जोडीदार तू माझा... भाग २१

 जोडीदार तू माझा...  भाग २१ मित्र कुठल्याही वयात एकत्र जमले तरी त्याच दिवसात परत डुबकी मारून फ्रेश होवून निघतात. तसचं होतं अरुण, आरती, भीमा आणि सदाच, पण काही पानं गळाली होती, वय सर्वांच वाढत होतं, जवाबदऱ्याही वळत होत्या. मुलं मोठी झाली की, जवाबदऱ्या कमी होत जातात हे गणित साफ खोटं आहे बरका!

उलट त्या वेगळं वेगळं वळण घेत वाढत असतात. लहान मुलांना वाढवण्यात आपण रमतो पण मोठ्या मुलांना समजून घेण्यात खर पालकत्व पणाला लागतं.

बाबा विचारात अंगणात आलेले तर भीमा काका येतांना त्यांना दिसले.

अरुण जरा डोकावत म्हणाला,

“काय भीमा इकडे कसा रे तू आणि सोबत कोण रे आलंय आज?”

भीमाच्या मागून सदा काका बाहेर आले,

“अरे दोस्ता मी रे, विसरलास काय गरीबाला मित्रा.”

अरे तू होय, तुला कसा विसरेन, तूच हल्ली आम्हाला विसरतोस..”

सदा हसला, हात जोडत म्हणाला,

“हा भीमा आला होता माझी चौकशी करायला म्हणाला तुझ्या कडे जातोय म्हणून, मलाही राहवलं नाही, खूप दिवस झाले तुला आणि आरतीला भेटलो नव्हतो.”

“ये रे तुझ्या बायकोच्या मैत्रिणीच घर आहे, तू कधीही ये इकडे, तसाही हल्ली दिसतोस कुठे.”

भीमा काका आता मधात बोलला,

“अरे अरुण ह्याला समजव ना, सात नंतर हा इग्रजी शिकवतो यार सर्व चाळीतल्या लोकांना. आणि माझ्या बहिणीला विनवत बसतो कि तिच्याकडे बोलावं म्हणून. आज ह्याला इकडेच आणला मी. वहिनी साहेबांना बोलावं बऱ... त्याच ह्याला काही सांगू शकतील. त्याचं नातं काही औरच आहे ह्याच्यासोबत.”

अरुणने आरतीला आवाज दिला,

“अग आरती सदा आलंय ग, जरा ये बाहेर.”

मग त्यांनी सर्वाना अंगणातच खुर्च्या टाकून बसायला लावलं आणि म्हणाले,

“आज जरा आम्ही बाहेर जाण्याचा बेत केलेला, आरती त्यासाठी तयार होतं आहे. बाळूला नौकरी लागली आणि सानू आज त्याला बाईक घेवून देत आहे. मग आज बाहेर जेवणाचा प्रोग्राम केलाय आमच्या प्रीय कन्यने.”

“अरे व्हा, मस्त... चला आपला बाळू मार्गावर लागेल आता, तुझी काळजी मिटेल नाही आता जराशी.”

“हो रे...”

“सानूला बऱ सुचतं असं, नाही कारे, बरोबर पोरगी जाणते सर्वांना धरून चालण.” सदा भावनिक होवून म्हणाला.

“काय रे नातवाचा फोन बिन येतो कि नाही.” अरुण खुर्चीवर बसत सदाला म्हणाला.

“हो रे येतो रोज, सुनबाई या म्हणते तिकडे, तिला कदाचित मुलाला बघायला आयाला ठेवावं लागतं...”

“असं म्हणतोस, बघ बाबा ते तुझं तुचं ठरव, आम्ही तुझ्या सोबत आहोत.” अरुणने भीमाला नजरेने इशारा करत म्हटल.

आरती सर्वांसाठी चहा घेवूनच बाहेर आली, सदाला म्हाणाली,

“काय जिजाजी आज कशी वाट चुकलात इकडे. आणि काय हे कशी अवस्था केलीय तुम्ही... आधीही माझ्या बहिणीला छळत होता आताही अशी स्वतःची अवस्था करून तिला तिकडे त्रास देता का?”

“अहो वहिनी हा रोज सात नंतर इग्रजीत भाषण देतो. आणि मग सगळे ह्याची चेष्टा करत असतात गल्लीत. स्वतःकडे लक्ष देत नाही हो, सूनेच ऐकत नाही आणि मुलाशी तर बोलतच नाही.” भीमा काका काळजीपोटी बोलला.

