जोडीदार तू माझा ... भाग ३९

 


एखादं मोठं पाऊल उचलतांना आपल्याला कल्पना नसते की पुढं काय काय होवू शकते म्हणून.... अंकित आणि अनयाने भावनेच्या भरात लग्न केले, अर्थात प्रेम होतंच त्याचं पण प्रेमाचा मार्ग कुठे सोपा असतो! इथे दोन जीवांना जगतांना सर्वांना जगण्याची उमेद देत जगावं लागतं तेव्हा कुठे प्रेमाला जीवनदान मिळत असतं... वळूया आजच्या भागाकडे,

आलियाशी बोलून झालं आणि गोंधळलेला अंकित घरात आला, घाम पुसत तो सानू जवळ बसला,

“ताई, आज तर सुटलो आपण पण माहित नाही ग मला अजून पुढे काय होईल ते...”

“अरे माझ्या शेंबड्या... आधी गोंधळ करतांना विचार केला नाही, घाबरला नाहीस तर आता काय घाबरायचं, जब प्यार किया तो डरना क्या... तू घाबरू नको, मी आहे ना सांभाळते सारं, तू आधी अनुला सांभाळ, आम्ही सर्व खंबीर आहोत. मोहिते निवास आहे हा, पिढीजात घर आहे हे, इथल्या ना भिंती पोकळ आहेत ना मन....”

“तायडे हाच विश्वास आहे ना ग माझा...”

“हो रे, पण अनया नवीन आहे, तिचा ह्या घरातल्या प्रत्येकावर विश्वास असायला हवा, किती घाबरते ती, काय लग्न केलं ना! पळून तर गेले नाही तुम्ही... तिच्या मनात खूप गोंधळ आहे. आपण चूक केली असं काहीसं वाटतं तिला...”

घाम पुसत असणाऱ्या अंकितच्या जवळ जावून सानू म्हणाली.

अंकित दी च्या हातात हात देत पुढे म्हणाला,

“ताई ती खूप भावनिक आहे ग, मलाच कळलं नव्हत कि तिने कसा एवढा मोठा निर्णय घेतला, मी बोललो होतो कि थांबूया पण ती ठाम होती... आणि मग मी त्या वेळी तिच्या निर्णयाला नकार दिलाच नाही.”

“अरे तिला माहित होतं, जर तिने तो निर्णय घेतला नाही तर ती तुझी कधीच होवू शकणार नाही... आम्ही मुली असतोच अश्या... कधी कुठला निर्णय घ्यायचा हे पक्क माहित असतं आम्हाला... म्हणूनच म्हणते तू तिच्या सतत सोबत राहा, इथे घरातले कसेही तिच्याशी वागले तरी तिला दोष देवू नको... इथे सर्व तुझे आहेत पण तिचे व्हायला वेळ लागेल.”

सानू अंकितच्या हातावर हात ठेवत त्याला शांत करत म्हणाली.

अनया बडीसोप घेवून आली आणि सारेच गप्प झाले. कैलासने बडीसोप उचलली आणि म्हणाला,

“येतो मी, आता कधी भेटायचं ग सानू ?”

“ये ना लग्नात?”

“लग्नात? आपल्या?”

“ये गध्या! राणीच्या... “

“मग, येणारच ना, पत्रिका मिळाली मला, सालीसाहेबाच्या लग्नात काम करायला नको का...? असा बंदोबस्त लावतो ना... सालं कुणी बाहेरचं मांडवातही शिरायला नको.”

“ये बाबा... असं काही करू नको... लग्न आहे, शपतविधी नाही. कि तू कडक बंदोबस्त लावशील.” सानू त्याला हात जोडत म्हणाली.

“बरोबर, शपथ विधीच असते ती, मी असं करेन.... मी तसं करेन.... दोघही बोलतात... किती लोकं करतात हे मला विचार, पोलिसात अर्धे भांडण तर नवरा बायकोचेच येतात.”

“तरीही तू अगदीच तयार आहेस रे लग्नाला.” सानू त्याला ढोपरापासून वंदन करत म्हणाली.

“अरे शादी लड्डू मोतीचूर का... मग खावून घ्यायचा ना!”

“बाबा तुझ्याशी मी नाही जिंकू शकत रे.”

“मग हरलीस का? येवू उद्या माझ्या घरच्यांना घेवून?”

सानू आणि कैलासची मस्करी अगदीच घरच्या फाटकापर्यंत सरू होती तर समोर ऑटो थांबला, आई आणि बाबा उतरले. तसा कैलास धावला सामान घ्याला, आधी त्याने बाबांना आणि आईला वाकून नमस्कार केला नी सर्व सामान हातात घेतलं. कैलास घरी दिसताच आई जरा घाबरल्या सारखी झाली. सानूच्या जवळ येवून उभी राहिली तोच कैलास परत सामान ठेवून बाहेर आला,

“काकू मी असा येवू शकत नाही का घरी? मी जरा ह्याच मागच्या गल्लीत आलो होतो कामासाठी मग चक्कर टाकली इकडे. आणि योगायोग बघा आज सानूची भेट झाली. चला निघायला हवं, आई वाट बघत असेल.”

बाबा त्याला चांगलेच ओळखून होते, त्याची टांग ओढत म्हणाले,

“काय रे अजूनही आईच वाट बघते का तुझी?”

“बाबा काय करू, आपली कन्या रत्न अजून होकार देत नाही ना. मग माझी वाट आईच बघणार.”

“असं म्हणतोस, तू बघ बाबा तुझं... मी तर हात जोडले त्या परमेश्वराला... चालू द्या तुमचे प्रयत्न... आम्ही आहोत आपल्या मागे सदा.”

कैलासने हसतच बाबांचे चरण स्पर्श केले आणि त्याच्या बाईकची किकी मारली...  सानूला हात दाखवून तो निघून गेला. सर्व घरात आले. अजून राणी आलेली नव्हती तर सानूने तिला कॉल केला,

“राणी कुठे आहेस? किती वेळ झाला? आता घरापर्यंत सोडून माग राजनला.”

“अग ताई मी त्यांच्या सोबतच आहे, ह्यांनी रागिणी ताईला आणि तिच्या त्यांनाही बोलावून घेतलं मग आम्ही चौघ आहोत आणि जेवत आहोत, सगळं ठीक आहे ना तिकडे?”

“हो ग सगळं ठीक आहे, `ये रागिणीचा तो म्हणजे?

“म्हणजे, समज ना तायडे...

“बर कळालं मला...”

“मी बोलते ना तुझ्याशी घरी, आता नको ना ग विचारू...

“राहिलं, तू ये आरामशीर मग, पण राजनला सोडून माग...”

“हो हो, नक्की, रोहिणी ताई गाडी घेवून आल्या आहेत. आधी मला सोडतील आणि मग सगळे जातील असचं ठरलं आहे आमचं.”

सानूने फोन ठेवला आणि ती सर्वांसोबत येवून बसली, अनयाने सर्वांसाठी पाणी घेतलं होतं. ती आईसमोरही घेवून आली, पण तिने नकार दिला, मग बाबा ग्लास उचलत म्हणाले, “मला तर हवं बाबा पाणी, घरच्या पानाण्यानेच माझी तहाण जाते, काय ते बॉटलच पाणी आपल्याल नाही जमत.”

आईने लक्ष दिलं नाही आणि दागिने काढायला लागली. राणीचे दागिने खूप सुंदर होते, चंद्रहार नवीन डिझाईनमध्ये आणि नथ अगदीच नाजूक दिसत होती. आजीच्या तिच्यासाठीच ठेवलेल्या पाटल्या नवीन कोऱ्या करून आणल्या होत्या आईने. मोत्याचा कंबरपट्टा सुरेख होता, बघून अनया मनातल्या मनात मनाला कुरतडत होती. आईची नजर पडली तिच्यावर. आणि तिने शेवटचा बॉक्स काढला,

“बाळू हे घे, तुझ्यासाठी.”

