावून घेतलं तर काय होईल माहित आहे ना!”
“वही तो फस गये ना हम, इधर से भी नही उधर से भी नही... बसं अटक गये मासाहेब के अटक से.”
“ये तायडे कसली मस्करी सुचते ग तुला, बसं इथे जरा निवांत, तुला बघायला आलाय तो राजन.”
“हुम्म... तेच तर ना, तोच का मला बघायला आलाय? मी का नाही गेले त्याला बघायला. च्यायला जुन्या काळी बर होतं, मुली जायच्या मुलाकडे बघायला.. ही कुठली मधल्या काळात प्रथा शिरली आणि काय होवून बसलं... मटकून बसा वाट बघत आपल्याला बोलवण्याची.. आणि मग जा समोर समोरच्यांच्या नजरा झेलण्यासाठी.”
“तायडे काहीपण ग तुझं?”
“काहीपण काय ग, नौकरी मीपण करते, त्याच्या येवढीच कमवते, घर बघते... मग मीच का पोह्यांची प्लेट घेवून लाजत समोर जावं आणि त्याने मला निरखून बघावं, चायला मी काय वस्तू आहे, असं एका वेळेस पारखून पसंत ना पसंत म्हणायला... आपल्याला बुवा नाही आवडत हे सांर!”
“ताई गप ग जरा. किती बोलतेस!”
“मग काय, सारी कचकच वाटत आहे ही साडी, कधी बोलवते ही आई, की मी जावू ग?”
इकडे हॉलमध्ये गप्पा रंगल्या होत्या, जरा सर्वांच सांर जवळपास बोलून झालं होतंच पण दोन्ही कडल्या मंडळींची मन कशी जुळ्या सारखी झाली होती, सानू राजनच्या घरच्यांना आधीच पसंत होती. आणि अरितीला राजन पसंत होता जावई म्हणू...
राजनची बहिण रागीनिशी बाळूची ओळखी झाली होती, रागिणी जरा बाळूपेक्षा मोठी होती पण त्याचं कॉलेज एकचं होतं, मग जुन्या गोष्टी काढत रागिणी बाळूशी बोलत जरा वेगळे बसले होते.
आई बाबा पाहुण्यांसमोर इकडल्या तिकडल्या गप्पा करत होते. बाबांनी हळूच आरतीला इशारा केला, आई आरतीने त्यांना नजरेनेच दिलासा दिला कि सानू आली आहे आणि तयार होत आहे.
बाबांना हे माहिती झालं आणि त्यांचा उत्साह वाढला होता. एक आशा दिसतं होती, मुलगा राजन त्यांना तंतोतंत सानूसाठी योग्य वाटत होता. त्याच जवाबदारीने बोलणं आणि शांतपणे उत्तर देणं, त्यांना भावलं होतं. आता त्यांनी आईला सानुला घेवून येण्याचा इशारा दिला आणि आई उठली.
इकडे खोलीत राणीची आणि सानूची मस्त खेचा खेची सूर होती, राणीने स्वतः तून निघून एक नजर परत सानूवर टाकली,
"ताई जवाब नाही ग तुझा, मी तर रंगाने गोरी आहे पण तू यार रंग बाबाचा घेतलास आणि चक्क बाबांच्या काळजांत शिरलींस, नाकं नक्षी आईची घेतलीस आणि तिची हुबेहूब प्रतिमा आहेस... तेरा तो जवाब नाही दी... लव्ह यू ग."
"ये माझी बहिणाबाई, तुही काही कमी नाहीस, आणि मैं हू ना... तेरा मेकअप करने के लिये ... आयेगी तेरी बारी भी आयेगी..."
तिने तिला ओढलं आणि राणीला त्याच्या पाकळी सारख्या ओठांना सेरेख लिपस्टिक लावून दिली, टपोऱ्या सुंदर डोळ्याचं मेकअप करून दिलं. राणी स्वतःला बघून मनातल्या मनात लाजत होती, तीही खूप सुंदर दिसत होती.
मग तिच्या खांदयावर सानुने हात ठेवला आणि मोठया रुबाबाबत म्हणाली, "तुला सांगू, आपली एकही बाजू अशी ठेवायची नाही कि समोरचा नकार देईल... पण आपण नकार द्यायचा, आणि मी तो देणार...बघ तू.”
"तायडे... काहीपण ग तुझं, काहीही बोलतेस काय..! आई पार खचेल ग! असलं काही करू नकोस."
"ये ब्लॅकमेल करू नको, माझं काय वय आहे का लग्नाचं? आता कुठं मी उडायला लागले आणि ही आई माझे पंख काटायला तयार झाली... पण मी नाही येणार हा ह्या लग्नाच्या पिंजऱ्यात... ज्यांना काहीच करायची इच्छा नसेल त्यांनी लग्न करावं."
"ओ...टेक ब्रेक तायडे, आईसमोर बोलली ना तर तुझं सामान घरातून फेकेल ती."
"म्हणूनच तर आली बाबा... निदान काही दिवस शांत राहिलं माझी माउली. आहे कुठे ती, अजून काही माझ्या नावाचा गजर वाजला नाही."
"पण काहीही बोलू नकोस, लग्न करणारे काहीच करत नाही का ग?"
राणी जरा नाराज स्वरात म्हणाली होती. काहीस लागलं होतं तिला.
"अबे, दिलं पे मत ले ना यार... आता आलं तोंडात, तर बोलले. सॉरी! आईने लग्नानंतर शिक्षण पूर्ण केलय, काही वर्ष नौकरी केली. मग तिच्या तब्येतीच्या कुरकुरीत नाही जमलं तिला, महित आहे ग मला... पण लग्न टर्निंग पॉईंट असतो ग आयुष्याचा, मुलींचाही आणि मुलाचाही. मुलाचं निभून जातं पण मुलींचं ? अत्तुच माहित आहे ना तुला! तिला बघितलं कि लग्न करावसं वाटत नाही. लग्न पद्धतीवरून विश्वास उडतो ग.”
“पण तसं नसतं ना तायडे प्रत्येकाच.”
“तेही ग, जावू दे, ये आत्या आली आहे का ग? येणार होती ना.. दिसली नाही अजून."
"हो ग, पण नाही आली अजून...”
दोघीही आत्या अंजली बद्दल बोलून गंभीर झाल्या होत्या.
समोरच्या भिंतीवर दोघीही बहिणी आणि आत्या अंजलीचा फोटो होता, सानू त्या फोटो समोर गेली आणि म्हणाली,
"ये राणी, बघना किती गोड दिसते आहे अत्तु... ती कॉलेजला होती ना, तेव्हा हा फोटो घेतला होता, तुला आठवते बाबांनी फोटोग्राफर बोलावला होता ना!”
“हो ग, त्यांना अत्तुचे फोटो हवे होते ना, तिच्या स्थळांसाठी...”
“हो ग, खूप सुंदर दिसायची अत्तु, आपण तर तिलाच बघत असायचो, तासन तास तिच्या खोलीत बसून राहायचो, तयार झाली कि जणू अभिनेत्री दिसायची ती... सुनिता पाटील म्हणायचे ना भीमा काका तिला... आणि आता कशी दिसते ग... तिच्या लग्नाच्या वेळी आपण लहान होता, पण तिने रेटलेला संसार बघता बघता मोठे झालो. आणि मग विश्वास उडत गेला माझा.”
“पण तायडे तिचं असं थाटात लग्नच झालं नाही ना ग, बिचारी!”
“पळून जावून लग्न केलं होतं माहित आहे ना?”
“हुम्म्म, काय मिळालं तिला ग, जोडीदार कसा आहे तिचा, ती कशी होती...”
“हो ना, कधी कधी अतुचे कॉलेजचे किस्ये बाबा किती मस्तीत सांगतात पण अतु समोर आली कि पाणी बघितलं आहे मी बाबांच्या डोळ्यात. जोडीदार खूप महत्वाचा असतो ग. नुसती जोडी बांधून नाहीना रेटता येत गाडा संसाराचा. आणि प्रेम म्हणजे असतं तरी काय ग... विश्वास आणि हवासा सहवास... नाही मिळाला अत्तुला. हीच खंत आहे आपल्या घरात प्रत्येकाच्या मनात."
"ताई हेही नक्की ग, पण आई बाबा आहेत ना जोडीदार आयुष्यभराचे... त्यांना बघितलं कि आजही लग्न पद्धतीवर विश्वास बसतो माझा.. नाही का?"
"हो, मग, माझा बाबा आहेच तसा... नाहीतर ह्या नुसत्या कट कट करणाऱ्या आईला कोण निभवून नेलं असतं."
राणी हसली, "म्हणूनच तुला ना घरात बाबांची चमची म्हणतात... संसार दोघांनाही सारखाच करावा लागतो. बाबांना जोड आहे आपली आई. म्हणूनच तर ते जोडीदार आहेत ना."
जोडीदार किती महत्वाचा असतो हे दोघीनाही माहित होतं. दोघीही अगदीच वेगळ्या विचाराच्या पण बंधनात होत्या प्रेमाच्या... तेच तर हवं असतं प्रत्येक नात्यात... जोडीदारच नातही असंच असतं ना, दोन विभिन्न विचारांचे मन एकाच वाटेने वाटचाल करत असतात, मग बघूया पुढच्या भागात कथा कशी वेळते ते....घरही राणीच्या मस्तीत शिरत सानुला उघडू पाहत होतंच, बहिणींच्या मस्तीत रमला होता सारा आसमंत आणि साऱ्यांनाच होती उत्सुकता सानुच्या पुढच्या निर्णयाची. भेटूया पुढच्या भागात लवकरच!
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments