जोडीदार तू माझा... भाग १३

 जोडीदार तू माझा...  भाग १३ 



राजनने त्याच्या घरी त्याचा निर्णय सागितला असल्याने मोहिते निवासात जरा आनंदाची लहर शिरली होती. घरात जोडीदारच्या गोष्टी सुरु होत्या आणि अंजू आत्या आली. हलकं फुलकं वातावरण काहीस गंभीर झालं होतं. भीमा काका आणि अरुण स्वयंपाक खोलीकडे कानोसा देत गप्प झाले होते. तसा हा प्रकार घरातल्या सर्वाना नवीन नव्हता. घरातल्या वातावरणात तिलाही फुलवावं हे आता सर्वांना नेहमीच होतं.

मग तिला बघताच, सानू तिला येवून बिलगली,

“ये अत्तु, कशी आहेस?”

अंजुने नुसती मान हलवत नजरने  ठीक असल्याच सांगितलं, तीच लक्ष अर्ध सुनीकाकी कडे होतं, तोच सानूने तिच्या चेहऱ्याला हात लावत तिच्या कडे वळवलं,

“काल का ग आलीस नाहीस?”

“अग सानू, नाही जमलं बेटा, आता आले ना, सांग बघू काय झालं काल...” आत्या अंजू नजर खाली करत बोलली. आणि सानूने परत तिचा चेहरा वर धरला,

“अत्तु, छकुली नीट आहे ना ग? रडलीस ना तू.”

“हो छकु नीट आहे ग.”

अंजूने मान वळवत डोळे पदराने पुसले, आणि ती कुठतरी बघत म्हणाली,

“माझं ग काय घेवून बसलीस, माझ्या डोळ्यात पाणी उरलं कुठे! जरा लाल होतात, जरा जरा गोष्टीत. लाली तर राहिली नाही मग डोळेच लाल होतात”

अंजू सहज बोलली, तिलाही हे नवीन नव्हतं आणि तिला तिच्यामुळे मोहिते निवासात आलेल्या आनंदाला कमी करायचं नव्हतं.

सानूही हे ओळखून होती, सुनीकाकी काही अंजूला खोदून विचारल्या शिवाय सोडणार नाही हे सानूच्या लक्षात आलं होतं, तिने अंजूला तिच्या खोलीकडे ओढलं.

“हुम्म्म... जावू दे,  कालं काय काय झालं ते सगळ आई सांगेल तुला नमक मीठ लावून, तिच्या सवयी नुसार. माझं काम आहे ग तुझ्याकडे. चल आधी खोलीत.”

तेवढ्यात सुनी काकी म्हणाली,

“अग सानू ती आताच आली ना, बसुदे ना तिला आमच्यासोबत.”

“अंजू येय ग इकडे, बसं जरा, किती दिवसांनी भेटलो आपण.”

सानू मध्येच म्हणाली,

“काकी तू बोल ना तिच्याशी नंतर, मला ऑफिसला निघायचं आहे. मी बोलते आधी. अत्तु तू ये ग इकडे, सुनीकाकी काही येवढ्यात निघायची, आईची तिला जावू द्यायची नाही.”

अंजलीने सुनीकाकीला हात दाखवत नंतर येते असं खुणावलं आणि ती सानूजवळ आली,

“काय ग, काय काम आहे तुझं?”

“माझे काही ड्रेस होते अल्टर करायचे, करशील ना ग?”

“हो दे की.”

सानूने तिच्या पर्स मधून हजार रुपये काढले आणि अंजलीच्या हातात ठेवले,

“ठेव आणि माझे ड्रेस अगदीच सुंदर फिटिंगचे कर. फुकट नको मला काही तुझं...”

अंजली बघतच राहिली, मनात विचार करत होती, कसं कळलं हिला मला पैस्याची गरज आहे हे. पण काहीच बोलली नाही. म्हणाली,

“सानू तुला नक्कीच आवडतील सगळे ड्रेस, आहेत कुठे.”

आणि ती च्या मागे तिच्या खोलीत ड्रेस घ्यायला गेली. खोलीत राणी राजनशी फोनवर बोलत होती, सानू आणि अंजली खोलीत आल्या, सानू राणीला म्हणाली,

“पेहला पेहला प्यार है, पहली पहली बार है.....

अहो राजन रावं, टाइम प्लीज, ब्रेक के बाद बात करो... और आगे बढो.... बातो से काम नही चलेगा... दिमाक चलाव... फिलाल टाइम है आपके पास...”

राणीनेही फोन स्पीकरवर टाकला, समोरून उत्तर आलं,

“जी, अब आपही साहारा हो... आप जो बोलो. दीदी और दादी दोन बन जावो.”

सगळे गाळे आणि मग शांतता होती, नंतर राजन हळूच म्हणाला,

“राणीची परीक्षा होवून जावू द्या, तोवर मी इकडे सांभाळतो, सगळे सोबत येणारच... जरा वेळ द्या मला. बघतो मी काय आणि कसं करायचं ते. बाकी तुम्ही आहातच ना सोबत आमच्या.”

“दिलाहो... वेळ दिलाच, काळजी घ्या. आणि काहीही असलं कि सांगा मला.”

आत्या अंजलीला काल घडलेला सर्व प्रकार जरा लक्षात येत नव्हता तरीही ती गुमान गप्प होती पण राणीला असं खुललेलं बघून काहीसं कळालं होतं तिला. तिच्या रडक्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं. जरा मनात काळजीही शिरली होती. तिला असं बघत सानू म्हणाली,

“अत्तु राजनला राणीशी पहिल्या नजरेत प्रेम झालंय, पठ्ठा बघायला मला आला आणि राणीला राजाला मिळाला.”