बाळूने तो बॉक्स उघडला,

“आई हे कुणासाठी ग...?”

“हे तुझ्या बायकोसाठी, बांध आमच्या सर्वांच्या समोर, मोकळ्या गळ्याने फिरते ती... लग्नाची बायको आहे ना तुझी? आणि ऐक, आम्ही एका लहेन्ग्याचा ऑर्डर दिवून ठेवला आहे, ही रीसीप्ट घे... एक दोन दिवसात तिकडे कॉल कर आणि घेवून ये.”

बाबा मध्येच म्हणाले, “अनु ह्या काही साड्या आहेत, ह्यातल्या दोन तीन तू तुझ्यासाठी काढून घे, लग्नात घालायला.”

अनु आणि अंकित एकमेकांकडे बघत उभे होते, तर आईने परत इशारा केला. अंकितने बॉक्समधून मंगळसूत्र काढलं आणि अनुच्या गळ्यात बांधल.

सुंदर छोटंसं नाजूक मंगळसूत्र अनुच्या नाजूक गळ्यात शोभून दिसत होतं, सानू म्हणाली, “मस्त आहे डिझाईन, तुला मस्त दिसत आहे अनु, घ्या घ्या दोघेही आशीर्वाद घ्या.”

अनु आणि अंकितने आई बाबांचे आशीर्वाद घेतले, आईने विषय टाळण्यासाठी परत म्हंटल, “अगबाई स्वयंपाकाच काय ग सानू, चल आवरते पट पट, तू लावतेस का खिचडी... मी थकली ग आता.

अग आई तो आला होता ना सुनामी मग गप्पा एवढ्या रंगल्या कि मी काही केलंच नाही उलट त्यानेच ऑर्डर देऊन सर्व मागवलं आणि जेवलाही इकडे, मी सगळं गरम करून घेते, तू बस, फ्रेश हो जरा.

हुम्म्म, तुझा तो सुनामी कसा काय आला होता ग आज अचानक?”

सुनामी!!! तो सांगून येणार होता? आणि त्याला काय कुठलाही बहाणा लागतो.”

सानूने सहज विषय टाळला. बाबा तिला बघत होते. काहीतरी झालंय हे त्यांच्या लक्षात येत होतं. राणीही घरी दिसत नव्हती. बाबा राणीला आवाज देत होते,

राणी... राणी कुठे आहे सानू...?”

अरे सांगायचंच राहिलं तुम्हाला, राजनरावांचा त्यांच्या बहिणीसोबत काही प्लॅन होता बाहेर जेवणाचा, गेलेत घेऊन राणीला, सोडतील एवढ्यात.”

राजन रावांच नाव घेताच आई धास्तावल्या सारखी बघत म्हणाली,

“काय ग सगळं नीट आहे ना... अजून काही पसारा मांडू नका रे बाबा.... एका धक्याने अजूनही सावरलो नाही आम्ही... किती वेळ स्वतःलाच समजावत असतो अजून, काही नको रे बाबा... लाव तिला फोन..”

सानूने आईला हात दाखवत शांत केलं आणि राणीला फोन लावायला फोन हातात घेतलाच होता तर बाहेरून हॉर्नचा आवाज आला, बाबा सानू आणि अंकित बाहेर गेले, राणीला सोडायला राजन आणि रागिणी दोघेही आले होते. राणीला अगदीच फाटका समोर सोडून, गुड नाईट म्हणून राजन आणि रागिणी निघून गेले. राणीने सानूला इशाऱ्यात काही घडलं का विचारलं तर सानूने तिला मानेने नकार दिला आणि दोघीही घरात शिरल्या.

कथा मनात शिरत आहे ना... मग भेटूया पुढल्या भागात!

Post a Comment

0 Comments