“हो आलंय माझ्या कानावर...” आरती चहा देत म्हणाली. 

सगळ्यांच्या गप्पा सुरु होत्या, तेवढ्यात अंजली गेट खोलून छकुली सोबत आत आली, येताच तिने भीमा काकाला आणि सदा काकाला वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, “वहिनी तुम्ही तयारी करा मी बघते ह्यांना काय हवं ते.”

“कशे आहात भीमा दादा तुम्ही, आज वहिनीला सोबत नाही आणलं.”

“सदा दादा, काय ही अवस्था करून घेतली तुम्ही. काळजी घेत जा ना, सुज्याला फोन करून सांगते मी.”

सदा डोळे चोळत म्हणाला, “सुरजला कशाला सांगतेस ग, तो आणि सुनबाई कधीची माझ्या मागे लागले आहेत, त्याला जराही सांगितलं तर तो मला घ्यायला येईल, माल नाही जायचं कुठे माझ्या जोडीदारच्या आठवणी आहेत इथे…”

आरती सदाला म्हणाली, “असं मग हे कारण आहे तर, आणि सारे सुरजला बोलतात कि तो  तिकडे बायको मुलासोबत बँगलोरला मजेत असतो आणि तुम्ही इकडे गल्लीत लोकांना इग्रजी शिकवता म्हणून. काय हो जिजाजी...” 

अंजली आल्या आल्या कप गोळा करायला लागली होतीच तर तिला थांबवत आरती म्हणाली,

“अग माझी तयारी झाली आहे, तू छकुलीला तयार कर, शाळेतून असचं आणलस ना तिला?”

“छकु जा ग राणीताईकडे, तुला तयार करून देईल ती. अंजू तू काही खावून घे आधी.” अंजली आत जाताच होती तर आरती परत ओरडली,

“छकुलीलापण दे ग काही खायला... फ्रीजमध्ये खीर आहे, घ्या दोघीपण, तिकडे पण जेवायला उशीर होईल.”

आता अंगणातल्या बैठकीत सर्व वयस्कर मंडळी होती. सगळे चिंतेत होते ते सानूसाठी... पण कुणीही दाखवत नव्हते. शेवटी चुप्पी सोडली भीमा काकाने, म्हणाले,

“सानूच काय सुरु आहे रे अरुण.... तिला काही वाईट तर नाही वाटत आहे ना कि राणीचं लग्न जुळतंय म्हणून...”

“आपली सानू तशी नाही रे भीमा...”

“हो रे तेही खरं, अरे मी ना सावंतांचा निरोपच घेवून आलेलो... राहूनच गेलं बघ सांगायचं... सावंत साहेब म्हणत आहेत कि टिक्याचा प्रोग्राम घ्यायचा, मी गेलेलो त्यांच्याकडे काल, जरा वातावरण बघाचय होतं मला तिकडलं , काळजी वाटत होती रे, सावंतबाई जरा वेगळ्या स्वभावाच्या आहेत ना. आपली राणी रे, फार जमवून घ्यावं लागेल तिला तिकडे, जाणवलं मला.”

अरुण जरा भावनिक होवून म्हणाला,

“भीमा! तू ना, जिगरी रे दोस्ता, तू आहेस म्हणून...”

“हो रे, राणी माझीही मुलगी आहेच ना, काळजी आहेच रे तिची, एकाऐकी सानूला पसंत करणारे अचानक राणीसाठी तयार झाले म्हणजे नवल वाटत होतं मला म्हणून जरा चक्कर टाकली मी सावंताकडे.”

आरती जरा काळजीत म्हणाली,

“मग?”

“मग काय, सावंतबाईंना जरा कमीपणा वाटतोय कदाचित पण सावंत साहेबांनी आपल्या राणीला लग्नानंतर तिकडल्या सारखं करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच म्हणणं आहे कि जसं बायकोला त्यांनी लग्नानंतर उभ केलं तसं ते सुनेलाही करतील, ह्याच शब्दामुळे सावंतबाई शांत आहेत. राणीने नशीब काढलं रे अरुण... झाली जरा खात्री मला, आता सगळं तिच्या जोडीदारावर निर्भर, राजन कसं सांभाळतो हे महत्वाच आहे. जोडीदार खरच खूप महत्वाचा असतो मित्रा. आणि तो आपल्या राणीला मिळालाय. सावंत साहेब जशे त्याच्या बाईसाहेबांच्या पाठीशी उभे आहेत तसंच राजन राहो म्हणजे मिळवलं, अजून काय हवं आपल्याला.”

अरुण आणि आरती मनातून आनंदी झाले होते. पण दुसऱ्या क्षणाला ते परत नाराज झाल्यासारखे झाले. त्यांना असं लटकलेलं बघून सदा म्हणाला,

“आरती तू सानूसाठी चिंतेत आहेस ना? नको करू काळजी, सानूचा जोडीदार नक्की येणारं बघ... आणि तो राजकुमारच असेल, कारण आपली सानू आहेच राजकुमारी. जवाबदारीने कसं वागायचं हे तिला अगदीच उमगतं आणि उत्तम राजकुमारी हे नक्कीच करते, नाही का रे अरुण.”

आरती परत काळजीच्या स्वरात म्हणाली,

“हो आपल्या सर्वाना आणि ह्या घराला त्या क्षणाची आतुरतेने वाट आहे.”

बोलणं संपल नव्हतच कि बाबांचा फोन वाजला, समोरून सानू बोलत होती,

“बाबा निघाले का तुम्ही सर्व, आमची बाईक आता मिळणारच आहे आम्ही निघू शोरूममधून लागलीच. तुम्ही सर्व निघा ना. मी ओर्डेर पण देवून ठेवला आहे. टेबल बुक आहे. तिथे गेलात कि नाव सांगा माझं.”

आणि तिला बाळूने बोलावल्याने तिने लगेच फोनही ठेवला.

सदा आणि भीमा आता उठले, भीमा काका म्हणाले,

“मी निघतोय, उद्या घटस्थापना आहे घरी, तयारी करायची आहे. सावंतांना काय कळवायच ते सांगा मला सानूशी बोलून.”

“सॉरी रे मित्रा, सानूने प्लॅन केलाय मग बाहेर जायचं आहे.” अरुण जरा हात जोडून म्हणाला.

“अरे मित्रा, काही नाही, आम्ही घरचेच आहोत... बऱ सानूला सांग बऱ मी आठवणं केली म्हणून. मीही आलो असतो पण आमच्या जोडीदाराने ही यादी दिली आहे ना सामानाची, घेतो आणि निघतो, आज सदाही माझ्यासोबत माझ्याकडे येतोय.”

हे बर केलं, आज आम्ही पण नाही घरी आणि हा सदा ना, रोज गोंधळ घालतो, बाळू जातो मग त्याला सांभाळायला, आपल्या गल्लीतील मुलं येतात सांगायला.

सदा, नको ना रे असं करत जावू. आता काय वय राहिलं तुझं.”

आरती, “जिजाजी अजिबात आवडत नाही मला, तुम्हांला असं कुणी चिडवलेलं, इकडे येत जा, घरी एकटेपणा वाटला की, हे घर किती दूर आहे. आणि तुमच्यासाठी काय घरात जागा नाही इथे.”

“आरती, राहुदे ना ग, कशाला बोलतेस तू... मला ना घरातून कुठेच जायचं नसतं... तुझ्या मंत्रिणीच्या आठवणी घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात आहेत.”

 मग काय झालं, मला बोलली होती ती, तुमच्यावर लक्ष ठेवायला. तिला काय सांगू. ते काही माहीत नाही. गुमान इकडे यायचं, नाहीतर सानूला सांगते. ती सारं समान इकडे शिफ्ट करते मग तुमचं.”

“नको ग पोरीला नको त्रास देवूस, मी येत जाणार आता इकडे. बघ हा मग तुचं म्हणशील मला.”

“काय म्हणले! आणि काही म्हटल तर तुम्हाला लागणार आहे?”

“नाही ग आरती, तुझं बोलणं लावून घेवून काय आता.”

सदाचे डोळे पाणावले होते. भीमाने त्याचा हात धरला.

भीमा, “निघतो रे, नाहीतरी आपला सदा भावनिक आहे. इथेच रडायचा. तुम्हाला वेळ होत आहे.”

दोघेही निघाले होते आणि, अरुण अरतीच्या जवळ आला, आरतीने अलगत तीची मान त्याच्या खांद्यावर टाकली,

“अहो, मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय.”

“मी तरी राहू शकतो का? आपलं तर ठरलं आहे, जायचं असेल ना तर सोबत जावूया देवाघरी सुद्धा, मला नाही राहायचं तुझ्याशिवाय.”

दोघंही हात घट्ट केले. आणि त्यांच्या घराकडे बघत होते.

भेटूया पुढच्या भागात…

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

 

Post a Comment

0 Comments