“अग पण राणी... “ अंजली जरा काळजीत म्हणाली.

“राणी... राणीला तो फ्रेंच कट दाढीवाला आधीच पसंत पडला होता... काय बाबा मग, राजाको राणीसे प्यार हो गया... पहली नजर मे पहिला प्यार हो गया.... "

आणि ती गुणगुणायला लागली,

“राजा को रानी से प्यार हो गया 
पहली नजर में पहला प्यार हो गया 
दिल जिगर दोनों घायल हुए 
तीरे नजर दिल के पार हो गया…

त्यात अंजू आत्यानेही कोरस दिला, डान्स करत दोघीही राणीला चिडवून सोडलं,

सानू, “अशी झाली ह्यांची प्रेम कहाणी सुरु आता. आपण काय बाहेरचे, बाहेरच बरे.”

राणी जवळ येत म्हणाली, “तायडे असं काही नाही, आजचं बोलणं सुरु केलंय ना ग, कशाला छळ्तेस, तू ना, जा बाई...”


“मी निघालेच आहे ऑफिसला, आता काय राणीला कुणाची गरज असणार.”

“तायडे, काहीही ग तुझं...”

अंजु आत्या हसली, राणीचा हाताने गोड  पापा घेतला तिने.

“असं आहे तर मग राणी, आणि राजा राणीची लव स्टोरी सुरु झाली आता...”  

“आणि तू ग सानू?”  बोलतांना आता अंजूने सानूच नाक पकडलं.

“ये अत्तु सोड ना ग, मला श्वास घेवू दे, अजून मला खूप काही करायचं आहे. नाक सोड ग, जगू दे अजून काही दिवस, अजून आपले हलाल होण्याचे दिसव आले नाही.”

“घे सोडलं, अग पण तो तुला बघायला आला होता ना ग?”

“तर काय झालं अत्तु, तू पण ना आता हे बोलू नको, कालपासून मी हेच ऐकत आहे... मला बघायला आला होता, मला बहायला आला होता... ते जुनं झालं आता... अब तो लव स्टोरी सुरु हो गई है !”

अंजू हसली, ड्रेसच्या घड्या करत साननूला काय काय करायचं विचारात तिच्या खोलीत बसली होती, सानू ऑफिससाठी तयार होतं तिला ते सांगत होती. अंजू कधी राणीकडे बघत होती तर कधी सानूकडे, म्हणाली,

“किती लवकर मोठ्या झाल्या ग तुम्ही दोघी, कालपरवा, मी अशीच तयार व्हायचे आणि तुम्ही दोघी मला बघत बसायच्या... बघा कसे लवकर दिवस बदललेत ना?”

काही वेगळीच कथा घरात सुरू झाली होती आणि मुख्य म्हणजे राजन सोबत होता राणीच्या... मुळात लव स्टोरी होती कि अरेंज हेही सांगता येत नव्हतं... नाहीका?

हॉलमध्ये बसले असलेले भीमा काका आणि त्यांची बायको, एकमेकांची अरुणसमोर खेचत होते.

“अरुण, तुला म्हणून सांगू, ही ना मला हेच ते माझ्या पायात न बसणारे हिने घतलेले जुते घालायला लावते रे, मी ना कंटाळलो आता. मला तर बायकोचा त्रास आहे रे.”

“मित्रा आपण सम दुखी आहोत रे! ह्या बायका ना आपल्याला छळ छळ छळतात.” अरुण ने भीमा काकाला टाळी दिली.

“हो का! आणि तुम्ही काय पुतळे बसून असता का हो?”

सुनी काकी भीमा काकाला ओरडत म्हणाली, आणि ती परत अरुणाला म्हणाली,

“अरुण दादा, तुम्हाला तर माहित आहे हे जुते घातले कि हे खाली हात परत येत नाहीत, मग काय होतं थोडं सहन करायला, काल घालायला तयार नव्हते, म्हणतात, माझी अंधश्रद्धा आहे... बघा ना आपल्या सानूच लग्न जुळलं नसलं तरी राणीचं जुडतय ना!”

 हे ऐकताच आरती जरा परत उदास झाली होती, तर भीमा म्हणाला,

“अहो वहिनी, कशाला मनाला लावून घेता, आपली सानू राजकुमारी आहे... बघा राजकुमार नक्की येईल तिच्यासाठी.”

“अहो हो, पण कधी? पुढ्या वर्षी माझी सानू तीसची होईल हो, आता हे राजनच स्थळ कसं सगळं जुळून आलं होतं, मुलगा बत्तीसचा होता आणि त्यांना सानूच्या वयाबद्दल काहीस हरकत नव्हती. पण... राहिलं, पोरीने नकाराच दिलाय, आनंद आहे, राणी राजनला पसंत पडली आणि उत्तम स्थळ हातून गेलं नाही अजूनतरी.”

आरतीच्या त्या विचाराने परत मंडळी गंभीर झाली होती. सगळ्यांना आता वाट होती ती राजनच्या घरच्यांची. सगळा निर्णय राजन वर होता. ही प्रेमकथा सूर झाली होती पण अजून काही कुणाला सुचत नव्हतं, प्रेमवीर निघाले होते त्यांच्या मार्गाने प्रेमाच्या वाटेवर, तुम्हीही वाट बघतायना पुढे कथेत काय होणार ह्याची. मग भेटूया पुढच्या भागात.


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments